The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

थेट ना*झी अधिकाऱ्यांशी सौदा केला आणि हंगेरीतल्या १६०० ज्यूंना हॉलोकॉस्ट पासून वाचवलं

by द पोस्टमन टीम
12 July 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जर्मनीमध्ये नाझी पक्षाच्या उदयानंतर ज्यू, कम्युनिस्ट आणि जिप्सींचा मोठ्या प्रमाणात छळ सुरू झाला होता. ना*झींनी ज्यूंचे व्यवसाय आणि मालमत्ता ताब्यात घेतली. जर्मनव्याप्त शहरांतील ज्यू अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहातून बाजूला करण्यात आलं. कित्येकांना बंदी बनवण्यात आलं. काही लोक हंगेरीमध्ये आसरा घेण्यासाठी पळाले. मात्र, तिथे देखील त्यांना छळच सोसावा लागत होता.

अशा परिस्थितीत ऑगस्ट १९४४ मध्ये स्वित्झर्लंडच्या ज्युरिक स्टेशनवर कास्टनर ट्रेन नावाची एक ट्रेन दाखल झाली. ट्रेनमध्ये हंगेरीतून पळून आलेले १ हजार ६०० प्रवासी होते. एक व्यक्ती अशी होती ज्यानं हंगेरीतील सर्वात क्रू*र ना*झी अधिकारी ॲडॉल्फ आयचमनशी बोलणी केली आणि आपला जीव धोक्यात टाकून या सोळाशे लोकांचा जीव वाचवला होता. त्या व्यक्तीचं नाव होतं ‘रुडॉल्फ कास्टनर’. रुडॉल्फ कोण होता? त्यानं या सोळाशे लोकांचा जीव वाचवण्यासाठी काय केलं होतं? या प्रश्नांची उत्तरं रोमहर्षक आहेत.

रेझो कास्टनर (रुडॉल्फ) हा ट्रान्सिल्व्हेनियन ज्यू होता. १९०६ मध्ये क्लूज येथे त्याचा जन्म झाला होता. तो एक ज्यू कार्यकर्ता होता. त्यानं आधीच्या काळात झिओनिस्ट पेपरचा संपादक, झिओनिस्ट युवा गटाचा नेता म्हणून आणि नंतर रोमानियन संसदेत नॅशनल ज्यू पार्टीचा सचिव म्हणून काम केले. १९४० साली तो बुडापेस्टला गेला आणि हंगेरीयन झिओनिस्ट असोसिएशनचा उपाध्यक्ष झाला. १९४२ साली कास्टनरनं ज्यूंसाठी मदत आणि बचाव समिती स्थापन करण्यास मदत केली.

त्यानं अनेक प्रयत्न करून ना*झींच्या ताब्यात असलेल्या स्लोव्हाकिया आणि पोलंडमधून ज्यू नागरिकांना हंगेरीत नेलं. परंतु मार्च १९४४ मध्ये जर्मन लोकांनी हंगेरीवर आक्र*मण केलं आणि पुन्हा ज्यूंचे हाल सुरू झाले. लवकरच होलोकॉस्ट सुरू झालं. ज्यूंची क*त्तल सुरू झाली. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा जीव वाचवण्यासाठी रुडॉल्फनं जोखमीचा आणि अकल्पनीय मार्ग निवडला. त्यानं हंगेरीतील ज्यूंच्या संरक्षणासाठी थेट ना*झी अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू केली.

सुरुवातीला कास्टनर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ज्यूंना सुरक्षित ठिकाणी नेण्याच्या बदल्यात ना*झी अधिकाऱ्यांना वीस लाख डॉलर्स देण्याची ऑफर दिली. मात्र, ना*झी अधिकाऱ्यांनी त्याला दाद दिली नाही. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी नवीन योजना तयार केली. कास्टनरनं एसएस अधिकारी कर्ट बेचरशी बोलणी केली.



ज्यूंच्या संरक्षणाच्या बदल्यात काही शस्त्रास्त्रे जर्मनीला मिळवून देण्याची आपली तयारी असल्याचं कास्टनरनं बेचरला सांगितलं. बेचर हा एसएस प्रमुख हेनरिक हिमलरचा प्रतिनिधी होता. पूर्व आघाडीवरील यु*द्ध वाढत असताना, जर्मन संसाधने कमी होत चालली होती. त्यामुळं बेचरनं कास्टनरच्या प्रस्तावाकडं एक फायद्याचा सौदा म्हणून पाहिलं. कास्टनरला मदत करण्याचे आदेश त्यानं ना*झी अधिकारी आयचमनला देऊन टाकले.

कास्टनरनं एक यादी तयार करून ना*झी अधिकारी आयचमनला दिली. प्रभावी ज्यू नेते, झिओनिस्ट नेते, ज्यू बुद्धिजीवी लोकं आणि कास्टनरचे मित्र आणि त्यांचे कुटुंबिय अशा एकूण १,६८५ लोकांचा या यादीत समावेश होता. या लोकांना ज्या ट्रेनमधून नेण्यात येणार होतं तिला ‘कास्टनर ट्रेन’ असं नाव देण्यात आलं होतं.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

३० जून १९४४ रोजी ही रेल्वे बुडापेस्टहून या लोकांना घेऊन निघाली. मात्र, मध्येच तिनं आपला मार्ग बदलला आणि ती बेलसेन ना*झी शिबिराकडं वळाली. या प्रकारानं ट्रेनमधील काही प्रवासी घाबरले आणि ट्रेनमधून उतरले. कास्टनरनं एसएस अधिकारी कर्ट बेचरच्या मदतीनं आयचमनवर प्रवाशांना सोडण्यासाठी प्रचंड दबाव टाकला. शेवटी नाखुशीनं का होईना आयचमननं ट्रेन ज्युरिकला सोडली.

त्यातील रोमानियन आणि ज्यू नसलेल्या प्रवाशांना मात्र, त्यानं पकडून ठेवलं. तरीही कास्टनरनं हंगेरीमध्ये परत ज्यूंना मदत करण्याचं काम सुरू ठेवलं. त्याच्या वाटाघाटीमुळे ऑस्ट्रियातील स्ट्रॅशॉफमध्ये ऑशविट्झऐवजी २० हजार ज्यूंना यु*द्धाच्या कामासाठी पाठवण्यात आलं. त्यापैकी पंचाहत्तर टक्के लोक यु*द्धातून वाचले. त्यानं अनेक छावण्यांमध्ये ज्यू कैद्यांना मदत देखील पुरवली, त्यामुळे अनेकांचं जगणं शक्य झालं.

महायु*द्ध संपल्यानंतर १९४७ साली कास्टनर आपली पत्नी आणि मुलीसह पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतरित झाला. तो तेथील राजकारणातील  एक प्रमुख व्यक्ती बनला होता. त्यानं डेव्हिड बेन गुरियनच्या मपाई सरकारमध्ये अधिकारी म्हणून काम केलं. हंगेरियन भाषेतील वृत्तपत्र, तसेच तेल अवीवमध्ये स्थापन झालेला दुसरा हंगेरियन पेपर देखील संपादित केला.

मात्र, १९५२ साली, जेरुसलेममध्ये राहणारा हंगेरियन ज्यू मल्कीएल ग्रुएनवाल्ड या व्यक्तीनं कास्टनरवर ना*झींना सहकार्य केल्याचा आरोप केला आणि त्याबाबत काही पत्रकं देखील वाटली. आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्याला ग्रुएनवाल्डविरुद्धच्या न्यायालयीन खटल्यात भाग घ्यावा लागला.

ग्रुएनवाल्डच्या म्हणण्यानुसार, कास्टनरनं ट्रेनमध्ये वाचलेल्या नागरिकांच्या (निवडक लोकांच्या) बदल्यात ऑशविट्झमधील ज्यू लोकांना संकटात टाकलं. कास्टनरनं मात्र, या आरोपांचं खंडन केलं. आपण प्रत्येक ज्यूला वाचवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले असल्याचं त्याने सांगितलं. ग्रुएनवाल्डची बाजू मांडणारे वकील, शमुएल तमीर अतिशय तीक्ष्ण बुद्धीचा व्यक्ती होता.

त्यानं कास्टनरला शाब्दिक कात्रीत अडकवण्यात यश मिळवलं. कास्टनरनं वैयक्तिक फायद्यासाठी, कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना वाटवण्यासाठी ना*झींशी वाटाघाटी केल्याचं तमीरनं न्यायालयात ठामपणे सांगितलं. न्यायालयानं कास्टनरला दोषी ठरवलं. परिणामी त्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

हा खटला संपल्यानंतर तीन वर्षांनी मार्च १९५७ मध्ये इस्रायलमधील अत्यंत उजव्या विचारसरणीतील तीन लोकांनी कास्टनरची ह*त्या केली. त्यानंतर एका वर्षातच इस्रायलच्या सर्वोच्च न्यायालयानं यु*द्धादरम्यान हंगेरीतील ज्यूंना वाचवण्यासाठी कास्टनरनं विलक्षण प्रयत्न केल्याचा हवाला देत पूर्वीचा निकाल रद्द केला.

२००८ साली किलिंग कास्टनर नावाची एक डॉक्युमेंटरी आली होती. त्यात कास्टनरचे निर्णय त्यावेळी बरोबरचं असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्याच्या ह*त्येनंतर आजही हा वाद कायम आहे, कास्टनर नायक होता की खलनायक? हा वाद अनेक पुस्तकांचा विषय बनून राहिला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हृदयविकाराचं औषध शोधायचं होतं पण शोध ‘व्हायग्रा’चा लागला

Next Post

कम्प्युटरमधील एका एररमुळे नासाची अपोलो-११ मोहीम धोक्यात आली होती! 

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

कम्प्युटरमधील एका एररमुळे नासाची अपोलो-११ मोहीम धोक्यात आली होती! 

१० हजार उधारीवर घेऊन सुरु केलेला व्यवसाय आज करोडोंची उलाढाल करतोय..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.