The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या मुलीने अवघ्या १९व्या वर्षी पृथ्वी प्रदक्षिणा करत एक विश्वविक्रम प्रस्थापित केलाय

by द पोस्टमन टीम
21 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


तुम्हाला तुमचं लहानपण चांगलंच आठवत असेल. प्रत्येकाच्याच आयुष्यात त्याचं लहानपण, मित्रांसोबत केलेली ती दंगामस्ती या सगळ्याचं एक वेगळं महत्त्व असतं. संध्याकाळी अथवा सुट्टीच्या दिवशी मैदानात खेळताना जेव्हा तुमची नजर आकाशात जायची त्यावेळी तुम्हाला विमान दिसत असेल. त्या लहान वयात आपण आपल्या आई वडिलांना किंवा मित्र-मैत्रिणींना मी भविष्यात वैमानिक/पायलट होणार असं प्रत्येकच जण सांगायचा.

हे झालं लहानपणीच, आजही कोणत्याही मध्यमवर्गीय माणसाला अथवा स्त्रीला विचारा, आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करणे, त्या प्रवासाचा आनंद घेणे हे त्या माणसाच्या अथवा स्त्रीच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये टॉप प्रायोरिटी असते. आता तुम्ही म्हणाल की हा आज हे काय विमान विमान घेऊन बसलाय. तर झालं असं की, एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात झारा रुदरफोर्ड हे नाव वाचण्यात आलं. ती एक वैमानिक आहे. पण कोण आहे ती? आणि तिच्याबद्दल आम्ही तुम्हाला का सांगतोय हे जाणून घेण्यासाठी हा लेख तुम्हाला वाचावा लागेल.

आता रुदरफोर्ड हे नाव ऐकलं किंवा वाचलं की आपल्या समोर येतो महान शास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड आणि त्यांचं ॲटोमिक मॉडेल. मग आता ही झारा रुदरफोर्ड नक्की आहे तरी कोण?

तर, झारा रुदरफोर्ड या मुलीने अवघ्या एकोणिसाव्या वर्षी विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. 

आता एखादी मुलगी किंवा महिला वैमानिक म्हटलं की आपल्या समोर येते कारगील यु*द्धात पराक्रम गाजवलेली गुंजन सक्सेना. जसा गुंजन सक्सेना यांचा लढाऊ वैमानिक बनण्याचा प्रवास हा खडतर होता तसाच अनुभव झारा रुदरफोर्ड यांनाही आला.



झारा रुदरफोर्ड यांचा जन्म बेल्जियममध्ये ब्रुसेल्स येथे २००२ साली झाला. झारा यांचे वडील हे ब्रिटिश नागरिक आहेत तर झाराची आई ही बेल्जियमची नागरिक आहे. झाराचे वडील सॅम रुदरफोर्ड हे वैमानिक आहेत, त्याचबरोबर ते विमान चालवण्याचे प्रशिक्षणही देतात. लहानपणापासूनच झारा तिच्या वडिलांसोबत विमान प्रवास करायची, तेव्हाच तिच्या मनात आपणही वैमानिक होऊ असा विचार आला.

वैमानिक होणे म्हणजे फार जबाबदारीचे व जोखमीचे काम. वैमानिक होण्याकरता माणसाला शारीरिक व मानसिक दृष्टीने सक्षम असणे गरजेचे असते. विमानाच्या तांत्रिक बाबी, हवामानशास्त्र याचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. झाराचे वडील हे स्वतः वैमानिक असल्याने तिला वैमानिक होण्याचे बाळकडू घरातूनच मिळाले होते.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

झाराने वयाच्या चौदाव्या वर्षापासून वैमानिक होण्याचे प्रशिक्षण सुरू केले. अर्थात हे प्रशिक्षण काही सोपं नव्हतं. ६ वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर झाराला २०२० साली वैमानिक होण्याचा अधिकृत परवाना मिळाला. आता एवढे कष्ट करून परवाना मिळाला आहे एखादा माणूस असता तर म्हणाला असता, परवाना मिळाला ना बास आता व्यावसायिक वैमानिक बनून उर्वरित आयुष्य आरामात काढू, पण झारा तशी नव्हती, तिचं अंतर्मन तिला सतत सांगत होतं, की तू याच्यापेक्षाही मोठ्या गोष्टी करू शकतेस. हाच होता झाराच्या आयुष्यातला “ये दिल मांगे मोर” वाला क्षण. झाराने आता ठरवलं की आपण काहीतरी जगावेगळं करायचं.

आणि अखेर तो दिवस आला. २६ जुलै २०२१ रोजी पॉपहॅम एअरफिल्डवर झाराने पत्रकार परिषद घेतली व त्यात तिने जाहीर केले की तिला पृथ्वी प्रदक्षिणा करणारी सर्वांत तरुण वैमानिक होण्याचा विक्रम करायचा आहे. तिने हेही जाहीर केले की तिला शाहीस्ता वाईज या महिला वैमानिकाचा विश्वविक्रम मोडायचा आहे. 

ह्या पृथ्वी प्रदक्षिणा मोहिमेसाठी झाराने शार्क युएल (Shark UL) हे सिंगल इंजिन असलेले विमान वापरायचे ठरवले. मायक्रोलाईट एअरक्राफ्ट या विमान श्रेणीत त्याचा समावेश होतो. सिंगल इंजिन असूनही लांब पल्ल्याच्या हवाई सफरीसाठी हे विमान वापरण्यात येते.

१८ ऑगस्ट २०२१ रोजी झाराचा या विमानातून कोर्टराईक येथून पृथ्वी प्रदक्षिणेचा प्रवास सुरु झाला. या मोहिमेत झाराने आइसलँड, ग्रीनलँड, कॅनडा, बहामास, अमेरिकेची पूर्व किनारपट्टी , कोलंबिया, पनामा, कोस्टा रिका, अमेरिकेची पश्चिम किनारपट्टी या ठिकाणी थांबे घेतले. ३० सप्टेंबर २०२१ रोजी झारा अलास्काला पोचली.

आता एखादा विश्वविक्रम करायचा म्हणजे ती काही साधी सरळ मोहीम नाही. या प्रवासात झाराला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. अलास्काला पोचताच तिला व्हिसा नूतनीकरण करण्यासाठी व विमान दुरुस्तीसाठी दोन आठवडे थांबाव लागलं.

१ नोव्हेंबर २०२१ रोजी झारा रशिया मध्ये पोचली. रशियात पोचल्यावर तिची अर्धी मोहीम फत्ते झाली असं तिला वाटत असतानाच तिच्यासमोर अजून संकटं येऊन ठेपली. रशिया म्हणजे उत्तर ध्रुवाजवळचा देश. तिथे सारखी बर्फाची वादळे येत जात असतात.

या वादळामुळे झाराला रशियाच्या मगादान, आयान, खबरोवोस्क , व्लॅडिवॉस्टॉक, इथे थांबे घेत पुढचा प्रवास करावा लागला. रशियाच्या आयान या शहरात जेमतेम ८०० लोकांची वस्ती होती व तिथे कुणालाही इंग्रजी भाषा येत नव्हती त्यामुळे तिथे थांबलेली असताना झाराला फार संकटांना तोंड द्यावं लागलं. अखेर ११ डिसेंबर २०२१ रोजी झारा रशियातून चीनच्या दिशेने निघाली.

२०२० आणि २०२१ ही संपूर्ण दोन वर्षे जग कोरोनाशी झुंज देत होतं. कोरोनाचा प्रत्यय झाराला देखील आला. झाराला चीनमध्ये थांबा घ्यायचा होता, पण चीनच्या कडक निर्बंधांमुळे तिला दक्षिण कोरियाला जावं लागलं. इथेही तिचा मागोवा घेत संकटं आलीच. दक्षिण कोरियाच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यावर तिला तिथल्या एअर ट्रॅफिक कंन्ट्रोलला ती येत आहे अशी सूचना द्यायची होती. पण योग्य फ्रीक्वेनसी न मिळाल्याने तिचे संदेश दक्षिण कोरियाच्या एअर ट्रॅफिक कंन्ट्रोलला पोचत नव्हते. अखेर एका व्यावसायिक कोरियन वैमानिकाने तिचे संदेश हे एअर ट्रॅफिक कंन्ट्रोलला पोचवण्यात मदत केली.

दक्षिण कोरियातून निघाल्यावर झारा तैवान, फिलिपिन्सला पोहोचली. झाराला फिलिपिन्सला जास्त वेळ थांबा घ्यायचा होता पण “राय” नावाच्या चक्रीवादळामुळे तिला लवकरच मलेशियाच्या दिशेनं कूच करणे भाग पडले. मलेशियातून, सिंगापूर, तिथून हिंदी महासागर ओलांडून प्रथम श्रीलंकेत थांबा घेतला व तिथून पुढे भारतात मुंबईला, ३१ डिसेंबर २०२१ रोजी पोहोचली.

भारतातून निघाल्यावर झारा मध्यपूर्व देशांच्या दिशेनं मार्गस्थ झाली. सुरुवातीला संयुक्त अरब एमरातीला तिने थांबा घेतला व नंतर सौदी अरेबियाला थांबली. सौदी अरेबियाचे राजपुत्र व माजी वैमानिक असलेल्या सुलतान बिन सलमान अल सौद यांना जेव्हा झाराच्या मोहिमेची माहिती मिळाली त्यावेळी तिचे स्वागत करण्यासाठी ते स्वतः विमानतळावर हजर होते.

सौदी अरेबियानंतर झाराने आफ्रिकेतल्या इजिप्तमध्ये थांबा घेतला. इजिप्तमधून पुढे तिने युरोपच्या दिशेने उड्डाण केले. युरोपमध्ये स्लोव्हाकिया, बल्गेरिया, चेक रिपब्लिक, येथे थांबे घेतले. जर्मनी हा तिच्या मोहिमेचा अखेरचा थांबा होता. शेवटी २० जानेवारी २०२२ रोजी झारा परत कोर्टराईक विमानतळावर पोचली, आणि अशाप्रकारे झाराने तिची पृथ्वी प्रदक्षिणा मोहीम यशस्वी केली.

पृथ्वी प्रदक्षिणा मोहीम पूर्ण व्हायला १५५ दिवस लागले व या मोहिमेत झाराने ४१ देशांना भेट दिली. झाराने या मोहिमेचं यश जगभरातील यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्याऱ्या तरूणींना समर्पित केले आहे. 

झारा जरी वैमानिक असली तरीही तिला गणित व भौतिकशास्त्र या विषयात विशेष रुची आहे. तिचा विश्वविक्रम करण्याचा हेतु हा आहे की अधिकाधिक तरुणींनी STEM(Science Technology Engineering Maths) या क्षेत्रात यावं व आपलं कौशल्य जगासमोर प्रस्तुत करावं.

झाराचं हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं तर हे लक्षात येतं की कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी त्या गोष्टीला वेळ द्यावा लागतो त्यावर मेहनत घ्यावी लागते व हे सर्व करत असताना स्वतःवर विश्वास असणे व संयम असणे आवश्यक आहे. आज माणूस जन्माला आल्यावर तो चालू असलेल्या एका न संपणाऱ्या स्पर्धेचा भाग बनतो. आणि ही स्पर्धा दुसऱ्या कुणाशी नसून कायम स्वतःशी असते. तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सतत उत्तम बनण्याचा प्रयत्न करत राहा. स्वतःला ओळखा. शेवटी मानवी जीवनाचं मूळ उद्दिष्ट हे स्वतःचं स्वरूप काय याचं उत्तर शोधण्यात आहे. आपण कोण आहोत हे जाणून घेणं हा एक न संपणारा प्रवास आहे.

एव्हीएशन सेक्टरमध्ये व इतर सर्वच सेक्टरमध्ये करीअर करणाऱ्या तरुण तरुणींना झाराच्या यशातून प्रेरणा मिळेल यात काही शंका नाही. झाराच्या या यशाला आमचा सलाम!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या परदेश मंत्र्यांनी युएनमध्ये चुकून चक्क पोर्तुगीज मंत्र्याचं भाषण वाचलं होतं!

Next Post

आपण चायनीज म्हणून खातो त्या हक्का नूडल्स चीनवरून नाही तर आपल्या कलकत्त्यावरून आल्यात

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

आपण चायनीज म्हणून खातो त्या हक्का नूडल्स चीनवरून नाही तर आपल्या कलकत्त्यावरून आल्यात

इंग्रज काळात दुभाषे इतके बदमाश होते की नंतर त्या शब्दाचा अर्थच खोटारडा असा झाला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.