The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिकन मंचुरियनचा शोध चीनमध्ये नाही तर मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये लागलाय..!

by द पोस्टमन टीम
24 November 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


चीन आणि भारत हे दोन देश एकदम ‘सख्खे’ शेजारी आहेत. दोन्ही देशांच्या दरम्यान कायम काही ना काही चकमकी उडत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये तर सीमा प्रश्नावरून वाद विकोपाला गेले आहेत. चीननं भारतीय सैनिकांवर अनपेक्षितपणे ह*ल्ला केल्यानंतर भारतानं जवळपास ५० चायनीज ॲप्सवर बंदी घातली आहे. एकमेकांमध्ये कमालीचे मतभेद असले तरी चीनमधील अनेक गोष्टी भारतीय बाजारपेठेमध्ये आणि भारतातील अनेक वस्तू चीनी बाजारपेठेमध्ये आजही विकल्या जातात.

याशिवाय चीनची आणखी एक गोष्ट आहे जी भारतीयांना प्रचंड आवडते. आवडते म्हणण्यापेक्षा भारतीय त्या गोष्टीच्या प्रेमात आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही! ती गोष्ट म्हणजे ‘चायनीज पदार्थ’. कढईमध्ये विविध प्रकारचे सॉस, मिरची, कांदा, लसूण आणि कॉर्नफ्लोर लावून तळलेल्या चिकन मंचुरियनची प्लेट पाहिली की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. चिकन चाऊ, शेझवान डोसा, हक्का नूडल्स यांसारखे इंडो-चायनीज पदार्थ हे देशभरातील मोठमोठ्या रेस्टॉरंट्सपासून ते अगदी स्ट्रीट फूड स्टॉल्सवर अगदी सहज सापडतात.

गंमतीची गोष्ट म्हणजे, जे अस्सल चायनीज खाद्यपदार्थ आहेत ते या इंडो-चायनीजसारखे अजिबातच दिसत नाहीत किंवा त्यांची चवही सारखी नसते. चीनमधील मेन्यूमध्ये तर तुम्हाला मंचुरियन आणि त्याचे विविध प्रकार शोधूनही सापडणारही नाहीत. जर असं असेल तर मग हा चिकन मंचुरियन खाद्यपदार्थ आला कुठून? आणि तो फक्त भारतातच का आढळतो? असे प्रश्न पडणं साहजिक आहे.

भारतामध्ये मिळणारे चायनिज पदार्थ किती स्वादिष्ट आहेत हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यातल्या त्यात चिकन मंचुरियन हा पदार्थ नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांचा जीव की प्राण. पण, जो पदार्थ तुम्ही चायनिज म्हणून मिटक्या मारत खाता त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? चिकन मंचुरियन पहिल्यांदा चीनमध्ये नाही तर मुंबईतील एका क्रिकेट क्लबमध्ये तयार करण्यात आलं होतं, असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?

हो..! चिकन मंचुरियन या पदार्थाचा आपल्या भारतामध्येच शोध लावण्यात आला आहे. चिकन मंचुरियनची जन्मकथा ऐकल्यानंतर मुंबईकरांना नक्कीच अभिमान वाटेल. कारण, लाखो लोकांच्या तोंडाला पाणी आणणारं चिकन मंचुरियन सर्वांत अगोदर मुंबईमध्ये बनवण्यात आलं होतं. अजूनही प्रसिद्ध असलेल्या चायना गार्डनचे संस्थापक, नेल्सन वांग यांनी १९७५ साली सर्वांत पहिल्यांदा चिकन मंचुरियन हा पदार्थ बनवला होता. १९५० साली जन्मलेले नेल्सन वांग हे एका चिनी स्थलांतरिताचं अपत्य होते. प्रसिद्ध शेफ होण्यासाठी  १९७४ मध्ये वांग यांनी मुंबईत पाऊल ठेवलं होतं.



मुंबईमध्ये आल्यानंतर वांग यांनी ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’मध्ये केटरर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) हे चर्चगेटजवळच्या ‘दिनशा वाचा’ रोडवर आहे. मेरीलेबोन क्रिकेट क्लबची (एमसीसी) समकक्ष संस्था म्हणून सीसीआयची स्थापना करण्यात आली होती. हा क्लब देशातील सर्वांत प्रतिष्ठित क्लब्सपैकी एक मानला जातो.

सीसीआय क्रिकेट खेळण्यासाठी ब्रेबॉर्न स्टेडियमचा वापर करतो. जेव्हा नेल्सन वांग मुंबईमध्ये आले होते तेव्हा ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’ उच्चभ्रू लोकांची आवडती जागा होती. वांग क्लबमधील रेस्टॉरन्टमध्ये काम करत असताना एका ग्राहकानं त्यांना ऑफ-द-मेनू डिश बनवण्यास सांगितले. असं काहीतरी जे यापूर्वी कधीही बनवलं गेलं नव्हतं.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

ग्राहकाची मागणी पूर्ण करण्यासाठी वांग यांनी चिकनचे चौकोनी तुकडे कॉर्नस्टार्चमध्ये बुडवून घेतले आणि ते तळून काढले. त्यानंतर त्याला लसूण, आलं, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि सोया सॉसमध्ये परतून घेतलं. नेल्सन वांगची ही नवीन डीश क्लबमध्ये चर्चेचा विषय झाली होती. क्लबमध्ये येणाऱ्या प्रत्येक मांसाहारी व्यक्तीनं या डीशचा आस्वाद घेतला. वांगनं आपल्या या नवीन डीशला ‘चिकन मंचुरियन’हे नाव दिलं.

क्रिकेट क्लबमधील व्यक्तींच्या तोंडून चिकन मंचुरियनची ख्याती देशभरात पोहचली. खवय्यांच्या मनात या नवीन डिशबद्दल उत्सुकता निर्माण झाली. वांगला इतकी प्रसिद्धी मिळाली की लोकांनी त्यांना स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करण्यास प्रोत्साहन दिलं. यातूनच मुंबईतील पहिलं इंडो-चायनीज रेस्टॉरंट ‘चायना गार्डन’ अस्तित्त्वात आलं.

मुंबईमध्ये आजही नेल्सन वांग यांचं इंडो-चायनीज रेस्टॉरंट आहे. सध्या त्यांचे वारस ‘चायना गार्डन’ सांभाळतात. चायना गार्डनप्रमाणेच, चिकन मंचुरियनचा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याची जबाबदारी वांगचा मुलगा एडी यानं स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. त्यानं बंगळुरू, गोवा, पुणे, हैदराबाद आणि दिल्ली येथे रेस्टॉरंटची चेन उघडली.

गेल्या ५० वर्षांमध्ये भारतातील प्रत्येक इंडो-चायनीज रेस्टॉरंटच्या मेनूकार्डमध्ये चिकन मंचुरियनने स्वतःची खास जागा तयार केली आहे. मंचुरियनच्या अफाट फॅन-फॉलोईंगच्या चवीची पूर्तता करण्यासाठी वेगवेगळ्या आवृत्त्यांचा समावेश केला गेला आहे. चिकन मंचुरियनप्रमाणं व्हेजिटेबल मंचुरियन आणि गोबी मंचुरियन देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे.

कमालीचे भू-राजकीय मतभेद असूनही इंडो-चायनीज खाद्यपदार्थ भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत. चिकन मंचुरियनप्रमाणं असे अनेक पदार्थ आहेत जे ‘देसी चायनीज’ म्हणून ओळखले जातात. पूर्वी भारतात स्थलांतरित झालेल्या मोजक्या चायनीज लोकांमध्ये बरेच जण ‘हक्का’ होते. त्यांनी भारतामध्ये हक्का-शैलीतील नूडल्स प्रसिद्ध केले. इतर चायनीज पदार्थही वेळोवेळी या लोकांसोबतचं भारतामध्ये आल्याचं सांगितलं जातं.

प्रामुख्यानं बंगाल आणि ईशान्य भारतामध्ये स्थलांतरित चायनीज लोक वास्तव्याला होते. मात्र, १९६२च्या यु*द्धानंतर अचानक या स्थलांतरित लोकांची संख्या कमालीने घटली. सध्या चायनीज लोक जरी भारतामध्ये नसले तरी त्यांचे हक्का नूडल्स इंडो-चायनीज रेस्टॉरंट्स, रस्त्यावरील स्टॉल्सचा मुख्य आधार झाले आहेत. हक्का नूडल्स प्रामाणं शेझवान चटणी, पनीर चीली समोसे, गोबी मंचुरियन मसाला यासारखे अनेक पदार्थ आपण आवडीनं खातो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘गंगनम स्टाईल’ एवढं व्हायरल झालं होतं की युट्युबचं व्ह्यू काउंटरच क्रॅश झालं..!

Next Post

आपला ‘बंधुभाव’ जगासमोर व्यक्त करण्यासाठी दोन समाजवादी नेत्यांनी एकमेकांना किस केलं होतं

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

आपला 'बंधुभाव' जगासमोर व्यक्त करण्यासाठी दोन समाजवादी नेत्यांनी एकमेकांना किस केलं होतं

राणी मेरी अँटोइनेटने ऑर्डर दिलेलं घड्याळ तिच्या मृत्यूनंतर ३४ वर्षांनी तयार झालं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.