The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एवढ्याश्या इस्त्राईलने आठ अरब राष्ट्रांना फक्त सहा दिवसांत धूळ चारली होती..!

by अनुप देवधर
4 June 2025
in इतिहास, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


१९६७ चा जून महिना उजाडला होता. घडामोडी कमालीच्या जलद झाल्या होत्या. इस्राईलच्या विरोधात इजिप्त, सीरिया, जॉर्डन, सौदी अरेबिया, इराक, कुवेत, सुदान, अल्जेरिया आणि येमेन या देशांची फौज एकवटली होती. यु*द्धाच्या विरोधात असणारे आणि अतिशय शांत, मवाळ स्वभावाचे इस्राईलचे पंतप्रधान, लेव्ही एश्कॉल यांनी अचानक १ जूनला मोशे देयान यांना संरक्षण मंत्री केलं.

गेल्या दोन-तीन महिन्यांत हालचाली गतिमान झाल्या होत्या. ‘सिक्स डे वॉर’ (Six Day War) नावानं ओळखल्या जाणाऱ्या आणि मध्य पूर्वेचा नकाशा बदलून टाकणाऱ्या या यु*द्धाचा शंखनाद झाला होता. आता यु*द्ध अटळ होतं…

खरंतर या यु*द्धाची पार्श्वभूमी इस्राईलच्या जन्मापासूनची होती. दुसरं महायु*द्ध संपताना सौदी अरेबियानं आपल्या तेलाच्या बदल्यात अमेरिकेकडून एक आश्वासन पदरात पाडून घेतलं होतं. ते म्हणजे सौदीला विचारल्याशिवाय अमेरिका इस्राईलबाबत कोणताही निर्णय घेणार नाही.

दुसऱ्या महायु*द्धानंतर इंग्लंडची जगावरची पकड सैल होऊ लागली होती. इंग्लंडने पॅलेस्टाईनमधून काढता पाय घेतला होता. जगभरातून ज्यू लोकांचा ओघ आता पॅलेस्टाईनकडं सुरू झाला होता. शेवटी १९४७ साली संयुक्त राष्ट्रसंघात पॅलेस्टाईनच्या फाळणीचा प्रस्ताव मंजूर झाला.



सौदी अरबला ही गोष्ट मान्य होणं शक्यच नव्हतं. सौदीनं ज्यूंवर ह*ल्ले सुरू केले. अशातच १४ मे १९४८ रोजी इस्राईलच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली. पराकोटीचा अमानुष छळ सहन केलेल्या ज्यू लोकांच्या इस्राईलचा जन्मच संघर्षानं झाला होता. सोव्हिएत पाठोपाठ अमेरिकेनं इस्राईलच्या निर्मितीला पाठिंबा दिला. पण अमेरिकेकडून होणारी प्रचंड गुंतवणूक, त्यातून मिळणाऱ्या अफाट पैशांकडं बघून सौदी शांत बसला. पण इस्राईलसोबत त्यांची कुरबुर कायमचीच झाली होती.

बाजूनं असणारे इजिप्त, सिरिया, पॅलेस्टाईन आणि जॉर्डन या सगळ्यांनाच इस्राईल पुरून उरला होता. आता तेलाचा पैसा खेळू लागल्यानं सगळे इस्राईलविरोधात एकवटू लागले होते. त्यातच १९५६ साली इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासिर यांनी सुएझ कालवा अडवला होता. जगभरातील तेल वाहतूक बंद झाली होती. त्यामुळं इस्राईलनं इंग्लंड आणि फ्रान्सच्या साहाय्यानं सुवेझवर ह*ल्ला चढवला होता, त्यामुळं इजिप्त सकट त्याची सल सगळ्यांच्याच मनात होती. त्यानंतर इस्राईलच्या सगळ्या बॉर्डर्सवर सतत लहान मोठी यु*ध्दं सुरूच असायची.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

१९६७ च्या एप्रिल महिन्यात इस्राईलनं ६ सीरियन मिग विमानं पाडली. त्यातून प्रचंड तणाव निर्माण झाला होता. सोव्हिएतच्या इंटेलिजन्स विभागानं इस्राईल उत्तरेच्या बॉर्डरवर सैन्य पाठवून सिरिया ताब्यात घेणार असल्याचंही सांगितल्यावर अजूनच ठिणगी पडली.

याला उत्तर म्हणून २२ मे रोजी इजिप्त, सिरिया आणि जॉर्डन यांनी मिळून तिरानची सामुद्रधुनी बंद करून इस्राईलचा गळा आवळला होता.

या सगळ्या दरम्यानच पुढं मे च्या शेवटी, गमाल अब्दुल नासिर यांनी पुढाकार घेऊन इजिप्त आणि जॉर्डनमध्ये एक करार केला. इस्राईलनं जर कोणावर हल्ला केला, तर दुसरा देश त्याला मदत करेल. म्हणजेच इस्राईलने कोणावरही ह*ल्ला केला, तर तो इजिप्त वर ह*ल्ला मानला जाणार होता. आणि त्यात इतर देश अप्रत्यक्ष सहभागी होणार हे उघडच होतं.

सिरियावर इस्राईलकडून होणाऱ्या ह*ल्ल्याची माहिती मिळाल्यावर नासिर यांनी सिनाईच्या द्वीपकल्पावर आपलं सैन्य धाडलं. तिथं आधीपासूनच तैनात असणारं संयुक्त राष्ट्रसंघाचं पीस किपिंग फोर्सचं सैन्य बाजूला करण्यात आलं होतं.

इकडे इजिप्त, सिरिया, जॉर्डन आणि इतर अरब देशांनी युद्धाची सगळी जुळवाजुळव केली होती. तिन्ही बाजूंनी इस्राईलला घेरण्याची तयारी केली होती. त्यांच्या दिमतीला २ लाख ४० हजारांची फौज, जवळपास ३ लाख राखीव दल, ९५७ लढाऊ विमानं आणि २५०४ रणगाडे होते.

तर इस्रायली सैन्याकडं ५० हजार फौज, २ लाख ४० हजार राखीव दल, ३०० लढाऊ विमानं आणि ८०० रणगाडे दिमतीला होते. इस्राईल लष्करी ताकदीला कमी होता.

शेवटी जून महिना उजाडला. अचानकपणे संरक्षणमंत्री झालेले मोशे देयान आता रियल हिरो होणार होते. त्यांनी यु*द्धाच्या धामधुमीत एक आश्चर्यकारक घोषणा केली. त्यांनी सांगितलं की, इस्रायली सैन्य सुट्टीवर गेलं आहे, आणि हवाई दलाचं ट्रेनिंग सुरू आहे. सगळे जग गाफील राहिले.

ताकदीनं कमी असल्यामुळं पहिला ह*ल्ला इस्राईलला करणं क्रमप्राप्त होतं. आणि शेवटी ५ जूनचा दिवस उजाडला.

इस्राईलची २०० लढाऊ विमानं हवेत झेपावली. त्यांनी थेट जॉर्डनमधला अरब देशांचा सैन्यतळ गाठला. ‘ऑपरेशन फोकस’ या नावाखाली केलेला हा ह*ल्ला एवढा भयंकर होता, की तीनच तासांत इस्राईलच्या या लढाऊ विमानांनी १८ वायुतळ उ*ध्वस्त केले. जॉर्डनमधली शत्रूंची तब्बल ९०% लढाऊ विमानं जागेवरच बेचिराख करून टाकली. सगळी वायुसेनाच संपवल्यावर अरब राष्ट्रं सैरभैर झाली. आता यु*द्ध फक्त जमिनीवर उरलं होतं.

इस्राईलच्या सैन्याला कव्हर फायर द्यायला लढाऊ विमानं असल्यामुळं इस्राईल अक्षरशः तुटून पडला. इस्रायली फौजा इजिप्तमध्ये घुसल्या. ६ जूनला सिनाई द्वीपकल्पावर ताबा मिळवला. गाझा पट्टी ताब्यात घेतली. तर ७ जूनला जॉर्डनकडून पूर्व जेरुसलेम बळकावलं. शेवटच्या टप्प्यात म्हणजे ९ जूनला सीरियन आर्मीला नेस्तनाबूत करून गोलनच्या टेकड्या ताब्यात घेतल्या.

इस्राईली सेना एवढ्या त्वेषानं लढली, की फक्त १३२ तासांत २१ हजारांवर जास्त शत्रू सैन्याला ठार केलं. शेवटी १०जून रोजी संयुक्त राष्ट्रसंघानं हस्तक्षेप करून यु*द्ध थांबवलं. यु*द्ध ५ ते १० जून दरम्यान केवळ सहा दिवसच चाललं.

इस्राईलने जिनिव्हा करार मोडला होता. मानवाधिकारावर पाणी फिरवलं होतं. दुसरीकडं नासिर यांनी राजीनामा दिला. अर्थात ते परत सत्ताधीश झाले. तर इस्राईलमध्ये गोल्डा मायर पंतप्रधान झाल्या. एवढ्या सगळ्यांत यु*द्धाचे हिरो ठरलेल्या मोशे देयान यांना राजकारणामुळं राजीनामा द्यावा लागला.

इतिहासात हे यु*द्ध कायम स्वतःची जागा निर्माण करून गेलं. एकटा टीचभर इस्राईल तब्बल आठ अरब राष्ट्रांच्या विरोधात एकट्यानं लढला होता. फक्त लढलाच नाही, तर ६ दिवसांत सगळा भूगोल बदलून टाकला, जिंकला.

यु*द्धासाठी कोण जबाबदार होतं आणि कोण नाही, महत्त्वाचं नसतं. यु*द्धानंतर काय झालं हे महत्त्वाचं असतं. कारण ‘History remembers the battle, and forgets the blood’


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Israel
ShareTweet
Previous Post

बाजी राऊत – देशासाठी शहीद होणारा वयाने सर्वात लहान स्वातंत्र्यसैनिक

Next Post

दैनंदिन अडचणींवर मात करण्यासाठी भारतीय लोकांनी लावलेल्या या शोधांना तोड नाही

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

दैनंदिन अडचणींवर मात करण्यासाठी भारतीय लोकांनी लावलेल्या या शोधांना तोड नाही

"नॉट सो कन्वेन्शनल" कपूरला भावपूर्ण श्रद्धांजली!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.