The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिमालयात सापडणारी ही औषधी जडीबुटी लाखो रुपयात विकली जाते

by द पोस्टमन टीम
31 May 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारतात सोन्याला किती महत्त्व दिले जाते, हे आपण सर्वजण जाणतोच. पण, इथे हिमालयाच्या डोंगररांगात आढळणारी आणखी एक वस्तू आहे, जिला सोन्यापेक्षाही जास्त मागणी आणि भाव आहे. हिमालयातील स्थानिक लोक तिला यार्सागुम्बा म्हणून ओळखतात.

पण, हे यार्सागुम्बा आहे तरी काय, एखादा धातू, वनस्पती, फुल की फळ?

तर हे यार्सागुम्बा एक बुरशी आहे. हो हो! अशी बुरशी जिला सोन्यापेक्षाही जास्त मागणी असून ती सोन्यापेक्षाही जास्त भावात विकली जाते. विशेष म्हणजे, ही बुरशी फक्त हिमालयाच्या डोंगररांगांमध्येच मिळते.

हिमालयातील बर्फाच्छादित डोंगरातील वातावरण या बुरशीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे. नेपाळ, भूतान आणि तिबेटमधील हिमालयाच्या डोंगरांवर ही वनस्पती आढळते. या फंगसमुळे अनेक दुर्धर व्याधी बऱ्या होतात असा समज आहे. म्हणून या फंगसला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे ही बुरशी गोळा करणे, ती सुकवणे आणि नंतर ती व्यापाऱ्यांना नेऊन विकणे हा या प्रदेशातील स्थानिक लोकांचा व्यवसायच बनून गेला आहे. या फंगस गोळा करण्याच्या धंद्याने इथल्या अनेक कुटुंबाचा कायापालट करून टाकला आहे. अर्थात ही बुरशी गोळा करण्याच काम वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही.



यार्सागुम्बा ही एक अशी बुरशी आहे, जी मोठ्या फुलपाखराच्या अळीला मारून तिच्यावर वाढलेली असते. फुलपाखराच्या या अळीला नेपाळी भाषेत यार्सागुम्बा म्हणतात. ही अळी मे-जूनमध्ये आपले जीवनचक्र पूर्ण करते. मृत फुलपाखराची ही आळी स्वतःला जमिनीत पुरून घेते आणि तिच्यावर हळूहळू ही बुरशी वाढीस लागते.

अर्थात, फक्त उन्हाळ्याच्या दिवसातच ही बुरशी वाढत असते. त्यामुळे याच चार महिन्यात यार्सागुम्बा गोळा करून वर्षभर पुरेल इतका पैसा कमावता येतो. परंतु, एका मृत किटकापासून तयार होणारी ही बुरशी म्हणजे जगातील सर्वात महाग जैविक संसाधन आहे. या बुरशीला गोड चव असल्याचं म्हटलं जातं. हिमालयाच्या अगदी वरच्या भागात, तिबेटन पठारावर ही बुरशी येते. याला हिमालयन वायग्रा, किडा जडी, या नावाने देखील ओळखले जाते. हिमालयन वायग्राचं वैज्ञानिक नाव कोर्डीसेप्स सायनेसीस आहे. 

२००० वर्षापूर्वी चीनच्या पारंपारिक वैद्यकशास्त्रात या बुरशीचे अनेक औषधी उपयोग सांगितलेले आहेत. हे एक मौल्यवान टॉनिक असून, शरीरातील उत्साह, वाढवण्यासाठी, फुफ्फुसाची ताकद वाढवण्यासाठी आणि किडनीच्या आजारावर तसेच कॅन्सर आणि अस्थमासारख्या आजारावरही गुणकारी असल्याचे म्हटले गेले आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

नपुंसकतेवर मात करण्यास या औषधीचा विशेष मदत होत असल्यानेही याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

तसेच, लैंगिक इच्छा आणि शक्ती वाढण्यासाठी ही औषधी अत्यंत उपयुक्त असल्याचा समज हजारो वर्षापासून प्रचलित आहे. कामोत्तेजक पदार्थ असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील या बुरशीला प्रचंड मागणी आहे. म्हणूनच एक ग्रॅम यार्सागुम्बाची किंमत १८$ इतकी आहे.

बुरशीचे एक खोड साधारण अर्ध्या ग्रॅमपेक्षा कमी असते. चीनमध्ये याच्या व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. तिथे याची किंमत सुमारे १००$ प्रती ग्रॅम इतकी आहे. अर्थात, या बुरशीच्या औषधी गुणाबाबत आधुनिक विज्ञानाने अजूनही मान्यता दिलेली नाही.

बीजिंगमध्ये तर सोन्याच्या तीनपट भावाने ही बुरशी विकली जाते. ही बुरशी पाण्यात उकळून किंवा सूप करून किंवा अन्य पदार्थांत मिसळून खाल्ली जाते. या बुरशीला असलेली मोठी मागणी आणि हवामानातील बदल यामुळे या बुरशीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रतिष्ठित लोकांमध्ये याला स्टेटस सिम्बॉल म्हणून पहिले जाते. रशियन लोक ज्यापद्धतीने शाम्पेन देऊन पाहुणचार करतात तसेच चीन आणि तिबेटमध्ये पाहुण्यांना याचे सूप देणे प्रतिष्ठेचे मानले जाते. हिमालयाच्या विपारती वातावरणात राहून ही वनस्पती गोळा करणाऱ्या लोकांना कधीकधी जीव देखील गमवावा लागतो.

मे-जूनच्या दरम्यान स्थानिक लोकांमध्ये अक्षरश: ही बुरशी गोळा करण्यासाठी स्पर्धा लागलेली असते. अनेक दिवस बर्फाळ डोंगरात हे लोक झोपड्या बांधून राहतात. गोठवणाऱ्या थंडीत ही बुरशी गोळा करणे खूपच कठीण काम असते. जमिनीच्या वर २ इंच वाढणारी ही बुरशी जमिनीच्या आत पाच-सहा इंच खोलवर पसरलेली असते.

काही ठिकाणी लोक याची शेती देखील करतात. भारतात अशी शेती करणे किंवा या बुरशीचा व्यापार करण्यावर बंदी घातलेली आहे. नेपाळ सरकारनेदेखील या बुरशीच्या व्यापारावर बंदी घातली होती. मात्र २०११ साली त्यांनी ही बंदी उठवली.

यार्सागुम्बा हिमालयाच्या टोकावर आढळून येते. अशा ठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाणही खूपच कमी असते. त्यात वर्षातील फक्त एकाच ऋतूत बक्कळ पैसा कमवण्याची संधी मिळत असल्याने, लोकं ही बुरशी गोळा करण्यासाठी जीवाचे रान करतात. शेती नंतर रोजगार मिळवून देणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय आहे.

विशेष म्हणजे यार्सागुम्बा गोळा करण्यासाठी जाणाऱ्या या पहाडी लोकांकडे बर्फातून चालण्यासाठी लागणारे विशेष शूज, थंडीपासून सरंक्षणासाठी पुरेसे उबदार कपडे यांचीदेखील वानवा असते. अत्यंत थंड वातावरणात झोपडी बांधून राहावे लागत असल्याने त्यांच्याकडे स्व-सरंक्षणासाठी लागणारी पुरेशी साधनेदेखील नसतात. २०१४ साली गोठवणाऱ्या थंडीने १३ लोकांचा जीव घेतला होता.

गोठवणाऱ्या थंडीसोबतच हिमस्खलन, ऑक्सिजनची कमतरता आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या, बर्फावर झोपणे अशा कितीतरी धोकादायक प्रसंगांना तोंड द्यावे लागते. यार्सागुम्बा गोळा करण्याच्या वादातून कधी कधी लोक एकमेकांचा जीव देखील घेतात. एकीकडे ही बुरशी इतरांसाठी संजीवनी ठरत असली तरी, कधीकधी या पहाडी लोकांसाठी ती मृत्यूचे आमंत्रणच ठरते.

गेली कित्येक वर्षे या सिझनमध्ये हिमालयाच्या पहाडांवर अशा गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. संसाधानांसाठी होणारा संघर्ष, वादविवाद, लुटमार आणि कधीकधी तर खू*न देखील केले जात आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या क्रांतीकारकाने स्वदेशीच्या आग्रहासाठी स्वतःचं बलिदान दिलंय

Next Post

मानसिक आजार म्हणजे भूतबाधा ही अंधश्रद्धा या माणसाने दूर केली आहे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

मानसिक आजार म्हणजे भूतबाधा ही अंधश्रद्धा या माणसाने दूर केली आहे

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या वारीचा इतिहास आपल्याला माहिती असायलाच हवा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.