The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हॅलिफॅक्स ब्ला*स्ट – हिरोशिमाच्या अगोदरचा जगातला सगळ्यात मोठा स्फो*ट होता

by Heramb
14 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


“चबूक्टो शाळेचं शवगृहात रूपांतर झालं होतं. लहान मुलांसाठी तयार केलेल्या छोट्या गाड्या कसल्यातरी ढिगाने भरलेल्या होत्या आणि त्यावर ताडपत्री टाकली होती. पण ताडपत्रीमुळे तो ढीग मृतदेहांचा आहे हे मात्र लपवता येत नव्हते. मला वाटलं सगळ्या मृतदेहांचे हात-पाय काळ्या कव्हरने झाकलेले असतील, पण ते जळालेले किंवा गोठलेले मानवी शरीरांचे तुकडे होते हे मला लवकरच लक्षात आलं. मला हे अगदी स्पष्टपणे आठवते, पण त्या वेळी मी जे पाहत होतो त्याचे महत्त्व मला कळले नाही. मला अस्वस्थ वाटले नाही. हे प्रसंग आणि माझ्या आईच्या विकृत बनलेल्या चेहऱ्याच्या कहाणीचा मी  ऋणी आहे, कारण यांमुळेच मला त्या घटना लक्षात राहिल्या. अन्यथा त्यावेळी घडलेल्या घटना आतापर्यंत लक्षात राहतील इतकं माझं वय त्यावेळी नव्हतं.”

हे शब्द आहेत हॅलिफॅक्स स्फो*टातून वाचलेल्या जीन होल्डरचे. हिरोशिमाच्या आधी जवळजवळ तशाच तीव्रतेने झालेला हा स्फो*ट.

१९ नोव्हेम्बर २०१९. इंग्लंडमधील बोस्टन शहर. येथे थेट कॅनडामधून आलेल्या ख्रिसमस ट्रीचं भव्य स्वागत होत होतं. कॅनडातील नोव्हा स्कॉटीयामधून आलेल्या ख्रिसमस ट्रीचं आगमन म्हणजे एक सामूहिक उत्सवच असतो. बोस्टनमधील आणि आसपासच्या प्रदेशातील कित्येक लोक या ख्रिसमस ट्रीला अभिवादन करण्यासाठी येतात. हा हॉलमार्क ख्रिसमस चित्रपटासाठी मार्केटिंगचा कार्यक्रम नव्हता. ही भेट १०० वर्षांपूर्वी मॅसॅच्युसेट्सच्या लोकांनी केलेल्या मदतीच्या प्रती कृतज्ञतेचा भाव होता.

ही मदत मॅसॅच्युसेट्सच्या लोकांनी ६ डिसेम्बर १९१७ रोजी “हॅलिफॅक्स ब्ला*स्ट”नंतर केली होती. हॅलिफॅक्सचा स्फो*ट एका अपघातामुळे झाला होता, पण तो फक्त एका अपघाताएवढा नव्हता तर सुमारे ३ हजार किलो वजनाच्या स्फो*टकांच्या स्फो*टामुळे संपूर्ण शहरच उ*द्ध्वस्त झालं. यात हजारो लोकांचा मृत्यू झाला.

९/११च्या  घटनेनंतर हरवलेल्या नातेवाईकांचा शोध घेत असलेल्या निराश ‘न्यू यॉर्क’वासीयांचा विचार कोणीही करू शकत नाही. काही जण अजूनही त्यांचा सुगावा लागेल या आशेने बेपत्ता लोकांचे फोटोज् आणि नावं पोस्ट करत आहेत. तसं पाहायला गेलं तर हॅलिफॅक्स हासुद्धा कॅनडाचा १०० वर्षांपूर्वीचा ९/११च होता. या संकटानन्तर बचावकार्यामुळे असंख्य मैल दूर मोठे ख्रिसमस ट्री पाठवण्याची अबाधित परंपरा सुरु झाली. नेमकं काय झालं होतं तेव्हा, जाणून घेऊया या लेखातून..

आशियातील मुंबईप्रमाणेच हॅलिफॅक्स हे कॅनडामधील सर्वांत महत्त्वाचे बंदर तर आहेच, शिवाय बंदराच्या योग्यतेच्या दृष्टीने पाहिलं तर ते एक ‘परफेक्ट नैसर्गिक’ बंदर असल्याचं आपल्याला दिसून येईल. खोल पाणी, सहसा न गोठणारं पाणी, अटलांटिक महासागरावर वसलेलं आणि युरोपच्या दिशेला असलेलं हे अद्वितीय बंदर आहे. नासाच्या एका संशोधन निबंधानुसार, हॅलिफॅक्सचा वापर अमेरिकन क्रांतीदरम्यान शस्त्रास्त्रं पुरवठ्याचे केंद्र म्हणून केला जात होता. तसेच नेपोलिनिक यु*द्ध आणि अखेर पहिल्या महायु*द्धासाठीही याचा शस्त्रास्त्रं पुरवठ्याचे केंद्र म्हणून वापर केला जात असे.



विसाव्या शतकात एकेकाळी, हॅलिफॅक्स बंदर जहाज वाहतुकीने गच्च भरून गेले होते आणि हॅलिफॅक्सच्या छोट्या शहराची लोकसंख्या तब्बल ५० हजारपर्यंत पोहोचली होती. जखमी सैनिक, रसद आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा देखील या बंदरावर उतरवला जात असे किंवा येथून कुठेतरी पाठवला जात असे.

व्यापारी आणि सामरिक महत्त्वाबरोबरच या बंदराला जागतिक प्रवासातसुद्धा अनन्यसाधारण महत्त्व होते. विविध ठिकाणांहून युरोपकडे जाणारे प्रवाशांचे काफिले याठिकाणी एकमेकांना भेटायला थांबत असत. त्यामुळे, हॅलिफॅक्स बंदर हे जर्मन यू-बोट्ससाठी देखील एक महत्त्वाचे बंदर होते. पण याठिकाणी एक नैसर्गिक आणि भौगोलिक अडथळा निर्माण झाला.

“नॅरो” या नावाने ओळखला जाणारा एक लहान ‘चोक-पॉईंट’ बंदराला प्रत्यक्ष समुद्राशी जोडतो. लष्करी रणनीतीमध्ये, चोक पॉईंट म्हणजे जमिनीवर किंवा समुद्रात पाण्याखालील एका निमुळत्या वाटेच्या दोन्ही बाजूंनी अडथळा असलेली भौगोलिक रचना. उदाहरणार्थ पुल किंवा खिंड. अशा गुंतागुंतीच्या भौगोलिक स्थितीचा फायदा घेऊन कॅनडियन अभियंत्यांनी जर्मन पाणबुड्यांपासून रक्षण व्हावे यासाठी काही बचावात्मक उपाय केले होते. पण मोठ्या जहाजांच्या सततच्या रहदारीमुळे या क्षेत्रात जहाजे एकमेकांवर धडकण्याची शक्यता होती.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

‘माउंट ब्लँक’ नावाच्या एका फ्रेंच जहाजाने ६ डिसेम्बर १९१७ रोजी सकाळच्या सुमारास हॅलिफॅक्स बंदराच्या ‘नॅरोमध्ये’ प्रवेश केला. या जहाजात प्रामुख्याने यु*द्धसामग्री होती. ज्यामध्ये दोन हजार तीनशे टन पिकरीक ॲसिड, २५० टन टीएनटी, तितकंच बेन्झीन, ६० टनपेक्षा जास्त नायट्रोसेल्युलोज आणि जहाजावर असलेल्या डेक-ग*नसाठी आवश्यक ३०० पेक्षा जास्त बंदुकीच्या गोळ्या अशी धोकादायक सामग्री या जहाजावर होती. पिकरीक ॲसिडतर टीएनटीपेक्षाही बरंच वि*ध्वंसक असतं.

खरं तर अशा प्रकारच्या जहाजांवर “धोकादायक माल” आहे हे दर्शवण्यासाठी एक विशिष्ट ध्वज असतो, पण या जहाजावर तसा कोणताही ध्वज नव्हता. त्यामुळे आसपासच्या यु-बोट्सना या जहाजावर धोकादायक माल असल्याची कल्पना आली नाही. इमो नावाचे  एक नॉर्वेजियन जहाज घाईत होते, त्यामुळे या जहाजाने वेग मर्यादा ओलांडली. अचानक, दोन जहाजे एकमेकांच्या समोर आली. दोन्ही जहाजे एकमेकांना रस्त्यातून बाजूला हटण्याचा इशारा देत होते, पण नॅरोच्या निमुळत्या आकारामुळे ते शक्य नव्हते.

इमोने पूर्ण उलट्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या एका प्रोपेलरमध्ये काहीतरी गडबड होऊन इमो जहाज ‘माउंट-ब्लँक’कडे ॲक्सॅलिरेट झाले. ही किरकोळ धडक आहे असं वाटत असतानाच, दोन्ही जहाजांच्या हल्सच्या (जहाजाचा मुख्य भाग) टकरेतून निर्माण झालेल्या ठिणग्यांमुळे आग लागली. जहाजे एकमेकांवर आदल्यामुळे ‘माउंट-ब्लँकवरील बॅरेल्समधून बेन्झीन सांडलं आणि आग आणखीनच भडकली.

माउंट-ब्लँक जहाजाच्या क्रूने जहाज सोडले, कारण त्यांना ही आग मोठ्या प्रमाणावर भडकणार याची पूर्ण खात्री होती. पण बेटांमधील बाकीच्या जहाजांनी आग विझवण्यामध्ये मदत करायला सुरुवात केली आणि याच प्रयत्नांत अनेक लहान बोटी आणि काही जहाजे माउंट-ब्लँकजवळ गेली. हॅलिफॅक्समध्येही या आगीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आपल्या हातातलं काम सोडून लोक आगीचा जबरदस्त झगमगाट खिडक्यांमधून पाहत होते.

माउंट-ब्लँकचा क्रू किनाऱ्यावर आला आणि ते लोक आपला जीव मुठीत घेऊन पळू लागले. त्यांनी फ्रेंच भाषेमध्ये लोकांना सावध केले, पण दुर्दैवाने ते शहर प्रामुख्याने इंग्रजी असल्याने कोणालाही त्यांच्या ओरडण्याचा अर्थ कळाला नाही. अखेर व्हायचा तो अनर्थ झालाच!

स्फो*टाच्या वेळी हॅरॉल्ड कॉनोली शाळेत होता. त्याने त्याच्या पुस्तकातून क्षणभर खिडकीबाहेर नजर टाकली आणि त्याला एक अवाढव्य आगीचा गोळा दिसला. त्याने ताबडतोब ओरडून आपल्या वर्गमित्रांना सावध केले आणि काही वेळातच स्फो*टाची लाट शाळेला धडकली. शाळेची संपूर्ण इमारत नाहीशी झाली. यातून कॉनोली आणि त्याचे काही मित्र वाचले. कॉनोली सांगतो, त्याच्या शिक्षकांचा टेबल खिडकीकडेच होता आणि खिडकीतून बाहेर नजर टाकल्याने उष्णतेच्या प्रचंड दबावाने काचेचे कण त्याच्या डोळ्यात गेले. त्यामुळे त्याने एक डोळा गमावला.

कॉनोली आणि इतर विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यात आले होते. त्याने बंदरापासून काही अंतरावर असंख्य नष्ट झालेल्या इमारती पाहिल्या. त्यादिवशी त्याच्या अनेक मित्रांचे आई-वडील मरण पावले. काही दिवसांनी शार्पनेल्स (स्फो*टामुळे तयार झालेले हवेतील स्फो*टक पदार्थ) शरीरावर लागल्याने आणि त्यामुळे झालेल्या जखमांमुळे त्याच्या वडिलांना रक्ताचा एक भीषण आजार झाला आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला.

आपल्या एका लेखात स्टीव्ह हेन्ड्रिक्स सांगतो, माउंट ब्लँकचा लोखंडी हल स्फो*टानन्तर काही सेकंदातच गायब झाला, त्या लोखंडी हलच्या शार्पनेल्सनी हवेसह मैलोन्मैल प्रवास केला, अर्धा टन अर्थात ५०० किलोपेक्षा जास्त वजन असलेला अँकर सुमारे २ मैल लांब फेकला गेला. समुद्राच्या पुढे असलेला एक स्केअर-मैलाचा भाग पूर्णतः उ*द्ध्वस्त झाला होता.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहांचे कपडे फाटले होते. तर शहराच्या क्लॉक टॉवरचे काटे ९ वाजून ५ मिनिटे यावरच थांबलेले होते. खरंच त्यादिवशी त्या व्यस्त शहराची वेळच थांबली होती. आजही त्या घड्याळात ९ वाजून ५ मिनिटेच वाजलेले दिसतात. हे हेतुपुरस्सर या घटनेच्या स्मरणार्थ करण्यात आले आहे. नासाच्या अहवालानुसार, या स्फो*टामुळे ५० मैल दूरपर्यंत खिडक्या फुटल्या होत्या.

स्टीव्ह हेन्ड्रिक्सच्या अहवालानुसार, मृतांची संख्या प्रचंड मोठी होती. सुमारे २ हजार लोकांचा यामध्ये मृत्यू झाला होता तर ५ हजार लोक गंभीररीत्या जखमी झाले होते. जीवितहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात वित्त हानीसुद्धा या स्फो*टामध्ये झाली होती. सर्वत्र इमारतींची पडझड झाली. नासाच्या अहवालानुसार, सुमारे १२ हजार इमारतींची पडझड झाली. पण सगळ्यांत भीषण परिस्थिती म्हणजे, भयंकर हिवाळ्यात असंख्य लोक आता बेघर झाले होते. अटलांटिकच्या सागरी संग्रहालयाने देखील दळणवळण, रेल्वे मार्ग आणि संपूर्ण क्षेत्रासाठी शिपिंग पूर्णपणे विस्कळीत झाल्याचा अहवाल दिला आहे.

मृतदेहांना हाताळण्यासाठी सर्वत्र तात्पुरती शवगृहे तयार झाली. अनेक मृत आणि काही जिवंत लोकही प्रचंड ढिगाऱ्यांच्या खाली गाडले गेले होते.

हॅलिफॅक्स शस्त्रास्त्रं पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असल्याने, स्फो*टानन्तर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. कॅनडा, इंग्लंड आणि अमेरिकेतील सैनिक, खलाशी, लढाईचा अनुभव असलेल्या परिचारिका आणि डॉक्टर्स मदतीसाठी धावले. याव्यतिरिक्त, कठोर परिश्रम करणारे स्थानिक लोकही त्यांच्या शेजारी असलेल्या शहरातील गरजूंना मदत करण्यासाठी पुढे आले. हेंड्रिक्सने एका नेत्ररोग तज्ज्ञाचे वर्णन केले. त्यांनी दोन दिवस सतत काम केले आणि जवळजवळ खराब झालेले ८० नेत्रपटल काढले.

या आपत्तीमुळे वित्तहानी झाली होती. त्यामुळे मॅसॅच्युसेट्समधून डॉक्टर, परिचारिका आणि स्वयंसेवकांचे मोठे गट ट्रेनने येऊ लागले. हे सगळे लोक स्वेच्छनेच येत होते. नासाच्या अहवालानुसार, अगदी चीनमधूनही मदत म्हणून निधी आला. सरकारी पातळीवर, कॅनडाच्या सरकारने १८ मिलियन डॉलर्स, इंग्लंडने ५ मिलियन डॉलर्स आणि मॅसॅच्युसेट्सच्या राज्याने १ मिलियन डॉलर्स अशी मदत दिली गेली.

नासाच्या लेखात, आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आवश्यकतेनुसार असंख्य वैद्यकीय नवकल्पनांचा उदय झाल्याचा उल्लेख केला आहे. या आपत्तीतून वाचलेला सॅम्युअल हेन्री प्रिन्स याने देखील या आपत्तीवर आधारित ‘रिकव्हरी डॉक्टरेट प्रबंध’ लिहिला आहे. या प्रकारच्या आपत्तीचा हा जगातील पहिलाच पद्धतशीर अभ्यास आहे.

तुम्ही आज हॅलिफॅक्समध्ये गेलात तर तुम्हाला टॉवरवरील घड्याळाचे काटे ९ वाजून ५ मिनिटे यावरच कायमचे थांबलेले दिसतात आणि माउंट ब्लँक जहाजाचे अँकरसुद्धा दिसते. या त्या भयानक मानवनिर्मित आपत्तीच्या स्मृती आहेत. आपत्तीनंतर शंभर वर्षांनी जगातील अनेक जण ती “आग” विसरलेही असतील, पण तेथील स्थानिकांसाठी ते शक्य नाही. तथापि या आपत्तीची एक अविश्वसनीय आठवण देखील आहे. आजही, शंभर वर्षांनंतरही हॅलिफॅक्समधून बोस्टनला कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून ख्रिसमस ट्री पाठवले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हबीबगंज रेल्वे स्थानकाला ज्यांचं नाव दिलं त्या राणी कमलापती कोण आहेत..?

Next Post

‘आंद्रे नेल’ला सिक्स मारून श्रीसंतने मैदानात नाचून केलेलं सेलिब्रेशन आजही आपलं फेव्हरेट आहे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

'आंद्रे नेल'ला सिक्स मारून श्रीसंतने मैदानात नाचून केलेलं सेलिब्रेशन आजही आपलं फेव्हरेट आहे

कम्प्युटरचा जनक असलेल्या बॅबेजने कंटाळून शेवटी जुगाराचा धंदा चालू केला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.