The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोसोवा आणि सर्बियामध्ये वाद झाला आणि त्यात युरोपची सहा मिनिटे गहाळ झाली

by Heramb
9 October 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


घड्याळ जरी अनेकांच्या हातावर असलं तरी वेळ ही कोणाच्याही हातात नसते. घड्याळात किती वाजले हे वेळेचं परिमाण आहे. आपण त्या एककामध्ये वेळेची गणना करतो. पण वेळेच्या बाबतीत परिमाण किंवा एककसुद्धा वेळेइतकंच मौल्यवान आहे. म्हणूनच आपला संपूर्ण दिवस आणि सगळी कामे घड्याळी तासांवर अवलंबून असतात. पण दोन देशांच्या संघर्षामध्ये कधी हे तास किंवा वेळच कमी झाल्याचे तुम्ही ऐकले आहे का?

युरोपातील कोसोवो आणि सर्बियाच्या बाबतीत ते घडले आणि जानेवारी २०१८ च्या मध्यावर सर्व युरोपियन इलेक्ट्रिक घड्याळांवर सहा मिनिटं चक्क “हरवली”! ही कोणतीही अतिशयोक्ती किंवा कल्पना नाही तर वास्तव आहे. एंटोसद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका प्रेसनोटनुसार, २५ युरोपियन देशांमधील इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन ऑपरेटर्सचे प्रतिनिधित्व करणारे असोसिएशन, इलेक्ट्रिक घड्याळे, सेंट्रल हीटिंग टाइमर तसेच इलेक्ट्रिकल उपकरणांवरील घड्याळे कोसोवो-सर्बिया संघर्षामुळे मंदावली होती. याच गोष्टीचा परिणाम युरोपच्या संपूर्ण इलेक्ट्रिक ग्रिडवर झाला होता.

स्पेन ते तुर्की आणि पोलंड ते नेदरलँड पर्यंतचे देश हे एकाच आणि फ्रिक्वेन्सीमध्ये कार्यरत असलेल्या, वीज नेटवर्कशी जोडलेल्या युरोपच्या मोठ्या क्षेत्राचा भाग आहेत. हीच फ्रिक्वेन्सी काही उपकरणे आणि वस्तूंवरील वेळ नियंत्रित करते. उदाहरणार्थ, इलेक्ट्रिक घड्याळे, सेंट्रल हीटिंग टाइमर आणि इलेक्ट्रिकल उपकरणांवरील घड्याळे.

या संघर्षाच्या आणि संकटाच्या वेळी, कोसोवोने विद्युत गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी वीज तयार केली नाही आणि एंटोसच्या मते, हे युरोपियन विद्युत नेटवर्क स्थिर ठेवण्यासाठी सर्बिया कोसोवोच्या विनंतीला प्रतिसाद देण्यास बांधील होते. पण, वीज निर्मितीच्या बाबतीत महत्त्वाच्या या दोन्ही देशांनी या मुद्द्यावर असहमती दर्शविली आणि सर्बियाने आवश्यक वीज निर्मिती केली नाही. यामुळे हे दोन्ही देश फ्रिक्वेंसी कमी होण्यास कारणीभूत ठरले. त्यामुळेच युरोपियन इलेक्ट्रिक ग्रिड कार्यरत असलेल्या ५० हर्ट्झ सायकलमध्ये व्यत्यय आला.

याचाच परिणाम युरोपातील इलेक्ट्रिक घड्याळांवर झाला आणि म्हणूनच वेळेवरही झाला. घड्याळांची गती कमी झाली आणि युरोपियन लोकांची सहा मिनिटे “हरवली”! शेवटी ६ मार्च २०१८ रोजी कोसोवोने आवश्यक ऊर्जा निर्माण केली तेव्हा ही गंभीर समस्या सुटली. युरोपीय लोकांच्या सुदैवाने या गोष्टीचा संगणक, स्मार्टफोन आणि इंटरनेटवर काही परिणाम झाला नाही.



आजच्या जगात समोरासमोरच्या यु*द्धाबरोबरच व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संसाधने यांच्यावर आधारित अप्रत्यक्ष यु*द्ध लढले जात आहे. यालाच ‘हायब्रीड वॉ*रफेअर’ असेही म्हणतात. हायब्रीड वॉ*रफेअर हा लष्करी रणनीतीचा एक सिद्धांत आहे. सर्वप्रथम फ्रँक हॉफमन यांनी हा सिद्धांत प्रस्तावित केला होता.

हायब्रीड वॉ*रफेअरमध्ये सायबर वॉ*रफेअर, मुत्सद्देगिरी, कायदा, देशांतर्गत निवडणुकांमध्ये परदेशी हस्तक्षेप या सर्वांचा मिश्र समावेश असतो. यु*द्धाच्या स्वरूपामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत, पारंपारिक सशस्त्र संघर्षापेक्षा धोरणात्मक शेवट करण्यासाठी अधिक पर्याय आहेत यालाच काही तज्ञ ग्रे-झोन रणनीती असेही म्हणतात.

ही संकल्पना बऱ्यापैकी नवीन असली तरी त्याचे परिणाम आज बऱ्याचदा अनेक बातम्यांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये असतात. पाकिस्तानने भारतावरही हे यु*द्ध लादलेले आपल्याला दिसून येईल. यात चुकीची माहिती, आर्थिक फेरफार, प्रॉक्सी यो*द्धे (दह*शतवादी आणि फुटी*रतावादी), बंडखोरीचा वापर, मुत्सद्दी दबाव आणि अंशतः लष्करी कारवाई यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

या प्रकारची लढाई अफाट लष्करी क्षमता असलेले नॉन-स्टेट ॲक्टर्सच्या मदतीने लढली जाते. नॉन स्टेट ॲक्टर्स म्हणजेच जे लोक अनौपचारिक रीतीने एखाद्या प्रदेशाची किंवा देशाची सत्ता सांभाळत असतात. उदाहरणार्थ, २००६ च्या इस्रायल-लेबेनॉन यु*द्धात, हिजबुल्लाहने इस्रायलच्या विरोधात अनेक युक्त्या वापरल्या. त्यात गनिमी कावा, तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर यांचा समावेश होता. तसेच पाकिस्तान गेली काही वर्षे भारतात कट्ट*रतावाद, धार्मिक हिं*सा आणि चुकीची माहिती यांद्वारे अस्थिरता आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

यु*द्धाच्या अशा परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा हा केवळ केंद्र सरकारचा किंवा सैन्याचा अथवा तीन दलांचा प्रश्न राहत नाही. तर देशाचा प्रत्येक नागरिक हा एक सैनिकासारखा असतो. कारण एखाद्या नागरिकाने चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून काही कुकृत्य केल्यास संपूर्ण देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आजमितीस आपल्या सर्वांनाच माहितीच्या अधिकृत आणि प्रामुख्याने सरकारी स्रोतांवर विश्वास ठेवायला हवा. अन्यथा या हायब्रीड वॉ*रफेअरला बळी पडण्यास जास्त वेळ लागणार नाही.

संदर्भ-

European clocks lose six minutes after dispute saps power from electricity grid | Europe | The Guardian


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

पेशाने शेतकरी असलेला ‘सिमो’ देशासाठी स्नाय*पर बनला आणि ५५० शत्रूंचा खा*त्मा केला

Next Post

एकेकाळी खेळाचे पत्ते छापणारी कंपनी आज ६५हुन अधिक देशांच्या नोटा छापतेय

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

एकेकाळी खेळाचे पत्ते छापणारी कंपनी आज ६५हुन अधिक देशांच्या नोटा छापतेय

जगातला सर्वात मोठा तोतया, ज्याने नौदलात सर्जन म्हणून काम केलं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.