The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डार्क – नेटफ्लिक्सची प्रचंड गुंतागुंतीची आणि धरून ठेवणारी पाहायलाच हवी अशी सिरीज

by सोमेश सहाने
30 June 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


एक किशोरवयीन मुलगा हरवतो, एक सुखी गृहस्थ आत्महत्या करतो अशा गुंतागुंतीच्या वातावरणात “डार्क” सिरीज जर्मनीच्या विंडन नावाच्या काल्पनिक शहरात सुरू होते. 

अणुऊर्जा प्रकल्प आणि जंगल यांना लागून वसलेल्या या छोट्या शहरात बरोबर 33 वर्षांपूर्वीही असंच झालेलं असतं. या केसवर काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा भाऊ असाच हरवलेला असतो आणि पहिला भाग संपताना त्याचा मुलगा “मिकेल”ही तसाच जंगलातून गायब होतो.

यानंतर या चमत्कारिक घटनांच्या मुळाशी जाणारा तपास करण्यात या पात्रांसोबत आपणही यात हरवत जातो अधिक बरोबर शब्द वापरायचा तर अडकत जातो. वरवर ट्रेलर पाहताना असं वाटतं की मर्डर मिस्ट्री, सिरीयल किलर या प्रकारातलं हे काहीतरी असावं. पण तो भ्रमही सिरीज दुसऱ्याच एपिसोडमध्ये संपवते आणि टाईम ट्रॅव्हलसोबत अजून एक गोंधळ वाढवते. 

एवढा गुंता फक्त दुसऱ्या एपिसोडमध्ये, असे 2 सिजनमध्ये मिळून 45 मिनिटांचे 18 एपिसोडस् आहेत.



विंडनमध्ये हरवणाऱ्या मुलांसोबतच अनुविद्यूत प्रकल्प अजून गूढता वाढवतो. शाळा, पोलीस स्टेशन, जंगल, आपण नकाशावर मांडू शकू अशा सोप्या जागी ही पळापळ सुरू असते. इथले चार परिवार मुख्यतः या कथेचा भाग आहेत – डॉपलर्स, कानव्हाल्ड, निल्सन आणि टायडामन.

याच परिवारातील सदस्य 1922, 1953, 1986 आणि 2019 अशा वेगवेगळ्या काळात दाखवले आहेत. एक जादूचं प्रात्यक्षिक दाखवताना मिकेल आपल्या वडिलांना सांगतो की “मी हे कसं केलं यापेक्षा कधी केलं, हे महत्वाचं आहे”, हेच खरं तर या सिरीजमधील पात्र शोधत असतात. जे होतंय ते कसं होतंय यापेक्षा कधी होतंय, भूतकाळात की भविष्यात हे महत्वाचं आहे. 

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सुरुवातीला गुहेमधून 33 वर्ष मागे भूतकाळात जाता येतं असा शोध लागतो. भूतकाळात होणाऱ्या गोष्टींचा परिणाम वर्तमानावर होतो सोबतच भूतकाळातील लोकांसाठी आजचा वर्तमान हा भविष्यकाळ असतो. यामुळं त्यांचा वर्तमान नीट चालावा यासाठी ते भविष्यात जाऊन गोष्टी सुधारत असतात. 

असं हे काहीसं सायन्स फिक्शन असलं तरी जड नाहीए. कारण ते सोपं करून सांगायला पात्रांचा आधार आहे. फक्त पात्रच नाही तर त्यांच्या वेशभूषा, तिथले रंग यातूनही ते सोपं करून सांगितलं आहे. 

भूतकाळात आणि वर्तमानात मिळून 20 पात्रांसाठी जवळ जवळ 60 कलाकार काम करतात. त्यातील प्रत्येकजण एकमेकांपेक्षा खुप वेगळा दिसण्यासाठी त्यांची निवड आणि कपडे, केस वेगवेगळे ठेवण्यासाठी केलेली मेहनत आपल्याला तो गुंता सोपा करून बघायला खूप मदत करते. उदा. मोठा जबडा असणारा पोलीस अधिकारी 33 वर्षांपूर्वी शाळकरी मुलगा दाखवायला तसाच मोठा जबडा असणारा मुलगा दाखवलाय. त्याची बायको दोन्ही काळात ओळखू यावी म्हणून तिच्या केसांचा रंग बाकी कलाकारांच्या केसांपेक्षा वेगळा ठेवलाय. पण या गूढतेमध्ये तहान भूक विसरलेले सुपरहिरोसारखे इकडून तिकडे पळणारे लोक नाहीत. यात तुम्ही आम्ही रिलेट करू शकू अशा सामान्य माणसांच्या वैयक्तिक गोष्टी आहेत. 

विशेष बाब म्हणजे सामान्य जीवन जगत असणाऱ्या पात्रांची आयुष्य ही या गोंधळाचा भाग आहेत. आज चुकून भूतकाळात गेलेला माणूस त्याचा भूतकाळ हा आता भविष्यकाळ म्हणून जगणार असतो. हे करत असताना तो काही सगळं परमज्ञान असल्यासारखा वागणं अपेक्षित नाहीच, तो कुठल्याही सामान्य माणसासारखा घाबरलेला असेल, रडत असेल. हा “खरेपणाचा” धागा सगळ्या सिरीजमध्ये निर्मात्यांनी सुंदरतेने गुंफला आहे. 

सिरीज जरी गुढतेबद्दल असली तरी त्यातील भावविश्व हे त्या गुढतेइतकेच खोल आणि सुंदर ठेवलं आहे. परिवारात असणारे मतभेद, मनभेद हे स्पष्टपणे दाखवून त्यांना ही गुढतेची किनार दिली आहे. हे सगळं कौशल्यपूर्ण बांधलेल्या पत्त्याच्या बंगल्यासारखं आहे, जर एका जोडप्यात होणारं भांडण एडिटरने काढून टाकलं तर भांडून ते जे करणार असतात ते करणार नाही आणि कथेचा सगळा डोलारा पत्त्यांसारखा कोसळून पडेल. एवढ्या तपशीलवार लिहिलेल्या टाईट स्क्रिप्ट खूप दुर्मिळ असतात.

यात कोणीही चांगलं किंवा वाईट नाहीए. प्रत्येक पात्र त्याच्यासोबत होत असणाऱ्या घटनांना प्रतिसाद देतं. म्हणून त्यांचं वागणं हे बघणाऱ्यांसाठी अपेक्षित असतं. यातलं मुख्य पात्र असतं “जोनस”, हा गोंधळ थांबवून हरवलेल्या मुलांना परत आणावं हे ठरवून तो निघतो पण शेवटी ते शहरच प्रलायकरी अपघातात नष्ट होणार आहे हे त्याला समजतं. हे थांबवण्यासाठी तो पराकोटीचे प्रयत्न करतो आणि यात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात होणाऱ्या दुर्दैवी घटनाही भर घालतात. 

तो वेगळा वाटावा यासाठी त्याला नेहमी भडक पिवळ्या जॅकेटमध्ये दाखवलं जातं. यातील तांत्रिक गोष्टी तर एवढ्या छान आहेत की ते अनुभवायला ही सिरीज थिएटरमध्ये लावावी असं वाटतं. बॅकग्राऊंड म्युजिकमुळे बऱ्याचदा आपल्याला गोष्टींची उकल होते. कॅमेरा कधी पात्रांच्या बराच जवळ असतो यातून कळतं की कथा गूढ असली तरी त्याचा परिणाम वैयक्तिक असावा यासाठी निर्मात्यांनी प्रयत्न केलेत. 

अभिनयही कुठेच कमी पडत नाही, पण मुख्य पात्रच 20 आहेत म्हणून नाव घेणं शक्य नाही. बॅरन बो ओदार आणि जानते फ्रेज या जोडप्याने डार्कचं लिखाण, दिग्दर्शन केलंय आणि तेच शो क्रिएटरही आहेत. 

पहिली जर्मन नेटफ्लिक्स ओरिजिनल सिरीज आहे. डबिंगही छान झाल्यामुळे भाषेचा अडथळा नाहीए. इंग्रजी भाषा येत नसणाऱ्या देशांतल्या कलाकारांनी बनवलेली एवढ्या महान प्रकारची सिरीज जगप्रसिद्ध होणं, तिथल्या स्थानिक गोष्टींना जगात स्थान मिळवून देणं यात नेटफ्लिक्सला श्रेय द्यावं लागेल. 

रोटन टोमॅटोजवर समीक्षकांनी या सिरीजला “बेस्ट नेटफ्लिक्स ओरिजिनल सिरीज” असा मानही दिलाय. डार्कचा तिसरा सिजन 26 जून 2020 ला येतोय, बरोब्बर सीरीजमधल्या एका महत्वाच्या तारखेला, जेव्हा ती प्रलयकारी घटना घडते. अजिबात मिस करू नये अशी ही “डार्क” सिरीज नेटफ्लिक्सवर नक्की बघा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हॉलीवूड कलाकार रोनाल्ड रेगन सर्वांत वयस्कर आणि लोकप्रिय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते

Next Post

20 हजार टन डिझेल नदीत मिसळल्यामुळे रशियात आणीबाणी लागू केली आहे.

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

20 हजार टन डिझेल नदीत मिसळल्यामुळे रशियात आणीबाणी लागू केली आहे.

..म्हणून जागतिक आरोग्य संघटना चीनची पाठराखण करत असते.!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.