The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या भयानक व्हायरसबद्दल जाणून घ्या

by द पोस्टमन टीम
23 January 2020
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

चीनमध्ये एका अज्ञात व्हायरसच्या इन्फेक्शनच्या १७ नव्या केसेस समोर आल्या आहेत. ह्या पैकी तीन रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याची आणि चिनी नववर्ष साजरं करायला लाखो लोक आपआपल्या गावाच्या दिशेने निघाले असल्याने हा व्हायरस पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी माहिती अल जझिरा ह्या वृत्तवाहिनीने दिली आहे.

चीनला कोरोना व्हायरसच्या एका नवीन प्रजातीने पछाडले असून यामुळे सीव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोमचा धोका बळावला आहे.

ह्या व्हायरसचा धसका घेण्याचं कारण म्हणजे २००२ साली ह्या व्हायरसचा प्रसार चीनमधून २४ देशात झाला होता ज्यामुळे तब्बल ८०० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

त्यानंतर तो व्हायरस आज परतला आहे.



 

Insider

चीनच्या वूहान प्रांतात ह्या व्हायरसच्या १७ नव्या केसेस समोर आल्या आहेत. ह्यात काही पेशंटची अवस्था इतकी गंभीर आहे की त्यांना चालायला सुद्धा मोठे कष्ट घ्यावे लागत आहे. बहुतांश मध्यम वयाच्या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. ह्या व्हायरसने वूहान प्रांताच्या ६२ लोकांना बाधित केले असून त्यापैकी आठ हे गंभीर आहेत तर १९ लोकांना उपचार करून त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

ह्या व्हायरसमुळे आजपर्यंत २ लोकांचा जीव गेलेला आहे. व्हायरसमुळे फुस्फुसात पाणी भरून एका ६९ वर्षीय वृद्धाचे निधन झाले आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या मते त्यांनी न्युमेनियाच्या आजारावरील संशोधनास सुरुवात केली आहे. त्यांनी शहरातील लोकांची न्युमोनिया चाचणी घेऊन जो कोणी संशयित भासेल त्याला इस्पितळात भरती करून त्याच्याकडून जमा करण्यात आलेल्या परीक्षण नमुन्यांच्या आधारावर ह्या नवीन प्रजातीच्या करोना व्हायरसचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे.

 

WebMD

लंडनच्या इम्पेरियल कॉलेजमधील एमआरसी सेंटर फॉर ग्लोबल डिसीज अनालीसीसच्या शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या शोध निबंधात असा दावा केला आहे की, चीनच्या वूहान शहरात ह्या आजाराने पिडीत असणाऱ्या लोकांची संख्या ही १७०० च्या आसपास आहे. याच कारणामुळे चीन सरकारचे व जागतिक आरोग्य संघटनेचे धाबे दणाणले आहे. अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत असे म्हटले आहे की, त्यांना हा व्हायरस कसा पसरतो आहे याची कल्पना नाही आहे.

अनेक अधिकाऱ्यांच्या मते सागरी खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे हा व्हायरस पसरला असावा अशी आमची शंका होती पण अभ्यास केल्यावर तसे नसल्याचे आढळून आले आहे. शारीरिक संबंध अथवा केवळ स्पर्शातून देखील हा व्हायरस पसरण्याची शक्यात नाकारली जाऊ शकत नाही अशा आशयाचे विधान चीनच्या एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने केले आहे.

 

ABC7 Chicago

ह्या व्हायरसचा प्रसार जगभर होण्यास सुरुवात झाली असून थायलंड, जपान आणि सिंगापूर ह्या देशात ह्या व्हायरसने बाधित लोक आढळून आले असून, ह्या लोकांनी वूहान शहराला भेट दिली होती, ही त्यांच्यातील समान बाजू आहे. कुठलाही संभाव्य धोका टाळण्यासाठी ह्या देशातील आणि आशिया खंडातील जवळ जवळ अर्धा डझन विमानतळावर कडक सुरक्षाव्यवस्थेत मध्य चीनमधून येणाऱ्या लोकांची चाचणी केली जात आहे. अमेरिकेत देखील याची पुरेपूर काळजी घेऊन सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजल्स ह्या चीनच्या बाजूने येणाऱ्या विमानांची वर्दळ असणाऱ्या एयरपोर्ट्सवर सिक्युरिटी चेक पॉईंट्स उभारण्यात आले आहेत.

इतर देशच नाही तर चीनने देखील हा व्हायरस जगभरात इतरत्र पसरू नये याची काळजी म्हणून अधिकृत नसली तरी औपचारिक काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. चीनने आपल्या प्रत्येक विमानतळावर अनेक सिक्युरिटी चेक अप्स करण्याची व्यवस्था केली आहे. इन्फ्रारेड स्कॅनिंगचा आसरा ह्यासाठी घेण्यात आला असून त्यांनी स्पेशल थर्मोमीटर प्रोजेक्शन युनिट उभारले आहेत. ह्या थर्मोमीटर युनिट्सच्या माध्यमातून लोकांच्या शरीराला स्कॅन करून त्यांच्यातील बाधित आणि निरोगी लोकांची विभागणी करायला सुरुवात केली आहे.

 

आतापर्यंत तब्बल ३,००,००० लोक ह्या इन्फ्रारेड थर्मल सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून तपासण्यात आली आहेत आणि त्यांची नोंदणी देखील करण्यात आल्याचा दावा इथल्या अधिकाऱ्यांनी केला आहे. हॉंगकॉंग शहराच्या विमानतळावर आणि प्रमुख गेटवेज वर देखील अशा स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली असून मुख्य चिनी भूमीतून ज्याला मेनलॅन्ड चायना देखील म्हटले जाते अशा भागातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे. ह्या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न चिनी सरकारच्या माध्यमातून केले जात आहे.

वुहान शहराची लोकसंख्या ही ११ दशलक्ष म्हणजे १.१ कोटी इतकी असून, हे शहर चीनमधील एक प्रमुख वाहतूक केंद्र आहे. चीनच्या अत्यंत मध्य भागी असल्याने चीनच्या वेगवेगळ्या भागात आपलं नववर्ष साजरा करायला जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना ह्या शहरातूनच जावं लागणार असल्यामुळे चीन सरकार समोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. जर ह्या व्हायरसचा प्रसार झाला तर चीन सरकारच्या डोकेदुखीत अजून वाढ होण्याची शक्यता असल्याने ते टाळण्याचा प्रयत्न चीन सरकारचा असणार आहे.

 

The Telegraph

या दरम्यान जपानमध्ये देखील ह्या व्हायरसने पीडित व्यक्ती आढळली. जपानमध्ये ह्या आजाराचा धोका उत्पन्न होऊ  नये म्हणून जपान सरकारने ह्या व्यक्तीला अतिदक्षतेखाली निरीक्षणासाठी ठेवले आहे. हा व्हायरस जगभरात पसरून अजून मोठा धोका उत्पन्न होऊ नये यासाठी जागतिक आरोग्य संघटना देखील प्रयत्नशील असून त्यांनी देखील आशियाई देशातील आरोग्य विभागांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हा व्हायरस भारतात पसरणार नाही याची आम्ही पुरेपूर दक्षता घेणार असल्याची माहिती भारतीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. ह्या व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी लवकरच ह्यावर निदान शोधण्याचा प्रयत्न जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञ करत आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: ChinaCoronavirus China
ShareTweet
Previous Post

अलेक्झांडर फ्लेमिंग नव्हे तर या शास्त्रज्ञाने पहिल्या अँटिबायोटिकचा शोध लावला होता…

Next Post

स्वामी श्रध्दानंदांचा मारेकरी ‘अब्दूल’ला माफ करण्यासाठी गांधीजींनी पत्र लिहिलं होतं

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
Next Post

स्वामी श्रध्दानंदांचा मारेकरी 'अब्दूल'ला माफ करण्यासाठी गांधीजींनी पत्र लिहिलं होतं

अमेरिकेच्या प्राणीसंग्रहालयात माणसांनाच 'प्राणी' म्हणून ठेवण्यात आले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.