आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
चीनमध्ये लोकांचा आवाज कसा दाबला जातो याच्या सुरस कहाण्या अनेकदा सांगितल्या जातात. या चीनने संपूर्ण जगाला कोरोनासारखी महामारी भेट दिली. चीनमधले वुहान शहर, जे या प्रकोपाला पहिल्यांदा बळी पडले होते त्याबाबतच्या अनेक खोट्या बातम्या या चायनीज सरकारने प्रस्तुत केल्या आहेत.
आजही संपूर्ण जगाला संशय आहे के चीनने वुहानची सत्य परिस्थिती दाबून ठेवली. सरकारी आकड्यापेक्षा कितीतरी जास्त बळी कोरोनाने चीनमधून घेतले आहेत परंतु तेथील सरकारचा चिनी सोशल मिडिया (तेथे फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स असे सोशल मीडिया नाहीत), प्रिंट मिडिया, यांच्यावर चांगलच वचक असल्यामुळे खरी माहिती कधीही जगासमोर येत नाही.
चीनमध्ये आजही फेसबुक चालत नाही. तिथे ट्विटरला सुद्धा बंदी आहे. चीनच्या कम्युनिस्ट सरकारचा जुलमीपणा संपूर्ण जगाला ठाऊक आहे. मात्र हे सरकार तिथे नक्की कशा प्रकारे काम करते हे कोणालाच माहिती नाही. त्यासंदर्भातली खरी बातमी कधी बाहेर येत नाही.
मात्र इतिहास जर पहिला तर इतिहासात या चीनच्या सरकारने आपल्याच लोकांवर केलेला रक्तपात जगाने सगळ्यात पहिल्यांदा बघितला होता तो १९८९ मध्ये.
बीजिंग येथील तिआननमेन स्क्वेअर चौकात सरकारविरोधात आणि लोकशाहीसाठी निदर्शने करायला लोक जमले असताना तिथे जो निघृण रक्तपात घडला त्याबाबतच्या हकीकती जगभरातील लोकांपर्यंत पोहोचल्या आणि चीनचा खरा क्रू*रकर्मा चेहरा लोकांच्या नजरेसमोर आला.
चीनमध्ये कम्युनिझमचा इतिहास हा रक्तरंजित आहे. तेथील अ*त्याचारांचा मेरुमणी म्हणता येईल अशी घटना म्हणजे १९८९ ची तिआननमेन स्क्वेअर चौकातली घटना होय.
चीनमध्ये जी आजची पिढी आहे, त्या पिढीलासुद्धा या तिआननमेन स्क्वेअर चौकातील रक्तपाताविषयी जास्त माहिती नाही. याचे कारण या घटनेशी निगडीत प्रत्येक हकीकत चीनच्या सरकारने पुरेपूर दाबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजही चीनच्या लोकांसाठी ही घटना म्हणजे एक मोठे रहस्य बनले आहे. या घटनेचा कुणीही सार्वजनिक आयुष्यात उल्लेख करू शकत नाही.
जर असा उल्लेख केलाच तर अशा माणसाला पकडून त्याला त्याबाबत शिक्षा करण्याचे अधिकार हे चीनचे सरकार स्वत:कडे राखून आहे. चीनमध्ये या घटनेबाबत नवीन पिढीला खरेखुरे ज्ञान व्हावे म्हणून शिकवणुकीचे वर्ग घेतले जातात. तिआननमेन स्क्वेअर चौकामधील घटना ही कशी खोटी होती आणि सरकारची बदनामी करण्यासाठी कशा पद्धतीने ही घटना बाकी जगातील मिडीया पसरवते याबाबत चीनच्या लहान मुलांना अशा क्लासेस मध्ये सांगितले जाते.
तिआननमेन चौकात घडलेले ह*त्याकांड हे तिथल्या लोकांनी कम्युनिस्ट सरकारच्या विरोधात दीर्घकाळ चालवल्या गेलेल्या आंदोलनाचा परिणाम होता.
लोकांना हे कम्युनिस्ट सरकार नको होते. त्यांना या सरकारमध्ये चालणाऱ्या भ्रष्टाचाराचा कंटाळा आला होता. चीनच्या शेजारील देशामध्ये, भारतामध्ये जशी लोकशाही राज्यव्यवस्था आहे तशी राज्यव्यवस्था त्यांना स्वत:च्या देशात हवी होती.
त्याकाळात युरोपियन देशामध्ये असलेल्या कम्युनिस्ट सरकरविरोधात पण असेच उठाव होत होते. वर्सोवा कराराच्या पार्श्वभूमीवर होणारे हे उठाव जगातून साम्यवाद उखडून टाकण्याची भाषा बोलत होते. चीनमध्ये उपोषण आणि आंदोलने या माध्यमातून लोक चीनमधील जुलमी कम्युनिस्ट राजवटीचा निषेध करत होती.
तिआननमेन स्क्वेअर चौकातील घटनेच्या काही महिने आधीपासून चीनच्या विविध भागात लोक हरताळ, उपोषणे, बंद अशा विविध मार्गाने निषेध चालू होते. त्यातून ४ जूनच्या सुमारास अनेक लोकांनी तिआननमेन स्क्वेअर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन सरकारविरुद्ध निदर्शने केली होती.
मात्र या जमावावर चीन सरकरने मिलिटरीला गोळ्या घालण्याचे आदेश दिले. जवळ जवळ ५०० लोक जे या चौकात निदर्शानासाठी जमले होते ते गोळी*बारामध्ये ठार झाले. तरीसुद्धा चीन सरकारने तिआननमेन स्क्वेअर चौकात मेलेल्या लोकांची आकडेवारी कधीही बाहेर येऊ दिलेली नाही हे विशेष.

या घटनेनंतर चीन मधील पत्रकारितेचे मात्र पूर्णपणे धिंडवडे काढण्यात आले. हॉंगकॉंगसह देशभरातील मिडीया वर कडक सेन्सॉरशिप बसवण्यात आली. मीडिया द्वारे या घटनेबद्दल देण्यात येणारी हर एक खबर दाबली गेली. वर्तमानपत्रे, वाहिन्या यांची कार्यालये बंद करण्यात आली. पत्रकार लोकांना सस्पेंड करून घरी पाठवण्यात आले.
या चौकातील एक बोलके छायाचित्र मात्र जगभरात प्रसिद्ध झाले. चौकातील आंदोलकांवर मिलिटरीचे रणगाडे चालून येत होते तेव्हा त्या रणगाड्यासमोर उभा राहण्याची हिम्मत एका आंदोलकाने दाखवली होती. रणगाडा त्याला चिरडून पुढे गेला मात्र त्यापूर्वी घेण्यात आलेला त्याचा फोटो हा जगभरात ‘पिक्चर ऑफ टँकमॅन’ म्हणून गाजला.

जगभरात सरकारने आंदोलकांचे चिरडलेले उठाव प्रसिद्ध आहेत मात्र चीनच्या तिआननमेन स्क्वेअर चौकातला उठाव हा वेगळा का मानला जातो ते या टँकमॅनच्या फोटोकडे पाहून समजते.
मानवी आशा, उमेद, भावना आणि स्वतंत्र याला चिरडणारा रणगाडा हे या कौर्याचे प्रतीक बनून राहिले आहेत म्हणून हा उठावसुद्धा इतिहासामध्ये काळ्या अक्षरांमध्ये लिहिला गेलेला आहे.

परंतु चीनने या इतिहासामधून काहीही धडा घेतलेला नाही. आजही हॉंगकॉंगला ‘रिपब्लिक ऑफ चायना’मध्ये राहायचं नाही आणि चीनी राजवटीविषयी तेथील लोकांना प्रेम नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा हॉंगकॉंगमधील जनतेने आपला विरोध हा थांबवलेला नाही. चीन जरी हॉंगकॉंग ला स्वत:चा एक हिस्सा मनात असले तरी हॉंगकॉंगला चीनच्या अधिपत्त्याखाली राहायचे नाही. याचे कारण इतिहासातील या तिआननमेन चौकाच्या घटनेचे तपशील पाहिल्यास आपणाला समजू शकते.
विशेष बाब म्हणजे चीनचे अधिकृत नाव ‘”पीपल्स” रिपब्लिक ऑफ चायना’ आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








