The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Explainer – बहुराष्ट्रीय औषध कंपन्याच आजच्या काळातल्या सर्वात मोठ्या माफिया आहेत

by द पोस्टमन टीम
25 January 2022
in आरोग्य, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


डोकं दुखतंय? घे डोके दुखीची गोळी, ताप आलाय घे ताप उतरायची गोळी इथून ते अनेक दुर्धर आजारापर्यंत आज आपण अगदी सहजपणानं गोळ्या घशाखाली ढकलत असतो. आज करोनानं जगभर कहर मांडून झाल्यानंतरही अनेक देशांतील नागरिक कोविड प्रतिबंधक लसीच्या विरोधात उभे आहेत. अनेकजण प्रतिबंधात्मक औषधोपचारांना निकराचा विरोध करत आहेत. का घडतंय हे? काय आहे यामागचं कारण?

कोविड हे निमित्त आहे मात्र औषध इंडस्ट्री हा माफ़िया बनून सामान्यांच्या जिवावर कधी बसला नव्हे, जिवावर उठला हे कळलेलंही नाही. गोड आवरणातल्या कडू औषधांप्रमाणेच अगदी सहजगत्या अनावश्यक औषधं तुमच्या माझ्या घशाखाली उतरवली जातात. आज परिस्थिती अशी आहे की तुमचं जगणं किंवा मरणं हे या औषध कंपन्या ठरवू पहात आहेत. वाचताना अतिशयोक्ती वाटत असली तरिही हे विदारक वास्तव आहे.

मोठाल्या आणि मुठभर फ़ार्मा कंपन्यांनी आज जगाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात आवळून धरल्या आहेत. जगावर राज्य करण्याची शक्ती या कंपन्यांना लाभली आहे. आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे किंवा करण्यात आली आहे असं म्हणूया, की इथून पुढे कोविड बुस्टर डोस ही आपल्या आयुष्यातली सरावाची बाब बनणार आहे. गरज आहे की नाही याचा विचार न करता हे बुस्टर डोस आपल्या शरीरात येणार आहेत. 

यापूर्वी जसे अनेक रोगांचे बुस्टर शरीरात आले तसेच. मरणाची भिती ही सगळ्यात मोठी भिती असते आणि हीच भिती जिवनदायी औषधांना शक्तीशाली माफ़िया बनवते. भ्यायलेल्यांवर राज्य करणं सोपं असतं आणि मोठाल्या नफ़ेखोर औषध कंपन्या नेमकं हेच करत आल्या आहेत. लोकांच्या मनात भिती निर्माण करुन आपलं राज्य उभं करणं आणि नफ़ा कमावणं हा सरळ हिशोब आहे. हे सगळं कसं होतं? तर देशोदेशीच्या सरकारना वेठीस धरणं, ब्लॅकमेल करणं, इक्विटीवर राज्य करणं, गुप्त करार करणं, प्रलोभनं दाखविणं हे प्रकार घडतात.



या मोठ्या फ़ार्मा कंपन्याच औषधांचे दर ठरवितात, ही औषधं “खपविणार्‍या” बलाढ्य लॉबीज बनवतात, यातून काही धोकादायक अशी औषधं निव्वळ नफ़ेखोरीतून रुग्णांना दिली जातात. हे सगळं दिवसा ढवळ्या तुमच्या माझ्या डोळ्यादेखत घडत असतं मात्र आपण काहीही करू शकत नाही हे दुर्दैव. ही औषधं असोत की करोनावरची लस, ती घेण्यावाचून दुसरा पर्याय सामान्य माणसाच्या हातात नसणं हेच या फ़ार्मा माफ़ियांना बलशाली करणारं असतं.

मार्टिन शक्रेली हे नाव मध्यंतरी हे नाव चर्चेत आलं होतं आणि निमित्त होतं मलेरियावरिल डॅरोप्रिम हे औषध. हे औषध १३ डॉलर्स आणि ५० सेंटसला उपलब्ध होतं. मार्टिननं ही किंमत थोडीथोडकी नव्हे तर ५ हजार टक्के वाढविली आणि या औषधाची किंमत झाली ७५० डॉलर्स. पेशंटपासून, डॉक्टर्स, कायदेतज्ज्ञ, मिडिया सर्व थरातून मार्टिनला प्रचंड विरोध झाला. अर्थातच या विरोधाचा मार्टिनवर काहीही म्हणजे एका नव्या पैशाइतकाही परिणाम झाला नाही.

अखेर मार्टिनवर रितसर खटला चालविण्यात आला आणि त्याला सात वर्षांच्या कारावासाची तसेच चाळीस मिलियन डॉलर्स इतका दंड झाला. केवळ नफ़ा कमाविण्यासाठी त्यानं किमती वाढविल्या. हेड फ़ंड मॅनेजर म्हणून गुंतवणूकदारांचं हित बघणं त्याचं काम होतं जे त्यानं चोख केलं. मर्टिन हे एक उदाहरण आहे आणि या संपूर्ण नफ़ेखोर सिस्टिमचा एक चेहरा. ही ड्रग माफ़ियागिरी कशी चालते? त्याचं एक उदाहरण म्हणून मार्टिनकडे बघता येईल.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

बलाढ्य फ़ार्मा कंपन्या देशोदेशीच्या राजकारण्यांना विकत घेतात आणि आपली औषधं भरमसाठ किंमतीला सामान्यांच्या माथी मारतात. या औषधांचा रुग्णाला उपयोग होतो आहे की नाही? याचा विचार ही यंत्रणा अर्थातच करत नाही कारण या साखळीतला प्रत्येकजण कमाई करायला सहभागी झालेला असतो. सामान्यांचं आरोग्य वगैरे लक्षात न घेणं हा पहिला नियम हे सगळे भक्तिभावानं पाळतात.

याची सुरवात कुठून होते? 

दिशाभूल करणारी माहिती पसरविण्यापासून. ही माहिती पसरविण्यासाठी डॉक्टर्सचा “वापर” करुन घेतला जातो. पेशंटसाठी देवदूत असतो त्या डॉक्टरला मॅनेज करण्यापासून या साखळीची सुरवात होते. त्यांनी ही औषधं रुग्णांना देणं गरजेचं असतं. कारण कितीही झालं तरी पेशंट आजही डॉक्टरवर विश्वास ठेवतो कारण, त्याला पर्याय नाही.

अमेरिकेत काही वर्षांपूर्वी म्हणजे नव्वदच्या दशकात दिल्या जाणार्‍या ओपिऑईड या वेदनाशामक गोळीमधे एखाद्या हेरॉईनची शक्ती होती ज्याचं व्यसन लागत होतं मात्र औषध कंपन्यांनी हे दावे फ़ेटाळून लावले. मोठ्या फ़ार्मा कंपन्यांचे विक्री प्रतिनिधी रेटून सांगत असत की या औषधांत ॲडिक्शन करण्याची ताकद नाही. काही काळापुरतं हे औषध घेऊन सहज थांबविता येतं.

मात्र सुदैवानं वैद्यकीय पेशात अजूनही काही डॉक्टर हे नफ़ेखोरीकडे दूर्लक्ष करुन रुग्णाच्या आरोग्याला महत्व देतात. अशा डॉक्टर्स या गोळीच्या सेवन आणि विक्रीकडे बारकाईनं लक्ष होतं. हे औषध बनविणारी कंपनी परड्यू फ़ार्मा ही कंपनी आणि त्यांचं ऑक्सिकॉन्टिन हे औषध डॉक्टरना प्रिस्क्राईब करायला लावत होती. कोणतीही क्लिनिकल चाचणी न घेतात परड्यु ठोकून खोटं बोलत होती की त्यांच्या औषधानं रुग्ण ॲडिक्ट होत नाहीत. डॉक्टर्सही काहीही शहानिशा न करता हे औषध लिहून देत होते.

वास्तवातलं चित्र मात्र वेगळंच काही सांगत, दाखवत होतं. १९९७ साली ६ लाख ७० हजार प्रिस्क्रिब्शन लिहिली गेली. पुढच्या काळात यात दहापट वाढ होऊन ६.२ मिलियन प्रिस्क्रिप्शन्स लिहिली जाऊ लागली. या कंपनीच्या केवळ या एका औषधातूनच कंपनी कोट्यावधी डॉलर्सचा नफ़ा कमवू लागली. इतर औषधांचा तर यात समावेशही नाही. 

१९९९ ते २०१६ पर्यंत अमेरिकन जनता या वेदनाशामकांच्या आहारी अगदी अलगद गेली होती. नव्हे, डॉक्टर्स आणि औषध कंपन्यांनी जनतेला व्यसनाधीन बनविलं होतं आणि हे कोणाच्या गावीही नव्हतं. याच्या अतिरिक्त सेवनानं मृत्यू होऊ लागले आणि थोडेफ़ार डोळे उघडले गेले, कायद्यानं दखल घेतली गेली.

यावर घडलं काय? 

तर कंपनीला दिवाळखोर घोषीत केलं गेलं. थोडाफ़ार दंड झाला. कंपनी दिवाळखोर घोषित करण्यापूर्वी या कंपनीतील १०.८ बिलियन डॉलर्स इतकी मामुली रोख रक्कम या कंपनीतून काढून दुसर्‍या कंपनीत हलविण्यात आली. सामान्यांच्या जिवाशी खेळणार्‍या या कंपनीवर कोणतीही इतर कारवाई झाली नाही.

अल्झायमरवरचं औषध विकणार्‍या बायो हेल्थचं प्रकरणही आणखीन एक प्रकरण ज्यात एफ़डीएचा सहभाग होता. हे औषध समितीनं नाकारूनही बाजारात आणलं गेलं. कारण एफ़डीएच्या एकूण बजेट पैकी ४५ टक्के निधी हा त्यांना फ़ार्मा व्यवसायातून मिळत असल्यानं याकडे कानाडोळा करण्यात आला, नेहमीच येतो. इतकंच नाही अमेरिकन राजकारण असो की अर्थकारण या सगळ्याच्या नाड्या फ़ार्मा इंडस्ट्रिच्या हातात असल्यानं इथल्या गैरव्यवहारांकडे जाणूनबुजून डोळेझाक केली जाते.

अमेरिका हे विकसनशिल देशांना गिनिपिग बनवतं आणि या देशांकडे बाजारपेठ म्हणून बघतं हेही काही नविन नाही म्हणूनच या सगळ्यात सामान्य रुग्णाचा विचार होतो का? याचं उत्तर ज्याचं त्यानं शोधायची वेळ आता आली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

कोरोना निर्बंधांना वैतागून आता लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत..!

Next Post

हायस्पीड इंटरनेटला मूलभूत मानवी हक्काचा दर्जा देणारा फिनलंड हा जगातला पहिला देश बनलाय

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

हायस्पीड इंटरनेटला मूलभूत मानवी हक्काचा दर्जा देणारा फिनलंड हा जगातला पहिला देश बनलाय

चुकीच्या तपासामुळे एका निर्दोष माणसाला 'फाशी' देण्यात दिली होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.