The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हि*टल*रला हवं असलेलं ‘एअरक्राफ्ट कॅरियर’ त्याला शेवटपर्यंत मिळालं नाही

by Heramb
10 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दुसरं महायु*द्ध संपण्याच्या वर्षांमध्ये, अर्थात सन १९४२ साली जर्मनी येथील ब्रेमेरहॅवन शिपयार्डचे कर्मचारी काही प्रवासी जहाजांवर काम करण्यात व्यस्त होते. त्यांनी प्रवासी जहाजांचे सीट्स आणि बेड्स काढून टाकले होते. पण जर्मन नौदलाला प्रवासी जहाजांची अशी काय गरज भासली होती?

पहिल्या महायु*द्धानंतर व्हर्सायच्या करारामध्ये जर्मनीवर अनेक निर्बंध लावण्यात आले. यामध्ये जर्मन नौदलाच्या जहाजांच्या आकारावर मोठ्या प्रमाणात मर्यादा घालण्यात आल्या. या करारान्वये जर्मनीच्या नौदलामध्ये मोठ्या आणि विमानवाहू यु*द्धनौका यांच्यावरसुद्धा बंदी घालण्यात आली होती. परंतु १९३२ साली ॲडॉल्फ हि*टल*र सत्तेत आला आणि जर्मनीने व्हर्सायच्या करारावर पाणी सोडले. त्यामुळे जर्मन नौदल मोठ्या आकाराच्या यु*द्धनौका पुन्हा तयार करू लागले.

जर्मन नौदलाने ‘बिस्मार्क’ आणि ‘त्रिपिट्झ’ नावाच्या दोन महाकाय यु*द्धनौका तयार करून जगाला आश्चर्यचकित केले. या यु*द्धनौका त्याकाळात जगातील सर्वांत मोठ्या होत्या. परंतु याच महायु*द्धाच्या काळात ब्रिटिश नौदलाने या यु*द्धनौका बुडवल्या. बिस्मार्क, त्रिपिट्झच्या वि*ध्वंसानंतर आणि जपानी नौदलाने पर्ल हार्बरवर केलेल्या ह*ल्ल्यानंतर जर्मन ॲडमिरल्सना विमानवाहू यु*द्धनौकेचं महत्त्व पटलं होतं, पण एव्हाना फार उशीर झाला होता. हि*टल*रने जर्मनीची एकमेव विमानवाहू यु*ध्दनौका ‘ग्रॅफ झेपलीन’ला महत्त्व न देता त्याचे काम अक्षरशः बंदच पाडले होते.

विमानवाहू यु*द्धनौका तयार करण्यासाठी त्यावरून टेकऑफ आणि लँड करण्यायोग्य विमाने असणे गरजेचे असते. दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात साधी लढाऊ विमाने यु*द्धनौकेवर ऑपरेट करण्यायोग्य बनवण्याची जबाबदारी संबंधित हवाई दलावर असत. परंतु, लफ्टवेफने (ना*झी हवाईदल) जंकर्स आणि मेसारश्मित लढाऊ विमानांना विमानवाहू युद्धनौकेवर ऑपरेट करण्यायोग्य बनवण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून यु*द्धनौका तयार करण्याची प्रक्रिया सुरु करता येणार नव्हती. म्हणून त्यांनी प्रवासी जहाजांचंच रूपांतर ‘विमानवाहू यु*द्धनौकेत’ करायचं ठरवलं.



शार्नहॉर्स्ट, नेसेनाऊ, पोस्टडॅम आणि युरोपा ही १९३० च्या दशकातील सर्वांत वेगवान प्रवासी जहाजे होती. शार्नहॉर्स्ट, नेसेनाऊ आणि पोस्टडॅमने ब्रेमरहवेन पासून टोकियोपर्यंत अनेक प्रवास केले होते. त्यामुळे, ऐन यु*द्धाच्या काळातच जगभरात व्यापार आणि त्याबरोबर सागरी प्रवास वाढला.

यु*द्ध सुरु झाल्यानंतर शार्नहॉर्स्ट जहाज जपानमध्ये होते आणि ऐन यु*द्धकाळात जर्मन नौदलाच्या संरक्षणाशिवाय शार्नहॉर्स्टला जपानपासून जर्मनी असा प्रवास करणे शक्य नव्हते. पण पॅसिफिकमध्ये जर्मन नौदलाचे एकही जहाज नव्हते. त्यावेळी जपानी राजवट यु*द्धात तटस्थ होती आणि त्यांनी शार्नहॉर्स्ट जहाजाला ताब्यात ठेवले. पण लवकरच यु*द्धाचे चित्र बदलले आणि जपान जर्मनीचा सहयोगी बनला. यावेळी जपान सरकारने शार्नहॉर्स्ट जहाजाच्या मालकाशी वाटाघाटी करून यु*द्धानंतर दुप्पट किंमत देण्याचे आश्वासन दिले आणि ते जहाज विकत घेतले.

यानंतर ‘इम्पेरियल जॅपनीज नेव्हीने’ या जहाजाचे नाव ठेवले ‘शिन्यो’. मिडवेच्या लढाईत विमानवाहू जहाजांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर जपानला विमानवाहू यु*द्धनौकांची नितांत गरज होती. इम्पेरियल जॅपनीज नेव्हीने ‘शार्नहॉर्स्ट’ किंवा ‘शिन्यो’चे रूपांतर सेमी-एअरक्राफ्ट कॅरियरमध्ये केले. त्यांनी या शिन्यो सेमी एअरक्राफ्ट कॅरियरचा वापर जपानी जहाजांच्या संरक्षणासाठी केला. या काफिल्यांवर अमेरिकन नौदलाच्या पाणबुड्या आणि एस-यु*द्धनौकांमधून होणाऱ्या ह*ल्ल्यांना सामोरे जावे लागत होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

नेसेनाऊ आणि पोस्टडॅम जहाजांचे नाव बदलून अनुक्रमे एल्बे आणि जेड ठेवण्यात आले. याच ‘यु*द्धनौका’पुढे ‘जेड’ क्लासच्या विमानवाहू यु*द्धनौकांमध्ये सामील झाल्या. पण ‘जेड’ क्लासच्या यु*द्धनौकांवर पुढे कधीही काम झाले नाही. जेडचा वापर काही काळासाठी नौदलाच्या यु*द्धनौकेच्या रूपात झाला आणि डेन्मार्कजवळ असताना ते एका ‘अंडरवॉटर माईन’ला धडकून उ*ध्वस्त झाले.

एल्बे या जहाजावर काम सुरु असताना जर्मनीविरुद्ध आक्र*मणे वाढली आणि जर्मन नौदलाने या जहाजाचे काम थांबवले. पुढे हेच एल्बे जहाज ‘बॅरेक्स शिप’ बनले. यु*द्धानंतर एल्बे ब्रिटिशांच्या ताब्यात आले आणि १९४७ साली, पाकिस्तानच्या निर्मितीनंतर ब्रिटिशांनी ते पाकिस्तानी सरकारला विकले.

युरोपा हे जर्मनी आणि यूएसएमधील ट्रान्सअटलांटिक मार्गावर सतत प्रवास करणारे एक प्रवासी जहाज होते. यु*द्ध सुरू झाल्यानंतर, हा प्रवास थांबला आणि जर्मन नौदलाने हे जहाज आपल्या ताब्यात घेतले. या जहाजाचेसुद्धा ‘विमानवाहू यु*द्धनौका’ बनवण्याची जर्मन नौदलाची इच्छा होती, पण ती योजना प्रत्यक्षात आली नाही. यु*द्धानंतर. यूएसएसाठी हे जहाज यु*द्धात मिळालेले बक्षीस होते.

१९३९ साली फ्रेंचांनी ‘डी ग्रास’ हे क्रुझर जहाज तयार करण्याची तयारी दर्शवली. पण दुसरे महायु*द्ध सुरू झाल्यानंतर फ्रेंच नौदलाने या जहाजाचे बांधकाम बंद केले. पुढे जर्मनीने फ्रान्सवर ताबा मिळवला तेव्हा जर्मन नौदलाने हेच शिपयार्ड ताब्यात घेतले आणि १९४२ साली जर्मन नौदलाने ‘डी ग्रासचे’ ऑक्सिलरी एअरक्राफ्ट कॅरियर (सहाय्यक विमानवाहू जहाज) तयार करण्याचे ठरवले.

परंतु, हे शिपयार्ड दोस्त राष्ट्रांच्या हवाई दलांच्या रेंजमध्ये सहज येत असल्याने मित्र राष्ट्रांच्या लढाऊ विमानांनी यावर दोनदा ‘बॉम्बिंग’ केलं. मजूर आणि कच्चा माल न मिळाल्याने तसेच मित्र राष्ट्रांच्या वारंवार होणाऱ्या हवाई ह*ल्ल्यांमुळे जर्मन सैन्याने या जहाजाचेही काम थांबवले. यु*द्धानंतर फ्रेंच नौदलाने ‘डी-ग्रासचे’ अँटी-एअरक्राफ्ट क्रूझरमध्ये रूपांतर केले.

‘सेडलिट्झ’ ही जर्मन नौदलाची नवी ‘क्रुझर’ जवळ जवळ पूर्ण तयार झालीच होती. या जहाजाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले होते. परंतु सतत वाढणाऱ्या एअरक्राफ्ट-कॅरियरच्या मागणीमुळे, किंबहुना गरजेमुळे, जर्मन नौदलाने या जहाजाचेही काम थांबवले आणि त्याचे एअरक्राफ्ट-कॅरियर तयार करण्याचे आदेश दिले. यानंतर सेडलिट्झला नवे नाव मिळाले, वेसर. १९४३ साली या जहाजावर पुन्हा काम सुरु करण्यात आले पण कच्चा माल न मिळाल्याने हे काम पुन्हा थांबवावे लागले. यु*द्ध संपल्यानंतर सोव्हिएट सैन्याने या जहाजाला ‘स्क्रॅप’ केले.

जर्मन नौदलाची गरज आणि त्यांचे स्वप्न असलेले एअरक्राफ्ट कॅरियर त्यांना शेवटपर्यंत तयारच करता आले नाही. जर ना*झींनी विमानवाहू यु*द्धनौकांचा वापर केला असता तर यु*द्धाचा कालावधी आणखी वाढला असता किंवा बहुधा यु*द्धाचा निकालच बदलला असता..


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एकेकाळी वर्ल्डकप सेमी फायनलिस्ट असलेल्या केनियन क्रिकेट टीमची आजची अवस्था मन सुन्न करणारी आहे

Next Post

या कलियुगातल्या भीमाने व्हॉईसरॉयची फुल्ल स्पीडमधली गाडी साखळीने थांबवली होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या कलियुगातल्या भीमाने व्हॉईसरॉयची फुल्ल स्पीडमधली गाडी साखळीने थांबवली होती

या स्वयंघोषित डॉक्टरने मायकल जॅक्सनचा पण इलाज केला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.