The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकाच वेळी दोन्ही बाजूंना खेळवणारा हा सर्वात चलाख गुप्तहेर होता..!

by Heramb
29 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एका आदर्श राजाने सहयोगी राजांच्या दरबारात, शत्रू राजांच्या दरबारात, तटस्थ राजांच्या दरबारात आणि आपल्या १८ उच्च अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘गुप्तहेर’ नियुक्त करावेत असं कौटिल्य अर्थशास्त्राने सांगितलं आहे. जगामध्ये होऊन गेलेल्या अगदी लहान राजांनीसुद्धा आपले हेर इतर राजांवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केले होते. ‘हेरगिरी’ हे प्रोफेशन सगळ्यांत जुनं आणि आजवर टिकलेलं प्रोफेशन आहे.

हेरगिरी आणि त्यातील जोखीम:

गुप्तहेरांना फक्त शस्त्रांवर अवलंबून राहता येत नाही. त्यांना कठोर शारीरिक प्रशिक्षण आणि हातघाईच्या लढाईचे प्रशिक्षण दिले जाते. गुप्तहेरांना कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीत स्वतःचा बचाव करता आला पाहिजे, पण जर सगळ्याच गुप्तहेरांचं प्रशिक्षण एकसारखं असेल तर मग यामध्ये गुप्तता अशी काय राहते? विशिष्ट प्रकारच्या गुप्तहेरांना कठोर शारीरिक प्रशिक्षण घेणे अनिवार्य नसते.

गुप्तहेराकडे असलेली सर्वांत महत्वाची शस्त्रे म्हणजे ज्ञान आणि ‘बुध्दिबल’. शत्रूंच्या प्रदेशात घुसखोरी करण्यासाठी गुप्तहेरांना स्वतःचा वेष तर बदलता आलाच पाहिजे पण त्याचबरोबर एखाद्या नटसम्राटाप्रमाणे त्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्वातही बदल घडवता आला पाहिजे. यासाठी ते ज्या प्रदेशात जातात तिथल्या संस्कृतीचे, जीवनपद्धतीचे आणि मुख्य म्हणजे भाषेचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. बरं या गोष्टींचे फक्त ज्ञान असून चालत नाही तर त्या भाषेतील शब्दाच्या उच्चारांचे आणि संस्कृतील बारकावेसुद्धा माहिती असणे आवश्यक आहे, कारण उच्चारांमधील किंवा पेहरावामधील एखादी लहानशी चूकसुद्धा त्यांच्यासाठी मोठं संकट ठरू शकते. 

बारकाव्यांमधील चुकांमुळे गुप्तहेर संकटात सापडण्याची शक्यता वाढते. आपल्या देशाचे विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याही बाबतीत असा प्रकार घडला होता. अजित डोवाल १९६८ सालच्या बॅचचे आयपीएस आहेत. त्यांनी पहिल्यांदा केरळ मधील कोट्टयाम जिल्हा येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक (एएसपी) म्हणून कामकाज सुरु केले. कंदहार फ्लाईट प्रकरणामधील तीन भारतीय नेगोशिएटर्सपैकी ते एक होते.

त्यांच्या कामकाजाची पद्धत पाहता २००५ साली त्यांची नियुक्ती ‘इंटेलिजन्स ब्युरो’च्या अध्यक्षपदी करण्यात आली आणि २०१४ साली ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्त झाले. एक आयपीएस ऑफिसर या प्रोफेशनबरोबरच त्यांच्याकडे ‘हेरगिरीची’ कला होती. इंटेलिजन्स ब्युरोच्या अध्यक्षपदी नियुक्त होण्याआधी काही वर्षे ते कराचीमध्ये होते. तेथे घडलेला किस्सा ते स्वतः आपल्या भाषणात सांगतात.



कराचीमध्ये एका मशिदीच्या परिसरात वावरताना एका मुस्लिम व्यक्तीने त्यांना पहिले आणि हाताच्या इशाऱ्याने आपल्याकडे बोलावले. जवळ आल्यावर डोवाल यांच्या कानात तो व्यक्ती काहीतरी पुटपुटला आणि त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. डोवलांना त्याने विचारले होते, तुम्ही भारतीय हिंदू आहात मग तुम्ही इथे, कराचीमध्ये, मशिदीच्या आवारात काय करता? घरी नेल्यावर त्या व्यक्तीने आपल्या कपाटातील तिजोरी उघडली आणि त्या तिजोरीत हिंदू देवी-देवतांच्या प्रतिमा होत्या.

वरवर जरी त्याने धर्मांतर केलेलं असलं तरी आपल्या संस्कृतीशी तो जोडलेला होता आणि गुप्तपणे का होईना पण आपल्या मूळ धर्माचे पालन करीत होता. डोवालांना त्याने ओळखले ते ‘कान टोचण्याच्या खुणेवरून’. वैदिक जीवनपद्धतीमध्ये, बाळाचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांत कान टोचण्याची पद्धत आहे, मग कान टोचलेली ती खूण जन्मभर कानावर राहते. हा बारकावा कदाचित भारताच्या इंटेलिजन्स ब्युरो अथवा रिसर्च अँड ऍनालिसिस विंगच्यासुद्धा लक्षात आलेला नसावा. त्यानंतर मात्र डोवालांनी प्लॅस्टिक सर्जरी करून ती खूण मिटवून घेतली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

जुआन गार्शिया:

शत्रूच्या प्रदेशात अंडर-कव्हर एजंट बनून राहणे किती अवघड आणि जोखमीचे आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. पण हे काम लीलया पार पाडून दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात एक गुप्तहेर तब्बल ३६ वर्षे शत्रूच्या प्रदेशात राहिला. ही चित्तथरारक कथा आहे जुआन पुजोल गार्शिया नावाच्या गुप्तहेराची.

स्पेनमधील बार्सिलोना येथील एका कापडगिरणी मालकाच्या घरात जुआनचा जन्म झाला. वयाच्या सातव्या वर्षी त्याला बोर्डिंग स्कुलमध्ये पाठवण्यात आले, त्याठिकाणी त्याने चार वर्षे वास्तव्य केले. बोर्डिंग स्कुल सोडून तीन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर त्याला एका हार्डवेअरच्या दुकानात शिकाऊ कामगार म्हणून नोकरी करायची होती. तारुण्यात असताना त्याने पैसे कमावण्यासाठी बरेच प्रयोग केले. इतर व्यवसायांसह त्याने पशुपालनाचा अभ्यास केला आणि सिनेमा व्यवस्थापनाचेसुद्धा काम केले.

जेव्हा त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हा तो पोल्ट्री उद्योगाचे प्रशिक्षण घेत होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. पण स्पॅनिश गृहयु*द्धाच्या सुरुवातीस त्याच्या वडिलांच्या कारखान्यावर कामगारांनी ताबा मिळवला आणि गार्शिया कुटुंबाची आर्थिक स्थिती बिघडली. त्यानंतर जुआनने घोडदळात सहा महिने सक्तीची लष्करी सेवा केली.

पण त्याला हे काम आवडत नसे. एका चांगल्या सैनिकामध्ये आवश्यक असलेल्या निष्ठा, औदार्य आणि सन्मान या आवश्यक गुणांची आपल्यात कमतरता आहे हे त्याला माहीत होते. त्यामुळे सैन्याकडून पुन्हा बोलावणं येईपर्यंत तो आपला पोल्ट्रीचा व्यवसाय सांभाळण्यासाठी परत घरी निघून गेला.

स्पॅनिश रिपब्लिकन्सना कम्युनिस्टांबद्दल प्रचंड सहानुभूती होती. जुआन मात्र कम्युनिस्टांचा तिरस्कार करीत असे. त्याची विचारसरणी ‘राष्ट्रवादी’ म्हणजे देशहिताचा विचार करणारी होती, पण नंतर स्पॅनिश लोक फॅसिस्ट विचारसरणीचे पालन करतात हे त्याला कळले, तेही त्याला आवडले नाही. अखेरीस तो संघर्ष सोडून मॅड्रिडला गेला आणि त्याने ‘अरासेली गोन्झालेझ’शी लग्न केले.

जुआनच्या हेरगिरीची सुरुवात:

१९४० च्या सुरुवातीस, जर्मनीसाठी सगळ्या चांगल्या गोष्टी होत होत्या. हि*टल*रच्या कारकिर्दीत ही परिस्थिती हाताबाहेर जात होती आणि त्या वेळी एकमेव ब्रिटन या परिस्थितीबद्दल चिंतित होता. जुआनने मॅड्रिडमधील ब्रिटीश दूतावासात अनेक वेळा संपर्क साधला आणि गुप्तहेर म्हणून आपली सेवा द्यायची इच्छा प्रकट केली. पण ब्रिटिश दूतावासाने त्याच्या सर्व ऑफर्स नाकारल्या.

तरीही “मानवतेच्या भल्यासाठी” काहीतरी करण्याचा त्याचा निर्धार होता. मग त्याने एक अलौकिक विचार केला आणि पहिल्यांदा जर्मन गुप्तहेर होण्याचा निर्णय घेतला. कारण त्यानंतर तो ब्रिटीशांना जर्मनसंबंधी भरपूर गुप्त-माहिती देऊ शकतो. मग ब्रिटिशांना त्याला नाकारणे कठीण झाले असते. 

जुआन एक बनावट ना*झी बनला आणि एका जर्मन एजंटला त्याची भरती करण्यासाठी प्रवृत्त केले. एजंटने त्याला अनेक व्यापाराच्या युक्त्या शिकवल्या, त्याला एक अदृश्य शाईची बाटली, एक कोडबुक आणि वैयक्तिक खर्चासाठी ६०० पौंड्स दिले. ब्रिटनमध्ये जाऊन त्याला ब्रिटीश एजंट्सची नियुक्ती करण्याची आज्ञा देण्यात आली होती. पण इंग्लंडला न जाता तो पोर्तुगालची राजधानी लिस्बनला गेला आणि यूकेमध्ये त्याच्या हेरगिरीच्या प्रयत्नांचे खोटे आणि गुंतागुंतीचे अहवाल तयार करण्यास सुरुवात केली.

एमआय-६ मध्ये नियुक्ती:

त्याने बनावट प्रवास खर्चाच्या आधारे ना*झींना त्या कर्जाची परतफेड करायला लावली आणि यूकेमध्ये ‘काल्पनिक गुप्तचर सिस्टीम’ तयार करण्यापर्यंत त्याने मजल मारली. या सिस्टीमचा सुगावा लागल्यानंतर ब्रिटिशांनी एका माणसाचा शोध सुरु केला इतकी ही फेक किंवा काल्पनिक सिस्टीम प्रभावशाली होती. जेव्हा यूएसए जर्मनीविरुद्धच्या लढाईत उतरले, तेव्हा एका अमेरिकन अधिकाऱ्याने जुआनचे एवढे प्रयत्न बघून त्याची शिफारस ब्रिटिश गुप्तहेर संस्थेसाठी केली. 

जुआनच्या अप्रतिम नाट्यकलेसाठी त्याला ‘गार्बो’ हे कोडनेम देण्यात आले. गार्बो हा त्यावेळच्या जगातील सर्वोत्तम नट होता. जुआनच्या प्रचंड विश्वासार्हतेमुळे त्याला एमआय-६ किंवा एसआयएसबरोबर काम करण्यासाठी निवडले गेले. ब्रिटीश गुप्तहेर संस्थेचे दोन भाग आहेत, एमआय-५ आणि एमआय-६. एमआय-५ ब्रिटिश नागरिक, राष्ट्रीय हितसंबंध, देशांतर्गत आणि परदेशातील धोक्यांपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी जबाबदार आहे तर एमआय-६ हे सरकारच्या सुरक्षा, परराष्ट्र आणि आर्थिक धोरणांच्या समर्थनार्थ यूकेबाहेरून माहिती गोळा करण्यासाठी जबाबदार आहे.

त्याने जर्मन अधिकाऱ्यांना दिलेली माहिती एकतर खोटी होती, किंवा निरुपयोगी होती किंवा त्या माहितीला एवढे लष्करी महत्त्व नव्हते. जर्मन अधिकाऱ्यांना यूकेमध्ये हेरगिरीचे आणखी प्रयत्न अनावश्यक वाटले इतके जुआनचे बनावट जर्मन गुप्तचर नेटवर्क उत्कृष्ट होते. जुआनच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तो करत असलेले काम पुरेसे आहे यावर जर्मन अधिकाऱ्यांचा विश्वास बसला. जुआनने जर्मन गुप्तचर यंत्रणेची अक्षरशः खिल्ली उडवली.

इंग्रजांनी जुआनच्या बनावट गुप्तहेर नेटवर्कमधील गुप्तहेरांचे बनावट मृत्यूपत्र छापून त्याची आणखी मदत केली. यापेक्षाही विनोदी बाब म्हणजे जुआनने जर्मन अधिकाऱ्यांना बनावट गुप्तहेरांच्या विधवांना ‘पेन्शन’ देण्यास भाग पाडले. जुआनच्या कारकीर्दीचे शिखर म्हणजे ऑपरेशन फोर्टीट्यूड. या ऑपरेशनमध्ये जुआनने जर्मनीला मित्र राष्ट्रांचे सैन्य प्रत्यक्ष यु*द्धात होते त्यापेक्षा खूप मोठे आहे हे पटवून दिले. याची खात्री जर्मन लोकांना व्हावी यासाठी ब्रिटीशांनी बनावट विमाने, हवेने फुगवण्यायोग्य रणगाडे आणि रेडिओ चॅटर दिले.

जर्मन सैन्य नॉर्मंडीची लढाई हरत असताना दोन आर्मर्ड डिव्हिजन आणि पॅस डी कॅलेसमधील एकोणीस पायदळ तुकड्या दुसऱ्या आक्र*मणाची वाट पाहत होत्या, इतके या अहवालांनी जर्मन सैन्याला फसवले. नॉर्मंडीची लढाई दुसऱ्या महायु*द्धाला कलाटणी देणारी ठरली. म्हणूनच, दुसऱ्या महायु*द्धात मित्र राष्ट्रांच्या विजयासाठी जुआनचे प्रयत्न महत्त्वपूर्ण होते. त्याच्या कारकिर्दीत, जुआनने जर्मन अधिकाऱ्यांना ३ लाख ४० हजार डॉलर्स हेरांच्या बनावट व्यवस्थेसाठी द्यायला लावले होते.

जुआनच्या सेवेसाठी जर्मनीच्या ना*झी शासनाने त्याला ‘आयर्न क्रॉस सेकंड क्लास’ने सन्मानित केले. या पुरस्कार वितरण सोहळ्याचा साक्षीदार खुद्द हि*टल*र होता. ब्रिटीश अधिकाऱ्यांनीही ‘एमबीइ’ देऊन त्याला सन्मानित केले. अशा प्रकारे, जुआनला दोन्ही बाजूंनी सन्मान देण्यात आला. सर्वांत विशेष बाब म्हणजे जर्मन लोकांना त्याचे खरे रूप कधीच कळले नाही!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

फाशीच्या शिक्षेवर असलेले सहा कैदी ‘मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन’मधून पळाले होते..!

Next Post

या एका स्टॉकमुळे ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ सलग तीन दिवस बंद होते!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या एका स्टॉकमुळे 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज' सलग तीन दिवस बंद होते!

'कोकेन किंग' पाब्लो एस्कोबारने गरिबांचा रॉबिनहूड बनायचा भरपूर प्रयत्न केला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.