The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकेकाळी कैद्यांना छळण्यासाठी बनवलेल्या ‘ट्रेडमील’ आता वजन कमी करण्यासाठी वापरल्या जातात

by द पोस्टमन टीम
14 October 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सुरक्षित प्रकारे वजन कमी करणं आणि वाढवणं या दोन्हीही गोष्टी सोप्या नाहीत. त्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात! नियमित व्यायाम आणि योग्य आहाराची आवश्यकता असते. व्यायामासाठी बहुतांशी लोक जीममध्ये जातात. जीम म्हटलं की, पहिलं डोळ्यासमोर येतं ते ट्रेडमिल. कित्येकजण या ट्रेडमिलवर तासन् तास घाम गाळतात. ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी तर स्वत:चं ट्रेडमिल विकत घेऊन घरी सेट केलेलेही दिसतं.

कोट्यवधी लोकांच्या व्यायामाचा अविभाज्य भाग असलेल्या ट्रेडमिललासुद्धा एक स्वतंत्र इतिहास आहे. साधारण दोनशे वर्षांपूर्वी इंग्लंडमधील तुरुंगांसाठी एक पुनर्वसन यंत्र म्हणून ट्रेडमिलचा शोध लावण्यात आला होता. तुरुंगातील कैद्यांना कष्ट देण्यासाठी त्याच्या वापर केला जात असे! चला तर जाणून घेऊया ट्रेडमिलच्या शोधाची गोष्ट..

मिलराइट्सच्या  (औद्योगिक यंत्र हाताळणारा) कुटुंबात वाढलेल्या विल्यम क्यूबिटनं १८१८ साली पहिलं ट्रेडमिल तयार केलं. क्यूबिट व्यवसायानं एक सिव्हिल इंजिनिअर होता. ट्रेडमिलला सुरुवातीच्या काळात ‘ट्रेडव्हील’ असंही म्हटलं जात होतं. हाच क्यूबिट नंतर १८५१ साली लंडनमधील क्रिस्टल पॅलेसच्या बांधकामासाठी प्रसिद्ध झाला.

राणी व्हिक्टोरियानं त्याला ‘नाइट’किताब दिला होता. क्यूबिटच्या या रचनेत सुरुवातीच्या काळात अनेक रूपं घेतली. लंडनच्या ब्रिक्सटन कारागृहात लावण्यात आलेलं ‘ट्रेडमिल’ सर्वांत जास्त लोकप्रिय झालं होतं. त्यात एक मोठं चाक होतं. त्या चाकावर तयार केलेल्या पायरीवर कैद्यांनी पाय ठेवले की ती सरकून पायाखाली दुसरी पायरी येत असे. ही ट्रेडमिल एकाच वेळी तब्बल २४ कैद्यांना व्यस्त ठेवू शकत होती. कैद्यांना शारिरिक कष्ट देण्यासाठी या ट्रेडमिलचा वापर होत असे. उन्हाळ्याच्या दिवसात १० तास आणि हिवाळ्यात ७ तास कैदी ट्रेडमिलवर घाम गाळायचे.

अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांनी त्यांच्या कारागृहांमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली होती. इतिहासकार यू.आर.क्यू. हेनरिक्सन लिहिलेल्या ‘द राईज अँड डिक्लाइन ऑफ द सेपरेट सिस्टीम ऑफ प्रिझन डिसिप्लीन’ या लेखानुसार, कारागृहांमध्ये पूर्वी कैद्यांना काहीही सुविधा दिल्या जात नव्हत्या. त्यांच्यासाठी अन्न आणि अंथरूण देखील त्यांचे कुटुंबिय पुरवायचे. त्यानंतर कारागृहांनी कैद्यांना दोन वेळचं जेवण आणि इतर काही गरजा पुरवण्यास सुरुवात केली.



मात्र, यामुळं फक्त मोफत जेवण मिळवण्यासाठी अनेक गरीब लोक गुन्हे करत असल्याचं लक्षात आलं. त्यामुळं कैद्यांना काहीतरी शारीरीक श्रम देण्याची गरज निर्माण झाली होती. अशा वेळी ट्रेडमिलचा शोध लागला आणि तुरुंगात ते लावण्यात आलं. त्यावर चालण्याचं काम अनेक तास कैद्यांना दिलं गेलं.

ही गोष्ट मानसिक आणि शारीरिक थकवा देणारी होती. कैद्यांचा छळ करणारं यंत्र, अशी ट्रेडमिलची ओळख झाली होती. नंतर मात्र, इतर कामांसाठी देखील त्याचा वापर होऊ शकतो हे लक्षात आलं. कॉर्न दळण्यासाठी आणि विहिरीतील पाणी काढण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला.

इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडमधील २०० पैकी १०९ तुरुंगांमध्ये ट्रेडमिलचा वापर केला जात होता. असभ्य वागणुकीसाठी तुरुंगवास भोगलेल्या ‘ऑस्कर वाइल्ड’सारख्या लोकांनी देखील या ट्रेडमिलवर शारीरीक श्रम केले होते. दरम्यान, अनेक डॉक्टरांनी ट्रेडमिलवरील श्रम सुरक्षित नसल्याचं सांगण्यास सुरुवात केली. १८८५ साली ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये ‘डेथ ऑन द ट्रेडमिल’ असा एक लेख प्रसिद्ध करण्यात आला होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

त्या लेखानुसार, हृदयरोग असलेल्या ज्या कैद्यांना ट्रेडमिलची शिक्षा देण्यात आली त्यांचा मृत्यूदर जास्त होता. आठवड्यातून किमान एक तरी मृत्यू होत असल्याचा निष्कर्ष या लेखात काढण्यात आला होता. श्रम आणि पुनर्वसनाच्या नावाखाली कैद्यांचा अशा प्रकारे शारीरीक व मानसिक छळ करणं चुकीचं आहे. कैद्यांना अशा एखाद्या उपकरणाच्या अधीन ठेवणं अमानुष आहे. त्यामुळं ट्रेडमिलच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. १८९५ पर्यंत, सगळ्या ब्रिटनमध्ये फक्त ३९ तुरुंगांत ट्रेडमिल वापरात होते. हळूहळू या संख्येत आणखी घट झाली.

ब्रिटनमध्ये ट्रेडमिलचा वापर क्रू*र आणि निरर्थक असल्याचं सिद्ध झालं व त्याठिकाणी त्याचा वापर देखील बंद झाला. परंतु, अमेरिकेवर याचा काहीही परिणाम झाला नाही. अमेरिकेत ट्रेडमिलची आयात थांबली नाही. त्याठिकाणी १८२२ साली ट्रेडमिलचा प्रवेश झाला होता. सुरुवातीला अमेरिकेतील चार कारागृहांमध्ये त्याची उभारणी करण्यात आली होती. न्यूयॉर्क शहरातील ‘ईस्ट 26’ रस्त्यावर असलेल्या तुरुंगात ट्रेडमिल लावण्यासाठी त्यावेळी ३ हजार ५० डॉलर्सचा खर्च आला होता.

त्यावर एकाच वेळी १६ कैदी व्यस्त राहत होते. १८२७ पर्यंत, न्यूगेट, चार्ल्सटन आणि फिलाडेल्फियामधील तुरुंगात ट्रेडमिल लावले गेले. ट्रेडमिलवर कैद्यांकडून मका दळून घेतली जाई. मात्र, हळूहळू मका दळून घेण्यात कैद्यांचा वापर करणं म्हणजे त्यांच्या श्रम वाया घालवण्यासारखं असल्याचं लक्षात आलं.

मका तर गिरणीला जुंपलेली जनावरं देखील दळू शकतात. अमेरिकेत कामगारांची कमी असताना कैद्यांचा वापर इतर कामात केला तर जास्त फायद्याचं ठरेल, या मागणीनं जोर धरला. त्यानंतर तुरुंगातील ट्रेडमिलचा वापर बंद करून कैद्यांकडून चपला, कपडे, फर्निचर यांसारख्या गोष्टी तयार करून घेण्यावर भर देण्यात आला.

सुरुवातीला फक्त एक छळवणुकीचं साधन ठरलेल्या ट्रेडमिलमध्ये अनेक बदल झाले. व्यायामासाठी त्याचा उत्तम प्रकारे वापर करता येऊ शकतो ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याच्या वापराला प्रोत्साहन मिळालं. आज जगाच्या पाठीवर अशी एकही जीम आढळणार नाही ज्याठिकाणी ट्रेडमिल नाही. ट्रेडमिलवर चालल्यामुळं श्वासोच्छवासाची गती आणि हृदयाचे ठोके वाढतात.

यामुळं हानी पोहचू नये यासाठी मार्केटमधील बहुतेक फिटनेस ट्रेडमिलमध्ये आता ‘कार्डिओ मोड’ दिला जातो. त्यामुळं हृदयाची गती निर्धारित राहते. व्यक्तीच्या हृदयाची गती वाढली की ट्रेडमिलचा वेग आपोआप  नियंत्रित होतो. सध्या ट्रेडमिलची मोठ्या मार्जिननं विक्री होत आहे. व्यायामाच्या उपकरणांपैकी सर्वात जास्त विक्री होणाऱ्या यंत्रांमध्ये त्याचा समावेश होतो. परिणामी, जगभरात ट्रेडमिलचे शेकडो उत्पादक निर्माण झाले आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

१४ वर्षाचा हा मुलगा मिनी ‘ब्रूस ली’ म्हणून जगभर फेमस झालाय

Next Post

आपण पुरुष असल्याचं भासवून या महिलेने व्हॅटिकनच्या पोपची गादी सांभाळली होती

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

आपण पुरुष असल्याचं भासवून या महिलेने व्हॅटिकनच्या पोपची गादी सांभाळली होती

डॉक्टर होता आलं नाही म्हणून सँडविच विकायला चालू केले, आणि तिथेच सबवेची सुरुवात झाली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.