The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑलिम्पिकमध्ये विजयाच्या जवळ पोहोचला असताना याने बदकांसाठी होडी थांबवली होती

by Heramb
2 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दर चार वर्षांनी ऑलिम्पिक या जागतिक दर्जाच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. जगभरातून अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. ही स्पर्धा जिंकून पदक मिळवण्यासाठी सगळे खेळाडू अथक परिश्रम करतात. पण ही स्पर्धा चालू असताना विजयाच्या अगदी जवळ असूनही अचानक एखादा खेळाडू मध्येच थांबला तर?? हेन्री पिअर्स हा असाच एक खेळाडू.

हेन्री रॉबर्ट पिअर्स हा एक ऑस्ट्रेलियन ‘स्कलर’ होता. स्कलर म्हणजे ‘स्कलिंग’ या खेळात पारंगत असलेला खेळाडू. आता नेमका हा स्कलिंग खेळ म्हणजे आहे तरी काय?

तर स्कलिंग खेळात एक अरुंद पण लांब अशी होडी खेळाडूला पाण्यात चालवायची असते, ही होडी चालवण्यासाठी खेळाडूकडे एक किंवा दोन पाती दिली जातात. या पात्यांच्या साहाय्याने खेळाडू ती होडी पुढे वलवत नेतो. जो खेळाडू कमी वेळात ही शर्यत पूर्ण करतो तो विजयी घोषित केला जातो. ऑलिम्पिक या जागतिक दर्जाच्या स्पर्धेतही ‘स्कलिंग’ची स्पर्धा आयोजित केली जाते.

तर हेन्री पिअर्सचा जन्म सन १९०५ साली ऑस्ट्रेलियातल्या ‘सिडनी’ शहरात झाला. हेन्री पिअर्सला ‘बॉबी पिअर्स’ या नावानेही ओळखलं जातं. बॉबी पिअर्स हा १९२० ते १९३० च्या दरम्यान एक प्रसिद्ध स्कलर म्हणून नावाजलेला होता. बॉबी पिअर्स ज्या घरात जन्मला ते घरही खेळाडूंचं होतं. बॉबी पिअर्सचे वडील आणि आजोबाही स्कलिंग खेळत असत. त्याचे वडील हे प्रसिद्ध स्कलर होते आणि त्यांनी दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भागही घेतला होता.



स्कलिंग खेळाशी बॉबीची ओळख ही अगदी लहान वयातच झाली, बॉबी केवळ सहा वर्षांचा असताना त्याने स्कलिंगची पहिली स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत त्याचा प्रतिस्पर्धी चौदा वर्षांचा होता! जेव्हा तो २० वर्षांचा झाला तेव्हा तो ऑस्ट्रेलियामध्ये एक स्कलिंग चॅम्पियन म्हणून नावारूपास आला. त्याच्या खेळातील प्राविण्यामुळे आणि त्याच्या गोड स्वभावामुळे त्याचे बरेच चाहतेही होते. एकदा त्याच्या एक उत्तम खेळाडू असण्याची आणि त्यासोबतच एक संवेदनशील माणूस असण्याची प्रचिती सर्वांना आली.

१९२८ सालच्या ॲम्स्टरडॅम ऑलिंपिक्स स्पर्धेत हेन्री पिअर्सने भाग घेतला होता. या स्कलिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतला हा किस्सा! या स्पर्धेच्या अगदी सुरुवातीपासूनच बॉबी सर्वांच्या पुढे होता. अगदी अर्ध्या अंतरापर्यंतही बॉबीच सर्वांच्या पुढे होता, तो अगदी सहजपणे जिंकणार हे स्पष्ट होतं. पण अचानक असं काहीतरी झालं की बॉबीला आपल्या होडीचा वेग कमी करावा लागला आणि स्पर्धा सुरू असतानाच होडी थांबवावी लागली.

स्पर्धा सुरू असतानाच त्याला आजूबाजूच्या प्रेक्षकांचा आरडाओरडा ऐकू आला. त्याने समोर बघताच त्याच्या लक्षात आलं की त्याच्या होडीसमोरून एका बदकासोबत त्याची छोटी पिल्लं ते तळं पार करत होती. आपण ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये येत आहोत याची त्या बिचाऱ्या बदकांना पुसटशी कल्पनाही नव्हती! जसं बॉबी पिअर्सने त्या बदकांना बघितलं तसा त्याने होडीचा वेग कमी केला. त्याची ही कृती बघून त्याच्या चाहत्यांनी आणि आजूबाजूच्या इतर प्रेक्षकांनी आश्चर्याने ओरडायला सुरुवात केली. हा आरडाओरड ऐकूनही बॉबी शांतपणे त्या बदकांनी त्याच्या वाटेतून निघून जाण्याची वाट बघत थांबला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

या स्पर्धेत बॉबीचा प्रतिस्पर्धी होता ‘व्हिन्सेंट सौरीन’. व्हिन्सेंटही एक उत्तम स्कलर होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण ९ राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. त्याचसोबत तीन युरोपियन चॅम्पियमशिपमध्येही पदकं मिळवली होती. बॉबी बदकांमुळे थांबलाय याचा व्हिन्सेंटने फायदा घेतला आणि आपली होडी वेगाने पुढे आणली. आता बॉबीची होडी जरा मागे पडू लागली.

थोड्याच वेळात त्या सर्व बदकांनी त्याची वाट मोकळी केली. रस्ता मोकळा दिसताच बॉबीच्या होडीने पुन्हा वेग पकडला. आता नक्की कोण जिंकणार असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतानाच बॉबीच्या होडीने वेग पकडला, थोड्याच वेळात त्याची होडी व्हिन्सेंटच्याही पुढे जाऊ लागली. १००० मीटर्सच्या स्पर्धेत शेवटी बॉबी म्हणजेच हेन्री पिअर्स जिंकला!

खेळामध्ये संवेदनशीलता दाखवत आपली होडी थांबवूनही बॉबी जिंकला. बॉबीने व्हिन्सेंटच्या तुलनेत ३० सेकंद आधीच ही स्पर्धा पूर्ण केली. त्याने फक्त व्हिन्सेंटलाच हरवलं नाही तर इतर आठ प्रतिस्पर्ध्यांपेक्षाही कमी वेळात त्याने ही शर्यत पूर्ण केली. बॉबी फक्त उपांत्यपूर्व फेरीच जिंकला नाही तर अंतिम सामन्यातही जिंकला आणि पदक पटकावलं.

हेन्री पिअर्सला याबद्दल विचारताच तो म्हणाला “जेव्हा मी वेगाने होडी चालवत होतो तेव्हा अचानक मला आजूबाजूच्या लोकांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला, मी त्या माणसांकडे बघताच ते मला इशारा करून काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होते. मी त्या दिशेला बघताच मला बदकाचं एक कुटुंब शांतपणे पाण्यातून जाताना दिसलं, ते नेमकं माझ्याच मार्गात आडवं आलं होतं. त्यांच्याकडे बघताच काहीही विचार न करता मी माझ्या होडीचा वेग कमी केला!”

विजयाच्या अगदी जवळ असताना हेन्री पिअर्सने अचानक होडीचा वेग कमी केला त्यामुळे कदाचित तो स्पर्धा हरूही शकला असता. दुसरा एखादा खेळाडू असता तर स्पर्धेत जिंकण्यासाठी त्या बदकांचा विचार न करता आपली होडी वेगाने पुढे नेली असती. हेन्रीने मात्र ऑलिम्पिकसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत विजयाच्या अगदी जवळ असताना बदकांना वाचवण्यासाठी स्वतःचा वेग कमी केला. त्याची हीच गोष्ट त्याची संवेदनशीलता आणि माणुसकी दाखवून देते.

१९४५ साली हेन्री निवृत्त झाला. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत तो एकदाही स्पर्धा हरला नाही. खेळातून निवृत्त झाल्यावर दुसऱ्या महायु*द्धा दरम्यान तो नौदलातून कॅनडीयन यु*द्धात सहभागी झाला. १९५६ पर्यंत तो नौदलात होता, नौदलातून तो ‘लेफ्टनंट कमांडर’ म्हणून सेवानिवृत्त झाला. त्यानंतर १९७६ साली वयाच्या ७०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

हेन्री पिअर्स असा पहिला स्कलर होता ज्याने ऑलिम्पिक स्पर्धेत लागोपाठ सुवर्णपदकं पटकावली आहेत. त्याने फक्त या स्पर्धाच जिंकल्या नाहीत तर आपल्या माणुसकीने जगभरातल्या त्याच्या चाहत्यांची मनंही जिंकून घेतली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात तब्बल १२ कोटींची हाय सेक्युरिटी मर्सिडीज मेबॅक भरती झालीये

Next Post

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अन्नपूर्णा महाराणाने दिलेलं योगदान विसरून चालणार नाही

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अन्नपूर्णा महाराणाने दिलेलं योगदान विसरून चालणार नाही

आई आपल्या मुलासाठी काय करू शकते याचं उदाहरण म्हणजे ही स्त्री..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.