The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवनारायण चंदरपॉल आपल्या पिढीच्या लक्षात राहिला तो त्याच्या डोळ्याखालील काळ्या पट्ट्यांमुळे

by द पोस्टमन टीम
4 November 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


वेस्ट इंडिजमधील क्रिकेट खेळाडू त्यांच्या अनोख्या आवडी-निवडी जपण्यासाठी ओळखले जातात. विशेषत: गळ्यात जाड-जाड सोन्याच्या साखळ्या घालण्याचं क्रेज अलिकडच्या काळातील काही विंडिज खेळाडूंमध्ये असल्याचं दिसतं. याशिवाय काही खेळाडू त्यांच्या चित्रविचित्र हेयरस्टाईल्सनं आपलं लक्ष वेधून घेतात. विंडिजचा असाच एक खेळाडू होता जो त्याच्या एका विशिष्ट सवयीमुळं अनेकांच्या कुतुहलाचा विषय झाला होता. शिवनारायण चंदरपॉल असं या खेळाडूचं नाव आहे.

शिवनारायण चंदरपॉल १९९४ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वावरला. मात्र, त्याच्या साधेपणामुळं तो कायम ‘अनसंग हिरो’ राहिला याची अनेकांना जाणीव नाही. या प्रतिभावान कॅरेबियन खेळाडूनं आपल्या कारकिर्दीचा बहुतांश काळ लिजंड ब्रायन लारासोबत घालवला. लाराच्या प्रभावामुळं शिवनारायण झाकोळला गेला.

मात्र, लाराच्या निवृत्तीनंतर शिवनारायण कितीतरी दिवस वेस्ट इंडिजचा एकमेव आधार होता. विशेष आकर्षक शरीरयष्टी नसलेल्या चंदरपॉलच्या बॅटिंग स्टान्सची देखील खिल्ली उडवली जायची. तो एखाद्या खेकड्यासारखा उभा राहतो, असं त्याला म्हटलं जाई. सुरुवातीच्या १८ सामन्यांमध्ये १५ अर्धशतके झळकावल्यानंतर त्याला आपलं पहिल कसोटी शतक करता आलं.

आपल्या कारकिर्दीत त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये ११ हजार ८६७ जास्त धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ हजार ७७८ धावा करून त्यानं क्रिकेटप्रती असलेलं समर्पण सिद्ध केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं एकूण ४१ शतके आणि १२५ अर्धशतके ठोकली. या गोष्टी एक फलंदाज म्हणून त्याची क्षमता सिद्ध करण्यास नक्कीच पुरेशा आहेत, नाही का?



युनिक बॅटिंग स्टान्स असलेल्या चंदरपॉलची आणखी एक गोष्ट निराळी होती. त्याच्या डोळ्याखाली काळ्या रंगाच्या दोन पट्ट्या लावलेल्या असायच्या. साधारणपणे क्रिकेटर्स उन्हापासून आपलं संरक्षण करण्यासाठी ‘झिंक ऑक्साइड’ लावत असल्याचं आपल्याला माहित आहे. त्याचा सर्रासपणे वापर होत असल्याच दिसतं. मात्र, चंदरपॉल एकटाच असा खेळाडू होता जो डोळ्यांखाली काळे स्टिकर्स लावत असे. या स्टिकर्सबाबत अनेकांच्या मनात कुतुहल होतं.

तो आपल्या डोळ्यांखाली काळे स्टिकर्स का वापरत होता याचं उत्तर अनेकांना माहितीच नव्हतं. चंदरपॉल जे स्टिकर्स वापरत होता ते अँटी-ग्लेअर पॅच होते. हे पॅच डोळ्यांच्या परिघीय क्षेत्रामध्ये येणारा प्रकाश कमी करण्यासाठी वापरले जातात. जेणेकरून तुम्ही प्रकाशानं प्रभावित न होता फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करू शकता. फुटबॉलमधील अनेक अमेरिकन खेळाडू असे अँटी-ग्लेअर पॅच वापरताना दिसतात.

अँटी-ग्लेअर पॅचेस मेण, पॅराफिन आणि कार्बनच्या मिश्रणातून बनवले जातात. त्यात पेटंट फॅब्रिकचा देखील वापर केला जातो. अँटी-ग्लेअर पॅचेस डोळ्यांचं उष्णतेपासून संरक्षण करण्यास मदत करतात. अशा पॅचच्या कार्यप्रणालीबद्दल बरेच दावे केले गेले आहेत. काही लोक असा दावा करतात की ते जास्त फायदेशीर ठरत नाहीत. परंतु, ज्या खेळाडूंनी हे पॅच वापरले आहेत त्याच्या मते, हे पॅच खरोखरच त्यांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

शिवनारायण चंदरपॉल अनेक वर्षांपासून ‘म्युलर’ ब्रँड अँटी-ग्लेअर पॅच वापरत होता. त्यानं अँटी-ग्लेअर सनग्लासेसला कधीच प्राधान्य दिलं नाही. मात्र, २०११च्या ‘आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप’ स्पर्धेदरम्यान आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ब्रँडेड अँटी-ग्लेअर पॅच वापरण्याची परवानगी नाकारली गेली. त्यामुळं त्याला ‘म्युलर’ पॅच वापरता आले नाही. आता क्रिकेटमध्ये असे अँटी-ग्लेअर पॅच कुणीही वापरताना दिसत नाही.

शिवनारायणच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला तर तो एक शांत आणि धूर्त खेळाडू होता. सर्वांत वेगवान कसोटी शतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा चौथा क्रमांक लागतो. त्यानं २००२ साली पाहुण्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ ६७ बॉलमध्ये शतक झळकावलं होतं. अँटिगामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी ४१८ धावांचा पाठलाग करताना देखील १०४ धावा केल्या होत्या. २००५ साली दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी त्याला संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आलं.

कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात द्विशतक ठोकणारा दुसरा खेळाडू बनला. एक खेळाडू म्हणून तो यशस्वी झाला होता. पण, कर्णधार म्हणून त्याचा कार्यकाळ स्वत:साठी आणि संघासाठी फारसा फायद्याचा ठरला नाही. आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी शिवनारायण चंद्रपॉलनं २००६ साली कर्णधार पदाचा राजीनामा दिला.

हे पाऊल त्याच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरलं. कारण त्यानंतरच्या हंगामात त्याला प्रचंड यश मिळाल. २००७ च्या इंग्लंड दौऱ्यात त्यानं १५०च्या सरासरीनं धावा केल्या होत्या. या दौऱ्यातील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत त्यानं नाबाद शतकं केली होती. मात्र, चंदरपॉलचा एकाकी लढा यशस्वी झाला नाही. वेस्ट इंडिजनं ही मालिका गमावली.

कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा खेळ अधिक चांगल्या पद्धतीनं खुलत असला तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील त्याला चांगलं यश मिळालं. २००४ साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील वेस्ट इंडिजच्या यशस्वी मोहिमेत त्यानं महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. मधल्या फळीतील फलंदाज असूनही, चंदरपॉलनं २००६च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामीला येऊन खेळ केला आणि त्यात त्याला यश देखील मिळालं.

ज्यामुळं वेस्ट इंडिजला त्यावर्षी अंतिम फेरीपर्यंत पोहचण्यास मदत झाली. २००८ साली देखील त्याचा चांगला फॉर्म टिकून होता. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर ३ टेस्टमध्ये ४४२ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीचं आयसीसीनं कौतुक देखील केलं. त्याला २००८ साली ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ आणि ‘आयसीसी प्लेयर ऑफ द इयर’ हे दोन पुरस्कार मिळाले.

अगदी आपल्या कारकिर्दीच्या शेवटी देखील त्यानं आपली क्षमता सिद्ध केली होती. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे २०१२ साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत त्याने नाबाद १०३ धावा केल्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा देखील समावेश होतो. कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा तो ब्रायन लारानंतरचा दुसरा वेस्ट इंडियन ठरला होता. २०१२ साली त्यानं श्रीलंका प्रीमियर लीगच्या युवा नेक्स्टचं प्रतिनिधित्व करून टी ट्वेंटी सामने देखील खेळले. आपला अनोखा स्टान्स, आपलं अनोखं व्यक्तिमत्व आणि डोळ्यांखाली असलेल्या काळ्या स्टिकर्समुळं क्रिकेट रसिकांच्या तो कायम लक्षात राहिल, ही गोष्ट मात्र नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आदिवासींचा अभ्यास करायला गेलेला रॉकफेलर घराण्याचा वारस न*रभ*क्षक टोळीचं भक्ष्य बनला होता

Next Post

जेव्हा राणी एलिझाबेथच्या ड्राइव्हिंगने सौदी अरेबियाच्या राजकुमाराला घाम फुटला होता

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

जेव्हा राणी एलिझाबेथच्या ड्राइव्हिंगने सौदी अरेबियाच्या राजकुमाराला घाम फुटला होता

ब्रिटनने हि*टल*रला 'बाई' बनवण्याचा सिक्रेट प्लॅन बनवला होता, जो फ्लॉप झाला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.