The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या भारतीय राजाला खुद्द हि*टल*रने कस्टम मेड मेबॅक कार भेट दिली होती

by Heramb
6 July 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


एका भारतीय राजाच्या गॅरेजमध्ये आपल्याला हमखास जगातील काही महागड्या कार्स दिसतात. रोल्स रॉयस, बेंटले इत्यादी. अशाच एका राजाच्या गॅरेजच्या कोपऱ्यात एक काळ्या रंगाची कार उभी होती. ही काही सामान्य कार नव्हती. तर एक कस्टम मेड, दुर्मिळ मेबॅक कार होती. मेबॅक मॉडेलच्या केवळ सहा कार जगात होत्या.

भारतात संस्थानांच्या राजकुमारांना महागड्या वस्तू आणि महागडे शौक करायला आवडत असत. पटियालाच्या महाराजा भूपिंदर सिंह यांच्याकडे जे होते ते भारतातील कोणत्याही महाराजा किंवा नवाबाकडे आणि त्यांच्या समवयस्कांकडे असूच शकत नाही – एक दुर्मिळ आणि अनोखी मेबॅक कार. ही दुर्मिळ मेबॅक कार जर्मनीच्या हुकूमशहाने अर्थात हि*टल*रने स्वतः त्यांना भेट म्हणून दिली होती. पटियालाच्या महाराजांशी हि*टल*रच्या संबंधांची माहिती अनेकांना नाही. कदाचित ही एक शुद्ध मैत्री होती, त्यामुळेच हि*टल*रने त्यांना ही भेट पाठवली होती.

इसवी सन १७०७ साली दख्खनेत औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचे अधःपतन सुरु झाले. याच मंगलप्रसंगी शीख साम्राज्याचा पाया रचला गेला. मुघल कमकुवत झाल्यामुळे गुरु गोविंद सिंह यांनी खालसा दलाची पुनर्रचना केली आणि पश्चिमेकडील अफगाणांविरूद्ध मोहिमांचे नेतृत्व केले. याच साम्राज्यात पुढे महाराजा रणजितसिंग यांचा उदय झाला. त्यांनी शीख साम्राज्य भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागांमध्ये मजबूत केलं.

१८३९ साली महाराजा रणजितसिंग यांच्या मृत्यूनंतर शिखांचं हे बलाढ्य साम्राज्य ३ लढायांमध्ये कोसळलं. महाराजा रणजितसिंग यांच्या मुलांमध्ये वारसाहक्कावरून संघर्ष होऊ लागले होते. साम्राज्याचे सामूहिक अंतर्गत विभाजन आणि राजकीय गैरव्यवस्थेमुळे ते गंभीरपणे कमकुवत झाले. या संधीचा उपयोग ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने अँग्लो-शीख यु*द्धे जिंकण्यासाठी केला. दुसरे अँग्लो-शीख यु*द्ध संपल्यानंतर शीख साम्राज्य १८४९ मध्ये विभक्त संस्थानांमध्ये विसर्जित झाले.

दरम्यान पानिपतच्या तिसऱ्या यु*द्धानंतर दोन वर्षांनी बाबा अली सिंह यांनी १७६३ साली पटियाला संस्थान स्थापन केले होते आणि १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान ब्रिटिशांना दिलेल्या पाठिंब्यामुळे ते प्रसिद्ध झाले. पंजाबच्या सुपीक मैदानावरील प्रचंड उत्पन्नामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली राज्यांपैकी एक बनले होते. पटियाला संस्थानच्या शासकांनी अफगाणिस्तान, चीन आणि मध्य पूर्वेतील विविध यु*द्धांदरम्यान ब्रिटिश सैन्याला पाठिंबा देण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.



महाराजा भूपिंदर सिंह हे पटियालाचे एक अनन्यसाधारण राजे होऊन गेले. दारू, विषयसुख, दाग-दागिने, स्पोर्ट्स कार या सर्व गोष्टींसाठी असलेली त्यांची भूक प्रसिद्ध होती. त्यांच्याकडे २७ रोल्स रॉयस कार्स आणि प्रसिद्ध ‘पटियाला नेकलेस’सह असंख्य दागिने होते. ते भारतातील बी. सी. सी. आय. या क्रिकेट नियामक मंडळाचे संस्थापक आहेत. नवनगरचे महाराजा रणजितसिंग यांच्या सन्मानार्थ त्यांनी ‘रणजी ट्रॉफीची’ सुरुवात केली. 

महाराजा भूपिंदर सिंग राजकीयदृष्ट्या प्रभावशाली होते. चेंबर ऑफ प्रिन्सेसचा एक महत्त्वाचा सदस्य म्हणून त्यांनी भारत, स्पेन, स्वीडन, नॉर्वे आणि इतर युरोपीय देशांमध्ये मोठा प्रभाव पाडला. १९३५ साली जर्मनीच्या भेटीदरम्यान हि*टल*रने त्यांना मेबॅक कार भेट दिली. हि*टल*रने ब्रिटीश आणि ना*झी यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये महाराजांकडून तटस्थतेची अपेक्षा केली होती असेही सामान्यतः मानले जाते. कारण पटियाला संस्थानच्या शासकांनी नेहमीच ब्रिटिश सैन्याला पाठिंबा दिला होता.

या भेटवस्तूची कहाणी सांगताना महाराजा भूपिंदर सिंग यांचे नातू आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे धाकटे बंधू राजा मालविंदर सिंग ‘द ऑटोमोबाइल्स ऑफ महाराजास’ या ‘शारदा द्विवेदी’ लिखित पुस्तकात म्हणतात, “जगामध्ये या प्रकारच्या केवळ सहा कार्स आतापर्यंत बनवल्या गेल्या होत्या. मेबॅक ही एक औपचारिक आणि शानदार कार होती. यामध्ये १२ झेप्प्लिन इंजिन वापरले गेल्यामुळे बोनेटचा आकार प्रचंड होता. दुमडता येऊ शकेल असे मखमलीचे हलक्या पांढऱ्या रंगाचे छत होते आणि त्यात मरून रंगाचे सीट्स होते. तसेच बुटाने उघडता येतील अशा दोन जम्पसीट्स या कारमध्ये होत्या. कार रुंद असल्याने पुढच्या बाजूला ड्रायव्हर सह एक व्यक्ती आणि मागच्या बाजूला आरामात तीन व्यक्ती बसू शकत होत्या. तसेच या गाडीचे मायलेज ३ मैल प्रति गॅलन इंधन इतके होते. म्हणजेच १ लिटर इंधनामध्ये ही कार सुमारे १ किलोमीटर प्रवास करू शकत होती. “

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

ही असाधारण कार भारतात पाठवण्यात आली आणि पटियालाच्या महाराजांच्या असंख्य वाहनांच्या ताफ्यामध्ये सामील झाली. ही कारसुद्धा मोती बाग पॅलेसच्या गॅरेजमध्ये ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे, जेव्हा दुसरे वैश्विक महायु*द्ध सुरू झाले, तेव्हा मेबॅक राजवाड्यात लपवली गेली होती आणि ती पुन्हा कधीही वापरली नाही.

महाराजा भूपिंदर सिंहच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा यादविंद्र सिंह गादीवर आला. १९४७ साली पटियाला संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले. पटियाला अँड इस्ट पंजाब स्टेट्स युनियनमध्ये पहिल्यांदा मेबॅक कार ‘७’ या नंबरप्लेट सह नोंदणीकृत करण्यात आली. इतर राजघराण्यांप्रमाणेच, पटियाला राजघराण्यानेही नवीन काळाशी जुळवून घेण्यासाठी आपली अफाट मालमत्ता विकली. तर हि*टल*रने भेट दिलेल्या या मेबॅक कारसह अनेक गोष्टी सहजपणे भेट दिल्या गेल्या.

राजा मालविंदर सिंग यांच्या वडिलांनी १९६७ मध्ये मेबॅक कार सरदार सुखजीत सिंग मजिथिया यांना भेट दिली. त्यानंतर सरदार सुखजीत सिंग मजिथिया यांनी ती विकली. ही दुर्मिळ मेबॅक कार आता अमेरिकेतील एका प्राचीन आणि अद्वितीय वस्तूंच्या संग्राहकाकडे आहे आणि बहुधा ५ कोटी डॉलर्स इतकी त्या कारची किंमत असू शकते. 

भारताच्या संस्थानातील एक महत्त्वाची आणि अद्वितीय स्मरणिका मात्र आपण गमावली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

…म्हणून क्रिकेटर्स चेहऱ्यावर पांढरं क्रीम लावतात..!

Next Post

१६०० कोटींचा व्यवसाय उभा केला पण आता देश सोडून पळून जावं लागलं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

१६०० कोटींचा व्यवसाय उभा केला पण आता देश सोडून पळून जावं लागलं

भारतातली पहिली रेल्वे लाईन मुंबई ते ठाणे नव्हे तर 'रेड हिल रेल्वे' आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.