The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातली ती प्रयोगशाळा, जिथे अनेक मृतदेह पुन्हा जिवंत होण्याच्या आशेने ठेवले जातात

by द पोस्टमन टीम
26 January 2026
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


गेम ऑफ थ्रोन्स! २०११ साली प्रदर्शित झालेली ही ८ सिजन्स असलेली वेबसिरीज. या वेबसिरीजचं कथानक आणि या वेबसिरीजमधील पात्रं दोनही खिळवून ठेवणाऱ्या होत्या. याच गेम ऑफ थ्रोन्समधल्या जॉन स्नो हे पात्रं आठवतंय? आता तुम्ही म्हणाल काय चेष्टा करता राव, गेम ऑफ थ्रोन्स देखा पर जॉन स्नो को नहीं देखा तो क्या देखा.

तर, सहाव्या सीजनमध्ये जॉन स्नो अचानक मारला जातो आणि आपल्या सर्व प्रेक्षकांची घोर निराशा होते, पण पुढच्याच भागात लॉर्ड ऑफ लाईटच्या कृपेने तो पुन्हा जिवंत होतो. हे झालं वेबसिरीजचं, आता येऊया हॉलिवूडच्या मार्व्हल कॉमिक्स वर आधारित चित्रपटांकडे कॅप्टन अमेरिका द फर्स्ट अव्हेंजर या सिनेमाचा शेवट आठवतो? कॅप्टन अमेरिकाचं विमान बर्फाळी प्रदेशात कोसळतं आणि तो जवळ जवळ ७० वर्षं त्या बर्फात पडून राहतो.

आता ही सगळी उदाहरणं जी दिली आहेत तिचा ओघ कुणीकडे आहे काही कल्पना आहे का तुम्हाला? तर एखादी मृत झालेली व्यक्ती पुन्हा जिवंत होते असा या वर नमूद केलेल्या ३ उदाहरणांचा सार आहे. आता तुम्ही म्हणाल की एकदा मेलेला माणूस परत कसा जिवंत होऊ शकतो आणि जर झाला तर आस्तिक लोकं त्याला देवाची कृपा म्हणतात तर नास्तिक लोकं त्याला नशीबवान म्हणतात. तर मृत्यूनंतर परत जिवंत होणे हे वैज्ञानिकदृष्ट्या शक्य आहे का? हे आज आपण समजून घेणार आहोत. पण त्या आधी मृत्यू म्हणजे नक्की काय हे आधी समजून घेऊ.

मृत्यू! मृत्यू हा शब्द नुसता उच्चारला तरी मन घाबरतं. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही एक ना एक दिवस मरणार आहे हे ठाऊक असूनही मरणाचा विषय काढला जात नाही. मृत्यूबद्दल उघडपणे चर्चा होत नाही. वास्तविकरीत्या “मरण” आणि “मृत्यू”बद्दल आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत, आणि तितकीच मृत्यूची भीती देखील आहे. आता तुम्हाला कुणी विचारलं की “मरण” आणि “मृत्यू” यांच्यात नेमका काय फरक आहे? तर साधारण कोणताही माणूस सांगेल की दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो, फक्त आपल्या सोयीनुसार तो वापरला जातो. पण “मरण” आणि “मृत्यू” यांच्यात फरक आहे. जर थोडा शांतपणे विचार केला तर मरण, मृत्यू, आणि शोक या तिन्ही स्वतंत्र संकल्पना आहेत. वैद्यकीय परिभाषेत सांगायचं झालं तर “मरण” ही प्रक्रिया, मृत्यू ही घटना आणि दोन्ही झाल्यानंतर जी प्रतिक्रिया येते ती म्हणजे शोक. मरण-मृत्यू-शोक या संकल्पनांवर भरपूर वाद विवाद झाले आहेत.



आता मरण ही संकल्पना वैद्यकीयदृष्ट्या समजावून घेऊ. जन्म आणि मरण यामधील काळ म्हणजे जीवन. जशी माणूस जन्माला येण्याची एक प्रक्रिया असते सर्वश्रुत आहे, पण मरण ही प्रक्रिया नेमकी कशी घडते ते आपल्याला माहीत नसतं. माणसाच्या शरीरातील दोन महत्त्वाचे अवयव एक म्हणजे हृदय आणि दुसरा म्हणजे मेंदू.

जर माणसाचा मेंदू बंद पडला नाही तर माणूस जिवंत राहून पुन्हा क्रियाशील होऊ शकतो. त्यामुळे हृदयक्रिया बंद पडलेल्या आणि डॉक्टरांनी मृत घोषित केलेली व्यक्ती काही वेळानंतर मेंदू चालू असल्याने पुन्हा जिवंत झाली अशी बरीच उदाहरण आहेत. 

ऑक्सिजनशिवाय मेंदू काम करत नाही व श्वासोच्छ्वास बंद झाल्याने ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो व मेंदू बंद पडण्यास सुरुवात होते. मेंदू थांबल्याने मेंदू शरीरातील विविध अवयवांना पाठवणारे हार्मोन्स बंद करतो व त्यामुळे शारीरिक प्रक्रिया बंद होतात. शारीरिक प्रक्रिया बंद झाल्याने मांसपेशी आणि अवयव शिथील होतात व त्यामुळे काही मृत शरीरातून मलमूत्र आपोआप बाहेर येते. रक्तप्रवाह थांबल्याने शरीर थंड पडून पिवळे पडायला लागते. मरणाची ही संपूर्ण प्रक्रिया होण्यास १० ते १५ मिनिटांचा कालावधी जातो. मरणानंतर काही तास शरीरातील पेशी त्यांच्या आंतरिक प्रकियेमुळे स्वतंत्रपणे जिवंत राहतात म्हणूनच मरणानंतर अवयवांचे दान करता येते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आधी आपण मरण ही संकल्पना वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेतली. आता मरण ही संकल्पना आध्यात्मिकदृष्ट्या समजावून घेऊ. आध्यात्मिकदृष्ट्या, जेव्हा आत्मा एखादं शरीर सोडून जाते तेव्हा ते शरीर मृत होतं. संतकवी दासगणू महाराजांनी एका चरित्र ग्रंथात मरणाचे तीन प्रकार सांगितले आहेत, एक आधिभौतिक, आधिदैविक, आणि आध्यात्मिक. पण आत्ता यात खोलवर जाण्याची आवश्यकता नाही. आत्मा ही संकल्पनाच विज्ञानाला मान्य नाही म्हणून मरणाचा आध्यात्मिकदृष्ट्या विचार विज्ञानाला मान्य नाही. मग एकदा का माणूस मरण पावला की विज्ञानाच्या मदतीने तो पुन्हा जिवंत होऊ शकतो का? या विषयावर अनेक शास्त्रज्ञ व वैज्ञानिक संस्था संशोधन करत आहेत. या विषयीचं संशोधन जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर क्रायोनिक्स (Cryonics) ही संकल्पना आधी समजून घ्यायला हवी.

क्रायोनिक्स (Cryonics) हे तंत्र समजून घेण्याआधी या तंत्राचा विकास कसा झाला हे थोडक्यात समजावून घेऊ. क्रायोनिक्स या इंग्रजी शब्दाचा उगम ग्रीक भाषेच्या क्रायो या शब्दापासून झाला आहे. ग्रीक भाषेत क्रायो या शब्दाचा अर्थ थंड असा होतो. अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील प्राध्यापक रॉबर्ट एट्टींगर (Robert Ettinger) यांनी १९६२ साली “द प्रॉस्पेक्ट ऑफ इमॉर्टॅलिटी” या शोधप्रबंधात क्रायोप्रीजरवेशन (Cryopreservation) ही संकल्पना मांडली. एप्रिल १९६६ मध्ये लिक्वीड नायट्रोजनचा वापर करून एक मृत शरीर गोठवण्यात आलं.

पुढे याच प्राध्यापक रॉबर्ट एट्टींगर (Robert Ettinger) १९७६ साली “द क्रायोनिक्स इन्स्टिट्यूट” नावाची संस्था स्थापन केली. याच क्रायोनिक्स इन्स्टिट्यूटमध्ये  २०११ साली क्रायोनिक्स तंत्राचा वापर करून त्यांचे शरीर जतन करण्यात आले. 

ही होती क्रायोनिक्स या तंत्राच्या सुरवातीची व विकासाची थोडक्यात माहिती. आता हे क्रायोनिक्स तंत्र काम कसं करत हे समजून घेऊ.

क्रायोनिक्स (Cryonics) हे तंत्रज्ञान वापरून माणसाचे जीवन परत येईपर्यंत मानवी शरीर बर्फासारखे गोठवून ठेवण्याची या तंत्रज्ञान तरतुद आहे. या प्रक्रियेत क्रायोनिक्स (Cryonics) या तंत्रज्ञानाचा वापर करणारे शास्त्रज्ञ मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर शरीराचे जतन करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते शरीर किंवा त्या शरीराचा जो भाग जतन करायचा आहे तो -196℃ या तापमानात गोठवून ठेवला जातो.

क्रायोनिक्स (Cryonics) या प्रक्रियेचं उद्दिष्ट शरीरातील विघटन किंवा विखंडन प्रक्रिया शक्य तितक्या वेळ थांबवण्याचं आहे. हे विघटन किंवा विखंडन थांबवण्यासाठी मृत शरीरात एक विशेष द्रव्य प्रसारित केलं जातं, हे द्रव्य थंड होत असलेल्या शरीरात विस्तार करून त्या शरीराची विघटन प्रक्रिया थांबवतं. या संपूर्ण प्रक्रियेला क्रायोप्रीजरवेशन (Cryopreservation) असं म्हणतात. क्रायोप्रीजरवेशन (Cryopreservation) प्रक्रियेमध्ये संपूर्ण शरीर जतन केले जात नाही, फक्त मेंदूचे जतन केले जाते.

१९६२ पासून ते २०११ पर्यंत क्रायोनिक्स (Cryonics) हा विषय संशोधनापुरता मर्यादित होता. पण आजच्या काळात क्रायोनिक्स (Cryonics) ही प्रक्रिया व्यवसाय आणि उद्योगाचे रूप घेत आहे. या व्यवसायातील लोकांचा असा विश्वास आहे की भविष्यात लोक अशा प्रकारे पुनरुज्जीवन करू शकतील याची शाश्वती नाही.

विज्ञानाच्या दुनियेत संशोधन करताना शास्त्रज्ञाना खूप अनपेक्षित यश मिळालं आहे. 100 वर्षांपूर्वी चंद्रावर जाण्याची चर्चा ही कल्पना वाटत होती पण आज ते शक्य झाले तसंच क्रायोनिक्स (Cryonics) तंत्रज्ञान हे मृत व्यक्तींना पुनरुज्जीवन देण्यात यशस्वी ठरेल की अयशस्वी याचं उत्तर येणाऱ्या काळाच्या गर्भात आहे.

आज ना उद्या प्रत्येकजण हे जग सोडून जाणार आहे हे सत्य लक्षात घेऊन तोवर आपण प्रत्येक दिवस “आजचा दिवस माझा” हे ब्रीदवाक्य मनाशी बांधून हे मिळालेलं सुंदर जीवन आनंदाने जगूया.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ग्राहकांची लोकेशन चुकीच्या पद्धतीने ट्रॅक केल्यामुळे गुगलवर खटला भरलाय

Next Post

सलग ८ वर्ष बरड माळावर राबून नंदनवन फुलवलं; पद्म पुरस्काराने गौरव झाला!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

सलग ८ वर्ष बरड माळावर राबून नंदनवन फुलवलं; पद्म पुरस्काराने गौरव झाला!

Explainer - मेटाव्हर्स नेमकं काय आहे..? त्याने आपल्या खऱ्या आयुष्यात काय बदल घडणार आहेत..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.