The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चार्ल्स डार्विनच्या आधीही उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला गेला होता..!

by Heramb
26 October 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


चार्ल्स डार्विन आणि ‘उत्क्रांती’ हे जवळजवळ समानार्थी शब्दच आहेत. परंतु डार्विन फक्त प्राचीन आणि सर्वज्ञात असलेल्या कल्पनेवर आधारित आहे, असं सांगितलं तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण अनेक स्रोतांच्या आणि पुराव्यांच्या आधारे असं म्हणायला वाव आहे.

इतिहासात डोकावण्यापूर्वी, आपण “उत्क्रांती” आणि “उत्क्रांतीचा सिद्धांत” यांमधील महत्त्वाचा फरक जाणून घेऊ.

उत्क्रांती म्हणजे कोणताही निव्वळ, दिशात्मक बदल किंवा अनेक पिढ्यांमधून जीव अथवा जीवांच्या विविध गटांच्या वैशिष्ट्यांमध्ये होणारा कोणताही संचयी बदल.

तर उत्क्रांतीचा सिद्धांत म्हणजे उत्क्रांती कशा प्रकारे कार्य करते याची यंत्रणा. अनेकदा उत्क्रांतीचा सिद्धांत हा केवळ अनुवांशिक प्रवाहाचा संचय असतो, बहुतेक वेळा हा सिद्धांत निसर्गात आढळून येणाऱ्या समान गोष्टींच्या आधारे मांडला जातो. हे समजून घेणेसुद्धा महत्त्वाचे आहे. कारण, डार्विनने “नैसर्गिक निवडीद्वारे उत्क्रांतीचा सिध्दांत” सर्वत्र प्रसिद्ध केला होता. उत्क्रांतीच्या वस्तुस्थितीचा विचार करणारा तो काही पहिलाच मानव नव्हता. जगातील अनेक संस्कृतींनी उत्क्रांतीचा अभ्यास केला.



ग्रीक संस्कृतीमधील उत्क्रांतीचा सिद्धांत:

ग्रीक लोकांमध्ये अनेक प्रसिद्ध तत्वज्ज्ञ आहेत. त्यांच्या महान बुद्धीचा प्रभाव इतक्या वर्षांनंतरही मानवाच्या विचारांवर पडला आहे. ज्यांना आपण “उत्क्रांतीवादी विचारवंत” म्हणू शकतो असे अनेक लोक ग्रीक संस्कृतीत होते. पहिला मिलेटसचा ॲनाक्सिमेंडर होता, हा तत्वज्ञ सर्वात प्राचीन-ज्ञात सोक्रेटिक तत्त्वज्ञांपैकी एक होता. तर दुसरा होता एम्पेडोकल्स.

मानवी भ्रूण गूढपणे तयार होतात. याविषयी ॲनाक्सिमंडरच्या कल्पना विचित्र होत्या, तर एम्पेडोकल्सकडे काहीसा डार्विनसारखाच दृष्टिकोन होता. एम्पेडोकल्स म्हणतो, “भ्रूणात प्राणी किंवा वनस्पतींचे वेगवेगळे भाग एकत्र मिसळल्यानंतर, सर्व काही हेतूपुरस्सर घडत असावे.”

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आता, प्राचीन काळातील या दोन्ही नैसर्गिक तत्त्ववेत्त्यांकडे भ्रूण-विज्ञान, भ्रूण-विकास किंवा आनुवंशिकता यासंबंधीचे कोणतेही ज्ञान नव्हते. तरी दोघेही भविष्यात योग्य ठरलेल्या सुमारे २००० वर्षांपासूनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्ताच्या जवळपास येऊन पोहोचतात. तसं पाहायला गेलं तर डार्विनलासुद्धा भ्रूणविज्ञान, विकास किंवा आनुवंशिकता या गोष्टींची इथ्थंभूत माहिती नव्हती.

कोणत्याही प्रजातीचे दुसऱ्या प्रजातीमध्ये परिवर्तन होऊ शकत नाही ही गोष्ट ॲनाक्सिमेंडरला सर्वांत आधी समजली. सजीव सृष्टीची सुरुवात समुद्रात झाल्याची शक्यता आहे असे त्याचे मत होते. गोष्टी हेतुपुरस्सर बनवल्याप्रमाणे दिसतात, किंवा अगदी सोप्या भाषेतच म्हणायचं झालं तर एका विशिष्ट डिझाइनद्वारे बनवले जातात, हे तत्त्व एम्पेडोकल्सला समजले. खरं तर, ‘जीवांमध्ये झालेले अपघाती बदल’ + ‘सर्वाइव्हल ऑफ द फिटेस्ट’ची संकल्पनाही काही प्रमाणात हे सिद्ध करते.

प्राचीन ग्रीक विचारवंतांच्या ‘पवित्र त्रिमूर्ती’पैकी एक असलेल्या ॲरिस्टॉटलने त्याच्या संशोधनातून थेट निरीक्षणाचा वापर करून उत्क्रांतीच्या कोड्यात आणखी एक तुकडा जोडला. तत्कालीन अनेक नैसर्गिक तत्त्ववेत्त्यांप्रमाणे, विज्ञानाचा फक्त विचार करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रयोग करण्याची वेळ येई तेव्हा ॲरिस्टॉटल कुशलतेने विचार करून आपले मत नोंदवत असत.

ॲरिस्टॉटलने ‘स्काला नेचरे’चा सिद्धांत मांडला. या सिद्धान्तामध्ये त्याने अस्तित्वात असलेल्या सर्व प्राण्यांना आणि अस्तित्वात नसलेल्या जीवांची देखील अशी क्रमवारी लावली: देव – देवदूत – मानव – प्राणी – वनस्पती – खनिजे. यामध्येही ॲरिस्टॉटलने अनेक गट पाडले. प्राण्यांमध्ये सर्वात वरच्या थरावर वाघ-सिंहांसह, कुत्रे आणि मांजरांच्या पाठोपाठ, मेंढ्या आणि गायींसारख्या पाळीव प्राणी आणि शेवटी साप अशी रचना केली.

ॲरिस्टॉटलच्या मते प्राणी विशिष्ट श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकतात. उदाहरणार्थ सस्तन प्राणी, समुद्री प्राणी, क्रस्टेशियन्स (खेकडे). ही श्रेणीबद्ध कल्पना अधिक पद्धतशीर उत्क्रांतीच्या सिद्धांतांसाठी मध्यवर्ती कल्पना होती. हत्ती पोहताना त्यांची सोंड वर काढून हवेतील ऑक्सिजन घेऊ शकतात. डॉल्फिन आणि व्हेल हे प्रत्यक्षात सस्तन प्राणी होते हे सांगणारा पहिला ॲरिस्टॉटलच होता. 

रोमन संस्कृती

हल्ली उत्क्रांतीवादी विचारसरणीचा बहुतांश विरोध ख्रिश्चन आणि इस्लामच्या काही संप्रदायांसारख्या धार्मिक स्त्रोतांकडून होतो. त्याकाळात अगदी प्राथमिक शिक्षण मिळवण्याचा आणि अशा प्रकारे उत्क्रांतीबद्दल काही शिकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे धार्मिक संस्थांमध्ये मिळणारं शिक्षण. यामुळेच उत्क्रांतीबद्दल संशोधन करणारे प्रागैतिहासिक काळातील अनेक रोमन लोक हे ख्रिश्चन पादरी असत.

उदाहरणार्थ, उत्क्रांतीवादी विचारात स्पष्टपणे प्रगती नसताना, अलेक्झांड्रियाच्या चर्चचा फादर ओरिजनने उत्क्रांतीबद्दल भरपूर अभ्यास केला. प्रसिद्ध विचारवंत, ऑगस्टीन ऑफ हिप्पो लिहितो: “देवाने शरीराच्या हातांनी मातीपासून मानवाची निर्मिती केली असे समजणे फार बालिश आहे. त्याच्या मते “देवाने मनुष्याला शारीरिक हातांनी किंवा घसा आणि ओठांनी श्वास त्यांना घेऊन बनवले नाही.”

ऑगस्टीन नावाच्या अभ्यासकाने पुढचा सिद्धांत मांडला. त्याच्या मते, “सजीव सृष्टीमध्ये सतत वाढ होत राहते. देव अंतिम लेखक आहे, पण तो अप्रत्यक्षपणे या सगळ्यामध्ये योगदान देतो. विशिष्ट पदार्थांना विशिष्ट वर्गातील वनस्पती आणि प्राणी तयार करण्याची शक्ती देवाने दिली आहे.”

इस्लाम संस्कृती

ख्रिस्तपूर्व १४६ साली ग्रीसने रोमवर विजय मिळवल्यानंतर आणि ख्रिस्तपूर्व ३९५ साली रोमचे अंतिम पतन झाल्यानंतर, आधुनिक युरोप अस्तित्वात येऊ लागला. या काळात, इस्लामचे संस्थापक, पैगंबर अरबस्तानमध्ये इसवी सन ५७० ते ६३२ पर्यंत राहत होते. पैगंबरांनी इस्लाम धर्माची स्थापना केली, याच धर्माने नंतर अरब विश्वाच्या मोठ्या भागाचे एकत्रीकरण केले. इसवी सनाचे आठवे ते चौदावे शतक इस्लामिक सुवर्णयुग म्हणून ओळखले जाते.

‘द इंट्रोडक्शन’ म्हणून अनुवादित, हा इब्न खालदूनच्या महान कार्याचा, किताब अल-इबारचा पहिला भाग होता. हा ग्रंथ इस्लामिक सुवर्ण युगाच्या समाप्तीच्या दिशेने लिहिलेला होता. अनेकदा प्रजातींच्या जैविक संक्रमणाचा सिद्धांत विकसित करण्याचे श्रेय इब्न खालदूनला दिले जाते.

“वेलींसारख्या वनस्पतींचा शेवटचा टप्पा प्राण्यांच्या पहिल्या टप्प्याशी जोडला जातो, जसे की गोगलगाय आणि शेलफिश ज्यात फक्त स्पर्श करण्याची शक्ती असते. प्रत्येक गटाचा शेवटचा टप्पा नवीन गटाचा पहिला टप्पा बनण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, असा अर्थ या निर्माण झालेल्या गोष्टींशी संबंधित ‘कनेक्शन’ या शब्दाचा आहे. प्राणी जग नंतर विस्तृत होते, त्याच्या प्रजाती असंख्य बनतात आणि, हळूहळू निर्मितीच्या प्रक्रियेत, ते शेवटी मनुष्याकडे घेऊन जाते, जो विचार करण्यास आणि ते विचार कृतींमध्ये प्रतिबिंबित करण्यास सक्षम आहे.”

वर लिहिलेल्या मजकुरात, इब्न खलदुन मूलत: अ‍ॅरिस्टॉटलसारख्या पूर्वीच्या विचारवंतांच्या विचारांची पुनरावृत्ती करतो. त्यांनीसुद्धा प्राण्यांना गटबद्ध आणि श्रेणीबद्ध केले. तथापि, या पुढील परिच्छेदात, इब्न खालदून काहीतरी उल्लेखनीय असे दर्शवितो:

“माकडांच्या जगातून माणसाचा उच्च टप्पा गाठला जातो, ज्यामध्ये चपळता आणि धारणा दोन्ही आढळतात, परंतु जे प्रत्यक्ष प्रतिबिंब आणि विचारांच्या टप्प्यावर पोहोचलेले नाही. या टप्प्यावर आपण मनुष्याच्या पहिल्या टप्प्यावर येतो. इथपर्यंत आमचे (भौतिक) निरीक्षण विस्तारले आहे.”

माकडे मानवाप्रमाणे कृती प्रतिबिंबित करू शकत नाहीत किंवा विचार करू शकत नाहीत या कल्पनेबद्दल वरील सिद्धांत चुकीचा असला तरी, इब्न खलदुनने वर्तन, शरीरशास्त्र आणि आकारशास्त्रात माकडांसारखे प्राणी आश्चर्यकारकपणे मानवांसारखेच असतात हे क्रांतिकारक निरीक्षण केले. अशा प्रकारे प्राण्यांवर प्रभुत्व मिळवण्याऐवजी मानवांना प्राण्यांच्या साम्राज्यात बसवणारे हे पहिले लोक आहेत.  ही कल्पना नंतर १८७१ साली प्रकाशित झालेल्या चार्ल्स डार्विनच्या ‘द डिसेंट ऑफ मॅन’ द्वारे प्रसिद्ध केली गेली. त्यांनी १८५९ सालच्या सुरुवातीच्या कामात मानवी उत्क्रांती या विषयाला स्पर्श करण्यास नकार दिला.

प्राचीन भारतीय संस्कृती:

भारतीयांनीसुद्धा अनेकदा शास्त्रवचनांच्या माध्यमातून उत्क्रांतीवादी विचारांचे चिंतन केले आहे. उदाहरणार्थ, दशावताराचा सिद्धांत, विष्णूचे दहा अवतार माशापासून सुरू होतात, तर श्रीकृष्ण अवतार हा “पूर्ण” अवतार मानला गेला आहे.

विष्णूचा पहिला अवतार म्हणजे मत्स्यावतार, अर्थात मासा. या अवतारात जलचरांचे चित्रण आहे. त्यानंतर जमिनीवर आणि पाण्यावर राहणारा कुर्मावतार, अर्थात कासव. या अवतारात प्राणी जमिनीवर जाताना दर्शविले जाते. नंतर एक सस्तन प्राणी – वराह. त्यानंतर नरसिंह, एक मनुष्य-सिंह जीव, हा जीव उर्वोगेल सारखा आहे. यानंतर वामन अवतार, हा अवतार बटू होमोनिड सारख्या प्राण्यांचे चित्रण करतो. नंतर परशुराम अवताराने गुहांमध्ये राहणाऱ्या प्राचीन आदिमानवाचे कुऱ्हाडीसह चित्रण केले. त्यानंतर रामाने राज्यांच्या संस्कृतीच्या उदयाची सुरुवात दर्शविली. तर श्रीकृष्ण हा विष्णूचा संपूर्णावतार, या अवतारामध्ये मानवाची सर्वच उत्तम वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात किंवा उत्तम मानवाची सर्वच वैशिष्ट्ये या अवतारात दिसून येतात.

या वैशिष्ट्यांमध्ये इतरांविषयी प्रेम, मैत्री, खल निग्रहण, संत-सज्जनांचे रक्षण, अविवेकावर विवेकाच्या जोरावर केलेली मात, तत्वज्ञान, अधर्मावर धर्माच्या मार्गाने केलेली मात, वेळ पडली तर दुष्टांच्या विरुद्ध अनीतीचा वापर, इत्यादींचा समावेश आहे. विविध संत, विचारवंत आणि लेखकांनी दशावताराचा संबंध उत्क्रांतीशी जोडला. यामध्ये भक्तिविनोदा ठाकूर, हेलेना ब्लाव्त्स्की, मोनियर मोनियर-विल्यम्स, नबिनचंद्र सेन, सी.डी. देशमुख यांचा समावेश होतो.

वैदिक धर्मशास्त्रानुसार, वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती या शुद्ध चेतनेने स्वीकारलेल्या भौतिक स्वरूप आहेत. हे जन्म आणि पुनर्जन्मांचे अंतहीन चक्र जगतात. रामायणाचा इतिहास मानवी बुद्धिमत्तेसह अस्तित्वात असलेल्या ‘वानर’ या प्रजाती (वानर-पुरुष) बद्दल सांगतो. वानरांची ही प्रजाती आधुनिक मानवांसोबत लाखो वर्षांपूर्वीही अस्तित्वात होती.

चार्ल्स डार्विन हा पहिला उत्क्रांतीवादी नव्हता. खरं तर तो त्या निष्कर्षांपासून खूप दूर होता. प्राण्यांच्या साम्राज्यात वंश आणि परस्परसंबंध या विषयाला प्रथम स्पर्श करणार्‍या प्राचीन विचारवंत कदाचितच निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले. आतापर्यंत आपण इसवी सन १४०० नंतरच्या कोणत्याही इतिहासाला स्पर्श केला नाही. या युगात संपूर्ण प्रबोधन आणि वैज्ञानिक क्रांतीचा समावेश आहे. या युगात जगातील अनेक लोक धर्मापासून दूर गेले आणि मानव ज्या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे निर्माण झाला त्यावर लक्ष केंद्रित केले.

डार्विनने आपल्याला जे दिले, जरी तो त्याबद्दल पूर्णपणे तज्ज्ञ नसला तरीही तो नैसर्गिक निवडीचा एक पूर्णपणे तयार केलेला सिद्धांत होता. एचएमएस बीगलवरील त्याची वैयक्तिक निरीक्षण क्षमता आणि अनुभव, तसेच इतर निसर्गशास्त्रज्ञ, प्रजननकर्त्यांकडून कृत्रिम आणि नैसर्गिक निवडीची प्रकरणे गोळा करण्यात त्याची दृढता आणि चिकाटी यामुळे त्याच्या प्रजातीची उत्पत्ती सर्वात निश्चित आहे आणि नैसर्गिक निवडीद्वारे उत्क्रांतीसाठीचे प्रकरण आतापर्यंत पुढे आले आहे.

चार्ल्स डार्विन कदाचित पहिला उत्क्रांतीवादी नसला, परंतु तो त्याच्या काळापर्यंतचा सर्वोत्तम उत्क्रांतीवादी होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

तब्बल साठ वर्षे रस्त्यांवर राज्य करणारी फोक्सवॅगनची बीटल खऱ्या अर्थाने पीपल्स कार होती

Next Post

ब्रिटनने वसाहतींवर केलेल्या अत्याचाराचे कागदपत्रं-पुरावे पद्धतशीरपणे नष्ट केले होते

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

ब्रिटनने वसाहतींवर केलेल्या अत्याचाराचे कागदपत्रं-पुरावे पद्धतशीरपणे नष्ट केले होते

स्टीव्ह जॉब्सने सुरुवातीच्या सहकाऱ्यांच्या पगारी बुडवून फुकट काम करून घेतलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.