The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बेईमानीचा धंदा इमानदारीने करणारा ‘मटका किंग’

by द पोस्टमन टीम
18 May 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


मुंबई ही मायानगरी आहे. तिथे जर कुठलंही काम अगदी मनापासून केलं तर मग श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. बरेच लोक मुंबईत येतात, विविध क्षेत्रांत आपलं नशीब आजमावून बघायला येतात, त्यांना यशही येतं.

असाच एक जण मुंबईला आला, त्यानेसुद्धा विविध क्षेत्रांत आपलं नशीब अजमावून पाहिलं. संघर्ष केला तो मुंबईत टिकला. शेवटी त्याला असा एक व्यवसाय मिळाला की ज्यात त्याला भरभरून यश मिळालं.

ती व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नाही तर, मटका किंग रतन खत्री.

मटका या प्रकारामुळे कित्येक लोकांचे संसार धुळीस मिळाले तर यात काही लोकं करोडपती झाले. १९६० च्या दशकात या क्षेत्रात दोनच नावं होती. ती नावं म्हणजे कल्याण भगत आणि रतन खत्री. १९५० साली कल्याण भगतने मटका या काळ्या धंद्याचा शोध लावला आणि नंतर रतन खत्रीने त्या व्यवसायाचा प्रसार केला.



मूळ पाकिस्तानच्या कराचीचा असलेला रतन खत्री भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी भारतात आला. मुंबईत आल्यानंतर त्याने बरेच उद्योगधंदे करून पाहिले पण यात म्हणावं तेवढा तो समाधानी नव्हता. त्याच्या आयुष्यातल्या खऱ्या व्यवसायाची सुरुवात झाली ती कल्याण भगतला भेटल्यानंतर.

गुजरातच्या कच्छचा कल्याण भगत १९४१ साली मुंबईत आला. त्यानेसुद्धा बऱ्याच कामात स्वतःला झोकून देत उदरनिर्वाह केला पण त्याला त्यात यश मिळालं नाही. नंतर त्याने बेटिंगचे बुकी म्हणून काम करायला सुरुवात केली. कॉटन मार्केटच्या उघडण्यावर तसेच बंद होण्यावर तो बुकी म्हणून बेटिंग घेत असत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

बुकीचा व्यवसाय करता करता एका पायरीवर भगतला लक्षात आलं की आता आपल्याला या बाजारातील खाचखळगे माहिती झाले आहेत. कापसाच्या भावाचे अंदाज लावणं त्याला आता खूप सोपं जाऊ लागलं होतं. 

इथूनच त्याच्या डोक्यात कल्पना आली मटक्याची.

कल्याण भगतचा मुलगा विनायक याने वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे की, हा बेटिंगचाच एकप्रकार होता. लोक मटक्यातून चिठ्ठी काढून बेटिंग करायचे म्हणून याला भगतनी मटका असं नाव दिलं, पण वास्तविक पाहता यात कुठेही मटका/मडकं वापरलं जात नाही.

असं म्हटलं जातं की कल्याण भगतने जेव्हा हा मटक्याचा धंदा चालू केला तेव्हा सुरवातीच्या काळात त्याचा हा धंदा रतन खत्री सांभाळत होता. त्याला वरळी मटका असं म्हटलं जायचं. थोडक्यात रतन खत्री कल्याणचा मॅनेजर होता.

या मटक्यात न्यूयॉर्क कॉटन मार्केटच्या उघडण्यावर आणि बंद होण्यावर बोली लावली जातं असे. १९६० च्या दशकात हा मटका मुंबईत अतिशय प्रसिद्ध होता. हे सगळं सुरळीत चालू असताना १९६२ मध्ये न्युयॉर्क स्टॉक एक्सचेंजने त्यांची प्रक्रियाच बंद केली. या घटनेचे पडसाद मटक्यावरसुद्धा उमटले. मटक्याचा धंदा बंद होण्याच्या मार्गावर आला होता.

पण मागे हटतील ते व्यावसायिक कसले, यावर तोडगा काढत रतन खत्रीने मटका चालूच ठेवला फक्त त्याची पद्धत बदलण्यात आली होती.

खत्रीने बाकीच्या गोष्टींवरसुद्धा बोली लावण्यास सुरुवात केली. मटक्याचा धंदा तेजीत आला, आणि रतन खत्री कल्याण भगतपासून वेगळा झाला. त्याबरोबरच रतन खत्री हे नाव या धंद्यात प्रसिद्ध झालं.

कल्याण भगतपासून वेगळं होऊन खत्रीने रतन मटका नावाने आपला मटक्याचा धंदा चालू केला. भारतात जुगार हा बेकायदेशीर असला तरीसुद्धा हा मटक्याचा धंदा दिवसेंदिवस वाढतच जात होता.

धंदा भलेही फक्त मुंबईत चालायचा पण याच्यावर बोली लावणारे मात्र देशाच्या कानाकोपऱ्यातून असायचे.

एकीकडे बेकायदेशीर असल्याने कल्याण भगत हा धंदा लपवायचा प्रयत्न करायचा तर दुसरीकडे जास्त लोकांनी आकर्षित व्हावं म्हणून रतन खत्री याचा प्रसार, प्रचार करायचा. मुंबई मिररच्या एका रिपोर्टमध्ये १९७४ पर्यंत या धंद्याची उलाढाल रोज १ करोड रुपयांपर्यंत पोहचली होती.

१९७५ मध्ये जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली तेव्हा रतन खत्रीला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. १९ महिने जेल मध्ये काढून बाहेर आल्यानंतर त्याचा मटक्याचा धंदा पूर्णपणे विखुरला होता. पण तरीही बाहेर येताच पुन्हा आपलं जाळं सक्रिय करून त्याने आपल्या धंदा पूर्वपदावर आणला.

रतन खत्रीला चित्रपटांचं आणि ग्लॅमरचं खूप आकर्षण होतं. हिंदू या वृत्तपत्राच्या एका रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, फिरोज खान यांनी रतन खत्रीच्या जीवनावर आधारित परमात्मा नावाचा चित्रपटसुद्धा केला आहे. या फिल्मसाठी स्वतःबद्दल सगळी माहिती खत्रीने दिली होती.

झटपट आणि कुठलीही मेहनत न घेता पैसे मिळवण्याच्या नादात कित्येक कामगार, कष्टकरी लोकं या चुकीच्या मार्गावर गेले. कित्येकांचे संसार उ*ध्वस्त झाले. पुढे एवढ्यावरच न थांबता रतन खत्रीने राज्य सरकारच्या लॉटरी योजनेप्रमाणे स्वतःची लॉटरीसुद्धा चालू केली होती.

तर या रतन खत्रीचं २०२० साली मुंबईत निधन झालं. या घटनेने मटका क्षेत्रातला एक राजा गेला अशा प्रतिक्रिया त्या वर्गातून उमटल्या.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या खलाशांनी जीवावर उदार होऊन जगाचा नकाशा बनवलाय

Next Post

या माणसाच्या प्रयत्नामुळे आज दिल्लीला स्वतंत्र विधानसभा आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या माणसाच्या प्रयत्नामुळे आज दिल्लीला स्वतंत्र विधानसभा आहे

या आजींनी वयाच्या ८९व्या वर्षी एका यशस्वी स्टार्टपची सुरुवात केली आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.