The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेचा पाया रचणाऱ्या ‘या’ तेलाच्या बादशहाची अमेरिकन संसदेने पब्लिक ट्रायल घेतली होती

by अनुप देवधर
7 June 2025
in ब्लॉग, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


एकोणीसावं शतक मध्य ओलांडून पुढं जात होतं. साल होतं १८५९. अमेरिकेतल्या पेनसिल्वेनियाच्या टायटसव्हीलमध्ये २७ ऑगस्ट रोजी जगातली पहिली तेलविहिर खोदली गेली होती. जमिनीच्या पोटातून निघणारा हा पदार्थच सगळ्या जगाला आपल्या तालावर नाचावणार होता.

पुढे जगात ज्या काही असंख्य घटना घडल्या, त्याच्यामागे हे तेल आणि तेलाचं अर्थकारण, राजकारण होतं. मग दोन्ही महायु*द्धांपासून देशांचे आकार बदलणं किंवा नव्या राष्ट्रांचा उदय असो. देशांचं विकसित किंवा विकसनशील देश असं वर्गीकरण झालं, कारण विकसित देशांकडे एकतर तेल होतं, किंवा त्यांच्या राज्यकर्त्यांना तेलाचं महत्त्व समजलं होतं.

हे सगळं सुरू असतानाच साधारण वीसेक वर्षांपूर्वी म्हणजेच ८ जुलै १८३९ रोजी अमेरिकेच्याच न्यूयॉर्क जवळच्या रिचफोर्डमध्ये एका खेड्यातल्या सर्वसामान्य कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला.

नाव होतं जॉन डी. रॉकफेलर.



वडील विल्यम पोटापाण्यासाठी मिठापासून गावठी औषधांपर्यंत काही पण विकायचे. याला पण असाच वारसा. एकदा शाळेत असताना चक्क आपल्याच घरच्या अंगणातल्या कोंबड्या विकून आला. पुढं थोडा मोठा झाल्यावर गावच्या बाजारात भाजी, अंडी विकायला लागला.

नंतर जॉनने एका पुस्तकाच्या दुकानात कामाला सुरुवात केली. पगार होता आठवड्याला $3.57. पुढे मालकाने काम बघून पगार $25 केला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

असले काहीतरी भुरटे उद्योग करतानाच त्याचं लक्ष नुकत्याच शोध लागलेल्या रॉकेलकडे गेलं. त्याने साठवलेले $1000 डॉलर्स आणि वडिलांकडून $1000 डॉलर्स व्याजाने घेतले. आपला लहानपणापासूनचा साथीदार मॉरिस क्लार्कच्या साथीनं थेट पेनसिल्वेनिया गाठलं, आणि तिथल्या नगरपालिकेचं रस्त्यावरच्या दिव्यांसाठी रॉकेल पुरवण्याचं काम मिळवलं. या कामाने त्याला चांगलं स्थैर्य आणि पैसे मिळाले.

त्याने प्रयत्नपूर्वक आसपासच्या अनेक गावांतल्या अशा रस्त्यावरच्या रॉकेलच्या दिव्यांसाठी लागणारं रॉकेल पुरावण्याची कामं घेतली.

जॉनने काळाची पावलं लवकरच ओळखली, आणि हे तेल ज्याच्याकडे आहे, त्याचंच जग आहे अशी त्याची भावना झाली. आणि ऑइल रिफायनारीत पैसे घातले.

२७ ऑगस्ट १८५९ रोजी जन्माला आलेलं हे तेलरूपी बाळ आता चांगलंच बाळसं धरू लागलं. आपल्याकडे कसं एखाद्या वर्षी सगळे कांदे तर कांदेच करू लागतात तसं कर्नल एडविन ड्रेकच्या यशानं प्रेरीत होऊन अनेकांनी तेलविहिरी खणायचा सपाटाच लावला. त्यामुळे तेलाचे दर कोसळून सगळे कफल्लक झाले. बिचारा ड्रेकही त्याला अपवाद नव्हता.

१८६५ नंतर मात्र या खेळात रंग चढू लागला होता. अशाच एका बुडीत कंपनीचा लिलाव सुरू होता, आणि दोन मित्र त्यावर बोली लावत होते. तसे ते एकमेकांचे जोडीदारच; पण एक जण थांबला. ५०० डॉलर्स पासून सुरू झालेली ही बोली कुठपर्यंत गेली असावी? चक्क ७२ हजार डॉलर्स!!! बोली संपल्यावरसुद्धा दुसरा मित्र थांबला नाही. शेवटी ७२,५०० डॉलर्सची बोली लावून थांबला.

आता हा खेळ माझा आहे आणि या खेळाचे स्टॅण्डर्ड मीच ठरवणार, असं सांगून त्याने आपल्या नवीन कंपनीचं नावच जाहीर केलं. ‘स्टॅण्डर्ड ऑइल’. आणि त्या दोन मित्राचं नाव होतं. जॉन डी रॉकफेलर आणि मॉरिस क्लार्क!! गर्जना केल्याप्रमाणे खरोखरच पुढची अनेक वर्षं तेलाचा सगळा खेळ जॉन डी रॉकफेलरच्या हातात राहिला.

रस्त्यांच्या दिव्यांसाठी लागणाऱ्या तेलाची ऑर्डर त्याला मिळतच होत्या. आता त्याच्याकडे तेलविहिर आणि स्वतःचीच रिफायनारी होती. त्याला तेल साठवण्यासाठी लागणाऱ्या पत्र्याच्या डब्यांची गरज लागत होती. त्यासाठी त्याने पत्र्याचे डबे बनवायचा स्वतःचाच कारखाना सुरू केला. त्यानंतर त्याने मोठे टँकर्स बनवले. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तेल नेण्यासाठी त्याने स्वतःचीच व्यवस्था बनवली. पुढे त्याला रेल्वेच्या वॅगन ची गरज पडू लागली. त्याने तेही बनवले. वॅगन तर झालेच, पण ते ने-आण करण्यासाठी त्याने चक्क स्वतःचा रेल्वेमार्गच टाकला.

या सगळ्या व्यवसायाशी संबंधित लहान मोठ्या अशा एक दोन नाही तर चक्क चाळीस कंपन्या ‘स्टॅण्डर्ड ऑइल’ आपल्या पोटात घेतल्या. त्याच्याकडे आता सगळीच सत्ता एकवटली. सगळी व्यवस्थाच त्याच्या पुढे झुकायला लागली.

एकूण त्यावेळच्या अमेरिकेतल्या तेलव्यवसायाच्या उलाढालीतला रॉकफेलरचा वाटा तब्बल 95 % पर्यंत पोहोचला होता.

आता मात्र सगळ्यांच्या पोटात गोळा आला होता. आपल्या महाकाय संपत्तीच्या जोरावर रॉकफेलर अमेरिकेच्या राजसत्तेलाच आव्हान देईल अशी शंका वाटायला लागली. आता सरकार ‘स्टॅण्डर्ड ऑइल’चं साम्राज्य पाडायचा विचार करायला लागलं.

अमेरिकेतला एक सेनेटर जॉन शेरमनने एक कायदा तयार केला. ‘शेरमन अँटी ट्रस्ट ऍक्ट’ म्हणून त्याला ओळखलं जातं. दोन वर्षानंतर ओहायो सुप्रीम कोर्टाने स्टँडर्ड ऑइल ट्रस्ट बंद करायला भाग पाडलं. रुझवेल्ट यांनी रॉकफेलर यांच्यावरचा खटला जोमाने लढवला. त्यानंतर ‘स्टॅण्डर्ड ऑइल’ची मक्तेदारी संपवण्यात आली.

हे सगळं घडत होतं, तेव्हा १९१०-१९११ साल उजाडलं होतं. त्यावेळी रॉकफेलर यांची संपत्ती किती असावी ?

२५० बिलियन डॉलर्स! (२५ हजार कोटी डॉलर्स)

म्हणजे आताच्या जगात सगळ्यात श्रीमंत असणाऱ्या मायक्रोसॉफ्टचा मालक बिल गेट्सच्या दुप्पट! तेही १९११ साली. यावरून त्याच्या त्यावेळच्या ताकदीचा अंदाज येऊ शकतो.

आपल्या अफाट संपत्तीच्या जोरावर आपलं साम्राज्य निर्माण करून एकामागून एक कंपन्या ताब्यात घेणारा रॉकफेलर आणि नंतर आपली प्रचंड मोठी संपत्ती दान करणारा रॉकफेलर चांगला होता की वाईट, हे इतिहासात एक कोडंच राहिलं.

पण रॉकफेलरच्या ‘स्टॅण्डर्ड ऑइल’चे तुकडे होऊन निर्माण झालेल्या कंपन्या म्हणजेच आताच्या एक्झॉन मोबिल, एस्सो, शेवरॉन, टेक्साको एका अर्थाने ‘स्टॅण्डर्ड’ आणि रॉकफेलर या दोघांच्याही अस्तित्वाची जाणीव करून देतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

दूरदर्शनपासून अमूलपर्यंत आयकॉनिक लोगो ‘या’ लोकांनी डिझाईन केलेत

Next Post

औरंगाबादवरून येऊन पुण्याची कोतवाली मिळवणारा घाशीराम कोतवाल कोण होता..?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

औरंगाबादवरून येऊन पुण्याची कोतवाली मिळवणारा घाशीराम कोतवाल कोण होता..?

भारताच्या पहिल्या निवडणुकीसाठी बॅलट बॉक्सेसचा जुगाड कसा केला..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.