The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब*लात्का*राच्या आरोपाखाली मृत्युदंड झाला, आणि ७० वर्षांनंतर त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालं

by Heramb
28 October 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


या जगाच्या पाठीवर अनेक “भेदाभेद” आहेत. कुठे धर्म-भेद, कुठे जाती-भेद, इतकंच काय तर उपजाती-भेद, कुठे वर्ण-भेद, आणि यासारखेच कित्येक भेद आपल्याला संपूर्ण जगात पाहायला मिळतात. याचे महत्वाचे आणि मूळ कारण म्हणजे माणसाचे अज्ञान आणि त्याला खतपाणी घालणारा ‘अहंकार’! अज्ञानामुळे माणसाच्या अहंकाराला सतत भिंती आणि सीमा तयार कराव्या लागतात.  

भेदाभेद-भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥ तुकोबांच्या या वचनांप्रमाणे सर्वच लोक हे एकाच ‘समाजरूपी’ देहाचे अवयव आहेत. त्यापैकी एका अवयवाला इजा झाली तर दुसऱ्या अवयवालाही त्याचे परिणाम भोगावे लागतात.

असेच परिणाम पाश्चिमात्य राष्ट्रांतील समाजाला वर्णभेदामुळे मोठ्या प्रमाणात भोगावे लागले. मार्टिन्सविले येथे सात जणांना १९५१ साली ब*लात्का*राच्या आरोपाखाली मृत्युदंड देण्यात आला. पण काही वर्षांनन्तर ते निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. ते रंगाने ‘काळे’ असल्याने मृत्युदंड देण्यात आला होता हेसुद्धा सिद्ध झालं. तेव्हा ३१ ऑगस्ट २०२१ रोजी या सर्वांना “मरणोत्तर माफी” देण्यात आली. हे प्रकरण नेमकं काय होतं याबद्दलच आजचा विशेष लेख..

सत्तर वर्षांपूर्वी, १९५१ साली, रुबी स्ट्राऊड फ्लोयड या ३२ वर्षीय श्वेतवर्णीय महिलेवर कथित ब*लात्का*र केल्याप्रकरणी सात तरुण कृष्णवर्णीय पुरुषांच्या गटाला मृत्युदंड देण्यात आला होता. यांमध्ये १८ वर्षीय फ्रँक हेअरस्टन जूनियर, १९ वर्षीय बुकर टी. मिलनर, ३७ वर्षीय फ्रान्सिस डीसेल्स ग्रेसन, १८ वर्षीय हॉवर्ड ली हेअरस्टन, २० वर्षीय जेम्स ल्यूथर हेअरस्टन, १९ वर्षीय जो हेन्री हॅम्पटन आणि २१ वर्षीय जॉन क्लेबॉन टेलर यांचा समावेश होता. त्यांच्यावर झालेल्या कथित आरोपानंतर त्यांना “मार्टिन्सविले सेव्हन” म्हणून ओळखले जाऊ लागले.

पण फाशीनंतर सत्तर वर्षांनी ३१ ऑगस्ट २०२१ रोजी, या सात जणांची मरणोत्तर माफी व्हर्जिनियाचे गव्हर्नर ‘राल्फ नॉर्थमन’ यांनी मान्य केली. पुरेशी योग्य प्रक्रिया न करता हा खटला चालवला गेला होता आणि त्यांना वर्णभेदाच्या आधारावर पक्षपाती मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, बलात्काराच्या कृत्यासाठी दोषी आढळल्यानंतर थेट मृत्यूदंड दिला जात होता. याच काळात सामान्यतः एका श्वेतवर्णीय महिलेवरील ब*लात्का*रासाठी मृत्युदंड दिल्या गेलेल्यांपैकी ९० टक्के कृष्णवर्णीय प्रतिवादीच होते. खरंतर अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्याचे पीडित दोन्ही बाजूंना समानच होते.

‘मृत्युदंड’ शिक्षेच्या वापरामध्ये वर्णभेदात्मक विषमता गेल्या काही वर्षांपासून दिसून आली आहे. विशेषतः गुन्हेगारी न्याय व्यवस्थेमध्ये वांशिक पक्षपातीपणाच्या वास्तविक उपस्थितीकडे निर्देश करणारे वाढते पुरावे आहेत. मृत्युदंड माहिती केंद्राचे प्रमुख सांगतात, “मृत्युदंडाची शिक्षा आमच्या गुलामगिरीच्या आणि लिंचिंगच्या तसेच विलगीकरणाच्या इतिहासाशी अतूटपणे जोडलेली आहे आणि आज जे घडत आहे ते आम्हाला योग्य प्रकारे मांडायचे होते .”

ब*लात्का*रासाठी मृत्युदंडाच्या शिक्षेचा ऐतिहासिक वापर, विशेषतः, अमेरिकेत फाशीच्या शिक्षेचे वांशिक भेदभावपूर्ण स्वरूप आणि देशातील गुलामगिरीच्या इतिहासाशी त्याचा संबंध उघड झाला आहे. डेथ पेनल्टी इन्फॉर्मेशन सेंटरनुसार (डीपीआयसी), कृष्णवर्णीय महिलेवर ह*त्या न करता ब*लात्का*र केल्याबद्दल श्वेतवर्णीय माणसाला मृत्युदंड दिल्याची युनायटेड स्टेट्समध्ये नोंद नाही. पण, श्वेतवर्णीय महिलेवरील झालेला ब*लात्का*र हा सर्व राज्यांमध्ये एक मोठा गुन्हा असल्याचे घोषित केले गेले.



यापैकी बहुतांश राज्यांमध्ये, ‘एसीएलयु/एनएएसीपी कायदेशीर संरक्षण निधी’द्वारे नमूद केल्यानुसार ‘१८१६च्या जॉर्जिया दंड संहिते’नुसार, गुलामांच्या मालकांना त्यांच्या गुलामांना लैंगिक संबंधाची सक्ती करण्याची परवानगी देण्यात आली होती. तर गुलाम असलेल्या कृष्णवर्णीय स्त्रीवर तिच्या मालकाशिवाय अन्य पुरुषाच्या हातून ब*लात्का*र होणे हा मात्र ‘मालमत्ता गुन्हा’ मानला जात होता.

विसाव्या शतकातही, ‘ब*लात्का*रासाठी न्यायालयीन मृत्युदंडाची शिक्षा वर्ण आणि गुलामगिरीचा ऐतिहासिक वारसा यांच्यातील दुवा दर्शवते’ हे अमेरिकन फेडरल सरकारने संकलित केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. १९३० ते १९७२ दरम्यान अमेरिकेत ४५५ लोकांना ब*लात्का*रासाठी मृत्युदंड देण्यात आला होता – यापैकी ८० टक्के लोक कृष्णवर्णीय होते असे या आकडेवारीवरून असे दिसून आले. 

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या घटनेत, ८ जानेवारी १९४९ रोजी ३२ वर्षीय रुबी स्ट्राऊड फ्लोयड अलीकडेच विकल्या गेलेल्या काही कपड्यांचे पैसे गोळा करत होती. रूबी व्हर्जिनियाच्या मार्टिन्सविले येथील कृष्णवर्णीयांची शेजारी होती, तिने पोलिसांना घटनेची माहिती दिली. रुबी तिच्या दोन कथित ब*लात्का*ऱ्यांना (ग्रेसन आणि हॅम्पटन) ओळखण्यास सक्षम होती परंतु बाकीच्यांना ओळखण्यात तिला समस्या येत होती. तिच्या जबाबामध्ये अनिश्चितता असूनही, इतरांना ग्रेसन आणि हॅम्पटन यांच्यासह मृत्युदंडाच्या रांगेत उभे केले गेले.

सात तरुणांच्या अटकेनंतर, समाजातील काही कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय सदस्यांच्या गटाने व्हाईट हाऊसमध्ये नियोजित मृत्युदंडाच्या विरोधात निषेध नोंदवला. गोंधळाची परिस्थिती असूनही, यासंबंधित चार संशयितांना २ फेब्रुवारी १९५१ रोजी ‘इलेक्ट्रिक चेअर’च्या साहाय्याने मृत्युदंड  देण्यात आला, तर बाकीच्यांना फक्त तीन दिवसांनी विजेचा झटका देऊन मृत्युदंड  देण्यात आला.

गेल्या वर्षी, मार्टिन्सविले सेव्हनच्या कुटुंबाने, ‘मार्टिन्सविले कॉलिशन’ची स्थापना केली. या कॉलिशनमध्ये कुटुंबातील सदस्य आणि समाजातील वकिलांचा समावेश होता. वकिलांच्या अनुपस्थितीत पुरुषांची सक्तीने चौकशी केली गेली आणि मॉ*ब लिं*चिंगच्या धमकीखाली त्यांचा कबुलीजबाब काढण्यात आला, या आधारावर मार्टिन्सविले कॉलिशन त्या सात जणांना मरणोत्तर माफी देण्यावर जोर देत होते. व्हर्जिनियाच्या इतिहासात ब*लात्कारा*साठी एकाही श्वेतवर्णीय प्रतिवादीला फाशी देण्यात आल्याची नोंद नाही हे कोर्टासाठी विचारात घेणे सुसंगत आहे असेही त्यांनी नमूद केले.

अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने ब*लात्का*राच्या आरोपाखाली दिल्या गेलेल्या  मृत्युदंडाच्या शिक्षेबाबत दिलेल्या निर्णयानुसार, ‘त्या ७ पुरुषांच्या कथित गुन्ह्याची शिक्षा “क्रू*र आणि अमा*नुष” होती’ असा निर्णय दिला. हा निर्णय व्हर्जिनियाच्या गव्हर्नर नॉर्थमने मान्य केला. तत्कालीन न्यायव्यवस्थेचा निर्णय वांशिकदृष्ट्या पक्षपाती होता हेसुद्धा त्याने मान्य केले, आणि मार्टिन्सविले कॉलिशननी वंशवादी कारणासाठी समर्पण केल्याबद्दल तसेच त्यांच्या चिकाटीबद्दल मार्टिन्सविले कॉलिशनचे आभार मानले.

सातजणांच्या मृत्युदंडाबद्दल माफी ही गव्हर्नर नॉर्थमने त्याच्या राज्यांमध्ये फाशीची शिक्षा रद्द केल्याच्या पाच महिन्यांनंतर मान्य केली. त्यामुळे फाशीची शिक्षा समाप्त करणारे व्हर्जिनिया हे पहिले दक्षिण अमेरिकी राज्य बनले. मरणोत्तर क्षमा त्या सात पुरुषांना परत आणू शकत नसले तरी, वकील आणि न्यायव्यवस्थेने नैतिकदृष्ट्या आणि वांशिक पक्षपात न करता त्यांचा विवेक वापरतात न्यायदान करावे याची निश्चिती करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकेच्या आर्थिक व्यवहाराचं केंद्र असलेल्या वॉल स्ट्रीटवर झालेल्या ह*ल्ल्याचा सूत्रधार अखेरपर्यंत सापडला नाही

Next Post

आजही ‘विलियम टेल’ची गोष्ट स्वित्झर्लंडमध्ये धैर्य आणि स्वाभिमानाचे उदाहरण आहे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

आजही 'विलियम टेल'ची गोष्ट स्वित्झर्लंडमध्ये धैर्य आणि स्वाभिमानाचे उदाहरण आहे

हा भारतीय दिग्दर्शक सुपर नॅचरल हॉलिवूड चित्रपटांचा बादशाह आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.