The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्वांना छळणारा गणितातला X नेमका कुठून आला..?

by Heramb
6 October 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


गणित आणि भौतिकशास्त्रामध्ये स्वारस्य असणाऱ्या अनेकांना ‘x’ चांगलाच परिचयाचा असेल. अनेक परीक्षांमध्ये गणितातल्या विशेषतः कॅल्क्युलसमधल्या या ‘x’ ने अनेकांची वाट लावली. आधुनिक भाषेत म्हणायचं झालं तर तुमचा किंवा तुमची एक्स काही काळाने तुम्हाला सोडून जाते. पण गणित आणि इतर गणितीय विषयांमधील हा ‘x’ मात्र आयुष्यभर आपली साथ देतो. कोणाला धोका देतो तर कोणाला या गणिताच्या आणि भौतिकशास्त्राच्या अथांग भवसागरातून सुखरूपपणे बाहेर काढतो. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा हा एक भागच होऊन बसला आहे.

गणिताचा विद्यार्थी या नात्याने सर्वांनाच वैतागून का होईना पण एकदा तरी सव्वीस इंग्रजी अद्याक्षरांपैकी ‘x’ हेच अद्याक्षर गणितातील काही अज्ञात गोष्टींसाठी का वापरण्यात येते हा विचार नक्कीच केला असेल. गणितातच नाही तर मिस्टर एक्स, एक्स-फाईल्स, एक्स-रे, प्रोजेक्ट एक्स, एक्स स्पॉट, बीजगणितामध्ये “एक्सची किंमत सांगा”, ‘लेट इट बी ‘x”, इत्यादी. ‘x’ अक्षर नेहमीच अज्ञात गोष्टींचे प्रतीक राहिले आहे आणि बर्‍याचदा ते गूढतेने व्यापलेले असते. पण असं का हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

याचे उत्तर अतिशय मनोरंजकरित्या एका ‘टेड-एक्स’ भाषणात न्यूयॉर्क मधील रेडियस फाउंडेशनच्या संचालकांनी, टेरी मूर यांनी २००६ साली दिले. त्यांना हे उत्तर अरबी भाषा शिकताना मिळाले होते. विशेष बाब म्हणजे, ‘x’ हे अक्षर अज्ञात गोष्टींसाठी वापरले जाते, कारण स्पॅनिश लोक “sh” म्हणू शकत नाही.

अकराव्या शतकात जेव्हा अरबी ग्रंथ स्पेनमधून युरोपमध्ये पोहोचले, तेव्हा स्पॅनिश लोक या वेगळ्या लिपींमध्ये सापडलेल्या ज्ञानाने प्रभावित झाले आणि त्यांना हे ग्रंथ तसेच्या तसे स्पॅनिशमध्ये भाषांतरित करून घ्यायचे होते. पण एक मोठी अडचण होती, ती म्हणजे, अरबी भाषेतील काही ध्वनी फक्त युरोपियन वर्णांद्वारे दर्शविल्या जात नाहीत.

या वर्णांपैकी एक अरबी अक्षर “शीन” होते. या अक्षराचा ध्वनी ‘sh’ असा आहे. ‘शीन’ हे “श्युन” या अरेबिक शब्दाचे अगदी पहिले अक्षर आहे. याचाच अर्थ “काहीतरी अपरिभाषित” किंवा “अज्ञात” असा आहे. स्पॅनिश त्यांच्या स्वतःच्या भाषेत हे प्रस्तुत करू शकत नाही कारण स्पॅनिशमध्ये ‘sh’ नाही. म्हणून, त्यांनी ग्रीक “Κ” या अक्षराचा वापर केला.

पण, जेव्हा ही सामग्री नंतर लॅटिनमध्ये भाषांतरित केली गेली, तेव्हा ग्रीक अक्षर “Κ” ची जागा फक्त लॅटिन अक्षर ‘x’  ने घेतली. ज्यावेळी हा अनुवाद झाला तेव्हाच ६०० पेक्षा जास्त वर्षांपासून गणिताच्या पाठ्यपुस्तकांचा “x” हा आधार बनला, तेव्हा “x” हे अक्षर अज्ञात म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणूनच, आजही, “X” अक्षर गणितात आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टीचे प्रतीक आहे.



आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या बालकलाकाराला त्याच्या आईनेच करोडो डॉलर्सचा चुना लावला होता..!

Next Post

सिग्मंड फ्रॉईडच्या उल्लेखाशिवाय मानसशास्त्र हा विषयच अधुरा आहे..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

सिग्मंड फ्रॉईडच्या उल्लेखाशिवाय मानसशास्त्र हा विषयच अधुरा आहे..!

आपल्या नागरिकांना दुसऱ्या देशाबाहेर काढण्यासाठी केलेलं हे सगळ्यात मोठं मिलिटरी ऑपरेशन होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.