The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फ्री सोलो – अंगावर काटा आणणारी ऑस्कर विनिंग डॉक्युमेंटरी

by सोमेश सहाने
2 February 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


मी काही दिवस रॉक क्लायंबिंगची प्रॅक्टिस केली आहे, त्यामुळं त्या जगाबद्दलची बेसिक माहिती आहे, आणि ते करताना होणारी धडधड ही ओळखीची आहे. पुण्यात किर्लोस्कर फेस्टिव्हलला गिरिप्रेमीतर्फे एक फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला होता. त्यात दाखवलेल्या दोन डॉक्युमेंटरीजमधून क्लायंबिंग हा खेळ किती सिरीयस आहे हे कळालं आणि त्याला शूट करण्यात, डॉक्युमेंटरी बनवण्यात जो कस लागतो त्याची जाणीव आत्ता परवा बघितलेल्या फ्री सोलो मधून झाली.

या माहितीपटावर बोलताना, दोन भागात बोलावं लागेल. माहितीपट म्हणून असणारं सिनेमॅटिक महत्व, जे आपण नंतरच्या भागात बघू आणि ज्या माणसावर हा माहितीपट आहे त्याबद्दल आता बोलूयात. ऍलेक्स होनाल्ड. लहानपणापासूनच मितभाषी असणारा, संभाषणाचे सामाजिक संकेत न पाळणारा, इतरांपेक्षा वेगळे मोरल पाळणारा, एकटा एका व्हॅनमध्ये राहणारा साहसी पोरगा.

Alex Honnold
NatGeo

वैद्यकिय तपासण्यातून त्याला असं कळतं की सामान्य लोकांपेक्षा त्याला भीती कमी वाटते. या गोष्टीचा आपल्या एकटेपणाला साजेसा उपयोग तो फ्री सोलो क्लायम्बिंगसाठी करतो. सतत फिरस्तीवर असल्याने त्याने व्हॅनलाच आपलं घर केलंय.

बिनदोरीचं मी कुठंही चढतो याची भीती दाखवून तो त्याच्या गर्लफ्रेंड्सना पळवतो. मुलींशी त्याला गोड गोड बोलता येत नाही, मित्रांशी जास्त जवळीक नाही, अशा स्वभावाचा अलेक्स क्लायम्बिंगच्या क्षेत्रात मात्र हा एकटेपणा पूरक असेल असा खेळ निवडतो – फ्री सोलो रॉक क्लायम्बिंग. असं म्हटलं जातं की ऍलेक्स या काळातला ग्रेटेस्ट क्लायंबर आहे. ज्या गोष्टी याआधी कोणीच केल्या नाहीत, त्या करण्याचे विक्रम तो करतो.



पण माहितीपट जर त्या ग्रेटनेस बद्दल असता तर त्यावर लिहिण्याइतक काही विशेष मला तरी वाटलं नसतं. याबद्दल लिहावं वाटतंय कारण यात सिनेमॅटिक स्किल्स वापरून या सगळ्या जीवघेण्या प्रक्रियेत आपण ऍलेक्सला जवळून बघू शकतो, त्याला अतिशय सामान्य चष्म्यातून अत्यंत वैयक्तिक पातळ्यांवर पाहू शकतो. अगदी एखाद्या सेलिब्रिटीला त्यातला स्टारडम काढून त्याच्या घरात वावरताना शूट केलं जावं तसं.

३ हजार फूट उंच El Capitan नावाची भिंत, हात आणि पाय ठेवायला अगदी अर्धा इंच जागा, त्यात दोर नाही, पडला की मेलाच. अशा अवस्थेत ऍलेक्सच्या मनात गोंधळ असतो पण भीती नसते. त्याला काळजी असते म्हणून तो अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घेतो पण त्यांच्या अपयशाने घाबरून जात नाही. तो शांत असतो, शिस्तीत सगळी प्लॅनिंग करत असतो.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सतत तेवढ्याच गोष्टीच्या विचारात असतो. Wait wait wait… हे तर असणारच ना, यात काय सांगायचं? हे लिहावं लागतंय कारण तो कुठंच त्या २ तासांत हे बोलून दाखवत नाही. हे आपल्याला कॅमेऱ्यातून कळतं, याप्रकारे भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्यात हा माहितीपट यशस्वी ठरतो.

असा हा ऍलेक्स महान बनतो तो फक्त त्याच्या या कौशल्यामुळं नाही तर त्याच्या मॅच्यूरिटी मुळंसुद्धा. कौशल्य किंवा शारीरिक ताकद कमी पडली तरी निर्धारावर यश मिळतं हे त्याला माहीत आहे. म्हणून विचारांची स्पष्टता गरजेची असते, अशी स्पष्टता एका प्रसंगातून कळते. जेव्हा ऍलेक्स पहिल्या अटेम्प्टमध्ये माघार घेतो तेव्हा तो अर्थातच दुःखी असतो. त्याची गर्लफ्रेंड त्याला सांगत समजवत असते की जाऊदे, खुश रहा वगैरे. तेव्हा तो म्हणतो की

“Nothing good happens because you are happy. Nothing great happens because you are happy. It’s about being worrier. It’s not necessary that you know your aim, It’s about fighting passionately”

फ्री सोलो या महितीपटाला यावर्षी ऑस्करही मिळाला. जिमी चीन आणि एलिझाबेथ चाई वासार्हेल्वी हे दांपत्य या फिल्मचे दिग्दर्शक. जिम्मीने याआधीही याप्रकारच्या २ महितीपटांचं दिग्दर्शन केलेलं आहे. त्याला मी इंस्टावर फॉलो करतो म्हणून त्याच्या आयुष्यात असणार क्लायंबिंगचं आणि साहसी खेळांचं महत्व मला माहीत होतं पण या माहितीपटातून त्याची सिनेमा या माध्यमावर असणारी पकड नीट समजली.

ही जशी तांत्रिक बाबतीत आहे तशीच ती मानवी भावनांबद्दलच्या आदराविषयी सुद्धा आहे. या दोन गोष्टी कळण्यासाठी यातल्या दोन घटना जबाबदार आहेत. पहिल्यांदा El Capitan सर करताना ऍलेक्सला कम्फर्टेबल वाटत नाही. म्हणून तो चालू करताच थांबतो आणि माघार घेतो. पुढच्या वर्षीच्या मोहिमेला सेम टीम ऍलेक्सबरोबर असते, त्यात एक पत्रकार पण असतो. तो जेव्हा जिम्मीला मागच्या माघार घेण्याबद्दल विचारतो तेव्हा त्याचं उत्तर लक्षात राहतं, ते काहीस असं होत की,

‘तिथं आम्ही एवढे महागडे कॅमेरे आणि टीम घेऊन खूप पैसे पणाला लावून थांबलो होतो म्हणून त्यांना स्वतःवर दबाव टाकत ती चढाई केली नाही, त्याने स्वतःच ऐकलं, हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे’.

यातून मला तो टेक्निशियन विथ सेन्सीबीलिटीजचं एक उत्तम उदाहरण वाटला, या छोट्या छोट्या वैयक्तिक विकासातल्या गोष्टी तुमच्या कलेत/व्यवसायात उमटतात आणि तेव्हा कुठं असा मास्टरपीस बनतो.

जिम्मी या फिल्मचा DOP सुद्धा आहे. अशावेळी सगळे कॅमेरामेन हे प्रोफेशनल क्लायंबरच लागतात. त्या कड्याला वर दोरी बांधून रॅपलिंग करत, हातात मोठे कॅमेरे घेऊन खाली उतरावं, आणि ऍलेक्स अर्ध्या इंचाच्या ज्या खोबणीत बोटं ठेवतो, बरोब्बर तिथं फोकस करणं, त्याच्या सोबत कॅमेरा नेणं, हे सामान्य कौशल्य नाही.

3000 फूट उंच भिंतीवर चढताना कॅमेरामुळे किंवा यातल्या एकही माणसामुळे ऍलेक्सचं लक्ष विचलित झालं, तो कॅमेरा कन्सिअस झाला तर अनर्थ होऊ शकतो. सोलो क्लायम्बिंग ही खूप पर्सनल गोष्ट आहे, बरेच लोक तर कोणाला सांगतही नाहीत की ते आज सोलोला जात आहेत.

त्यांचा पर्सनल स्पेस त्यांच्यासाठी जास्त महत्वाचा असतो. अशात हे कॅमेरे म्हणजे मोठा धोका. ऍलेक्सचा एक सिनियर त्याला यावरून ओरडतोसुद्धा. अशा अवस्थेत हे इतक्या शिताफीने शूट झालं ही विशेष बाब आहे. ऍलेक्स एका रिस्की पॅचला सर करत असताना तर कॅमेरामनचं स्क्रीनकडे बघणं बंद करतो, इतकं ते दृश्य विदारक असतं.

पण कॅमेरामन स्क्रीनकडे बघत नाहीए, आपला मित्र पडेल की काय या काळजीत तो रडतोय, हे टिपायला पण तिथे अजून एक कॅमेरा असतो. अशाप्रकारे ही ऍलेक्स सोबतच त्याच्या जवळच्या लोकांची कहाणी आहे. बऱ्याचदा महान लोकांची महानता दाखवताना फिल्ममेकर्स त्यांना जवळ जवळ दैवी असल्याप्रमाणे हाताळतात. का? कारण त्यांना मानवी पातळीवर ठेऊन त्यांची कथा सांगण्याची कला इतकी सोपी नाही. म्हणून हा माहितीपट ग्रेट आहे.

२.५७ तास मृत्यूला कल्टी देत ऍलेक्स ही चढण पूर्ण करतो. मितभाषी आणि कॅमेरॅसमोर फारसा न येणारा ऍलेक्स आता खुलतो, त्या प्रसंगाला चित्रपट समीक्षक राहुल देसाईंनी खूप मस्त शब्दात लिहिलंय की:

“He isn’t distracted by it anymore; he has made peace with their – her – eyes on him. For better or worse, Honnold has chosen to be less lonely, both on the mountain and in his life”

पुण्यात फक्त एकच शो होता, तो चार-पाच दिवस चांगला फुल्ल होता पण अजून स्क्रिन्स भेटल्या असत्या तर जास्त लोकांपर्यंत पोहोचला असता.

Rock Climbing बद्दलची काही बेसिक माहिती वेगळ्याने लिहिल, या निमित्ताने पुन्हा प्रॅक्टिस सुरू करायला एक कारण मिळालं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: free solo
ShareTweet
Previous Post

रामनामी – सर्वांगावर रामनाम गोंदवून घेणारा दलित समाज

Next Post

चहाचा इतिहाससुद्धा चहा इतकीच तरतरी आणणारा आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

चहाचा इतिहाससुद्धा चहा इतकीच तरतरी आणणारा आहे

दहा वर्षांच्या पोटच्या मुलाला सोबत घेऊन सावित्रीमाई प्लेगग्रस्त रुग्णांचा आधार बनली होती.

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.