The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारताप्रमाणेच या देशांना देखील १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळालंय.

by द पोस्टमन टीम
14 August 2025
in इतिहास, ब्लॉग
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. दरवर्षी आपला स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर स्वातंत्र्य आपल्या पदरी पडलं.

पण तुम्हाला हे माहिती आहे का की भारताबरोबरच अजूनही काही देश आहेत ज्यांना १५ ऑगस्टलाच स्वातंत्र्य मिळालं होतं. चला तर असे कोणते देश आहेत यावर आपण एक नजर टाकूया.

◆ कोरिया

दक्षिण कोरिया पूर्वी जपानच्या ताब्यात होते. नंतर १५ ऑगस्ट रोजी त्यांनासुद्धा जपानकडून स्वातंत्र्य मिळाले. वस्तुतः १९०५ मध्ये जपान आणि कोरिया यांच्यात टाफ्ट-कटसुरा नावाचा करार झाला. यानंतर १९१० मध्ये जपानने आपल्या कोड पॉलिसीद्वारे कोरियाच्या राजकीय, आर्थिक आणि इतर सगळ्याच गोष्टींवर ताबा मिळवला.

जपानी लोकांनी कोरियन नागरिकांना गुलामगिरी करण्यास भाग पाडले. जपान त्यांच्यावर आपली संस्कृती लादण्यासाठी अनेक कठोर छळ करीत असे. परंतु, कोरियामधील मूळ रहिवासी याविरोधात सतत बंड करीत होते. शेवटी, जपानच्या क्रौर्य व सामर्थ्यासमोर कोरिया यशस्वी होऊ शकला नाही.



पुढे जेव्हा अमेरिकेने जपानवर दोन मोठे पर*माणु ह*ल्ले केले तेव्हा जपानने अमेरिकेसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर १९४५ मध्ये जपानला दुसर्‍या महायु*द्धात पराभवाचा सामना करावा लागला, आणि कोरियाला स्वातंत्र्य मिळाले.

पण यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या यंत्रणेत कोरियाचे दोन भाग झाले. याच्या उत्तर भागावर सोव्हिएत युनियन व दक्षिण भागावर अमेरिकेने राज्य करण्यास सुरुवात केली. हे झालं तर खरं पण सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्यातील करार फार काळ टिकू शकला नाही.

Flag of South Korea

परिणामी १५ ऑगस्ट १९४८ रोजी दक्षिण कोरियाचे डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया असे नामकरण करण्यात आले. यानंतर ‘सिंगमन री’ दक्षिण कोरियाचा पहिला अध्यक्ष झाला आणि क्रांतिकारी नेते ‘किम इल सुंग’ उत्तर कोरियाचे पहिले अध्यक्ष झाले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

याच दिवसाच्या आनंदात १५ ऑगस्ट रोजी कोरियाच्या बहुतेक सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यउत्सव साजरा केला जातो.

◆ कॉंगो

१५ ऑगस्टचा दिवस काँगोच्या देशवासियांसाठी कुठल्याही सणापेक्षा कमी नाही. यादिवशी कॉंगो फ्रान्सच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. कॉंगोमध्ये १४व्या शतकापासून पोर्तुगीजांचे आगमन सुरू झाले. कॉंगो नदीवर त्याचा अधिकार होता. १८८५ मध्ये बेल्जियमनेही कॉंगोमध्ये आपला हात घातला, तिथे आपल्या वसाहती स्थापन केल्या.

पुढे दुसऱ्या लिओपोल्डच्या कारकिर्दीत लोक अडचणीत सापडले. संपूर्ण राज्यात खासगी कंपन्यांचे वर्चस्व होते. कॉंगोमध्ये यावेळी बरेच मोठे घोटाळे झाले. यामुळे उपासमार, गरीबी आणि बेरोजगारीसारख्या समस्यांनी देशात जन्म घेतला.

यानंतर सर्वत्र सरकारी नियमाचा विरोध होऊ लागला. १९०८ मध्ये बेल्जियमचा राजा लिओपोल्ड दुसरा याने कॉंगोला औपचारिकरित्या स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. तरीही कॉंगो फ्रेंच वसाहतीचाच एक भाग होता.

Flag of Republic of Congo

१०४०-५० च्या दरम्यान कॉंगोचे शहरीकरण झाले. त्याचा विकास पाहता लोकांच्या गरजांसाठी अनेक सुविधा निर्माण झाल्या. पण यावेळी कॉंगोमध्ये जातीय भेदभावाचा जन्म झाला.

इथल्या वसाहतीतील वेतन इतर कोणत्याही आफ्रिकन वसाहतीच्या तुलनेत बरेच मोठे होते. यानंतर हळूहळू येथे स्वातंत्र्याची मागणी वाढू लागली. वेळोवेळी बरीच बंडखोरी केली गेली, या वेळी बर्‍याच कॉंगोलींनाही लक्ष्य केले गेले.

दरम्यान १९५९ मध्ये ब्रॅझाविलमध्ये वांशिक दंगल घडली आणि त्यानंतर फ्रान्सने १५ ऑगस्ट १९६० रोजी काँगोला मुक्त केले. आणि बर्‍याच अन्यायांनी ग्रस्त कॉंगोदेखील प्रजासत्ताक राज्य बनले.

तेव्हापासून कॉंगोनेही १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

◆ बहरीन

सहाव्या शतकात बहरीन एक इस्लामिक देश बनला होता. पुढे १८ व्या शतकाच्या शेवटी जेव्हा अल खलिफा राजघराण्याने येथे राज्य केले त्यानंतर १८३० मध्ये खलिफा आणि ब्रिटन यांच्यात एक करारावर स्वाक्षरी झाली.

या करारांतर्गत बहरीन ब्रिटीश-संरक्षित देश बनला. यानंतर ब्रिटनने बहरीनमधील पर्शियन आखात आपल्या ताब्यात घेतली. पुढे १९७१ मध्ये बहरीनने ब्रिटनबरोबरचा करार संपविण्याचा निर्णय घेतला.

 

यानंतर १५ ऑगस्ट १९७१ रोजी बहरीनने स्वत: ला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. या देशातसुद्धा १५ ऑगस्ट रोजी मोठ्या जल्लोषात स्वातंत्र्यात दिवस साजरा केला जातो

◆ लिकटेंस्टीन

लिकटेंस्टीन हा पश्चिम युरोपमधील एक छोटासा देश आहे. वास्तविक पाहता लिकटेंस्टीन हे १७९१ च्या सुमारास रोमन साम्राज्याचा भाग बनले. १८१५ मध्ये ते जर्मन संघात सामील झाले. पण १८६६ मध्ये हा करार मोडला गेला आणि लिकटेंस्टीन हे स्वतंत्र राज्य बनले.

पण इथली गोष्ट रंजक आहे.

इथे पुन्हा रोमन साम्राज्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले. विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतरही लिकटेंस्टीनमध्ये स्वातंत्र्य उत्सव साजरा केला जात नाहीत. इतिहासात १५ ऑगस्टच्या त्याच दिवशी येथे एक धार्मिक उत्सव साजरा करण्यात आला.

इतकंच नाही तर यासह, प्रिन्स फ्रांज जोसेफ दुसरा याचा वाढदिवससुद्धा याच दिवशी साजरा करण्यात आला.

हा उत्सव प्रथमच १५ ऑगस्ट १९४० रोजी राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी लिकटेंस्टीन स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देशातील विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लोक एकमेकांना शुभेच्छा देतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

गोलकीपर ते बेस्ट विकेटकीपर : “माही” धोनीने असे गाजवले मैदान

Next Post

“दादा”पासून सुरु झालेलं “विजयपर्व” माहीने अखंड चालू ठेवलं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

"दादा"पासून सुरु झालेलं "विजयपर्व" माहीने अखंड चालू ठेवलं

गांगुलीने भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दादा बनवलंय!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.