The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

असे बनले जगभरात प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांचे भन्नाट लोगो…

by द पोस्टमन टीम
31 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


व्यवसाय करताना सर्वात आधी त्याची सुरवात होते ते त्याच्या नावापासून, मग पुढे गोष्ट येते ती त्या नावाला साजेशा लोगोची अर्थात ट्रेडमार्कची.

कारण जेव्हा तुमचा ब्रँड मोठा होऊन नावाने ओळखला जातो तेव्हा ग्राहक सर्वात आधी ट्रेडमार्ककडे पाहतात हाच ट्रेडमार्क तुमची बाजारातली ओळख असतो. म्हणून प्रत्येक व्यवसायिक कंपनी आपला लोगो सर्वात उत्कृष्ट व आकर्षक कसा असेल यावर लक्ष देते.

तर आज आपण अशाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या काही कंपन्यांचे लोगो व त्या लोगोच्या मागे असणारा त्यांचा उद्देश जाणून घेऊया.

◆ Google – गुगलचा लोगो संपूर्ण जगातील सर्वात नामांकित ब्रॅंड्सपैकी एक आहे. आजकाल तर तो इतका लोकप्रिय आहे की गुगल हा शोध (सर्च) या शब्दाचा समानार्थी शब्द झालाय.


Google logo the postman
Google

गुगलच्या लोगोमध्ये एक गोष्ट तपासली जाऊ शकते ती म्हणजे रंगांची निवड. लोगो डिझायनर रूथ केदारने अतिशय प्राथमिक रंग वापरलेत फक्त “L” मधील हिरवा रंग सोडून. यातून गुगलने हेच सांगायचं अथवा दर्शवायचं आहे की, “गुगल कंपनी ही नियमांनुसार खेळत नाही उलट नियम तोडून मजा करण्यास प्राधान्य देते.”

◆ Amazon – आज ॲमेझॉन ही सर्वात विश्वसनीय ऑनलाइन वस्तू विकणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. बरीचशी जुनी असलेली ही कंपनी जगभर प्रसिद्ध आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

Amazon logo the postman
Amazon

आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभर ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या या कंपनीचा ट्रेडमार्क तयार करताना त्यांनी Amazon हे इंग्रजी अक्षरात नाव टाकलं असून यात आपल्याला एक रेषा दिसते जी A या अक्षरापासून चालू होऊन Z या अक्षरावर संपते, हा लोगो A ते Z या नावाने चालू होणाऱ्या सगळ्या वस्तू मिळतील असं दर्शवतो. तसेच या सरळ ओळीत असणाऱ्या लोगोमध्ये त्यांनी एक हास्यखळी दाखवण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून त्यांच्याकडून खरेदी केल्याने ग्राहक आनंदी होईल हा त्यांचा संदेश ग्राहकाला जाईल.

◆ Nike – हा लोगो तर एवढा प्रसिद्ध आहे की तुम्हाला या लोगो सोबत कंपनीचं नाव नसेल तरी तुम्ही ओळखाल. याचा अर्थ असा की त्या कंपनीने लोकांच्या मनात घर केलं आहे किंवा ते लोकांत पोहचले आहेत असं आपण म्हणू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे काय, या बरोबरच्या खुणेसारख्या असणाऱ्या लोगोचा अर्थ खूप मोठा आहे ते? नाही ना? तर आम्ही सांगतो.

Nike logo the postman
Nike

Nike ही वास्तविक पाहता ग्रीक देवी आहे जी विजयाचं मानचिन्ह असल्यासारखी आहे, तर १९७१ साली लोगो तयार करताना कर्लीन डेव्हीडसनने त्या देवीचा पंख हा हालचाल व वेग या उद्देशाने नावाच्या सोबत जोडला आणि तिचा तो निर्णय अत्यंत योग्य ठरला. त्याचं फळ म्हणजे आज लोकांच्या मनावर ठामपणे बिंबवलागेलेला तो Nike चा ट्रेडमार्क.

◆ Burger King – जगातील दुसऱ्या क्रमांकाची फास्टफूड चेन कंपनी म्हणून आज बर्गरकिंगकडे पाहिलं जातं, आणि जर तुमचा ब्रँड एवढा मोठा असेल तर ट्रेडमार्क सुद्धा तेवढा आकर्षक आणि समर्पक असणारच ना..! मध्यंतरी पुण्याच्या बर्गर किंग बरोबर झालेल्या नावाच्या केसमुळे त्याची चर्चा होती.

या लोगोत दोन बन पावांमध्ये असलेलं पॅटी किंवा मांस काढून त्याजागी बर्गर किंग हे नाव टाकण्यात आलं आहे. जेणेकरून जेव्हा त्यांच्या प्रसिद्ध बर्गर हॅम्बर्गरचा विषय येतो तेव्हा तो राजा आहेच व तो राहील हे उद्घोशीत होते. तर, बाहेर असलेली निळी रेषा ही सर्व सजीवश्रुष्टी ने व्यापलेल्या मंडळाला आकर्षित करते असा त्याचा अर्थ आहे.

◆ Coca Cola – शीतपेय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहत ? काहीही असुद्यात पण त्यात कोकाकोला असणार हे निश्चित. शीतपेय निर्मितीत अग्रेसर असलेला हा बऱ्याच काळापासून चालत आलेल्या ब्रँडने आपला लोगो सुरूवातीचा जसा आहे तसाच आजसुद्धा ठेवलेला आहे. त्यात काही सुधार सोडता विशेष असा काहीच बदल करण्यात आलेला नाही.

Coca Cola the postman in marathi
Coca Cola

जेव्हा १९८६ साली या लोगोची पहिली आवृत्ती निर्माण करण्यात आली तेव्हाच असलेला का हस्तलेखनाचा नमुना आहे, आजच्या घडीला कितीही बदल घडत असले तरीसुद्धा आपल्या विशेष शैलीवर कोका कोला ने कुठलेही बदल केलेली नाहीत व ते आपल्या दर्जावर ठाम आहेत आणि या लोगोची सर्वात निराळी गोष्ट ही आहे की जेव्हा जगभर त्या लोगोचा अनुवाद केला जातो तेव्हा कुठल्याही ठिकाणी ग्राहक यास ओळखू शकतात.

◆ Instagram – हे ॲप साधारणपणे ऑर्कुटच्या नंतर आलेलं, तुम्हाला हे कदाचित २०१० पासून आठवत असावं, फक्त फोटो टाकण्याच्या दृष्टीने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे, आणि फोटोप्रेमी प्रेक्षकांना आवडावा म्हणून हा लोगो आधी तपकिरी रंगाचा होता.

पण जेव्हा २०१६ साली त्यांच्या ॲपचा वाढलेला वापर आणि त्यात आलेली विविधता पाहून त्यांनी या लोगोला थोडं बदलण्याचा निर्णय घेतला, व आपला चेहरा बदलण्याचे ठरवले. कारण आता या प्लॅटफॉर्मवर आता मोठे मोठे व्यावसायिक ब्रँड, मॉडेल्स येऊ लागले होते. मग त्या नंतर २०१६ साली इन्स्टाग्रामच्या ॲपचा लोगो बदलण्यात आला व तो ज्याप्रमाणे सगळ्या प्रकारचं साहित्य आहे त्याप्रमाणे मिश्र रंगसंगतीचा करण्यात आला.

◆ Dove – आजच्या घडीला सौंदर्यप्रसाधनांचा वाढता वापर तर आपण अनुभवत आहोत. त्यात नानाविध प्रकारची अत्तरे असतील, सुगंधी तेल असतील किंवा रोजनिशीतील साबण असेल हे सगळं आपण वापरतच आहोत. तर या प्रसाधनांपैकी साबणाचे उत्पादन करणाऱ्या Dove या कंपनीच्या बोधचिन्हाबद्दल आपण जाणून घेऊया.

Dove च्या लोगोमध्ये असणारा आकार हा आपल्याला पक्ष्याचं प्रतिबिंब दर्शवतो तसेच त्यांची कंपनी शांतता, सौम्यता व शुध्दता दाखवतो. डव्ह हा निळ्या अक्षरात असणारा शब्द विश्वासहर्ता व उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. तर पिवळ्या रंगाचा पक्षी हा आनंद व समृद्धीला सूचित करतो, आणि अर्थातच सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या ब्रँडचा महिलांनी विचार करावा म्हणून हा लोगो परिपूर्णच आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: logos
ShareTweet
Previous Post

उपेक्षितांच्या वेदनांचे समोर येणारे भीषण स्वरूप भारतीय लोकशाहीला अशोभनीय नाही का?

Next Post

हिऱ्यांच्या ‘व्हाईट कॉलर’ धंद्यामागे आफ्रिकेतल्या एका देशाची भयानक दैन्यावस्था लपलेली आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

हिऱ्यांच्या 'व्हाईट कॉलर' धंद्यामागे आफ्रिकेतल्या एका देशाची भयानक दैन्यावस्था लपलेली आहे

मंगोल : पाणी दूषित होईल म्हणून स्नान न करणारे 'विश्वविजेते' शूर साम्राज्य

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.