The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कॅम्पिंगला गेलेल्या माणसांना मार*हाण केली म्हणून एका अस्वलाला जेलमध्ये टाकलं होतं

by Heramb
28 October 2024
in मनोरंजन, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


या चमत्कारिक जगात कधी काय होईल याचा काही नेम नाही. आपण अनेकदा सर्कशीत विविध कसरती आणि धमाल करणारी अस्वले, हत्ती, वानरं, वाघ असे अनेक प्राणी पहिले असतील. प्राण्यांच्या बाबतीत मनुष्य अनेकदा हळवा असतो, अनेकदा जिज्ञासू आणि उत्सुकही असतो तर कित्येकदा क्रू*र असतो. पण पोलिसांनी प्राण्यावर ‘केस’ किंवा ‘गुन्हेगारी प्रकरण’ टाकलेलं तुम्ही ऐकलंय का? कझाकिस्तानमध्ये मात्र असा प्रकार घडला होता. ‘कात्या’ नावाची तपकिरी अस्वली आणि अशाच काही प्राण्यांनी केलेल्या हिंसा*चार, कट, हेरगिरी या गुन्ह्यांसाठी त्यांना अटक झाली होती. हे प्रकरण नेमकं काय होतं, ते जाणून घेण्यासाठीच आजचा हा प्रपंच..

२००४ साली कझाक पोलिसांनी एका अस्वलीच्या गुन्हेगारी प्रकरणाचा तपास केला. या अस्वलीने कॅम्पिंग करत असलेल्या दोन पर्यटकांना बेदम मार*हाण करून इजा पोहोचवली होती. त्याचं कारणही तसंच होतं. ही अस्वली काही माणसाकडे स्वतःहून गेली नव्हती. तर एक अकरा वर्षांचा मुलगा तिच्या पिंजऱ्याच्या फारच जवळ गेला होता आणि एक मद्यपी अठ्ठावीस वर्षीय युवकाने तिच्या पायाचा पंजा हलवण्याचा प्रयत्न केला होता.

कात्या ही अस्वली यापूर्वी एका सर्कशीत होती. कॅम्पिंगला येणाऱ्या लोकांचे मनोरंजन करण्यासाठी तिला या पिंजऱ्यात ठेवले होते.  या प्रकारानंतर मात्र एकाटेरिनाला वन्य अधिकाऱ्यांनी कॅम्पिंगला येणाऱ्या लोकांच्या ‘मनोरंजनाच्या साधना’तून लगेच काढून टाकले. कॅम्पिंगच्या मनोरंजन कार्यक्रमातून काढून टाकल्यानंतर ‘कात्या’ला कोणतेही प्राणिसंग्रहालय किंवा ॲनिमल शेल्टर स्वीकारत नव्हते, मग कझाकच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तिला ठेवण्यासाठी ‘तुरुंग’ हे एकमेव ठिकाण असल्याचा अजब निष्कर्ष काढला.

कोस्टनायमधील ‘स्ट्रिक्ट पिनल कॉलनी’मध्ये कात्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या तुरुंगात आधीच ७०० हून अधिक मानवी कैदी होते. तिला अपूर्ण आहार आणि राहण्यास अयोग्य अशी जागा दिली गेली होती. पण या कालावधीत कात्या कैद्यांची लाडकी बनली होती, तिच्या सन्मानार्थ कैद्यांनी तिचा एक पुतळा देखील बांधला होता.

‘कात्या’ लवकरच आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये येऊ लागली. ‘बियर्स इन माईंड’ आणि ‘फॉरगॉटन ॲनिमल्स’ या एनजीओंनी तिची ताबडतोब मुक्तता करून योग्य वातावरणात ठेवण्याची मागणी केली आणि तिच्या समर्थनार्थ याचिका दाखल करण्यात आली. अखेर, ५ जून २०१९ रोजी या एनजीओंच्या प्रयत्नांना यश आले आणि तिला कझाकस्तानच्या उत्तरेकडील एका लहान प्राणिसंग्रहालयात स्थलांतरित करण्यात आले.

हे विचित्र प्रकरण समजून घेण्यासाठी, इतिहासात खटला चालवलेल्या प्राण्यांच्या इतर प्रकरणांवर प्रकाश टाकायला हवा. तेराव्या आणि अठराव्या शतकादरम्यान, जगातील न्यायालयांमध्ये प्राण्यांवर चालवले जाणारे खटले काही दुर्मिळ नव्हते. पाश्चिमात्य जगतात अनेकदा मालकांऐवजी बकऱ्या किंवा घोडे न्यायालयात मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असत. पाळीव प्राण्यांवर जादूटोण्याच्या कृत्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली खटला चालवला जात असे.



आपण अनेकदा पाश्चिमात्यांच्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल आणि त्यांच्या पुरोगामित्वाबद्दल बोलतो. पण स्वित्झर्लंडमधील बासेल या गावातील ‘कुर्झे बास्लर क्रॉनिक’ने १४७४ साली “अंडी घालण्याचा अनैसर्गिक गुन्हा” केल्याबद्दल एका कोंबड्यावर खटला टाकला होता असा दावा करण्यात येतो. या पक्ष्याने सैतानाचे अंडे दिले आहे, किंवा ‘कोकटेराईस’ नावाच्या सैतानाने कोंबड्याचे सोंग घेतले होते, म्हणून बासेल गावातील लोकांनी त्याच्या मृत्युदंडाची मागणी केली. या खटल्यात तो कोंबडा दोषी आढळला आणि त्याला खांबाला बांधून जाळण्यात आले. 

सतराव्या-अठराव्या शतकाच्या आधी अनेकदा प्राण्यांना अशा प्रकारे शिक्षा करण्यात आली आहे. त्याकाळी लोक प्राण्यांना शिक्षा करण्यासाठी फार उत्सुक असल्याचे दिसून येते. पण प्राण्यांना ‘गुन्हा’ म्हणजे काय हे माहित नाही इतकी नैतिक कल्पनाही या ‘माणसांना’ नव्हती. परंतु, जसाजसा समाज विकसित होत गेला, तसतसे प्रतिष्ठा, मूलभूत हक्क आणि नैतिकतेची समज वृद्धिंगत झाली आणि सार्वजनिक मृत्युदंडाबरोबर प्राण्यांवर चालवण्यात येणारे खटलेसुद्धा बंद करण्यात आले.

मग एकविसाव्या शतकात कात्या तुरुंगात कशी गेली? तथाकथित मानवी पीडितांच्या फायद्यासाठी किंवा समाधानासाठी कझाक अधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारीला दुय्यम स्थान दिले. ‘सार्वजनिक सुरक्षेचे कारण ‘ असे सांगून अस्वलाला किंवा कोणत्याही प्राण्याला चुकीची वागणूक देणे किंवा मारणे याचे हे एकच प्रकरण नाही.

अरापिराका येथील तुरुंगाच्या मुख्य गेटमधून एक मांजर सुटकेची उपकरणे घेऊन फिरताना आढळून आल्यावर तिला देखील तपासात अडकवण्यात आले. जेव्हा मांजरीला ताब्यात घेण्यात आले तेव्हा रक्षकांना दोन आरे, ड्रिल, एक फोन चार्जर, बॅटरी आणि मेमरी कार्ड सापडले होते. ही उपकरणे कोणासाठी आणली गेली असावीत हे मांजरीकरवी शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना मांजरीकडून काहीही माहिती मिळू शकली नाही. तुरुंगाच्या प्रवक्त्याने घोषित केले: “मांजर बोलत नसल्याने या कृत्यासाठी कोण जबाबदार आहे हे शोधणे कठीण आहे.”

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

भारतातही असा एक प्रकार झाल्याचं काही प्राणीप्रेमींकडून सांगण्यात येतं. २०१५ साली काश्मीरच्या भागात एका कबुतराला हेरगिरीच्या संशयातून पकडण्यात आले. या कबुतराच्या शरीरावर एका पाकिस्तानी फोन नंबरसह उर्दू भाषेत काहीतरी कोरले होते. त्यावेळी सैन्याधिकारी आणि स्थानिक पोलिसांना हेरगिरीचा संशय येणे साहजिकच होते. म्हणून त्यांनी अजून काही संशयास्पद आहे का हे तपासण्यासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात कबुतराचा एक्स-रे केला. पण सुदैवाने या तपासात काहीही निष्पन्न झाले नाही आणि त्या कबुतराला सोडण्यात आले.

मग मात्र पाकिस्तान सरकारचे खोट्या बातम्या चालवणारे ऑफिस आयएसपीआर आणि पाकिस्तानी जनतेने इंटरनेटवर या गोष्टीचा ‘मीम’ केला आणि जगातील अनेक कथित ‘प्राणीप्रेमींनी’ यावर टीकाही केली. भारतीय सुरक्षा दलाने संशयामुळे, सुरक्षेच्या दृष्टीने पशुवैद्यकीय रुग्णालयात कबुतराचा एक्स-रे केला म्हणून त्यांच्यावर कथित ‘प्राणीप्रेमींनी’ टीका केली, पण कबुतराच्या शरीरावर संदेश कोरताना त्याला होणाऱ्या वेदनांकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

माउंट एव्हरेस्टची उंची नेहमी बदलत का राहते..? हे घ्या उत्तर..!

Next Post

मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या बाईने संगीतातला सर्वोच्च ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या बाईने संगीतातला सर्वोच्च ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता

कोरियाची राजकुमारी जिला जपानमध्ये अक्षरशः कैद्यासारखं आयुष्य जगावं लागलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.