The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीयत्व हेच खरे अस्तित्व!!

by द पोस्टमन टीम
9 June 2020
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


मी मधुरा काळे.

मला कळत नाही लोकांना आडनावावरून जातीचं विश्लेषण करण्यात काय मजा वाटते? माझ्या बोलक्या स्वभावामुळे अन् थोडीफार सामाजिक बांधिलकीची जाण असल्याने बरेच लोक भेटतात. बऱ्याच लोकांशी संबंध येतो. विविध विषयांवर गप्पा रंगतात, चर्चा होतात, तात्विक टीपण्या,माहितीपर भाषणं, साहित्याची देवाणघेवाण आणि असिमीत शब्दांवर भाष्य होत असतं.

परवा अशाच एका चर्चेत मी बोलत होते चक्ररधर स्वामींविषयी. लिळाचरित्र, म्हाइंभट्टांचे द्रुष्टांत असे अनेक विषय निघत गेले. मधेच अडवून मला समोरची व्यक्ती म्हणाली, “तुम्ही माळी का?”

अजून एक किस्सा आठवतो. राजगड चढताना किंवा तोरण्याला डोळे भरुन पाहताना मी शिवाजी महाराजांचा पोवाडा मनसोक्त गायले तेव्हा मला सगळ्यांनी विचारलं, “तुम्ही मराठा का?”



मेसमध्ये जेवताना भगवान महावीरांविषयी बोलत होते. अहिंसा, अपरीग्रह अशा अनेक सूत्रांचा उलगडा होत होता .जेवण संपल्यावर एक मुलगी मला म्हणाली, “तू जैन का ?”

मला आधीपासुनच भगवान गौतम बुद्धांचं तत्वज्ञान, त्यांच्या चेहऱ्यावरील तो शांत भाव फार भावतो. बुद्धांच्या ठिकाणी मी आत्माचिंतनात रमते. काही दिवसांपूर्वी बुद्ध प्रतिमांच्या प्रदार्शनाला भेट दिली.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

तेव्हा एक चित्र न्याहाळत असताना पलीकडची व्यक्ती मला म्हणाली, “तुम्ही बौद्धच ना ?”

मागच्या गणपतीला मित्राकडे मंत्र पुष्पांजली म्हटली संस्कृतमधून तेव्हा लगेच त्याच्या बाबांनी विचारलं, “तू ब्राम्हण का?”

आज परत फेसबुकवर एका जणाशी बोलताना परत तोच विषय. समोरच्याने पहिलाच प्रश्न विचारला, तुम्ही माळी का? म्हटलं नाही,  “मी भारतीय आहे”. तर समोरून उपहासात्मक प्रतिक्रिया आली, “आडनाव काळे ना? म्हणुन विचारलं.”

विचित्र आहे ना?

भारत माझा देश आहे ! सारे भारतीय माझे बांधव आहेत ! पहिलीपासून ही प्रतिज्ञा आम्ही तोंडपाठ केलीये पण खरच ती आपल्याला कळली आहे का? खरच सर्व भारतीयांना आपण बांधव मानतो का? भारताचं जाऊ द्या राज्यात, जिल्ह्यात, गावात, घरात अन् महत्वाचं म्हणजे मनातच दुजाभाव असेल तिथे बंधुत्व नांदणार तरी कसं?

माणसाने कोणत्या परिवारात, कोणत्या जागी, कोणत्या जातीत जन्माला यावं हे आपल्या हातात आहे का ? मग ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीतच त्याच गोष्टींचा अवडंबर करून आपण एकाला डोक्यावर चढवतो व दुसऱ्याला पायाखाली तुडवतो. हे आपल्या मनाला तरी पटतं का? सगळंच कळतं पण ते वळवून मात्र कोणीच घेत नाही.

कोणी सैनिक शहीद झाला तर अमुक जातीचा हा सैनिक, तमुक जातीचा तो सैनिक असा भेदभाव न करता आपला देश प्रत्येकाला शासकीय इतमामात सलामी देतो!

जर देश आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण तरी या देशात राहून आपापसात भेदभाव का करायचा? आपल्या भारतीयत्वाच्या अस्तित्वापुढे जात ही फार क्षुल्लक गोष्ट आहे.

आता तुम्हीच विचार करा आपल्याला आपलं अस्तित्व क्षुल्लक ठेवायचं आहे की मोठ्ठं, अथांग अन् चिरकाल ठेवायचं आहे!

लेखिका- कु. मधुरा काळे

(अंजनगाव सुर्जी जि.अमरावती)


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या भारतीय महिलेमुळे संयुक्त राष्ट्रसंघात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळाला

Next Post

काय आहे भारत आणि नेपाळच्या सीमावादाचा सुगौली करार..?

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

काय आहे भारत आणि नेपाळच्या सीमावादाचा सुगौली करार..?

पुण्यात कोरोना थैमान घालत असताना या गावात कोरोनाचा अजून एकही रुग्ण नाही..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.