The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजही कित्येक देशांचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा ब्रिटिश म्युझियममध्ये कैद आहे..!

by द पोस्टमन टीम
3 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


तुम्ही रोझेटा स्टोनबद्दल ऐकले आहे का? रोझेटा स्टोन हा जगातील सर्वात मौल्यवान कलाकृतींपैकी एक आहे. रोझेटा स्टोन हा प्राचीन ईजिप्शियन लिपी समजून घेण्यासाठी उपयुक्त स्रोत आहे. रोझेटा स्टोनमुळे तीन ईजिप्शियन लेखन पद्धतींचा शोध लागला. एल्जीन मार्बल्स हे पाचव्या शतकातील ग्रीक शिल्पांचा एक संच आहे जो पार्थेनॉन मंदिराच्या सजावटीसाठी वापरला गेला. बेनिन ब्रॉंझेस ही बेनिन राज्याची धातूची शिल्पे आहेत. तंजावरची भगवान शिवाची कांस्य मूर्ती जी चोल राजवटीने एक हजार वर्षांपूर्वी बनवली होती.

वरती नमूद केलेल्या या सर्व अप्रतिम कलाकृती आहेत, या सर्व अप्रतिम कलाकृतींमध्ये काय साम्य आहे हे तुम्हाला माहित आहे का? तर या सर्व अप्रतिम कलाकृती आज ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवल्या आहेत.

या कलाकृतींमध्ये अजून एक गोष्ट समान आहे, या सर्व अप्रतिम कलाकृती एकतर चोरल्या गेल्या, बळजबरीने जिंकल्या गेल्या, किंवा अवैध मार्गाने मिळवल्या गेल्या. आज या सर्व कलाकृती वसाहतवादी काळातील क्रू*र आठवणी पुन्हा जागृत करतात.

आज ब्रिटिश म्युझियम या कलाकृतींना मौल्यवान खजिना म्हणून प्रदर्शित करते. या कलाकृती प्रदर्शित करताना ब्रिटिशांना भूतकाळातील अपराधांबद्दल पश्चातापाची भावना नाही आणि ज्या लोकांकडून या कलाकृती घेतल्या गेल्या त्यांच्याबद्दल कृतज्ञता तर नाहीच.

केवळ ब्रिटनच नाहीतर संपूर्ण युरोपातील म्युझियम आज या अशा कलाकृतींनी भरलेले आहेत. त्यामुळे इथे प्रश्न असा उपस्थित होतो की, ब्रिटन आणि इतर पाश्चात्य देशांना, चोरलेल्या, बळजबरीने जिंकलेल्या, अवैध मार्गाने मिळवलेल्या, या कलाकृतींना प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे का?



वसाहतवादाच्या काळात युरोपियन राष्ट्रांनी ज्या देशांतुन या अप्रतिम कलाकृतींची चोरी केली आज ते देश स्वतंत्र झाले आहेत. बहुतांश युरोपियन राष्ट्रांनी त्यांनी केलेल्या ऐतिहासिक चुकांची भरपाई करण्यास व कलाकृती परत करण्यासही नकार दिला आहे. आर्किऑलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका या संस्थेने प्रदर्शित केलेल्या एका अहवालानुसार ९०% कलाकृतींच्या मालकीची व उत्पत्तीची ब्रिटन व इतर पाश्चात्य देशांच्या म्युझियम्सकडे नोंद नाही. शिवाय या ९०% कलाकृती आफ्रिका आणि आशिया खंडातील आहेत.

२०१८ साली फ्रेंच सरकारने एक अहवाल प्रदर्शित केला ज्यामध्ये असे म्हटले होते की, आफ्रिकेतील ९०% सांस्कृतिक वारसा आज पाश्चात्त्य देशांचा म्युझियम्समध्ये आहे. आज एकट्या फ्रान्समध्ये, ८ आफ्रिकन वसाहतींमधील ९० हजार वस्तू आहेत, जिथे फ्रांसने एकेकाळी राज्य केले होते. फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांना उपरती झाली आणि त्यांनी बेनिन राज्यातुन चोरी केलेल्या २६ कलाकृती बेनिन राज्याला परत देण्याचा निर्णय केला. फ्रेंच सरकारच्या या निर्णयामुळे युरोप आणि अमेरिकेमध्ये चोरी केलेल्या कलाकृती या त्यांच्या मूळ देशात परत पाठवायला हव्यात की नाही या मुद्द्यावर वाद सुरू झाला. फ्रांसचे उदाहरण समोर ठेऊन काही म्युझियम्सनी चोरलेल्या कलाकृती त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

लंडनमधील ब्रिटिश म्युझियम, पॅरिसमधील लॉवर (Louvre) म्युझियम, बर्लिनमधील Humboldt Forum म्युझियम, लॉस अँजेल्समधील जेटी सेंटर (Getty Center) म्युझियम, न्यूयॉर्क मधील Metropolitan म्युझियम आणि यांसारख्या जगातील इतर मोठ्या म्युझियम्सने चोरलेल्या कलाकृती या त्यांच्या मूळ देशांत परत पाठवण्यास नकार दिला आहे. तसेच या कलाकृती या चोरलेल्या नसून त्या कलाकृती यु*द्धातील लूट आहेत त्यामुळे या कलाकृती परत करता येणार नाहीत असे या म्युझियम्सचे म्हणणे आहे, पण असे केल्याने आपण कित्येक लाख लोकांना त्यांच्या मौल्यवान सांस्कृतिक वारस्यापासून आपण वंचित करत आहोत ही बाब कदाचित त्या म्युझियम्सना लक्षात येत नाही.

“United Nations Declaration on Rights of Indigenous People” या घोषणेनुसार एखाद्या देशाला त्यांचा सांस्कृतिक वारसा परत मिळवण्याचा अधिकार आहे. वरील घोषणा, ही म्युझियम्सना, अशा सांस्कृतिक कलाकृती मूळ देशांना परत करण्यास बाध्य करते ज्या पूर्व संमतीशिवाय घेतल्या गेल्या होत्या.

“United Nations Declaration on Rights of Indigenous People” या घोषणेला इंग्लंड, अमेरिका व इतर पाश्चात्य देशांनी मान्यता दिली आहे. इंग्लंड आणि अमेरिकेमधील न्यायालयांनी, त्यांच्या देशातील बऱ्याच खटल्यात, चुकीच्या पद्धतीने मिळवलेल्या कलाकृती, परत करण्याचे आदेश दिले आहेत.

इंग्लंड आणि अमेरिकेमधील न्यायालयांनी असे ही म्हटले आहे की जर एखाद्या देशाला एखादी वस्तू जर त्यांचा सांस्कृतिक वारसा वाटत असेल तर त्या वस्तूवर त्या देशाचा सार्वभौम हक्क आहे. बऱ्याच मानवी हक्क करारात याला “Right to Culture” म्हणजेच संस्कृतीचा अधिकार असे म्हटले आहे. एखाद्या देशाला संस्कृतीचा अधिकार असणे म्हणजे त्या देशाला त्यांच्या संस्कृतीशी संबंधित असलेल्या गोष्टींवर पुन्हा हक्क सांगण्याचा अधिकार प्राप्त होणे.

आता भारताचे उदाहरण घेऊ, इंग्लंडने भारतावर २ शतके राज्य केले. या वसाहतवादाच्या काळात भारतात सर्व काही लुटले. गेले कित्येक वर्षं भारत कोहिनूर हिरा मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. १८४९ साली जेव्हा ब्रिटिशांनी पंजाब काबीज केला त्यावेळी ब्रिटिशांनी कोहिनूर हिरा हा राणी व्हिक्टोरियाला भेट म्हणून दिला आणि तेव्हा पासून ते आजतागायत हा हिरा ब्रिटनमध्येच आहे.

आणखी एक अनमोल कलाकृती म्हणजे महाराजा रणजित सिंग यांचे सिंहासन, अँग्लो-शीख यु*द्धानंतर कोरीव सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेले हे सिंहासन ब्रिटिशांनी बळकावले व आज ते ब्रिटनमध्ये अलबर्ट म्युझियममध्ये ठेवलं आहे. अजून उदाहरणं द्यायची झाली तर मध्य प्रदेशातील भगवान हरिहराची वाळूची मूर्ती, बिहारमधील ५०० किलो तांब्याचा वापर करून तयार केलेली बुद्धाची मूर्ती, टिपू सुलतानची तलवार आणि अशा बऱ्याच कलाकृती आज ब्रिटनमधील विविध म्युझियम्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील.

United Nations Declarations on Rights of Indigenous People ही आंतरराष्ट्रीय मान्यता असलेली घोषणा आहे, कोर्टाने दिलेले निकाल आहेत, आदेश आहेत, तरी तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल की एवढं सगळं असून पण ब्रिटनने या सगळ्या कलाकृती स्वतःजवळ का ठेवल्या आहेत?

आता यावर ब्रिटनने केलेला युक्तिवाद हा अजब आणि जगावेगळा आहे, तर ब्रिटनमधील बहुतेक म्युझियम्सचे असे म्हणणे आहे की सांस्कृतिक कलाकृती सर्वांना उपलब्ध करून देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे जेणेकरून लोकांना त्यांचे मूळ व संस्कृती जाणून घेता येईल. आता हा युक्तिवाद अतिशय तथ्यहीन आहे हे सांगायची गरज नाही. मुळात आपले मूळ व आपली संस्कृती समजून घेण्यासाठी ब्रिटनला जायची काही एक गरज नाही.

आज ब्रिटन किंवा इतर पाश्चात्त्य देशांतील म्युझियम्समध्ये सर्व सांस्कृतिक कलाकृतींची मांडणी अतिशय सुचीबद्धपणे एका वातानुकूलित इमारतीत केलेली असते जेणेकरून पाश्चात्त्य लोकांना या सांस्कृतिक कलाकृती पाहण्यासाठी आफ्रिका आणि आशियातील अस्वस्थ हवामानात जावे लागणार नाही. म्हणूनच इंग्लंड आणि इतर पाश्चात्त्य देश हे या कलाकृती मूळ देशांना परत देण्यास तयार नाहीत. त्यामुळे या कलाकृती स्वतःजवळ ठेवून आणि त्यांना फीसाठी प्रदर्शित करून, पाश्चात्त्य म्युझियम्स हे वसाहतवादी काळात त्यांनी केलेल्या अन्यायाचे समर्थन करीत आहेत व अशाप्रकारे त्यांच्या वसाहतवादी वारश्याचा फायदा ते घेत आहेत.

आज पाश्चात्त्य लोकांसाठी, ब्रिटन ही जगाची सांस्कृतिक राजधानी असेल पण प्रत्यक्षात ब्रिटन ही वसाहतवादी लुटीची राजधानी आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

चीनने प्रकाशित केलेली नवीन दिनदर्शिका वादात का सापडलीय..?

Next Post

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी कलम ३७० रद्द केल्यामुळे भारताचा निषेध केला होता

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी कलम ३७० रद्द केल्यामुळे भारताचा निषेध केला होता

मुलांना लहान वयातच कोडिंग शिकवणं खरंच आवश्यक आहे का..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.