The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कार्टूनच्या दुनियेच्या बादशहाचा एक अवगुण लपवण्यासाठी त्याचा अख्खा इतिहासच बदलावा लागला होता!

by द पोस्टमन टीम
4 December 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“वॉल्ट डिस्ने” हे नाव घेतलं की आपल्यासमोर उभी राहते ती त्याने बनवलेली कार्टून दुनिया. ‘मिकी माऊस, मिनी माऊस, विनी द पूह ‘ असे एक ना अनेक नावं आपल्यासमोर येतात. ही नावं म्हणजे फक्त नावं नसून वॉल्टने त्याच्या कुंचल्यातून अजरामर केलेले व्यक्तिमत्वच आहेत जणू.

जगात असे खूप कमी लोकं असतील ज्यांना या कार्टून्सबद्दल माहिती नसेल. प्रत्येक माणूस जेव्हा ठरवतो की त्याला कसली तरी कंपनी काढायची आहे तर त्याच्या डोक्यात पहिला विचार येतो व्यवहार आणि नफ्या-तोट्याचा. पण वॉल्ट डिस्ने याने ज्यावेळी ठरवलं की त्याला एक कंपनी बनवायची आहे तर त्याच्या डोक्यात वेगळाच विचार चालू होता, त्याला अशी कंपनी बनवायची होती जिच्यात मुलांना आपली स्वप्न पूर्ण करता येतील आणि यातूनच उदय झाला तो “डिस्ने स्टुडिओजचा”.

Walt Disney Studios Paris - the postman in marathi
Walt Disney Studios Paris

 

एक कफल्लक ते जगातील सर्वांत यशस्वी व्यक्तींपैकी एक हा वॉल्ट डिस्ने ह्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. जगातील बहुतांश लोक त्यांना व्यवसाय जगतातील आदर्श मानतात. लहान मुलांसाठी तर वॉल्ट डिस्ने म्हणजे एक जादूगारच आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करण्याची जणू सवयच आहे लहान मुलांना.



कार्टून दुनियेचा खराखुरा अनुभव लहान मुलांना घेता यावा म्हणून वॉल्ट डिस्ने आणि त्यांचा बंधू रॉय ह्यांनी “डिस्ने वर्ल्ड” ची निर्मिती केली . आज डिस्ने वर्ल्ड ही जगातील 5व्या क्रमांकाचे सर्वांत जास्त लोकांनी भेट दिलेले ठिकाण आहे. दरवर्षी सरासरी 6 करोड लोक ह्या ठिकाणी भेट देतात. लहान मुलांसाठी “डिस्ने वर्ल्ड” म्हणजे सगळंच. जसं क्रिकेट चाहत्यांना एकदा तरी स्टेडियम मध्ये जाऊन मॅच पहायची असते तसंच नातं डिस्ने वर्ल्ड आणि लहान मुलांचं आहे.

वॉल्ट डिस्ने हा नक्कीच एक आदर्श होता आणि आजही आहे. का नसावा? त्याच्याकडे तो प्रत्येक गुण होता जो त्याला एक आदर्श व्यक्ती बनवतो .

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पण जर मी तुम्हाला सांगितलं की त्यात एक अवगुण किंवा वाईट सवयसुद्धा होती. तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष कोणीच माणूस हा सर्वतोपरी परिपूर्ण नसतो. बरोबर, पण वॉल्ट डिस्ने ची ही सवय एवढी घातक आणि वाईट होती की त्यांच्या देहांतानंतर अक्षरशः ती सवय लपवण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वॉल्ट डिस्ने ह्यांचा इतिहासाच बदलावा लागला आणि ती गोष्ट लपवावी लागली.

कुठली होती ती गोष्ट? का ती लपवण्यासाठी एवढी उठाठेव करावी की ज्याने वॉल्ट डिस्ने ह्यांचा इतिहास च बदलला…….?

तर ती सवय होती धुम्रपानाची. होय बरोबर धूम्रपान, वॉल्ट ह्यांना दिवसाला 3 पॅकेट सिगारेट्स लागत होते. तुम्ही म्हणाल की जर हा माणूस एवढ्या सिगारेट्स ओढत होता तर त्याचा एखादा फोटो तरी असेल ज्यामध्ये त्याच्या हातात सिगारेट असेल.

नाही, असा एकही फोटो तुम्हाला इंटरनेटवरच काय तर डिस्ने ह्यांच्या फोटोसंग्रहातही नाहीये. कसकाय? उत्तर खूप सोप्पंय तर त्यांनी सगळे फोटो हे फोटोशॉप केलेत.

disney in marathi

पण ही विचित्र गोष्ट इथेच नाही थांबत कारण सिगारेट जरी फोटोशॉप करून लपवली असली तरी सिगारेट पकडणाऱ्या 2 बोटांच्या पकडीचं काय?

मग ही पकड कसली आहे हे समजावून सांगण्यासाठी त्याच्या कर्मचाऱ्यांनी शक्कल लढवली त्यांनी त्या पकडीला “2 fingers point” हे नाव दिलं. आणि ते एवढ्यावरच नाही थांबले तर त्यांनी डिस्नेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देऊन “2 fingers point” करायला लावले. की जेणे करून असं वाटेल की ही सवय वॉल्ट डिस्ने ह्यांची आहे आणि कर्मचारी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

हे सर्व करण्यामागचे कारण अगदी स्पष्ट होतं. डिस्ने ह्यांच अनुकरण करणारा सर्वात मोठा वर्ग हा लहान मुलांचा आहे. आपल्या हिरोला सिगारेट ओढताना पाहून त्यांना वाईट सवयी लागू नयेत म्हणून हे सर्व करावं लागलं .

मित्रांनो ही सवय एवढी वाईट होती की ह्याच सवयीने वॉल्ट डिस्ने ह्यांचा घात केला. ह्या सवयीने त्यांनी पाहिलेलं “डिस्ने वर्ल्ड” चं स्वप्न सुद्धा त्यांना सत्यात पाहता नाही आलं. अतिधुम्रपणामुळे त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला आणि 1966 मध्ये त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: walt disney
ShareTweet
Previous Post

गिर्यारोहकांचा जीव की प्राण असणारा कोकणकडा काय आहे? कसा बनला? जाणून घ्या.

Next Post

साऊथ इंडियन खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या ‘सांबार’चा शोध मराठा सैन्याने लावलाय

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

साऊथ इंडियन खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या 'सांबार'चा शोध मराठा सैन्याने लावलाय

उपेक्षितांच्या वेदनांचे समोर येणारे भीषण स्वरूप भारतीय लोकशाहीला अशोभनीय नाही का?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.