The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जालियानवाला बाग ह*त्याकांडाचा बदला एका हॉलीवूड कलाकाराने घेतला होता..!

by द पोस्टमन टीम
25 December 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


१३ एप्रिल १९१९. बैसाखीचा म्हणजेच आनंदाचा आणि गाण्यांचा उत्सव. सर्व लोक सकाळी लगबगीने तयार होऊन अमृतसरमध्ये जत्रेत फिरत होते. आपल्या चिमुकल्यांना घेऊन, तर काही खरेदी करत होते.

अशाच वेळी जालियनवाला बागेत बरेच लोक ‘रॉलट ॲक्ट’ ला विरोध दर्शवण्यासाठी एकत्र आले होते. बऱ्याच नेते मंडळींची भाषणे चालू होती. हे सर्व ऐकण्यासाठी खूप लोकं तिथे आले होते. अत्यंत शांततेत चाललेल्या निदर्शनात काहीतरी खूप भयानक होणार होतं याची कोणी कल्पनाही केली नसेल कारण तशी कल्पना असती तर बाप आपल्या पोराला खांद्यावर घेऊन भाषण नसता ऐकत बसला. आई आपल्या लेकरांना प्रत्येक नेत्याकडे बोट दाखवून ओळख करून देत नसती.

पण नियतीने घात केला ब्रिटिश अधिकारी ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर पंजाब प्रांताचे राज्यपाल मायकेल फ्रान्सिस ओ’डवायर याच्या आदेशानुसार ९० सैनिकांना घेऊन सभेच्या ठिकाणी पोहोचला आणि जालियनवाला बागेला चारही बाजुंनी घेरलं.

“फायर……..” एवढा एकच शेवटचा शब्द होता जो तिथं उपस्थित लोकांच्या कानावर पडला .

त्यानंतर १० मिनिटं बेछूट गोळीबार झाला नि:शस्त्र निदर्शकांवर. जीव वाचवण्यासाठी लोकं वाट मिळेल तिकडे सैरावैरा पळू लागले. काहींनी या नर*संहा*रातून वाचण्यासाठी बागेतल्या विहिरीत उडी मारून प्राणांची आहुती दिली. १० मिनिटानंतर १६५० राऊंड फायर करून झाल्यानंतर सगळे राऊंड संपल्यानंतर जनरल डायर थांबला त्यानंतर जालियनवाला बागेत उरली होती ती फक्त भयाण शांतता.


जालियानवाला बाग हत्याकांड

जालियनवाला बागेनंतर बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलले होते यातूनच भगतसिंगांनी क्रांतिकारकाचं मार्ग स्विकारला होता.

पण अजून एक १९ वर्षांचा तरुण होता जो तिथं येणाऱ्या वाटसरूंना पाणी देण्याचं काम करत होता. हा सगळा न*रसं*हार त्याने पहिला होता. त्यानंतर येणारा प्रत्येक क्षण त्याने फक्त आणि फक्त “मायकेल फ्रान्सिस ओ’डवायरचा खात्मा” यासाठीच खर्च केला होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पण जे काही करायचं होतं ते शांत डोक्याने आणि व्यवस्थित नियोजन करून यासाठी खूप वेळ लागणार होता पण तिथे मागे हटून चालणार नव्हतं. जालियनवाला बाग ह*त्याकांडनंतर सुरू झाला होता त्याचा सुडाचा प्रवास.

२६ डिसेंबर १८९९ रोजी शेरसिंग म्हणून जन्म झाला . काही वर्षांनीच आई वडिलांचं छत्र हरवलं आणि त्यांनतर त्यांची त्यांच्या मोठया भावासोबत रवानगी झाली पुतलीघर , अमृतसरच्या “केंद्रीय खालसा अनाथाश्रममध्ये”. ज्यादिवशी जालियनवाला बागमध्ये २० हजार लोकं जमले होते त्याठिकाणी शेरसिंग हा त्याच्या अनाथाश्रमातल्या मित्रांसोबत पाणी वाटपाचं काम करत होता.

तिथला झालेला न*रसं*हार बघून त्याने “गदर पार्टी”मध्ये सहभाग घेतला आणि भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांसोबत काम सुरू केले.

१९२७ साली भगतसिंगांच्या आदेशावरून २५ बंदुकी विनापरवाना परदेशातून आणताना शेरसिंगला अटक झाली आनि ५ वर्षं कारावासाची शिक्षा झाली . कारागृहात त्यांनी त्यांचं नाव ” राम मोहमद सिंग आझाद” म्हणून हातावर गोंदवून घेतलं होतं.

नाव जरा विचित्रच वाटतं नाही. पण हे नाव दर्शवत होतं पंजाब प्रांतातील प्रत्येक धर्म आणि समूह. ” १९३१ रोजी जेव्हा शिक्षा संपवून शेरसिंग कारागृहातुन बाहेर आला तेव्हा ब्रिटिशांची नजर चुकवून तो कश्मीरमध्ये गेला आणि तिथून जर्मनीला.

डोक्यात अजूनही विचारचक्र चालूच होते “ओ’डवायर चा खात्मा.” पण कसा ? कारण आता ओ’डवायर तर लंडनमध्ये आहे. एक एक काम करत मिळेल तसं ते लंडनच्या होता होईल तेवढं जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते.

१९३१ ते १९३४ त्यांनी सैनिक म्हणून काम केले होते. १९३४ साली शेवटी ती संधी त्यांना मिळाली लंडनमध्ये इंजिनीअरची नोकरी मिळाली होती. लंडनमध्ये स्थिरस्थावर झाल्यावर समाजात त्यांना बरंच नाव आणि लौकिकही मिळाला होता.

का नाही मिळणार लौकिक?! त्यांनी २ अत्यंत नावाजलेल्या इंग्रजी चित्रपटात काम जे केलं होतं. पहिला चित्रपट म्हणजे १९३७ साली आलेला ” elephant boy” आणि दुसरा १९३९ साली आलेला ” the four feathers.” कोणी विचारही केला नसेल असं आयुष्य चालू होतं शेरसिंगचं छोट्याशा गावातून आलेला अनाथ मुलगा वयाची पस्तिशी ओलांडायच्या आधीच आफ्रिका , युरोप आणि अमेरिका पाहिलेला. नावाजलेल्या इंग्लिश चित्रपटांत काम केलेला आणि समाजात मान असलेला. आयुष्य अतिशय छान चालू होत.

पण एक गोष्ट होती जी शेरसिंग अजूनही करत नव्हते १९१९ पासून त्यांनी बैसाखी साजरी केली नव्हती ती बैसाखी साजरी न करणं सारखं त्यांच्या डोक्यात एक गोष्ट आणून देत होती “ओ’डवायर अजूनही जिवंत आहे.”

जनरल डायर

सगळं असतानासुद्धा शेरसिंगला चैन पडत नव्हती. डोक्यात एकच विचार १ हजारांहून अधिक लोकांचे प्राण घेणाऱ्या ओ’डवायरचा काटा कसा काढायचा. रात्री झोपले की डोक्यात सारखं तेच, डोळ्यासमोर तेच भयावह चित्र उभं राहत होतं. ७ महिन्याच्या लेकरालापण सोडलं नव्हतं त्या बंदुकीच्या फैरींनी.

“ओ’डवायर ला जिवंत राहण्याचा काहीच अधिकार नाही तो मेलाच पाहिजे.” पण कसा .ओ’डवायर काही साधारण व्यक्तिमत्त्व नव्हतं तो एक सेवानिवृत्त राज्यपाल होता त्याच्या अवती-भोवती सारखी सुरखरक्षकांची गस्त असायची मग ह्याला मारायचा कसा.

एक एक दिवस जात होता पण ओ’डवायर काही एकटा सापडत नव्हता. त्याला मारायचं तर होतं आणि जगाला दाखवायचं होतं की जालियनवाला बागेतला न्याय आज झालाय. शेवटी तो दिवस आलाच, १३ मार्च १९४०. दुसरे महायु*द्ध सुरू होऊन ६ महिने उलटले होते. लंडनमधील “canxton hall”मध्ये “Royal Central Asian society” आणि ” East India Association” यांची बैठक होती.

“Caxton हॉल”हा ब्रिटिश संसदेपासून फार काही दूर नाही. म्हणजे आज जे काही घडणार होतं ते साऱ्या जगापर्यंत पोहोचणार होतं.

ह्या बैठकीत भाग घेण्याचं शेरसिंगने ठरवलं. त्याने आपले शूज पॉलिश केले , आपल्याकडे असलेला सर्वोत्तम सूट परिधान केला आणि तोंडावर स्मित ठेवून त्याने caxton हॉलमध्ये प्रवेश केला. संध्याकाळ सरायला सुरुवातच झाली होती आणि आता बैठकही संपली होती. ओ’डवायर उठून बाहेर जाणारच एवढ्यात ४० वर्षांचा एक भारतीय तरुण उठला आपल्या सोबत असलेल्या पुस्तकातून एक रिव्हॉल्वर काढली आणि ओ’डवायरच्या दिशेने दोनदा फायर केली .

काही कळायच्या आताच ओ’डवायर जमिनीवर कोसळला. या तरुणाने कुठलाही विरोध न दर्शवता, पळून न जाता स्वतःला ब्रिटिश पोलिसांकडे सुपूर्द केलं होतं. आज २१ वर्षांपासून केलेल्या तपस्येचं फळ मिळालं होतं. १३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बागेत धारातीर्थी पडलेल्या प्रत्येक निदर्शकाच्या आत्म्याला शांती मिळाली होती.

शेरसिंगला विधिवत अटक करण्यात आली आणि त्यावर खटला चालवण्यात आला. त्यात खु*नाच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवण्यात आले आणि फाशीची शिक्षा दिली, त्याला लंडनच्या pentonville कारागृहात ३१ जानेवारी १९४० रोजी फाशी देण्यात आली.

कोण होता तो तरुण , का त्याने आयुष्यभर कष्टाने कमावलेलं नाव आणि लौकिक सोडून हा मार्ग अवलंबला तो तरुण होता “शेरसिंग उर्फ सरदार राम मोहम्मद सिंग आझाद ” ज्यांना इतिहास “सरदार उधम सिंग” म्हणून ओळखतो. हे सर्व त्यांनी केलं स्वातंत्र्यासाठी फक्त आणि फक्त स्वातंत्र्यासाठी . तेच स्वातंत्र्य जे तुम्ही आणि मी आज उपभोगत आहोत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: Freedom Fightersardar udham singh
ShareTweet
Previous Post

पुणे शहराच्या अगदी जवळची ही पाच पर्यटनस्थळे पाहिली नसतील तर स्वतःला पुणेकर म्हणू नका!

Next Post

‘ऋषी’ आणि ‘मुनी’ : नेमका फरक काय? जाणून घ्या.

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

'ऋषी' आणि 'मुनी' : नेमका फरक काय? जाणून घ्या.

अवघ्या १२० सैनिकांना घेऊन १२०० चिनी सैनिकांचा फडशा पाडणाऱ्या मेजरची थरारक कथा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.