The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोव्हिएतनं गॅस विहीरीतील आग विझवण्यासाठी चक्क अ*णुबॉ*म्बचा वापर केला होता

by द पोस्टमन टीम
18 January 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जागतिक महायु*द्धाची गरज आणि शत्रूच्या संभाव्य ह*ल्ल्यापूर्वीच “अ*ण्वस्त्रधारी” देश म्हणून तयारी दाखवण्यासाठी अ*ण्वस्त्रांची निर्मिती करण्यात आली. दुसऱ्या महायु*द्धामध्ये अमेरिकेनं जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर त्याचा वापरदेखील केला. मात्र, अ*णुबॉ*म्बमुळं झालेला वि*ध्वंस पाहता त्याच्या पुन्हा मानवी वस्तीवर वापर करण्याचा धाडसी विचार कुणी केला नाही.

दुसरं महायु*द्ध संपल्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्ता आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर आपापलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी धडपडत होत्या. त्यासाठी अ*ण्वस्त्रे, अंतराळ मोहिमा आणि माहिती तंत्रज्ञानाचा आधार त्यांनी घेतला होता. नवनवीन संशोधन करून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते सोडत नव्हते.

याचाच एक भाग म्हणून ऑक्टोबर १९६१ मध्ये, सोव्हिएत युनियननं आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेकडील दुर्गम बेटावर एक बॉ*म्ब टाकला होता. त्याच्या ताकदीमुळं आर्क्टिकमधील बेट एखाद्या स्केटिंग रिंकसारखं सपाट झालं. स्फो*टातून निर्माण झालेला प्रकाश ६०० मैल (९६५ किमी) पेक्षा जास्त अंतरावरून देखील पाहणं शक्य झालं होतं. हा जगाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली बॉ*म्ब होता!

३० ऑक्टोबर रोजी घडवून सोव्हिएतनं घडवून आणलेला हायड्रोजन बॉ*म्बचा स्फो*ट हा इतिहासातील सर्वांत शक्तिशाली मानवनिर्मित स्फो*ट ठरला. त्यानंतर मात्र, रशियन वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी अ*णुबॉ*म्बसारख्या घातक शस्त्रांचा वापर विधायक कामांसाठी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अ*णुबॉ*म्बमधून निघणाऱ्या किरणोत्सारामुळं या कल्पनेवर मर्यादा येत होत्या. तरी देखील इतिहासामध्ये काही घटना अशा घडल्या आहेत ज्यात सोव्हिएत युनियननं उदात्त नागरी हेतूसाठी प्रत्यक्षात आ*ण्विक स्फो*टांचा वापर केला. सोव्हिएतनं १९६०च्या दशकाच्या मध्यात नियंत्रणाबाहेर गेलेली गॅस विहीरीतील आग विझवण्यासाठी चक्क अ*णुबॉ*म्बचा वापर केला होता. हे संपूर्ण प्रकरण काय होतं? हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा…

१ डिसेंबर १९६३ रोजी, उर्ता-बुलक गॅस फील्डमधील विहीर क्रमांक ११मध्ये अयोग्य पद्धतीनं ड्रिलिंग झाल्यामुळं मोठा स्फो*ट झाला. २ हजार ४०९ मीटर खोल विहिरीतील गॅस ३०० एटीएमच्या दाबानं जमिनीच्या बाहेर उडाला. या धक्क्यामुळं आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात विनाश झाला गॅसमुळं पृष्ठभागावर आग पसरली. विहिरीतून निघणाऱ्या आगीच्या ज्वाला आकाशात १२० मीटर उंचीपर्यंत उडत होत्या. ही साइट साफ करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला, परंतु गॅसमुळं लागलेली आग नियंत्रणात आणण्यात अपयश आलं.



११ क्रमांकाच्या विहिरीतून निघणारी आग दररोज १.२ करोड घनमीटर गॅसचा वापर करून अखंडपणे जळतच राहिली. अनियंत्रितपणे जळणारी आग शांत करण्यासाठी सुरुवातीला पाण्याचा वापर करून आग सुरक्षितपणे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या नवीन डायव्हर्टर कॅपनं आलेल्या दबावामुळं परिस्थिती आणखी बिघडली. कारण मूळ बोरहोलच्या आसपासच्या भूपृष्ठावर गॅस झिरपत होता. या गॅसमध्ये हायड्रोजन सल्फाइडचं प्रमाण जास्त होतं. त्यात पाणी मिसळल्यामुळे भूगर्भातून विषारी वायूचे बुडबुडे वरती येऊन पृष्ठभागावर खड्डे तयार होऊ लागले. 

ही परिस्थिती पुढे चालून खूपच धोकादायक ठरली असती. म्हणून थोड्याच दिवसात पाण्याचे डायव्हर्टर काढण्यात आले. विविध पारंपारिक पद्धतींचा वापर करून गॅसचा प्रवाह रोखण्यासाठी आणखी दोन वर्षे गेली. तरी देखील विहीर एखाद्या अखंड अग्निकुंडाप्रमाणं धगधगतच होती. मुळ विहीरीतील गॅसचा प्रवाह फ्लुईड करण्याच्या प्रयत्नांत अनेक साध्या विहिरीही खोदण्यात आल्या. मात्र, त्यात एक अडचण अशी होती की, मूळ ११ क्रमांकाची विहीर २ हजार ४०९ मीटरपर्यंत उभी ड्रील केली गेली होती आणि सद्य:स्थितीत त्यामध्ये आग होती. त्यामुळं तिला आडवे ड्रील मारणं कठीण जात होतं.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

अकरा क्रमांकाच्या विहीरीतील आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न करूनही यश आलं नाही. शेवटी १९६६च्या उन्हाळ्यात एक आशेचा किरण दिसला. त्यावेळी सोव्हिएत सरकारनं नुकताच ‘न्यु*क्लियर एक्स्प्लोजन फॉर द नॅशनल इकॉनॉमी’ या नावानं शांततापूर्ण हेतूंसाठी आ*ण्विक स्फो*टांचा वापर शोधण्यासाठी एक कार्यक्रम स्थापन केला गेला.

हा नवीन कार्यक्रम सुरू झाल्यानंतर, उर्ता-बुलक गॅस फील्डमधील विहीर क्रमांक ११ बंद करण्यासाठी याचा काही उपयोग होऊ शकतो का? याबद्दल नेत्यांशी संपर्क साधला गेला. कारण, तज्ज्ञांना अशी आशा होती की, विहिरीशेजारी भूगर्भात अ*णुस्फो*ट घडवून आणल्यानंतर विहीरी ब्लॉक करता येईल.

मूळ विहिरीच्या सुमारे २५ ते ५० मीटरच्या आत ३० किलोटन न्यु*क्लियर डिव्हाईसचा स्फो*ट घडवून आणण्यासाठी परवानगी देण्याची मागणी नेत्यांकडं करण्यात आली होती. शेवटी भूगर्भशास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार मूळ विहीरीच्या ईशान्येस ५० ते ६० मीटर अंतरावर १ हजार ५०० मीटर खोलीची एक ‘किलींग’ विहीर काळजीपूर्वक ड्रिल करण्यात आली. 

त्याठिकाणी ३० किलोटन न्यु*क्लियर डिव्हाईस ठेवण्यात येणार होतं. हे काम हाताळण्यासाठी साइटवर मोठ्या प्रमाणात उपकरणं आणण्यात आली होती. हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होता. त्यामुळं रेडिओलॉजिकल आणि सिस्मिक मॉनिटर्स हाताळण्यासाठी साइटवर एक कमांड स्टेशन स्थापित केलं गेलं होतं. हे कमांड स्टेशन खास अरझामास अ*ण्वस्त्र प्रयोगशाळेच्या मदतीनं तयार करून घेण्यात आलं होतं. किलींग विहीरीमध्ये आ*ण्विक स्फोटक काळजीपूर्वक उतरवले गेले आणि ती विहीर नंतर सिमेंटनं बंद करण्यात आली.

३० सप्टेंबर १९६६ रोजी सकाळी विहीरीमध्ये आ*ण्विक स्फो*टकांचा स्फो*ट झाला. तोपर्यंत विहिरीतील आगीला पूर्ण २ वर्षे आणि ९ महिने झाले होते. स्फो*ट झाल्यानंतर जमिनीत थोडासा बदल दिसला आणि एक खडखडाट ऐकू आला. त्यानंतर मात्र, ११ क्रमांकाच्या विहीरीतून निघणारी गॅस फ्लेअर ताबडतोब कमी होऊ लागली आणि स्फो*टानंतर केवळ २३ सेकंदातच विझली. त्यानंतर थोड्याच वेळात ग्राउंड झिरोवरून रेडिओलॉजिकल सेफ्टी प्लेन उडवण्यात आलं. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याठिकाणी जास्त प्रमाणात रेडिएशन आणि मिथेनचं अस्तित्व आढळलं नाही. भूस्तरावरील रेडिएशन देखील नेहमीच्या मर्यादेत असल्याचं आढळलं. एकंदरीत, या प्रयोग यशस्वी झाला होता. अ*ण्वस्त्रांचा वापर करून उर्ता-बुलक गॅस फील्डमधील एक दीर्घ आणि कठीण अध्याय थांबवण्यात यश आलं होतं. ही विहीर बंद केल्यानं कोट्यवधी घनमीटर गॅस वाया जाण्यापासून वाचला. सोव्हिएतनं हीच संकल्पना आणखी चार वेळा वापरली.

१९६८ ते ७२ या काळात पामुक, मायस्की आणि क्रेस्टिशचे या गॅस फील्डमधील विहिरी यशस्वीपणे बंद करण्यात आल्या. शेवटचा प्रयत्न १९८१ मध्ये रशियाच्या उत्तर किनार्‍यावरील कुमझिन्स्की गॅस डिपॉझिटमधील विहिरीमध्ये करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी हा प्रयोग अयशस्वी झाल्याचे तपशील आहेत.

ज्या अ*णुशक्तीचा वापर करून अमेरिकेनं लोकांचे जीव घेतले तिच अ*णुशक्ती वापरून लोकांचे जीव वाचवता येऊ शकतात, हे सोव्हिएतनं जगाला दाखवून दिलं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

‘माल्टीज संस्कृती’ कमी काळ टिकली पण येणाऱ्या पिढ्यांसाठी फार काही सोडून गेली

Next Post

भल्या मोठ्या लढाऊ विमानांना सहज हुलकावणी देऊन ह*ल्ला करणारे ‘नॅटस्’ आणि ‘मॉस्किटोज्’!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

भल्या मोठ्या लढाऊ विमानांना सहज हुलकावणी देऊन ह*ल्ला करणारे 'नॅटस्' आणि 'मॉस्किटोज्'!

बेल्जीयमचं २०० टन सोनं दुसऱ्या महायु*द्धात सगळ्या जगाची सफर करून आलं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.