The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिऱ्यांच्या किंमती अवाढव्य असण्यामागे एक मार्केटिंग टेक्निक आहे..!

by द पोस्टमन टीम
21 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आठवतं? साधारण नव्वदीचं दशक संपतानाचा काळ. टेलिव्हिजनवर हिर्‍यांच्या जाहिराती झळकू लागल्या होत्या. ‘हिरे है सदा के लिये’ म्हणत जोर शोर से जाहिरातबाजी चालली होती. किमान भारतात तरी अद्याप सोन्याची झळाळीच वर्चस्व राखून होती. लग्न कार्य म्हटलं की सोन्याचेच दागिने हे समीकरण पक्कं होतं. मात्र त्याचवेळेस पाश्चिमात्यांकडे मात्र हिर्‍यानं हात पाय पसरले होते. लग्नाची मागणी घालताना छोटीशी वेलवेटची डबी तळहातावर ठेवून त्यात चमकणारी हिर्‍याची अंगठी देणं ही प्रथा बनली. भलेही लग्नाची अंगठी सोन्याची असेल, परंतु, मागणी घालतानाच हिराच असायला हवा हे समीकरण बनलं.

आज असं चित्र आहे की, भारतातही नव्या पिढीनं हिर्‍याला आपल्या प्रेमकहाणीचा भाग बनवत प्रपोज करताना हिर्‍याचीच अंगठी देणं मान्य केलं आहे. मुलींना हिरा आवडतो, मुली हिर्‍याच्या प्रेमात पडतात, तुम्हाला तुमचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर हातात हिर्‍याचीच अंगठी असली पाहिजे हे नव्वदीच्या दशकापासून सुरू झालेलं खुळ आज जोम धरतं झालं आहे. भावनेचा मुद्दा बाजूला ठेऊया. तुम्ही कधी विचार केला आहे? हिर्‍याची खरोखरच खरी किंमत काय असते? ज्या क्षणी तुम्ही दुकानातून बाहेर पडलेले असता त्या क्षणी ती पन्नास टक्क्यांनी घटलेली असते. होय. बरोबर वाचता आहात तुम्ही.

सोनं आणि हिरा यात हाच मोठा फ़रक आहे. मग लोक हिर्‍याच्या मागे असे वेड्यासारखे का धावतात? हिर्‍याला जास्त ग्लॅमर का? तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, परंतु, अवघ्या काही दशकांपूर्वीचं हे खुळ आहे. श्रीमंती, सत्ता आणि रोमान्सचं प्रतिक बनून हिर्‍याला फार काळ झालेलाच नाही, आणि त्याहूनही गंमतीची बाब ही की, एका जाहिरात कंपनीनं अगदी विचारपूर्वक खेळलेली ही खेळी होती.

१९०० च्या सुरवातीच्या काळात ‘एन डब्ल्यू. अय्यर’ जाहिरात कंपनीनं डी बेअर या त्यांच्या ग्राहकासाठी जे कॅम्पेन राबववलं त्याचाच हा परिणाम आहे. आता याला यशस्वी जाहिरात करणं म्हणायचं की लोकांचा वेडेपणा, भाबडेपणा हे कळायला मार्ग नाही.

१८७० साली दक्षिण अफ़्रिकेत हिर्‍याच्या खाणी सापडल्या. या शोधानंतर लगेचच हिऱ्यांच्या खाणींना पैसे पुरवणाऱ्या ब्रिटिश फिनॅन्सीअर्सना जगातील हिऱ्याचं मार्केट धोक्यात असल्याचं लक्षात आलं. यावर उपाय म्हणून त्यांनी दोन धाडसी योजना आखल्या. एक म्हणजे, हिर्‍यांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मिळविले, यामुळे त्यांनी जागतिक हिरे व्यापाराची पूर्ण मालकी आपल्या आपल्या ताब्यात ठेवली. डी बिअर्सचे अध्यक्ष सर सर्नेस्ट ऑप्पनहेमर यांनी जगभरात या हिर्‍यांच्या घाऊक विक्रेत्यांचे जाळे निर्माण केले. दुसरी गोष्ट म्हणजे या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी डी बिअर्सला सप्लाय कंट्रोल करावा लागणार होता आणि त्याचबरोबर जगभरातून हिऱ्यांना मागणी यावी यासाठी मोठी जाहिरात करावी लागणार होती.



जेव्हा डी बिअर्सने जाहिरातीसाठी कंपनी शोधण्यास सुरवात केली तेंव्हा जागतिक अर्थव्यवस्था कमकुवत झाली होती. जगावर यु*ध्दाचं सावट होतं. कोणत्या देशांतून हिर्‍यांना मोठ्या प्रमाणात मागणी मिळू शकते हे शोधून त्या देशात मार्केटिंगची सर्व व्यवस्था करणं हे महत्त्वाचं होतं. त्यासाठी एक सर्व्हे केला गेला. ज्या जाहिरात कंपनीची निवड झाली तिचं नाव, एन. डब्लू. अय्यर.

या जाहिरात कंपनीनं सर्वेक्षण केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की, हिरे हे उच्चभ्रू, श्रीमंतींचं लक्षण आहे. करोडपतींनीच खरेदी करावी अशी ही गोष्ट आहे. अमेरिकन लोक आपले पैसे गाड्या, विविध उपकरणं यावर खर्च करण्यातच आनंद मानत होते. आता प्रश्न हा होता की अधिकाधिक लोकांनी हिरे खरेदी करावी म्हणून काय करावं लागेल, याचा विचार करणे. लोकांना हिरा खरेदी करण्यासाठी ठोस कारण देणे. मग त्यांच्या लक्षात आलं की, कोणतीही गोष्ट भावनेशी नेऊन जोडली की ती सहज विकता येते, याचं उत्तम उदाहरण आहे इन्शुरन्ससारखी गोष्ट!

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आता सहजी न खपणार्‍या हिर्‍यांना खपवण्यासाठी कोणता भावनिक आधार घ्यावा, कोणत्या भावनेला साद घातल्यास लोक हटकून हिरे खरेदी करतील? याचा शोध चालू झाला. एका भावनेचा शोध लागला. जोडीदाराला आयुष्यभर साथ देण्याचं वचन, ही ती भावनिक साद होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने जाहिराती बनवून त्या लोकांसमोर आणल्या गेल्या. प्रेम आणि विवाह या चिरंतन गोष्टीसांठी वचन देताना तितकीच चिरंतन गोष्ट साक्षीला असली पाहिजे, आणि ती म्हणजे, हिरा हे जाहिरातींमधून बिंबवलं गेलं. आज याचाच परिणाम म्हणजे, प्रपोज किंवा वेडिंग रिंग्च्या बाजारपेठेत हिर्‍याची अंगठी दिमाखात झळकत उभी आहे.

नामांकित सेलिब्रेटिजना हाताशी धरुन जाहिराती बनविल्या गेल्या. इतकंच नाही तर हे सेलिब्रेटी आपल्या जोडीदाराला देत असलेल्या अंगठ्यांची चर्चा घडवून आणली गेली. हिर्‍याचा आकार ते त्याची किंमत याबाबत उत्सुकता निर्माण केली गेली. या फिल्मी हस्तींच्या चाहत्या वर्गानं आता आपापल्या स्टार्सचं अनुकरण करण्यास सुरवात केली होती.

डी बिअर्सच्या जाहिरातींमधून केवळ हिरे विकले गेले नाहीत तर लोकांना हिरे खरेदीबाबत शिक्षणही दिलं गेलं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे, १९३८ ते १९४१ या अवघ्या चार वर्षांत अमेरिकेत हिरे विक्री ५५ टक्क्यांनी वाढली. आता एन. डब्लू. अय्यर जाहिरात कंपनी अधिक आक्रमक झाली. त्यांचा उद्देश होता की अमेरिकन जनतेला ‘हिर्‍यांशिवाय लग्न’ ही कल्पनाही करू द्यायची नाही. त्यांच्या या उद्देशात ते सफ़ल झाले.

१९४८ साली त्यांनी आणलेल्या , ‘अ डायमंड इज फॉरेव्हर’ या स्लोगननं प्रचंड लोकप्रियता मिळविली. जी आजही तशीच अबाधित आहे. हे स्लोगन ‘फ्रान्सेस गेरिटी’ नावाच्या एका महिलेला सुचलं. अगदी सहजच सुचलेली ही ओळ इतिहास घडवेल हे तिला त्या रात्री जाणवलंही नसेल. त्याचं झालं असं होतं की, दुसर्‍या दिवशी असणार्‍या मिटींगची आठवण फ्रान्सेसला रात्री झोपण्यापूर्वी झाली आणि लक्षात आलं की आपण याचा काहीच विचार केलेला नाही. उद्या मिटिंगमधे काहीतरी सांगावं तर लागणारच होतं. तिने काहीतरी लिहायचं म्हणून कागदावर हे वाक्य खरडलं, जे दुसर्‍या दिवशीच्या मिटिंगमधे डोक्यावर घेतलं गेलं. रेस्ट इज हिस्टरी!

सोनं किंवा चांदीप्रमाणे हिर्‍याला आर्थिक स्थान नाही ही कल्पना ‘डी बिअर्स’ला होतीच. म्हणूनच त्यांनी भावनेचा आधार घेत बाजारपेठेत स्वतःसाठी जागा निर्माण केली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

युट्युब चॅनेलपासून सुरु झालेल्या ‘या’ कंपनीची नेट वर्थ आज कोट्यवधींमध्ये आहे!

Next Post

हे आहेत जगाच्या इतिहासातील सर्वांत जास्त वेळ चाललेले वेढे..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

हे आहेत जगाच्या इतिहासातील सर्वांत जास्त वेळ चाललेले वेढे..!

कृष्णवर्णीयांना शारीरिक दुःख होत नाही ही अंधश्रद्धा आजही पाश्चात्य डॉक्टर मानतात!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.