The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्हणून ताजिकिस्तानसह नऊ देशांमध्ये असलेले भारतीय लष्करी बेस सामरिकदृष्ट्या महत्वाचे आहेत

by Heramb
28 October 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


हजारो वर्षे सतत शत्रूंच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या भारताची राष्ट्रीय सुरक्षा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. काही दशके केलेल्या प्रत्यक्ष यु*द्धानंतर पाकिस्तानने भारतावर अप्रत्यक्ष ह*ल्ले सुरु केले. यामध्ये सीमेपलीकडील द*हश*तवाद असो किंवा कश्मीरमध्ये केली जाणारी घुसखोरी असो. मुख्य म्हणजे या सगळ्याला बहुतांश पाकिस्तानी जनतेचाही पाठिंबा होता.

पाकिस्तानी लोकांना शिक्षणही नीटनेटके दिले जात नाही. शिक्षणाचा अभाव असल्याने तेथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळते. केवळ धार्मिक आणि कश्मीरच्या मुद्द्यांवरच निवडणुका होतात, सैन्याची परवानगी असेल तर. असो. १९८९ साली अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएटचा पाडाव झाल्यानंतर सोव्हिएट म्हणजेच तत्कालीन महासत्तेला जर ते दह*शत*वादी हरवू शकतात तर भारताला का नाही असे पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना वाटले. म्हणून कश्मीर घेण्यासाठी पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेने कश्मीरच्या उत्तर भागातून अनेक पाकिस्तानी आणि परदेशी द*हश*तवादी पाठवणं सुरु केलं. अशा प्रकारे कश्मीरमध्ये दह*शत*वाद आणि घुसखोरी सुरु झाली. याच वेळी नुकत्याच झालेल्या यु*द्धाचा अनुभव असलेल्या आयएसआयने अफगाणिस्तानप्रमाणेच कश्मीरमध्येसुद्धा “प्रॉक्सि वॉ*र” नावाचे तंत्र प्रत्यक्षात उतरवणे सुरु केले.

प्रॉक्सि वॉ*र म्हणजे प्रत्यक्ष राष्ट्रीय सैन्याचा वापर न करता स्थानिक लोकांमध्ये किंवा बाहेरील द*हशत*वाद्यांना खोट्या बातम्या देऊन आणि प्रोपागंडा करून असंतोष पसरवणे आणि त्यांचा वापर सैनिकीदृष्ट्या करणे. त्याप्रमाणे आयएसआयने काश्मिरी लोकांमध्ये “जिहाद”चं विष पसरवायला सुरुवात केली. तर पाकिस्तानच्या तरुण वर्गाला ‘१९७१ चा बदला’ घेण्याची जाणीव करून देण्यात आली.

आज आपण आपल्या घरात, कार्यालयांत बसून काम करतो, पण आपल्याला कल्पनाही नसेल इतका मोठा धोका भारताच्या डोक्यावर निर्माण झाला आहे. आज कोणत्याही परिस्थितीत पारंपरिक ‘यु*द्ध’ होणार नाही. कारण या संघर्षातील तीनही देश ‘अण*वस्त्र’सज्ज देश आहेत. पण हा ‘संघर्ष’ दोन आघाड्यांवर नाही तर ‘अडीच’ आघाड्यांवर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पाकिस्तान, चीन आणि देशांतर्गत कट्टरतावाद, नक्षलवाद, शहरी नक्षलवाद, इत्यादी.

असं असूनही राष्ट्रीय सुरक्षेत महत्वाची भूमिका बजावते ते म्हणजे राष्ट्राची ‘एअर-स्पेस’. जर राष्ट्राचे हवाई क्षेत्र सुरक्षित असेल तर बाह्य आक्र*मणांची शक्यता कित्येक पटीने कमी होते. म्हणूनच भारताचे दोन विस्तारवादी शत्रू, चीन आणि पाकिस्तान कधीही भारताविरोधात आपली हवाई ताकद वापरत नाहीत. १९७१च्या यु*द्धादरम्यान अमेरिकेच्या जीवावर पाकिस्तानने आपली हवाई ताकद भारताविरुद्ध वापरली होती. पाकिस्तानी हवाई दलाने अमृतसर आणि अंबाला येथे बॉम्बिंग करून भारताला ललकारले होते, पण यु*द्धाची समाप्ती पाकिस्तानच्या शरणार्थाने आणि फाळणी होऊन झाली. यानंतर दह*शत*वाद आणि कट्टरतावादाच्या मदतीनेच पाकिस्तानने आपली लढाई भारताविरोधात सुरु ठेवली होती.



भारतीय वायुसेना जगातील सर्वोत्तम वायुसेनांपैकी एक आणि अत्याधुनिक वायुसेना आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेलसारखी विमाने सामील झाली असून सुखोई, मिराज-२०००, जॅगुआर अशी शत्रूंच्या मनात धडकी भरवणारी लढाऊ विमाने सुरुवातीपासूनच वायुसेनेत आहेत. यापैकी बरीचशी मिग-२१ सारखी लढाऊ विमाने कालबाह्य झाली असली कारणाने त्यांची बदली अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांशी केली जात आहे. येत्या काळात भारतीय वायुसेनेच्या ताफ्यामध्ये ‘युरोफायटर टायफून’सारखी अत्याधुनिक विमाने असावीत अशी अपेक्षा करण्यास काही हरकत नाही. शिवाय हिंदुस्थान ऐरोनौटिक्स लिमिटेडद्वारे फीफ्थ आणि सिक्सथ जनरेशनची एएमसीए विमानं कशी असतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

राष्ट्राचे हवाई क्षेत्र सुरक्षेमध्ये आणखी एक महत्वाची भूमिका बजावतात त्या म्हणजे अँटी-एअरक्राफ्ट आर्टिलरीज (विमान-प्रतिरोधक तोफा). अशा प्रकारच्या तीन काहीशा जुन्या आणि सात अत्याधुनिक सिस्टिम्स भारतीय सुरक्षा दल वापरतात. यांपैकी टूके-१२ कब, एस-१२५ पेचोरा आणि एस-२०० या काहीशा जुन्या आणि लवकरच निवृत्त होणाऱ्या सिस्टिम्स आहेत. तर इस्रायली स्पायडर, रशियन एस-४००, डीआरडीओ निर्मित आकाश सरफेस टू एअर मिसाईल (सॅम), डीआरडीओ निर्मित मिडीयम रेंज सरफेस टू एअर मिसाईल (एम आर सॅम), क्विक रिऍक्शन सरफेस टू एअर मिसाईल (क्यू आर सॅम), एक्सटेंडेड रेंज सरफेस टू एअर मिसाईल (एक्स आर सॅम) आणि आकाश एन जी मिसाईल्स या अत्याधुनिक मिसाईल सिस्टिम्स आहेत. 

सुरक्षा क्षेत्रामध्ये अनेकदा ‘ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स’ असं म्हटलं जातं. म्हणजेच शत्रूने काही विघातक कारवाई करण्याच्या आधीच आपण अशी तयारी ठेवायला हवी की शत्रूची अशी कारवाई करण्याची हिम्मतसुद्धा होऊ शकत नाही. असंच काहीसं काम भारत सरकारच्या परराष्ट्र आणि रक्षा मंत्रालयाने भारतीय वायुसेनेच्या मदतीने केलं आहे. 

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच तालिबानचा झेंडा काबूलवर फडकला. याची कारणपरंपरा आणि जगभरात याचे उमटणारे पडसाद आपण पाहतच आहोत. १५ ऑगस्ट २०२१ नन्तर अफगाणिस्तानातील काबुलमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय हवाई दलाने सी – १३० आणि सी – १७ या ट्रान्सपोर्टर विमानांचा वापर केला. 

या विमानाने काबूलमधील भारतीय मिशनच्या कर्मचाऱ्यांची सुटका केली आणि ते सर्व सुरक्षितपणे भारतात परतले. विशेष म्हणजे या विमानाने भारतातून उड्डाण सुरू केले नव्हते, तर ताजिकिस्तानमधील आयनी या छोट्या एअरबेसवरून हे विमान काबुलला पोहोचले होते. ताजिकिस्तानमध्ये भारताचा एअरबेस कसा असेल? असा फक्त एकच एअरबेस आहे का? तर नाही! 

ताजिकिस्तान यूएसएसआरचा भाग होता. १९९१ साली यूएसएसआरमधून वेगळे होत ताजिकिस्तानने स्वातंत्र्य मिळवले. अफगाणिस्तानवर झालेल्या रशियन आक्र*मणादरम्यान, रशियाने ताजिकिस्तानमधील लष्करी ठिकाणांचा वापर अफगाणिस्तानातील सैन्याला सपोर्ट देण्यासाठी केला. अफगाणिस्तानात पराभव झाल्यानंतर रशियाने ताजिकिस्तानमधील तळाची जबाबदारी ताजिकिस्तानच्या संरक्षण विभागाकडे सोपवली. ताजिकिस्तानला या लष्करी तळांचा वापर नीट करता न आल्याने त्यांनी इतर देशांकडून विशेषतः भारताकडून तळाचा वापर करण्याची अपेक्षा ठेवली.

यु*द्ध झाल्यास पाकिस्तानवर ह*ल्ला करण्यासाठी भारताला पाकिस्तानच्या पश्चिम किंवा उत्तर दिशेने प्रवेश हवा होता. भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’ने ताजिकिस्तान सरकारशी अफगाणिस्तानच्या उत्तर प्रांताजवळील फरखोर एअरबेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत बोलणी केली. कारगिल यु*द्धानंतर भारताने ही प्रक्रिया जलद केली आणि काहीच काळातच भारताने पहिला परदेशी एअरबेस ताब्यात घेऊन त्याचे नूतनीकरण केले. फरखोर एअरबेसवर भारताने भारतीय हवाई दलाचे सैनिक आणि एक रुग्णालय तैनात केले आहे. तालिबानविरोधी लढाऊंवर उपचार करण्यासाठी भारताने या वायुसेना रुग्णालयाचा वापर केला. 

फरखोर एअरबेस पाकिस्तानच्या सीमेपासून अवघ्या ९०० किमी अंतरावर आणि हवाई मार्गाने फक्त १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. पाकिस्तानच्या संपूर्ण हवाई दलाची आणि हवाई संरक्षणाच्या सिस्टिम्स भारताच्या सीमेजवळ तयार तैनात करण्यात आल्या होत्या, त्यामुळे अफगाणिस्तानच्या बाजूची हवाई सीमारेषा पाकिस्तानसाठी संपूर्णतः असुरक्षित होती.

आयनी हा आणखी एक एअरबेस आहे जो भारताद्वारे रशियासह संयुक्तपणे चालवला जातो. ताजिकिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र असले तरी ते लष्करी गरजांसाठी रशियावर अवलंबून आहे. भारत अनेक वर्षांसाठी रशियन शस्त्रे, विशेषत: विमानांचा मोठा खरेदीदार होता आणि रशियासह अशा सुरक्षा सुविधा भाड्याने वाटून घेण्यास कोणतीही आंतरराष्ट्रीय समस्या नाही. आयनी आणि फरखोर एअरबेसेस भारताला चीनशी संघर्ष झाल्यावरसुद्धा मदत करु शकतील.

पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ताजिकिस्तान आणि भारत सरकारने त्यांना भारतीय हवाई तळ म्हणून मान्यता देण्यास नकार दिला आहे. कारण कोणत्याही राष्ट्रीय हिताशिवाय परदेशातील एअरबेसच्या नूतनीकरणासाठी भारत कोट्यवधी डॉलर्स का खर्च करतो असा प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे चीनचा ताजिकिस्तानमध्ये लष्करी तळ आहे. प्रत्येक देशालाच आता मध्य आशियामध्ये आपला दबदबा हवा आहे. पण दुर्दैवाने मध्य आशियाई देशांमध्ये आता कधीही शांतता दिसणार नाही. पण भारतासाठी सुरक्षेच्या दृष्टीने हा एअरबेस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.

ताजिकिस्तानशिवाय आणखी नऊ देशांमध्ये भारताचे मिलिटरी बेसेस आहेत. यामध्ये भुटान, नेपाळ, मॉल्डिव्ज, व्हिएतनाम, मादागास्कर, सेशेल्स, कतार, ओमान आणि मोझाम्बिके या देशांचा समावेश होतो. इतर कोणत्याही तत्वाशिवाय भारताने आता राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला प्राधान्य देऊन आवश्यक त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जाहिरात करून सावज शोधणारा हा एकमेव न*रभ*क्षक होता

Next Post

सोमवार आवडत नाही म्हणून या “हुशार” मुलीने शाळेवरच अंधाधुंद गोळीबार केला

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

सोमवार आवडत नाही म्हणून या "हुशार" मुलीने शाळेवरच अंधाधुंद गोळीबार केला

जहाज अपघातातून वाचलेल्या दर्यावर्दींनी वसवलेला देश म्हणजे बर्मुडा..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.