The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रिकेटच्या वेडापायी त्याने जगातील आजवरचा सर्वांत मोठा क्रिकेट अर्काइव्ह बनवला आहे..!

by Heramb
29 September 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


क्रिकेटच्या अनेक मॅचेसच्या दरम्यान विविध संघांचे, खेळाडूंचे किंबहुना क्रिकेटचे फॅन्स वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला व्यक्त करीत असतात. त्यात अनेक प्रकार असतात, कोणी आपापल्या संघाच्या देशांचे ध्वज आणतात, कोणी आपापल्या संघांचे टीशर्ट्स घालून येतात, कोणी डोक्यावर संघाच्या जर्सीच्या रंगाची सजावट करतात, तर कोणी ते रंग चेहऱ्याला आणि अंगाला लावून येतात. भारतात तर अशा फॅन्सची संख्या प्रचंड आहे.

असे लाखो फॅन्स आहेत, पण आज ज्या फॅनची गोष्ट आम्ही या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत तो अतिशय वेगळा आहे. ऑस्ट्रेलियामधील हा क्रिकेटचा चाहता अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अकल्पनीय आहे. रॉब मुडी असे त्याचे नाव. क्रिकेटच्या प्रेमापोटी त्याने कळत्या वयापासूनच क्रिकेटच्या सर्व लाईव्ह मॅचेस रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली होती.

साधारणतः १९८० च्या दशकापासून तो या मॅचेस रेकॉर्ड करत आला आहे. त्याच्या मॅचच्या रेकॉर्डिंग्स शेकडो टेराबाईट्सच्या (1TB=1000GB) असून व्हिडीओ टेप्स, डीव्हीडीज आणि हार्ड ड्राइव्हमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात या मॅचेस रेकॉर्डेड आहेत. १९८२-८३ च्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट सीझनमध्ये त्याने वयाच्या पाचव्या वर्षी क्रिकेट मॅचेस व्हिडिओ टेपवर रेकॉर्ड केल्या. त्यानंतर १९९० च्या दशकात लाइव्ह क्रिकेट सामने रेकॉर्ड करण्यासाठी त्याने डीव्हीडीचा वापर सुरु केला. बदलत्या तंत्रज्ञानानुसार त्याने हार्ड ड्राईव्हचा वापरही केला. त्याच्याकडे ३०० व्हिडिओ टेप्स, २५ हजार डीव्हीडीज आणि ६० हार्ड ड्राइव्हज आहेत..

रॉब मुडीचे एक युट्युब चॅनेल देखील आहे, ज्यावर तो हे रेकॉर्डिंग्स अपलोड करत असतो. क्रिकेटच्या अस्सल फॅन्ससाठी हा संग्रह आणि युट्युब चॅनेल सोन्यापेक्षा अधिक किमती आहे. याच युट्युब चॅनेलला जगातील सर्वांत मोठा क्रिकेट मॅचेसचा संग्रह मानला जातो. आता तुम्ही म्हणाल हा पठ्ठया हे सगळं पैशासाठी करत असेल. पण तसं आजिबात नाही. रॉब या सर्व गोष्टी एकही पैसा न कमावता पूर्णतः ‘फ्री’मध्ये करतो.



रॉब मुडीच्या चॅनेलवर तुम्हाला १९८२ च्या क्रिकेटपासूनचे जवळ जवळ सगळेच क्षण बघायला मिळतील. अगदी टेन्शनचे, हलके-फुलके, विनोदी, अभिमानास्पद असे अनेक क्षण त्याने जपून ठेवले आहेत. तुम्हाला रॉब मुडीच्या ‘रॉबेलिंडा 2’ या चॅनेलवर पाहायला मिळतील. यूट्यूबवर काही शेफिल्ड शील्ड हायलाइट अपलोड करून असे संग्रहित व्हिडिओ युट्युबवर शेअर करण्यास त्याने सुरुवात केली. ही आयडिया त्याला त्याच्या एका ऑनलाईन मित्रानेच दिली होती.

७ नोव्हेंबर २०१० रोजी त्याने आपले पहिले युट्युब चॅनेल रोबेलिंडा या नावाने सुरु केले, पण काही महिन्यांतच त्याला मोठे व्हिडीओज अपलोड करताना अडचणी येऊ लागल्या. त्यामुळेच त्याने ‘रॉबेलिंडा 2’ नावाचे नवीन चॅनेल उघडले. सुरुवातीला तो फक्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे व्हिडीओजच युट्युबवर अपलोड करत असे, पण कालांतराने त्याने सर्व देशांच्या क्रिकेटचे व्हिडीओज अपलोड करण्यास सुरुवात केली.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्रेग ब्लेवेटने १९८९ साली इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात झळकावलेल्या सेंच्युरीचा व्हिडीओ त्याने यूट्यूबवर शेअर केलेला अविस्मरणीय व्हिडीओ होता. त्याचप्रमाणे १० नोव्हेंबर २०१० रोजी झालेल्या कसोटी सामन्यात डेव्हिड साकरच्या हाफ व्हॉली बाऊन्सरचा व्हिडिओ त्याच्या चॅनेलवरील मोस्ट व्युव्हड व्हिडीओ ठरला. टीव्हीवर हायलाईट्स म्हणूनही दाखवल्या न जाणारे काही दुर्मिळ क्षणही त्याच्या रेकॉर्ड्समध्ये उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

रॉब मुडीच्या यूट्यूब चॅनेलवर ९० टक्के व्ह्यूज भारतातून येतात. त्याच्यावर अनेकदा कॉपीराइट्स व्हायोलेशन्सचा आरोपही लावण्यात आला होता, पण त्या आरोपांचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि तो आपले पॅशन फॉलो करतच आहे.. रॉब मुडीच्या युट्युब चॅनेलवर तुम्हाला क्रिकेटमधील अविस्मरणीय क्षण नक्कीच सापडतील, तेव्हा या T-20 च्या जमान्यात नक्कीच त्याच्या चॅनेलला भेट द्या..


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

Next Post

भारताला FIFA वर्ल्ड कपमध्ये खेळता आलं नाही त्यामागे खरं कारण ‘हे’ आहे..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

भारताला FIFA वर्ल्ड कपमध्ये खेळता आलं नाही त्यामागे खरं कारण 'हे' आहे..!

त्या दाम्पत्याने स्वबळावर जगातील सर्वांत मोठा हॉटेलिंग ब्रँड सुरु केला..!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.