The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एलिअन्सच नाही तर अमेरिकेने झॉम्बीशी लढण्याची तयारीसुद्धा पूर्ण केलीये..!

by Heramb
21 October 2025
in विश्लेषण, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भूत-प्रेत, पिशाच्चसारख्या गोष्टी जगाच्या विविध भागात असतात. अशा प्रकारच्या गोष्टींचे स्वरूप बदलत असते, पण त्यांच्यामागे एकच कुतूहल असतं आणि ते म्हणजे ‘मृत्युपलीकडील जीवन’. काही ठिकाणी तत्त्वज्ञानाचा एखादा सिद्धांत समजावण्यासाठी भूत-प्रेत आदींचा उल्लेख होतो, काही ठिकाणी निव्वळ लोकांना घाबरवण्यासाठी आणि बहुतेकदा मनोरंजनासाठी अशा गोष्टींचा उपयोग केला जातो. झॉम्बी हे अशाच गोष्टींपैकी एक.

अमेरिकेकडे पृथ्वीवरील सर्वांत मोठ्या सैन्यांपैकी एक सैन्य असेलही, पण अगदी पेंटागॉननेही पृथ्वीवरील कोणत्याही शत्रूला सामोरे जाऊन त्यांचा पराभव करण्याइतपत तयारी ठरवली आहे. २०११ साली अमेरिकेच्या संरक्षण विभागाने संभाव्य झॉम्बी अपोकॅलिप्स अर्थात ‘झॉम्बी प्रलया’चा सामना करण्यासाठी एक धोरण जाहीर केले. सध्याच्या काळात जरी हे शत्रू काल्पनिक असले तरी अमेरिकन सैन्याने मात्र त्यांचा गांभीर्याने विचार केला आहे. खरं तर, झॉम्बी-प्रतिबंधक योजनेच्या डॉक्युमेंटची पहिली ओळ “ही योजना विनोद म्हणून तयार केली नाही.” अशी आहे.

या योजनेची सुरुवात २००९ आणि २०१० साली आयोजित सैन्य प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये झाली. या कार्यक्रमादरम्यान जॉईन्ट ऑपेरेशनल प्लॅनिन्ग अँड एक्झेक्युशन सिस्टीममध्ये सहभागी तरुण सैन्यअधिकाऱ्यांना काल्पनिक पण संभाव्य झॉम्बी ह*ल्ल्याचा सामना करण्यासाठी काहीच तयारी नव्हती.

अफगाणिस्तान आणि नायजेरियासारख्या वास्तविक शत्रूंपेक्षा बनावट झॉम्बींशी यु*द्धाचे गांभीर्य कितपत असू शकेल? पण तरीही सरकारने या गोष्टीला गांभीर्याने घेतले आणि झॉम्बींशी लढा देण्याच्या कल्पनेने नवोदितांना सर्जनशील रणनीती आखायला प्रवृत्त केले.

पँटागॉनने सांगितल्याप्रमाणे, झॉम्बींशी यु*द्धाची त्यांची ही योजना सहजरित्या लोकांना उपलब्ध व्हावी हा त्यांचा हेतू होता, जेणेकरून योजनाकारांना ही योजना वेळोवेळी अपडेट करता येईल, या अपग्रेडेशन प्रोसेसमध्ये काही अनकन्व्हेन्शल गोष्टींचा (नेहमी पेक्षा काही वेगळे) देखील समावेश होऊ शकतो. 



झॉम्बींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याप्रकारचे सिनेमे आणि सिरियल्स प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत.  झॉम्बीची पहिली कथा सतराव्या शतकातील आहे. या कथेत झॉम्बी म्हणजे आफ्रिकन गुलाम मानले जात असत. १९६८ च्या ‘द नाईट ऑफ द लिविंग डेड’ या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे भयानक अफवा उठल्याच होत्या.

तर अमेरिकी सैन्याने झॉम्बीविरुद्ध तयार केलेल्या या योजनेचे नाव होते ‘कॉंप्लान ८८८८-११’. या योजनेत एकूण तीन भाग होते. पहिला भाग म्हणजे मानवजातीला अशा प्रकारच्या भक्षकांपासून वाचवण्यासाठी योजना तयार करणे. दुसरा भाग म्हणजे झॉम्बींपासून असलेला संभाव्य धोका नष्ट करण्यासाठी विशिष्ट कार्यपद्धतीचे पालन केले जावे. तिसरा म्हणजेच शेवटचा पण तितकाच महत्वाचा भाग म्हणजे यु*द्धग्रस्त ठिकाणी उध्वस्त झालेली अर्थव्यवस्था तसेच कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करणे.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

झॉम्बींचे प्रामुख्याने आठ प्रकार आहेत, या प्रकारांमध्ये हवेतील जीवाणू आणि रोगजनकांच्या माध्यमातून निर्माण होणारे झॉम्बीज् आणि गूढ, अज्ञात स्त्रोतांनी तयार केलेल्या झॉम्बीज् पासून ते शाकाहारी झॉम्बींपर्यंत आहेत, शाकाहारी झॉम्बी म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर भस्म्या झालेला झॉम्बी. होय. त्यांना न संपणारी भूक असते, आणि ती भागवण्यासाठी ते शाकाहारी पदार्थ खातात. या आठ प्रकारांपैकी आतापर्यंत झॉम्बींचा केवळ एकच वर्ग प्रत्यक्षात अस्तित्वात आहे असे मानले जाते.

“चिकन झॉम्बी”चा संभाव्य धोका कॅलिफोर्नियाच्या पेटलुमा येथे २००६च्या एका घटनेने उद्भवला. एका पोल्ट्री मालकाने कार्बन मोनॉक्साईडचा वापर करून कुक्कुटपालन करण्याचा प्रयत्न केला पण या प्रयत्नात त्यांच्या सगळ्या कोंबड्यांना भूतबाधेसमान रोगझाल्याचे सांगितले जाते. कोंबड्या त्या पोल्ट्रीमालकाच्या बहिणीच्या मृतदेहाभोवती अगदी आपला जीव जाईपर्यंत विचित्र पद्धतीने फिरत होत्या.

कॉंप्लान ८८८८-११ या प्लॅनमध्ये झॉम्बीवर ह*ल्ला केला तर काय परिणाम होतील या आशयाची एक यादी आहे.हा प्लॅन खरंच कायदेशीररित्या वैध आहे का हे तपासण्यासाठी यावर संशोधन झाले. पण अमेरिकेतील आणि कोणत्याही इतर राष्ट्रात मानव किंवा वन्य जीवांवर हल्ले करता येण्याजोगेच कायदे आहेत. एखाद्या रोगाने ग्रासलेल्या माणसावर किंवा प्राण्यावर हल्ला करण्यास कोणताही कायदा संमती देत नाही. पण हा प्लॅन अस्तित्वात आहे हे नक्की.

‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’नेही ‘द वॉकिंग डेड’ आणि अशाच इतर झॉम्बींशी संबंधित कार्यक्रम जवळ जवळ संपुष्टात आणले आहेत. एखादी आपत्ती आल्यास काय करावे किंवा काय करू नये याबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी झॉम्बीपासून रक्षणाची ही योजना अमेरिकेने आणली असेही सांगितले जाते.

यातून आपल्याला शिकण्यासारखं काय? 

अस्तित्वात नसलेल्या एखाद्या शत्रूचा सामना कसा करावा याची चर्चा, संशोधन, इत्यादी जर या देशात चालले असेल, तर प्रत्यक्ष शत्रूचा सामना कसा करावा याची तयारी अमेरिकेने कित्येक मोठ्या पटीने केली असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. किंबहुना, आपले शत्रूच तयार होऊ नयेत अशाच योजनांची अंमलबजावणी करताना अमेरिका दिसत आहे.

यु*द्ध कोणतंही असो, रशियाविरुद्ध असो, वा अरबांविरुद्ध, अमेरिका कधीही प्रत्यक्षात आपल्या भूमीवर लढत नाही. यु*द्धभूमी म्हणून कधी युक्रेनचा वापर होतो, कधी इस्रायलचा तर कधी अफगाणिस्तान-पाकिस्तानचा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

व्हियेतनामच्या ‘माय लाई’ ह*त्याकांडाचे डाग आजही अमेरिकेच्या ‘महासत्ता’ या प्रतिमेवर आहेत

Next Post

या दंगलीत अर्ध्या कॉन्स्टॅन्टिनोपलची राख झाली आणि १० हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला होता

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

या दंगलीत अर्ध्या कॉन्स्टॅन्टिनोपलची राख झाली आणि १० हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला होता

जर्मनीने १९१६ साली केलेल्या ह*ल्ल्याची भरपाई अमेरिकेने १९७९ मध्ये व्याजासकट वसूल केली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.