The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जॉन हावर्डच्या पुतळ्याच्या डाव्या पायावर बोट घासून आशिर्वाद घेतल्यानं ‘गुडलक’ मिळतं

by द पोस्टमन टीम
25 September 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


१६३६ साली ‘हार्वर्ड कॉलेज’ म्हणून स्थापन झालेली हार्वर्ड ही युनायटेड स्टेट्समधील उच्च शिक्षणाची अतिशय जुनी संस्था आहे. जगातील सर्वांत प्रतिष्ठित शिक्षणसंस्थांमध्ये हार्वर्डचा समावेश होतो. मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये कमालीची सुव्यवस्था आढळते. भव्य इमारतींपासून ते विडेनर लायब्ररीच्या भव्य खांबांच्या प्रत्येक विटेमध्ये परंपरा आणि सभ्यतेची भावना भरलेली दिसते.

विविध सोयीसुविधा आणि हजारो झाडांनी परिपूर्ण असलेल्या विद्यापीठ परिसरात जगभरातून आलेले विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. यासर्व गोष्टींशिवाय विद्यापीठाचा परिसर आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. त्या गोष्टीबाबत अनेक मिथकं, वाद आणि अफवा पसरलेल्या आहेत. हावर्डमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी आणि पर्यटक या गोष्टीला न चुकता भेट देतोच. लोकांच्या कुतुहलाचा विषय असलेली ही गोष्ट म्हणजे विद्यापीठाचे संस्थापक असलेल्या जॉन हार्वर्ड यांचा पुतळा !

डॅनियल चेस्टर फ्रेंच यानं तयार केलेला जॉन हार्वर्ड यांचा पुतळा हे एक कांस्य शिल्प आहे. या पुतळ्याच्या पायथ्याशी दगडावर ‘जॉन हार्वर्ड’ हे नाव लिहिलेलं असलं तरी तो पुतळा प्रत्यक्षात जॉन हार्वर्ड सारखा दिसणारा नाही. कारण जॉन हार्वर्ड कसा दिसत होता याचा पुरवाच उपलब्ध नाही.

१८८४ साली, डॅनियल चेस्टर फ्रेंचला हा पुतळा तयार करण्याचं काम देण्यात आलं. त्यानं शर्मन होअर या व्यक्तीला जॉन हार्वर्डच्या पुतळ्याचं मॉडेल म्हणून बसवलं. हेचं होअर नंतर काँग्रेसचे सदस्य आणि यूएस डिस्ट्रिक्ट ॲटर्नी झाले. पुतळ्याच्या शिलालेखावर ‘जॉन हार्वर्ड, फाउंडर’ असं कोरलेलं आहे. त्याबाबतही वाद आहे.

जॉन हार्वर्डला सन्माननीय संस्थापकाचा दर्जा देण्यात आलेला आहे. मात्र, जॉन खरंच संस्थापक होता का? असा देखील प्रश्न अनेकजण उपस्थित करतात. हार्वर्डच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, विद्यापीठाची स्थापना हे एका व्यक्तीचं काम नसून अनेकांनी त्याला हातभार लावला होता. मात्र, जॉन हार्वर्ड यांनी दिलेले योगदान मोठं आहे त्यामुळं त्यांना संस्थापक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.



२७ जून १८८३ रोजी, हार्वर्डच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा भरला होता. त्यावेळी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी विद्यार्थी असलेल्या जनरल सॅम्युएल जेम्स ब्रिज यांनी हार्वर्ड यांचा पुतळा तयार करण्याची घोषणा केली होती. त्याला सर्वांनी सहमती दर्शवली आणि सप्टेंबर महिन्यात पुतळ्याचं काम सुरू झालं. पुतळ्यासाठी शर्मन होअर या विद्यार्थ्याची मॉडेल म्हणून निवड करण्यात आली.

शर्मन होअर हार्वर्डचे चौथे अध्यक्ष लिओनार्ड होअर यांचा भाऊ होता आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्याचं घोषणापत्र व राज्यघटनेवर स्वाक्षरी करणाऱ्या रॉजर शेरमन यांच्या वंशजातून आलेला होता. हावर्डचा पुतळा तयार करण्यासाठी हेन्री-बोनार्ड कंपनीनं कांस्य धातू पुरवला. त्यासाठी २० हजार डॉलर्स खर्च आला होता. (तेव्हाच्या २० हजार डॉलरचं मुल्य आता ६० हजार डॉलर्स इतकं होतं) शिल्पकार डॅनियल चेस्टर फ्रेंचनं हा पुतळा पूर्ण केल्यानंतर विद्यापीठाच्या वतीनं त्याचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

हार्वर्डचा पुतळा हा काही एका दिवसात नष्ट होणारी गोष्ट नव्हती. कितीतरी वर्षे किंवा कदाचित कितीतरी शतके टिकणारी गोष्ट होती. त्यामुळं ती तयार करताना प्रचंड दबाव आल्याचं फ्रेंचनं सांगितलं होतं. याच फ्रेंचनं ३०वर्षांनंतर लिंकन मेमोरियलसाठी अब्राहम लिंकन यांचा पुतळा तयार केला होता.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

१५ ऑक्टोबर, १८८४ रोजी या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. जॉन हावर्डचा हा पुतळा सिटी ब्लॉकवरील मेमोरियल हॉलच्या पश्चिम टोकाला बसवला होता. खुर्चीवर बसलेले जॉन आकाशाकडं उत्सुकतेनं पाहत असल्याचा भास होत असे. १९२० मध्ये शिल्पकार फ्रेंचनं हार्वर्डचे अध्यक्ष ॲबॉट लॉरेन्स लोवेल यांना एक पत्र लिहिलं. हा पुतळा मेमोरियल हॉलच्या परिसरातून स्थलांतरित करण्याची इच्छा फ्रेंचनं व्यक्त केली. १९२४ मध्ये हा पुतळा मेमोरियल हॉलपासून हार्वर्ड यार्डमधील युनिव्हर्सिटी हॉलच्या पश्चिम बाजूला, मॅसॅच्युसेट्स हॉल आणि जॉन्स्टन गेटकडे तोंड करून बसवण्यात आला. सध्या याच जागेवर हा पुतळा आहे.

विद्यापिठातील विद्यार्थी प्रत्येक परिक्षेच्या अगोदर जॉन हार्वर्डच्या पुतळ्याच्या डाव्या पायावर बोट घासून आशिर्वाद घेतात. असं केल्यानं ‘गुडलक’ मिळतं, असा विश्वास विद्यार्थ्यांना आहे. जेव्हापासून हा पुतळा बसवण्यात आला आहे, तेव्हापासून ही परंपरा विद्यार्थ्यांनी सुरू करून आजतागायत जपली आहे.

१९९०च्या दरम्यान टुर गाईड्सनी पर्यटकांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि तेव्हापासून विद्यापीठ पाहण्यासाठी येणारी प्रत्येक व्यक्ती हार्वर्डच्या पायाला हात लावल्याशिवाय कॅम्पसमधून बाहेर पडत नाही. याच कारणामुळं संपूर्ण पुतळा काळ्या रंगात असताना त्याच्या डाव्या पायाचा अंगठा मात्र तेजानं चमकत असल्यासारखा दिसतो!

दरवर्षी पदवीदान समारंभासाठी जाताना विद्यार्थ्यांची रांग जेव्हा या पुतळ्याच्या समोरून जाते तेव्हा ते जॉन हार्वर्डचा सन्मान म्हणून जरावेळासाठी आपल्या डोक्यातील टोप्या काढून हातात घेतात. युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिसनं १९८६ मध्ये छापलेल्या जॉन हार्वर्ड स्टॅम्पवर हा पुतळा वापरण्यात आला आहे.

जॉन हार्वर्डचा पुतळा त्याच्या अनावरणापासूनच विविध कारणांमुळं चर्चेत राहिलेला आहे. १८८४ मध्ये काही व्यक्तींनी जॉन हार्वर्डच्या पुतळ्याला रात्री डांबर लावलं होतं आणि प्रवेशद्वारावरील भिंतीवर मोठ्या अक्षरात ‘८७’ असा आकडा लिहिण्यात आला होता. १८९०मध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांनी दारू पिऊन पुतळ्यावर लाल रंग टाकला होता.

पुतळ्याच्या पायथ्याजवळ काही पावलांचे ठसे देखील सापडले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन डिटेक्टिव देखील नेमण्यात आले होते. त्यांच्या मते हे ठसे कुत्र्यांच्या पायाचे होते. कारण त्यावेळी विद्यापीठात अनेक विद्यार्थ्यांकडे कुत्री होती. मात्र, हार्वर्डला मानणाऱ्या विद्यार्थ्यांचं या गोष्टीमुळं समाधान झालं नव्हत. त्यांच्या मते काही खोडकर टाळक्यांनीच पायाच्या चवड्यांवर चालत हे ठसे उमटवले होते. पुढे हा प्रताप दारूड्या विद्यार्थ्यांचा असल्याचं समोर आलं होतं.

सध्या जॉन हार्वर्डचा पुतळा अमेरिकेतील सर्वात जास्त फोटो काढले जाणाऱ्या वास्तूंच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. यावरून तुम्ही कल्पना करू शकता त्याची लोकप्रियता किती आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एकदा हर्शेजचं चॉकलेट खाल्लं की त्यानंतर दुसऱ्या कुठल्याच चॉकलेटला चव लागत नाही

Next Post

काश्मीरच्या मीरपूरमध्ये पाकिस्तानने ३५ हजार हिंदू आणि शिखांची निर्दयपणे क*त्तल केली होती

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

काश्मीरच्या मीरपूरमध्ये पाकिस्तानने ३५ हजार हिंदू आणि शिखांची निर्दयपणे क*त्तल केली होती

कम्प्युटरमधल्या एररला 'बग' म्हणतात त्यामागे हा किस्सा आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.