The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रस्त्याच्या कोणत्या बाजूने ड्रायव्हिंग करायची यावरून पण इतिहासात बरेच राडे झालेत..!

by Heramb
19 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जगातील सुमारे ६५% देश रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहने चालवतात. तर बाकी सर्वजण डावीकडून वाहने चालवतात. रस्त्याच्या डाव्या बाजूला गाडी चालवण्याचे नेमके प्रयोजन काय आहे आणि ते योग्य की अयोग्य? याच्यामागे काही शास्त्रीय कारणं वगैरे आहेत काय हे जाणून घेण्यासाठी हा प्रपंच.

जे देश रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवतात ते देश मुख्यत्वे ब्रिटीश वसाहती असलेली ठिकाणे आहेत. मध्ययुगीन काळामध्ये, बहुतेक लोक रस्त्याच्या डाव्या बाजूचा वापर करत असत. याचा संबंध वैयक्तिक सुरक्षा-असुरक्षेशी आहे. असं केल्याने संभाव्य शत्रूच्या हातातील तलवारीचा घाव चुकवता येत असे. तलवार बाळगणारा कोणताही व्यक्ती रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत असत. यामुळे तलवारधारी त्याचा उजवा हात संभाव्य ह*ल्लेखोर आणि प्रतिस्पर्ध्याच्या दिशेने ठेवू शकत होता.

याव्यतिरिक्त, उजवा हात कर्ता (राईट हँडेड पर्सन) असलेल्या व्यक्तीसाठी डाव्या बाजूने घोड्यावर चढणे सोपे असते. शिवाय स्वार त्यांच्या घोड्याला मध्यभागी न ठेवता रस्त्याच्या डाव्या बाजूला ठेवायचे कारण अन्य रहदारीला अडचण होऊ नये. अन्यथा बैलगाडी किंवा तत्सम वाहनांना ‘ट्रॅफिक’चा सामना करावा लागला असता. मग उजव्या बाजूने ड्रायव्हिंग नेमकी सुरु झाली असेल?

अशा प्रवासाची सुरुवात आपल्याला १७०० च्या सुमारास दिसते. या काळात शेतकऱ्यांचे विविध गट आपला शेतमाल मोठ्या वाहनांनी बाजारात नेत असत, याचवेळी गाडा ओढणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी एक ‘ड्रायव्हर’ घोड्यावर बसून रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत असत. डाव्या बाजूने चालत असताना तो आपल्या उजव्या हाताने त्या गटाचे मार्गदर्शन करीत असत.

पुढे १७५२ साली, रशियाच्या साम्राज्ञीने ‘दळणवळण’ रस्त्याच्या उजव्या बाजूने सुरु राहील असे अधिकृतरीत्या जाहीर केले. दळणवळणाची ही पद्धत त्यावेळी रशियाची एक राष्ट्रीय प्रथाच होती. १७८९ साली, फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान, याच प्रथेचा झपाट्याने प्रसार झाला. फ्रांसमध्ये उजव्या बाजूने वाहतूक होईल हा नियम १७९४ साली अधिकृतरीत्या लागू झाला.

या बदलामागे एक विशेष कारण आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधी, रस्त्याच्या डाव्या बाजूने चालण्याचा किंवा वाहन चालवण्याचा अधिकार फक्त उच्च वर्गाला होता. यामुळे शेतकरी आणि तत्सम कामे करणाऱ्या लोकांना रस्त्याच्या उजव्या बाजूचा अवलंब करावा लागला. कालांतराने, विशेषतः राज्यक्रांतीनन्तर उच्च वर्गानेही सर्वांमध्ये मिसळण्यासाठी रस्त्याच्या उजव्या बाजूचा अवलंब करण्याची सुरुवात केली. १७९३ साली डेन्मार्कनेसुद्धा रस्त्याच्या उजव्या बाजूने दळणवळणाचा नियम लागू केला.



पुढे नेपोलियन बोनापार्टने हा नियम उचलून धरला. त्याने ज्या ज्या देशांवर आक्र*मण करून ते देश पादाक्रांत केले त्या त्या देशांमध्ये त्याने उजव्या बाजूने दळणवळण करण्याचा नियम लादला. तर ज्या देशांनी त्याचा प्रतिकार केला, त्या देशांमध्ये मात्र डाव्या बाजूने दळणवळणाचा नियम लागू होता.

युनायटेड किंगडमने त्यांचे वर्चस्व असलेल्या सर्व देशांमध्ये डाव्या बाजूने दळणवळणाची पद्धत अबाधित ठेवली. या पद्धतीचे १८३५ साली नियमात रूपांतर होऊन हा नियम सक्तीचा करण्यात आला. ब्रिटिश अधिपत्याखालील सर्व देशांमध्ये याच नियमाचे पालन होत असत. दुसऱ्या महायु*द्धानन्तर ब्रिटिश साम्राज्याचे पतन होऊ लागले.

स्वातंत्र्य मिळालेल्या बऱ्याच देशांनी पुढे हाच नियम लागू केला. पण इजिप्त मात्र याला अपवाद होता. इजिप्तवर ब्रिटिशांपूर्वी नेपोलियनचे वर्चस्व होते. नेदरलँडवर विजय मिळवल्यानंतर नेपोलियनने डचांना उजव्या बाजूने दळणवळण सुरु ठेवण्यास प्रवृत्त केले, पण तरीही नेदरलँडच्या वसाहतींनी मात्र डाव्या बाजूने दळणवळण सुरु ठेवले होते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अमेरिका ब्रिटिश वसाहत होती, तरीही त्याठिकाणी उजव्या बाजूने ड्रायव्हिंग होते. कारण अमेरिकन राज्यक्रांतीनंतर अमेरिकन लोकांना ब्रिटनशी असलेले सर्व संबंध तोडायचे होते म्हणूनच त्यांनी उजवीकडून ड्रायव्हिंग करायला सुरुवात केली. फ्रान्सचा भाग उजव्याच बाजूने ड्रायव्हिंग करीत होता आणि ब्रिटिश प्रभाव असलेला भाग डाव्या बाजूने ड्रायव्हिंग करीत होता. १९२० पर्यंत कॅनडामध्येसुद्धा उजव्या बाजूने ड्रायव्हिंग होत असे. न्यूफाऊंडलॅंडमध्ये मात्र १९४९ पर्यंत डाव्या बाजूने ड्रायव्हिंगची प्रथा होती. पण न्यूफाऊंडलॅंड कॅनडामध्ये विलीन झाल्यानंतर ही प्रथा बंद पडली.

दुसऱ्या महायु*द्धानंतर युरोप हळू हळू अमेरिकन राज्यक्रांतीच्या विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊ लागला. अमेरिकन राज्यक्रांतीनुसार त्यांनीही उजव्या बाजूने ड्रायव्हिंग करण्यास सुरुवात केली. युरोप खंडात डाव्या बाजूने ड्रायव्हिंग करणारे फक्त चारच देश आहेत, इंग्लंड, माल्टा, सायप्रस आणि आयर्लंड. ब्रिटिशांनी उजव्या बाजूने ड्रायव्हिंग करण्याची पद्धती इंग्लंडमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, पण यासाठी मोठा खर्च लागणार होता शिवाय, प्रथेप्रमाणे डाव्या बाजूनेच ड्रायव्हिंग व्हावी असा राजकीय दबाव बनल्यानेसुद्धा हा बदल रद्द करण्यात आला.

उजव्या बाजूने ड्रायव्हिंग करणाऱ्या काही देशांनी दुसऱ्या महायु*द्धानंतर आपली भूमिका बदलली आणि त्यांनी डाव्या बाजूने ड्रायव्हिंग करण्यास सुरुवात केली. अशा देशांमध्ये तीन प्रमुख देश म्हणजे ईस्ट तिमोर, ओकिनावा आणि जपान. ईस्ट तिमोरने हा बदल १९७५ साली केला. जपान आणि ओकिनावाने हा बदल १९७८ साली, अमेरिकेच्या प्रभावाखाली आणि त्यांच्या सूचनेनुसार केला. सोमोआ या देशाने २००९ साली डाव्या बाजूने ड्रायव्हिंग करण्यास सुरुवात केली. याचं कारण म्हणजे सोमोआला डाव्या बाजूने ड्रायव्हिंग करणाऱ्या न्यू झीलँड, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांकडून स्वस्त गाड्या आयात करायच्या होत्या.

३ सप्टेंबर १९६७ रोजी, पहाटे ५ वाजता स्वीडनने रस्त्याच्या डाव्या बाजूने ड्रायव्हिंग करणे रद्द केले आणि आता यापुढे उजव्या बाजूने ड्रायव्हिंग होईल हे जाहीर केले. यालाच त्यांनी एचडे म्हणून मान्यता दिली. ‘एच’हे एका स्वीडिश शब्दाचे आद्याक्षर आहे. त्या स्वीडिश शब्दाचा अर्थ होतो, ‘उजव्या बाजूने वाहतूक वळवणे’. १९५५ साली ८३% स्वीडन लोकसंख्येने या बदलाला विरोध दर्शवला होता.

पण १९६३ साली स्वीडनच्या संसदेने या बदलाला बहुमताने मान्यता दर्शवली. कारण स्वीडनच्या आजूबाजूच्या सर्व देशांनी हा बदल घडवून आणला होता. स्वीडनमधील अनेक कारचे स्टीयरिंग व्हील डावीकडे होते आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचेही लक्षात आल्याने हा नियम लागू करण्यात आला.

म्यानमारमध्ये देखील १९७० पर्यंत डाव्या बाजूने ड्रायव्हिंग होत असे. पण म्यानमारचा नेता, जनरल ने विनने सगळ्यांना उजव्या बाजूने ड्रायव्हिंग करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे त्याला एका जादूगाराने हा सल्ला दिला होता. पण खरी समस्या म्हणजे अशा लहरीपणाने आदेश दिल्यामुळे सर्व गाड्यांचे स्टिअरिंग व्हील अजूनही उजव्याच बाजूला होते आणि रंगूनच्या रस्त्यांवरील सिग्नल्ससुद्धा रस्त्याच्या रॉंग साईडला होते.

अमेरिकेत उजव्या बाजूला स्टिअरिंग व्हील असलेली कार चालवणे कायदेशीर आहे. फक्त यासाठी आवश्यक नोंदणी करणे आवश्यक असते. अमेरिकेत आपण उजव्या बाजूला स्टिअरिंग व्हील असलेले ‘पोस्टल वाहन’ किंवा ‘मेल कार’ चालवू शकतो, पण ते वाहन संबंधित सेवेतून निवृत्त झालेले असले पाहिजे.

जगाच्या विविध भागात तेथील इतिहासानुसार आणि जनमानसानुसार दळणवळणाच्या बाजूचे नियम आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

प्राचीन आयुर्वेदाचा सखोल अभ्यास करून, आधुनिक प्रॉडक्ट्सचा ब्रँड उभा केला..!

Next Post

फक्त आपल्याच नाही, तर अमेरिकन अर्थव्यवस्थेला पण बेवड्यांनीच आधार दिला होता..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

फक्त आपल्याच नाही, तर अमेरिकन अर्थव्यवस्थेला पण बेवड्यांनीच आधार दिला होता..!

दुसऱ्या महायु*द्धात स्त्रियासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने सहभागी झाल्या होत्या..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.