The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यात कोरोना थैमान घालत असताना या गावात कोरोनाचा अजून एकही रुग्ण नाही..!

by द पोस्टमन टीम
8 June 2020
in विश्लेषण, आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


सध्या फोन हातात घेतला की, बातम्या लावल्या की फक्त एकच गोष्ट दिसते. कोरोना, कोरोना आणि कोरोना!

गेल्या काही महिन्यांपासून या कोरोनाने सगळ्यांच्या नाकात दम आणला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात हा विषाणू पसरला आहे. भारतात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

तरीही कुठल्या ना कुठल्या मार्गाने हा गावागावात पोहचला आहे. शहराकडे नोकरीसाठी आलेले लोक तिथेच अडकून न पडता होईल तसं आपापल्या गावाकडे परत गेलेत. खासकरून पुण्यामुंबईतील नोकरदार वर्ग.जे साधन मिळेल त्याने लोक आपापल्या घरी परतले आहेत. साहजिकच यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा वाढू लागला.

पण आज पुणे-सोलापूर महामार्गावर एक असं गाव आहे ज्या गावात एकही कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण नाही.



सोरतापवाडी! फुलांचं गाव!

पुण्याजवळ सोलापूर महामार्गाला लागूनच असणारं दहा हजार लोकसंख्येचं गाव. आज पुणे शहर, पिंपरी-चिंचवड याबरोबरच पुणे जिल्ह्यातील उरळीकांचन, लोणी काळभोर यांसारख्या इतर अनेक गावांत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सोरतापवाडी येथील अनेक गावकरी उरुळी कांचन, पुणे याठिकाणी कामासाठी सतत जाणं येणं करत असतात पण असे असूनही सोरतापवाडीमध्ये मात्र एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

याचं मुख्य कारण म्हणजे येथील ग्रामपंचायतीच्या मदतीने सर्व ग्रामस्थांनी घेतलेली योग्य काळजी, सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं योग्य पालन. अगदी सुरुवातीपासून पाळण्यात येणारं सोशल डिस्टसिंग आणि निर्जंतुकीकरण यामुळे आज गाव कोरोना फ्री आहे.

हे सगळं त्यांनी कसं साध्य केलं?

यावर सोरतापवाडीचे सरपंच सुदर्शन चौधरी सांगतात की पूर्व हवेलीमध्ये ज्यावेळी पहिला रूग्ण आढळला त्याचवेळी समस्त ग्रामस्थांनी एकत्र येऊन घेतलेल्या बैठकीत यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केली. यामध्ये गावात सगळीकडे सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली. तसेच सोडियम हायपोक्लोराईडने गावात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याची सोय केली गेली. जेव्हा कोरोनाचा धोका जाणवू लागला त्यावेळी सोरतापवाडी गावात ३ हजार माहिती पत्रकांचे वाटप ग्रामपंचायतीच्या मार्फत घरोघरी करण्यात आले. या माध्यमातून लोकांना कोरोना विषाणू म्हणजे नेमकं काय आहे? आणि त्यापासून कशाप्रकारे बचाव करता येईल याची संपूर्ण माहिती साध्या आणि सोप्या भाषेत देण्यात आली.

आशा वर्करच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात. ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसून आली त्यांची यादी करून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आली.

एवढेच नाही तर केंद्र शासनाने सांगितलेले आरोग्यसेतू ऍप गावातील अडीच हजाराहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. या ऍपच्या माध्यमातून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची माहिती ग्रामस्थांना मिळते. त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याच्या बाबत असणाऱ्या समस्याही लक्षात येतात. जेणेकरून त्यांना पुढील उपचार आणि काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करता येते. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शिक्षक यांच्या मदतीने ग्रामस्थांच्या फोनमध्ये हे ऍप डाउनलोड करून त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

sudarshan choudhary

आज केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या ऍपचे सगळ्यात जास्ती डाउनलोड सोरतापवाडी या गावात करण्यात आले आहे.

सरपंच सुदर्शन चौधरी या सगळ्याचे श्रेय ग्रामस्थांच्या बरोबरच माजी सरपंच सागर चौधरी, उपसरपंच भाऊ चौधरी, ग्रामविकास अधिकारी संतोष नेवासे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चौधरी, सुनीता कड, भारती चौधरी, स्वाती चोरघे, सहदेव सावंत, अलका चौधरी, बापूसाहेब वाल्हेकर, संजय जगताप, चंद्रकांत चौधरी यांना देतात.

आज सोरतापवाडीने राज्यातील सगळ्या गावांपुढे आदर्श निर्माण केला आहे. योग्य नियोजन करून कोरोनापासून वाचू शकतो हाच संदेश या कोरोना फ्री गावातील सगळे गावकरी आपल्याला देतायत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

काय आहे भारत आणि नेपाळच्या सीमावादाचा सुगौली करार..?

Next Post

हॉलीवूड कलाकार रोनाल्ड रेगन सर्वांत वयस्कर आणि लोकप्रिय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
Next Post

हॉलीवूड कलाकार रोनाल्ड रेगन सर्वांत वयस्कर आणि लोकप्रिय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते

डार्क - नेटफ्लिक्सची प्रचंड गुंतागुंतीची आणि धरून ठेवणारी पाहायलाच हवी अशी सिरीज

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.