The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपल्या प्राचीन हडप्पा संस्कृतीतील लोकांचा पेहराव कसा होता…?

by द पोस्टमन टीम
8 November 2024
in इतिहास
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


संस्कृती. 

विविधतेतून एकता दर्शविणाऱ्या भारतासारख्या देशाला सांस्कृतिक वैविधतेचं मिळालेलं वरदान अमूल्य आणि अतुलनीय आहे. प्रादेशिक भाषा, प्रादेशिक वेशभूषा, प्रादेशिक भौगोलिक रचना या आणि अजून कित्येक गोष्टी भारतीय वैविधतेमध्ये अमूल्य भर पाडतात. एखाद्याच्या वेशभूषेवरुन त्या व्यक्तीच्या प्रादेशिक अस्मितेची ओळख करता येऊ शकते ही गोष्ट भारतीय संस्कृतीसाठी अतिशय महत्त्वाची आहे. नऊवारी घातलेली मराठी मुलगी, कुर्ता आणि पायजमा घालून भांगडा करणारा पंजाबी तरुण, घागरा घालून नवरात्रीमध्ये दांडीया खेळणारी गुजराती मुलगी हे भारतीय वेशभूषेत असलेल्या विविधतेचा एक उत्तम नमुना आहे.

पण संस्कृतीची मुळे रुजलेली असतात ती त्या देशाच्या इतिहासात. प्रादेशिक वेशभूषेवर त्या प्रदेशाच्या इतिहासाचा मोठा प्रभाव असतो. तसेच त्या प्रदेशातील भौगोलिक परिस्थिती, समाजात स्त्रियांचा असलेला सन्मान या गोष्टी त्या प्रदेशातील वेशभूषेत आपला हातभार नकळतच लावतात.

आता आलेल्या नविन आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि कापड उद्योगात झालेल्या भरमसाठ क्रांतीनंतर आज कापड उद्योगात वैविधतेने नटलेले विविध प्रकारचे कपडे आपल्याला बघायला आणि घालायला मिळतात. पण आजच्या या विविधतेने नटलेल्या भारतीय वेशभूषेची सुरुवात झाली ती हडप्पा (सिंधु) संस्कृती आणि संगम काळात.



आता असणारी विविधता त्यांनी त्या काळी कशी सुरु केली आणि टिकवून ठेवली हे आज आपण जाणून घेऊया.

१. हडप्पा संस्कृती (सिंधु नगरसंस्कृती)

(कालावधी: इ.स.पु. ३३०० ते इ.स.पु. १३००)

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

हडप्पा संस्कृतीची विशेषता म्हणजे त्या वेळी घेतलं गेलेलं भरमसाठ कापूस उत्पादन. जलसिंचनाच्या अतुल्य सोयीसुविधा विकसित असलेला हा प्रदेश कापूस उत्पादनात अग्रेसर होता. कापसाच्या धाग्यापासून कापड बनवण्याची कला त्यावेळी विकसित झाली होती. या काळातील लोक दुहेरी पेहराव करत असत.

पुरुष आणि स्त्रिया कमरेच्यावरती आत्ता शालसारखे दिसणाऱ्या कपड्यांचा वापर करत तर धोतराचा वापर कमरेपासून खाली कपडे म्हणून केला जात असे. या काळातील लोक कापड विणण्यात अतिशय पारंगत होते.

उत्खननात मिळालेल्या विविध पुराव्यांमध्ये विविध प्रकारचा आणि रंगाचा दोर, सुया, कापसाच्या बिया सापडल्या असून त्याचबरोबर काही समकालीन पुतळे सापडले आहेत. एका राजपुरोहितचा सापडलेला पुतळा त्यावेळी असलेल्या वेशभूषेची कल्पना अतिशय चांगल्या पद्धतीने देतो. पुतळ्याकडे बघितलं की लक्षात येतं की पुरुष फुलांची सूक्ष्म नक्षी असलेली कापडाचा वापर करत असे.

अजुन एका पुराव्यात देवीची मुर्ती सापडली असून महिला दागिन्यांचा वापर करत होत्या हे त्यावरुन स्पष्ट होतंय. छोट्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या असणाऱ्या या गोष्टी आपल्याला हडप्पा संस्कृतीच्या वेशभूषेबद्दल एक अंदाज बांधण्यास पुरेशा आहेत.

पुराव्यातून मिळालेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या वर्गातील लोकांच्या वेशभूषेचा अंदाज लावता येणं अवघड आहे. पण केनोयर जे. एम. या इतिहास संशोधकाच्या अभ्यासानुसार सामान्य पुरुष धोतर तर स्त्रिया परकरसारख्या वेशभूषा दैनंदिन जीवनात वापरत असत.

आणखी मिळालेल्या काही पुराव्यांनुसार पायांची मोकळी हालचाल गरजेची असल्याने तरुण पायजम्याचा वापर करत असत असाही निष्कर्ष काढता येतो. कापसाबरोबरच रेशम, अंबाडी, लोकर यांचा वापरही कपडे तयार करण्यासाठी केला जात असावा.

तसेच पुरुष-स्त्रिया अंगावरती भरपुर दागिने वापरत असावीत. हे दागिने सोने, चांदी, ताम्र यांनी बनवलेले असत, तर मूल्यवान मोती त्यामध्ये वापरले जात असत. यावरुन त्यावेळी असलेल्या धनिक संपदेचा ही अंदाज लावता येतो.

तसेच हडप्पा संस्कृतीमध्ये केसांना लावण्यासाठी विविध दागिन्यांचा वापर केला जात असावा असा अंदाज आपण पुराव्यांवरुन लावू शकतो. या दागिन्यांवरुन त्यावेळी लोकांना केशभूषेबद्दल अतिशय आकर्षण होतं हे सुध्दा स्पष्ट होतं. तसेच केसांमध्ये टोपी आणि पागोटे यांचादेखील वापर केला जात होता.

या वैविध्याने समृध्द असलेल्या हडप्पा संस्कृतीमधूनच आत्ता आपण वापरत असलेल्या पगड्या, तसेच विविध दागिने यांची सुरुवात झाली असं म्हणण्यास हरकत नाही. सिंधु संस्कृतीनंतर गुप्त काळात साडीचं महत्त्व वाढत गेलं. तसंच मुघल आ*क्रमणात वाढ झाल्यानंतर सलवार-कमीजसारख्या कपड्यांचं महत्त्व वाढत गेलं.

२. संगम काळ (ई .स.पू.५०० ते ई. स. पू. ३००)

इतिहास समजून घेत असताना त्या काळातील साहित्य अतिशय महत्त्वाची भुमिका बजावत असते. संगम काळातील वेशभूषा समजून घेण्यात आपल्याला त्या काळातील साहित्याचा उपयोग करता येतो. त्याकाळात लिहिल्या गेलेल्या कविता, वेद, आणि लेखांमधून आपल्याला वेशभुषेचा अंदाज येतो.

संतनम स्वामीनाथन या पत्रकाराने या लेखांचा अभ्यास करुन त्या काळातील एक कवी ‘नक्कीरार’ याबद्दल लिहिलंय.

नक्कीरारच्या लेखानुसार, प्राचीन तमिळ लोक वरती एक कपडा आणि खाली धोतर या प्रकारे कपडे घालत असत. ‘कंचुकम’ नावाचा सदरा वापरात असल्याचे पुरावे सापडले आहेत ज्याचा वापर सैनिक किंवा परदेशी अंगरक्षक करत असत.

काही शिल्पं आणि चित्रांनुसार त्या काळी महिला फक्त कमरेच्या खाली झाडांच्या पानाचा वापर करत असत हे दिसतंय. अशोका या झाडाची पाने, तसेच पुन्नैच्या फुलांचा वापर करुन परकर बनवले जात असत. तेच काही शिल्पांमध्ये स्त्रिया ‘कलिंगम’ नावाचं वस्त्र पुर्ण शरीर झाकण्यासाठी करत असत असं दाखवण्यात आलं आहे.

महिला दागिन्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करत असत असा अंदाज विविध ऐतिहासिक पुराव्यातून येतो. ‘मकुता’ नावाचा सोन्याचा दागिना, मौल्यवान हिरे-मोत्यांनी जडलेला होता. तसेच केस आणि कानांमध्ये विविध दागिने वापरले जात असत. दागिने बनवण्यासाठी सोने, विविध मोती, हिरे यांचा वापर केला जात असे.

आजच्या काळात आपण आपला हा ऐतिहासिक ठेवा जसाच्या तसे समोर जरी आणला नसेल तरी या इतिहासाचा आपल्या आता असलेल्या वेशभूषेवर खूप मोठा प्रभाव आहे. इतिहासाशिवाय वर्तमान शक्य नाही याचं हे एक उत्तम उदाहरण. हाच वारसा आपण पुढे ठेवण्यातच त्याचा सन्मान आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या शास्त्रज्ञाने ब्रिटनला दुसरं महायुद्ध जिंकून दिलं पण ब्रिटनने त्यांनाच शिक्षा ठोठावली

Next Post

आणि हि*टल*रने स्वतःच जर्मनी बेचिराख करण्याचा आदेश दिला

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

आणि हि*टल*रने स्वतःच जर्मनी बेचिराख करण्याचा आदेश दिला

फातिमा इस्माईल - या महिलेने पोलियोमुक्त भारताचा पाया रचलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.