The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सात दशके पोलिओशी लढा देत, कोणतीही हालचाल न करता तो आज वकील झाला आहे..!

by द पोस्टमन टीम
22 September 2023
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


गेली अनेक दशकं आपल्या देशात ‘दो बुंद जिंदगी’ के या स्लोगन अंतर्गत पोलिओ प्रतिबंध मोहिम राबविली जात आहे. एव्हाना या मोहिमेनं देशातील प्रत्येक घरात पोहोचून या रोगावर नियंत्रण मिळाविण्यात यश मिळविलं आहे. आज कदाचित या प्रतिबंधक लसींमुळे या रोगाचं गांभिर्य अनेकांना समजणार नाही मात्र या आजाराशी थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल सात दशकं एक व्यक्ती झगडत आहे. हा झगडाही एका जागी झोपून करावा लागत आहे. एखाद्या आजारानं इतकी वर्षं अंथरूणाला खिळून असणार्‍या रुग्णाचं हे दुर्मिळ आणि बहुतेक एकमेव उदाहरण असावं. या रूग्णाचं नाव आहे, पॉल रिचर्ड अलेक्झांडर.

एखाद्या लोखंडी खोक्यात चार दोन तास नुसतं पडून रहा, हालचाल करू नका असं सांगितलं तर सामान्य माणसाला ते जाचक वाटेल. किंबहुना ते अशक्यही आहे. ‘खतरों के खिलाडी’सारख्या खेळांमधे अजब गजब खेळ खेळविले जातात. या खेळात शोभावा असा खेळ नियतीनं पॉलच्या नशिबी लिहिला आणि तो त्याला खेळावाच लागला कारण या खेळातली त्याची हार ही त्याला मृत्यू देणारी आहे.

मृत्यूसोबतचा त्याचा हा सामना सात दशकं यशस्वीपणे चालू आहे. तो केवळ या लोखंडी खोक्यात रहातो असं नाही तर गमतीची गोष्ट म्हणजे एक यशस्वी वकीलही आहे. पॉलची ही जगावेगळी कथा ऐकण्यापूर्वी त्याला ज्या रोगानं जेरबंद केलेलं आहे त्या पोलिओबाबत थोडक्यात जाणून घेऊ.

पोलिओ म्हणजे काय?; पोलिओ म्हणजे एका व्हायरसमुळे होणारा ‘पोलिओमायलेटिस’ हा रोग. नियंत्रणात आणला नाही तर जिवाला धोका असणारा असा हा रोग आहे. हा व्हायरस मनुष्याच्या मणक्यावरच हल्ला करतो आणि त्यामुळे पॅरेलिसिस होतो, शरीरातली स्नायूंची ताकद कमी होते, अशक्तपणा येतो, हालचाली मंद ते अजिबात न होणं हे घडतं. हे सगळं इतकं टोकाचं असतं की स्वत:हून शरीराच्या हालचाली करणंही शक्य होत नाही. हे इतक्यावरच थांबत नाही. बरेचदा हा रोग इतकं गंभीर रूप धारण करतो की नैसर्गिक पध्दतीनं आपला आपण श्र्वास घेणंही मुश्किल होतं.



हा रोग काही आधुनिक जगातला नाही. याचे संदर्भ इजिप्तमधील सुमारे ३४०० वर्षं जुन्या मूर्तीत आढळतात. अर्थात त्या काळात वैद्यकीय क्षेत्र या रोगाशी मुकाबला करण्याइतकं प्रगत नव्हतं. मात्र १९१६ पासून या रोगाबाबत संशोधन सुरू झालं आणि यावरचे उपाय शोधण्याची जणू एक मोहिमच हाती घेण्यात आली. मात्र या दरम्यान या रोगावर मात करणारा कोणताही ठोस इलाज संशोधकांच्या हाती लागला नाही.

१९२८ साल मात्र या रोगावरील उपचारांबाबात दिलासा देणारं ठरलं. हार्वर्ड विद्यापीठातील फ़िलिप ड्रिंक्नर आणि लुईस शॉन या दोघांनी मिळून असं एक उपकरण बनवलं जे या रूग्णांवर इलाजही करू शकेल आणि उपचार चालू असेपर्यंत रूग्णाला जिवंतही ठेवू शकेल. एक व्हॅक्युम क्लिनर वापरून या यंत्राची निर्मिती केली गेली होती. पोलिओग्रस्त रूग्णाच्या फ़ुप्फ़ुसांना संसर्ग होणं ही या रोगातील अत्यंत धोकादायक पायरी समजली जाते. इथे हे यंत्र कामी येत होतं. सुरवातीच्या काळात या यंत्राचं नाव स्पिंक्नर रेस्पिरेटर ठेवलं गेलं होतं. कालांतरानं याच यंत्राचं नाव आयर्न लंग असं ठेवलं गेलं. १९३१ साली जॉन हेव्हन इमर्सनने या यंत्रात अनेक बदल करत हे उपकरण अधिक परिणामकारक बनविलं आता हे उपकरण केवळ जास्त परिणामकारकच नाही तर आधिच्या तुलनेत स्वस्तही बनलं.

१९५२. सहा वर्षांच्या पॉलच्या शरीरात या व्हायरसनं प्रवेश केला. हे तेच वर्ष होतं, जेंव्हा अमेरिकेत पोलिओनं नाकी नऊ आणले होते. अमेरिकन प्रशासन या रोगाशी सर्व ताकदीनिशी सामना करू पाहत होतं, मात्र या रोगाचा त्रास काही थांबता थांबेना. या वर्षी एकट्या अमेरिकेत ५७ हजाराहून अधिक पोलिओ रूग्ण नोंदविले गेले होते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

याच वर्षातला एक नेहमीप्रमाणे उजाडलेला दिवस होता. छोटा पॉल पावसात आपल्या मित्रांसोबत मजेत खेळत होता. अचानकच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. तो खेळ थांबवून आईकडे गेला आणि त्यानं डोकं आणि मान दुखण्याची तक्रार चालू केली. सुरूवातीला आईला वाटलं पावसात भिजल्यामुळे हे होत असावं. तिनं काही घरगुती आणि मामुली उपचार केले. मात्र तिला लवकरच लक्षात आलं की ही पोलिओ संसर्ग झाल्याची सुरवातीची लक्षणं आहेत. तिने तातडीनं फ़ॅमिली डॉक्टरना बोलवलं, त्यांनी पॉलला तपासून त्याच्या उपचारांची निकड लक्षात आणून दिली. त्या काळात हॉस्पिटलमधे अशा रूग्णांची रांग लागलेली होती.

एकूण परिस्थिती लक्षात घेता डॉक्टरनी पॉलला घरातच उपचार सुरू करण्याचा सल्ला दिला. मात्र हे अधिक काळ चालू शकले नाही. दुर्दैवाने आठवडाभरातच पॉलची तब्येत ढासळू लागली, या रोगाच्या संसर्गानं त्याच्या शरीरावर कब्जा करण्यास सुरवात केली होती. फ़ॅमिली डॉक्टर मात्र अजूनही घरातच उपचार चालू ठेवावेत या मताचे होते. काळजीनं ग्रासलेल्या पॉलच्या पालकांनी मात्र हा सला डोळ्याआड करुन हॉस्पिटल गाठण्याचा निर्णय घेतला.

हॉस्पिटलमधे दाखल झाल्यावर त्याची तपासणी करणार्‍या डॉक्टरनी त्याच्यावर इलाज करण्यास असमर्थता दर्शविली. याचा संसर्ग हाताबाहेर आणि उपचाराबाहेर गेल्याचं सांगितल्यानं पॉलच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीन हादरली. हे सगळं चालू असतानाच दुसरे एक डॉक्टर आले आणि त्यांनी पॉलची केस हातात घेत त्याच्यावर उपचारांची तयारी दर्शविली. त्यांनी पॉलच्या मानेजवळ कट मारत फ़ुप्फ़ुसांतून कफ़ बाहेर काढला. दुसर्‍या दिवशी पॉलच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली. तो आता बोलू शकत होता मात्र शरीरात इतका अशक्तपणा आला होता की त्याला हातपाय हलविणंही अशक्य झालं होतं. म्हणून डॉक्टरनी त्याला आयर्न लंग्जमधे ठेवलं.

काळ झटकन पुढे सरकत होता. आता पॉलला या आयर्न लंगमधे येऊन अठरा महिने झाले होते. त्याच्याबरोबरीनं दाखल झालेली मुलं बरी होऊन घरी परतली होती किंवा मृत्यूमुखी पडली होती. पॉलच्या परिस्थितीत मात्र काहीच सुधारणा नव्हती. आता डॉक्टर त्याला फ़्रॉग ब्रिदिंग शिकवू लागले होते. जेणेकरुन पॉल जास्तीतजास्त नैसर्गिक पध्दतीनं श्र्वास घेऊ शकणार होता. केवळ आठव्या वर्षीच पॉलनं दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या तंत्रावर महारथ मिळविली.

आता पॉल आयर्न लंग्जशिवायच श्र्वासोच्छास करू शकत होता मात्र अद्याप त्याला या उपकरणातून बाहेर काढले नव्हते, कारण त्याचे संपूर्ण शरीर पॅरलाईज झाले होते. एव्हाना पॉलला या यंत्रातच रहायची सवयही झाली होती. आता त्याच्या आई वडिलांनी पॉलला विविध गोष्टीत गुंतविण्यास सुरवात केली. पॉलच्या डोक्यावरच एक आरसा लावला ज्यात त्याला स्वत:चे प्रतिबिंब मान न वळवता दिसू लागले. याशिवाय एक असे उपकरण तयार केले ज्याद्वारे पॉल तोंडात पेन्सिल धरुन चित्रंही रेखाटू लागला.

एकीकडे पॉलचं वय वाढत होतं आणि दुसरीकडे आयर्न लंग्जमधून तो बाहेर पडण्याच्या आशा मावळत होत्या. निराश न होता त्यानं त्याचं शिक्षण पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. हे वाचल्यावर तुम्ही थक्क व्हाल की, अवघ्या एकविसाव्या वर्षीच पॉल डल्लास हायस्कूलमधून अव्वल गुणांसहित पदवीधारक बनला. एकही दिवस शाळेत न जाता पदवी मिळवलेला तो एकमेव विद्यार्थी होता. त्यानंतर त्यानं डल्लास विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी अर्ज केला, मात्र त्याचा अर्ज विद्यापीठानं , तो हा अभ्यासक्रम शिकण्यास शारीरिकदृष्ट्या अत्यंत अकार्यक्षम असल्याचं कारण देत नाकारला.

मात्र पॉलने हार न मानता याचा पाठपुरावा चालूच ठेवला आणि तब्बल दोन वर्षांनंतर त्याच्या प्रयत्नांना यशही मिळालं. आता तो अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम शिकू लागला. हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्न केल्यानंतर आता पॉलला कायद्याचा अभ्यास करण्याची इच्छा झाली. कारण त्या काळात ही सर्वांत कठीण पदवी मानली जात असे आणि सतत आव्हानांशी सामना करत जगल्यानंतर आता पॉलला यात मजा येऊ लागली होती. अर्थातच यातही पॉल यशस्वी झाला आणि १९८४ साली त्यानं पदवी प्राप्त केली. केवळ शिक्षण घेऊन तो थांबला नाही तर आता त्यानं आपली प्रॅक्टिसही चालू केली. पॉल म्हणजे संघर्षाचं आणि त्यावर मात करत यश मिळविण्याचं मूर्तीमंत उदाहरण बनला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एक्सप्लेनर: भारत-कॅनडा तणावाचं कारण नेमकं काय..?

Next Post

पे पालच्या माजी कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या कंपन्या आज कोट्यवधींची उलाढाल करताहेत..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

पे पालच्या माजी कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या कंपन्या आज कोट्यवधींची उलाढाल करताहेत..!

एटीएमच्या चुकीनं अब्जाधिश बनलेला बारटेण्डर

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.