The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दूरदर्शनपासून अमूलपर्यंत आयकॉनिक लोगो ‘या’ लोकांनी डिझाईन केलेत

by द पोस्टमन टीम
14 July 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


मोठमोठ्या कंपन्यांचे आयकॉनिक सिम्बॉल आणि लोगो वर्षानुवर्षे लोकांच्या लक्षात राहतात. अनेक वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे वैशिष्ट्यपूर्ण लोगो लोकांच्या मनात इतके घर करून बसले आहेत की, या लोगोशिवाय आपण त्या कंपनीची काल्पनाही करू शकणार नाही.

एअर इंडियाच्या लांबलचक झुबकेदार मिशीवाल्या महाराजांपासून ते अमूलच्या ठिपक्याठिपक्यांच्या पोलक्यातील अमूल गर्लपर्यंत अशा कित्येक सिम्बॉलनी आपल्या मनात घर केले आहे.

अमूल गर्लशिवाय आपण अमूलच्या जाहिरातीची कल्पना करू शकतो का? अजिबात नाही!

महत्वाचे म्हणजे हे सगळे सिम्बॉल आणि लोगोज या कंपनीसोबत वर्षानुवर्षे चिकटलेले आहेत. प्रश्न हा आहे की, इतक्या वर्षात लोकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारे आणि ब्रँडच्या नावात चार चांद लावणारे हे लोगो किंवा सिम्बॉल कुणाच्या कुंचल्यातून उतरले असतील?



असेच काही आयकॉनिक डिझाईन्स आणि त्यांचे कलाकार यांची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

नर्गिस वाडिया

नर्गिस वाडिया या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबईच्या विद्यार्थिनी. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एअर इंडियाच्या आर्ट स्टुडीओमध्ये दाखल झाल्या. एअर इंडियाचा जो झुबकेदार लांबलचक मिशीवाला महाराजा उतरला तो यांच्याच कल्पनेतून. नंतर वाडिया आणि टीमने या महाराजांना सोबत घेऊन कित्येक जाहिराती बनवल्या.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

१९५५मध्ये या महाराजांची कल्पना जन्मास आली होती. आज इतक्या वर्षांनंतरही आपण या महाराजांशिवाय एअर इंडियाची कल्पना देखील करू शकत नाही.

 

Air India Maharaja

या सिम्बॉलनंतर एअर इंडियाचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील प्रस्थ चांगलेच वाढले. जगभरातून या सिम्बॉलच्या कल्पकतेचे कौतुक करण्यात आले. एक स्त्री म्हणून जाहिरातीच्या क्षेत्रात काम करत असताना नर्गिसजींना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

अर्थात, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्या-त्या अडचणींवर मात करत आपले करिअर उभे केले. आज नर्गिस वाडिया हे जाहिरातीच्या क्षेत्रातील एक नामचीन व्यक्तिमत्व आहे.

शेखर कामत

१९६९ साली १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने स्वतःचे रूप पालटून नव्या अवतारात लोकांसमोर यायचे ठरवले, आणि यासाठी त्यांना नवीन लोगोची गरज होती. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने डिझायनिंग करणाऱ्या वेगवेगळ्या राष्ट्रीय संस्थांकडून डिझाईन्स मागवले.

१ ऑक्टोबर, १९७१पासून SBIचा नवीन स्वतःची वेगळी ओळख असणारा लोगो वापरात आला.

 

SBI Logo designed by Shekhar Kamat

एका वर्तुळाच्या मध्यभागी किल्ली घालण्याच्या छिद्राचे हे डिझाईन शेखर कामत यांनी बनवले होते.

त्यांच्यासोबत या टीममध्ये विकास सातवळेकर होते, प्रा. दशरथ पटेल यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते. प्रा. दशरथ पटेल हे या डिझाईन विभागाचे प्रमुख होते. तर, या सिम्बॉलसोबत जो फॉंट वापरण्यात आला आहे तो, महेंद्र पटेल यांनी डिझाईन केला होता.

युस्तेस फर्नांडिस

लाल रंगाच्या ठिपक्या-ठिपक्यांच्या पोलक्यातील अमूल गर्ल तर लाखो लोकांच्या गळ्यातील ताईत आहे. अमूलच्या होर्डिंग्जमधील जाहिरातीतून ही अमूल गर्ल लोकांना कधी हसवते कधी रडवते, कधी चिमटे काढते, कधी मिश्कील विनोद करते तर कधी अंतर्मुख करते.

अशा या आपल्या अमूल गर्लच्या या रेखाटनाची कल्पना होती युस्तेस फर्नांडीस यांची.

Yustes Fernandes

गोबऱ्या गालाच्या या अमूल गर्लच्या ठिपक्या ठीपक्याच्या पोलक्यापासून ते तिचे निळे केस आणि त्यावरच्या रिबिनीपर्यंतची कल्पना युस्तेस फर्नांडीस यांनीच मांडली होती. त्यानंतर निशा दाकुन्हा यांनी त्याला ‘अटर्ली बटर्ली डेलीसियश’ ही पंच लाईन दिली.

ती ओळ आणि मिश्कील अमूल गर्ल लोकांच्या इतकी पसंत पडली की, या दोहोंशिवाय अमूलची कल्पना करता येणे शक्यच नाही. फर्नांडीस यांनी अमूलच्या या रेखांकनाच्या कामाला १९६९पासून सुरुवात केली. १९७४पासून आजतागायत अमूलच्या जाहिरातीत हे सिम्बॉल वापरले जात आहे.

सुदर्शन धीर

हिंदुस्तान पेट्रोलियम (HP), टायटन, द इस्सार ग्रुप, रहेजा कॉर्प, किसान, IDBI बँक आणि सेंच्युरीअन बँक – या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती कॉमन आहे, ती म्हणजे सुधीर धीर. या एकाच व्यक्तीने या सगळ्या कंपन्यांचे लोगो आणि ब्रँड डिझायनिंग केले.

फक्त याच कंपन्या किंवा ब्रँडसाठी नव्हे तर अशा शंभरहून अधिक कंपन्यांसाठी धीर यांनी लोगो आणि सिम्बॉल डिझायनिंगचे काम केले आहे. धीर यांनी ग्राफिक डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केला आणि त्यानंतर फाईन आर्ट्सचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी नॅशनल ऍडव्हर्टायजिंग आणि एमसीएम सारख्या जाहिरात एजन्सीत काम केले.

देवाशिष भट्टाचार्य

दूरदर्शन आणि त्यावरील जाहिरातीच्या काळाची ती नुकतीच सुरुवात होती. अशावेळी या राष्ट्रीय प्रसारण चॅनेलला स्वतःचा असा एक युनिक लोगो हवा होता. या आयकॉनिक लोगोचं डिझाईन बनवलं होतं एनआयडीच्या एका विद्यार्थ्याने. त्याचं नाव होतं देवाशिष भट्टाचार्य.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्याकडे आलेल्या १४ डिझाईन्समधून एनआयडीचं डिझाईन निवडलं. आजही दूरदर्शनचा तो लोगो बघताच आपल्याला आपले बालपणीचे दिवस, त्यासोबत जोडलेल्या आठवणी डोळ्यापुढे येतात.

आर. के. जोशी.

आर. के. जोशी हे एक नामांकित कॅलीग्राफर आहेत. मुळ कोल्हापूरचे असणाऱ्या आर. के. जोशी यांनी मुंबईच्या जे. जे. आर्ट्समधून अप्लाइड आर्ट्सचचे शिक्षण घेतले. १९५२ साली त्यांनी आपली पदवी पूर्ण केली.

आपल्या कलेत स्वदेशी परंपरांतील चिन्ह, आकार, आकृती यांना स्थान देण्यात आर. के. यांचा वेगळाच हातखंडा आहे. त्यांच्या डिझाईन्सचे हेच एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.

 

उदाहरणार्थ, त्यांनी डिझाईन केलेला पंजाब नॅशनल बँकेचा युनिक लोगो. हा लोगो बनवताना त्यांनी गुरुमुखी लिपीचा वापर केला आहे. सुरक्षित ठिकाणी रक्कम जमा केल्याचे या चिन्हातून सांकेतिकपणे सूचित केले आहे. या चिन्हात वापरण्यात आलेला भगवा रंग भारतीय परंपरेचे प्रतिक असल्याने त्यातून एक वेगळा ठसा उमटतो.

ब्रँड आणि त्यांना लोकप्रिय करणाऱ्या लोगो आणि सिम्बोल्समागे अशा अज्ञात कलाकारांचा हात असतो. त्यांच्या अफाट कल्पकतेतून साकारलेल्या या प्रतिमांनी आपल्यावर एक अमिट ठसा उमटवलेला असतो ज्यामुळे कुठलीही कंपनी किंवा ब्रँड आपल्याला आपल्या जवळची वाटू लागते. ग्राहक आणि कंपनी यांच्यातील दुवा बनण्याचे अनोखे काम अशा प्रतिमांच्या माध्यमातून नकळतपणे होऊन जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

देश स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा क्रांतिकारक मोहन रानडे चौदा वर्षे पोर्तुगीजांच्या कैदेत होते

Next Post

अमेरिकेचा पाया रचणाऱ्या ‘या’ तेलाच्या बादशहाची अमेरिकन संसदेने पब्लिक ट्रायल घेतली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

अमेरिकेचा पाया रचणाऱ्या 'या' तेलाच्या बादशहाची अमेरिकन संसदेने पब्लिक ट्रायल घेतली होती

औरंगाबादवरून येऊन पुण्याची कोतवाली मिळवणारा घाशीराम कोतवाल कोण होता..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.