The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जग इकडचं तिकडं झालं तरी चहा सोबतची ‘पार्ले-जी’ची जागा दुसरं कोणी घेऊ शकणार नाही

by ऋजुता कावडकर
23 April 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


सकाळच्या चहासोबत घराघरात सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात करणारं बिस्कीट म्हणजे “पार्ले-G”. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचं असं हे बिस्कीट पिढ्यानपिढ्या आपल्याला प्रत्येकाच्या घरात दिसतं.

पण हे बिस्कीट नेमकं आलं कुठून? कधीपासून आहे भारतात? हे जाणून घेण्यासाठी थोडं मागे जाऊयात.

सगळ्याचं आवडतं पार्ले-G हे भारतातलं भारतीयांसाठी बनलेलं पहिलं बिस्कीट आहे. पार्ले-G हे पार्ले कंपनीचं पहिलं उत्पादन नव्हतं. आपल्याला माहितीच आहे की, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतात सगळ्या मालावर इंग्रजांचीच मक्तेदारी होती. बाजारपेठांमध्ये विदेशी मालांचीच रेलचेल जास्ती दिसून यायची.

अशा काळातच इंग्रजांनी भारतीयांना “कॅंडी”ची ओळख करुन दिली. पण इतर विदेशी मालाप्रमाणेच हेदेखील केवळ काही श्रीमंत लोकांच्या खिशालाच परवडू शकणारे होते. इतर भारतीय मालाच्या अव्वाच्या सव्वा किमतींमुळे सगळ्या गोष्टींपासून वंचित रहात होते.



पण हे एका इसमाला बघवले नाही. असाही त्यांच्यावर स्वदेशी चळवळीचा प्रभाव असल्याने त्यांनी इंग्रजांनी आणलेली कॅंडी भारतात बनवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते जर्मनीला गेले आणि कॅंडी बनवण्याचे तंत्र शिकून आले. एवढेच नाही तर त्या काळात त्यांनी तब्बल ६०,००० रुपयांचे कॅंडी बनवण्याचे मशीन देखील भारतात आणले.

त्या इसमाचे नाव होतं मोहनलाल दयाल चौहान. ज्यांनी पार्ले या कंपनीची स्थापना केली. खरतर मोहनलाल यांचा रेशमाचा व्यापार होता. पण जर्मनीहून परतल्यावर त्यांनी विलेपार्ले येथे एक जुनी फॅक्टरी विकत घेऊन नवीन व्यापार चालू करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांच्या मदतीने, रात्रीचा दिवस करुन त्यांनी फॅक्टरीला मूर्त रूप दिले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पार्ल्यात सुरु करण्यात आली म्हणून कंपनीचे नाव “पार्ले” ठेवण्यात आले.

या कंपनीचे पहिले उत्पादन म्हणजे “ऑरेंज कॅंडी”. ऑरेंज कॅंडी हिट झाल्यामुळे पार्लेने अजून कॅंडी बनवायला सुरुवात केली.

चहाबरोबर हमखास दिले जाणारे बिस्कीट हे सुद्धा केवळ इंग्रज आणि उच्चभ्रू लोकांपुरते मर्यादित होतं. दलालांनी विचार केला की कॅंडी प्रमाणेच आपण बिस्कीट देखील भारतात बनवू शकतो. आणि १९३९ मध्ये गव्हाच्या पिठापासून बनलेल्या पार्ले-ग्लूकोच्या उत्पादनाची सुरुवात झाली.  या बिस्किटाची जिभेवर रेंगाळणारी चव आणि कमी किंमत यामुळे अल्पावधीतच हे बिस्कीट भारतीयांमध्ये लाडकं ठरलं.

ग्लूको बिस्कीट इतके प्रसिद्ध झाले की त्याच्या लोकप्रियतेपुढे सगळे ब्रिटीश बिस्किट फिके पडले.

याचवेळी जगात दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती. अनेक भारतीय जवान ब्रिटेनच्या वतीने युद्धभूमीवर पाठवण्यात आले होते. तेव्हा तिथे सुद्धा त्यांनी इमर्जन्सीसाठी म्हणून ग्लूको बिस्किटे आपल्याबरोबर नेली होती. जेणेकरून यातील ग्लुकोज त्यांना ताकद पुरवेल.

दुसरे महायु*द्ध संपता संपता पार्ले-ग्लूको एक ब्रँड बनला होता. बिस्कीट बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गहू लागत असे ज्याच्या कमतरतेमुळे दुसऱ्या महायुद्धानंतर ग्लूकोचे उत्पादन बंद करण्यात आले. १९४७ मध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरही ही कमतरता तशीच होती. उत्पादन बंद झाल्यामुळे सगळ्यांनाच बिस्किटाची कमतरता भासू लागली. परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा एकदा उत्पादन असे कंपनीचे आश्वासन त्यांनी थोड्याच कालावधीत पूर्ण केले.

ग्लूको हे नाव त्यात असलेल्या ग्लुकोजवरून आले असल्याने त्याचा काहीच कॉपीराईट कंपनी कडे नव्हता. याचाच फायदा इतर बिस्कीट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी घेतला. आणि बघताबघता बाजारात सगळीकडे ग्लूको बिस्किटे दिसायला लागले. परिणामी ओरिजिनल ग्लूको कुठले यावरून लोकांमध्ये गोंधळ उडू लागला. सरतेशेवटी १९८२ साली पार्लेने पार्ले-ग्लूको हे नाव बदलून पार्ले-G असे केले.

काळ हळूहळू बदलत होता. भारतात टीवी त्या काळात घराघरात टीवी पोहचला होता. याचाच फायदा घेऊन पार्ले आपली पहिली जाहिरात टीवीवर दाखवण्याचा निर्णय घेतला. आणि याचा त्यांना अपेक्षेपेक्षा जास्ती फायदा झाला. १९९१ पर्यंत बिस्किटांच्या एकूण खपाचा ७०% भाग केवळ पार्लेचाच होता.

पार्लेला आता कळून चुकले होते की खप वाढवायचा असेल तर चवीबरोबरच त्यांना स्वतःच्या मार्केटिंगकडे पण लक्ष द्यावे लागेल. आणि म्हणूनच १९९८मध्ये जेव्हा खप कमी झाला तेव्हा त्यांनी मुलांचा लाडका सुपरहिरो “शक्तिमान” याला घेऊन आपले मार्केटिंग केले. याचा परिणाम? पार्ले-Gचा वाढलेला खप.

पार्ले
फोटो – द बेटर इंडिया

जसेजसे वर्ष सरत होते पार्ले-Gची लोकप्रियता वाढतच होती. आणि आता भारतातच नव्हे तर जगात सुद्धा याच्याइतका खप दुसऱ्या बिस्किटांचा होत नव्हता. २००३ मध्ये जगात सर्वाधिक विकले जाणारे बिस्कीट म्हणून पार्ले-G ला घोषित करण्यात आले. २०१२ मध्ये पार्ले-G भारतातला पहिला FMCG ब्रांड बनला ज्याची विक्री तब्बल ५००० करोड इतकी होती.

इतक्या वर्षात जग इकडचं तिकडे झालं पण पार्लेनी आपली जागा अजूनही कायम ठेवली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आजही सगळ्यांची पसंती पार्ले-Gलाच आहे. या “स्वाद भरे-शक्ती भरे पार्ले-G”ची पसंती दिवसागणिक वाढणारी पसंती, जिभेवर रेंगाळणारी ही चव अशीच कायम राहो!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: parle
ShareTweet
Previous Post

कोरोनाशी लढताना स्क्रॅप बसेस पासून बनवलेल्या सॅनिटायझेशन बसेस ठरताहेत वरदान

Next Post

म्हणून हि*टल*रने त्याचा देह दफन न करता जाळण्याचे आदेश दिले होते

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

म्हणून हि*टल*रने त्याचा देह दफन न करता जाळण्याचे आदेश दिले होते

युट्यूबच्या माध्यमातून भटकंती करणारा हा तरुण सध्या महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये घर का करतोय ?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.