The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जर्मनीने १९१६ साली केलेल्या ह*ल्ल्याची भरपाई अमेरिकेने १९७९ मध्ये व्याजासकट वसूल केली

by द पोस्टमन टीम
7 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


यु*द्धस्य कथा रम्या । असे आपल्याकडे म्हटले जाते. यु*द्ध होऊन गेल्यावर मुख्य यु*द्धाच्या कथा, आणि त्याच्यातून निर्माण होणारी छोटी छोटी उपकथानके वाचायला, ऐकायला छान वाटली तरी त्या काळात जे नुकसान होते, ते भरून निघायला खूप वेळ जावा लागतो. अनेक जखमा इतक्या खोल असतात, की त्यांचे घाव कधीच भरून येत नाहीत. एखाद्या देशाचे यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर फार मोठे, कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते, कित्येकदा जगाचा नकाशा बदलतो. अस्तित्वात असलेले देश विलीन होतात, लोप पावतात, तर कधी नवी राष्ट्रे उदयास येतात.

असेच अनेक दूरगामी परिणाम घडवून आणणारे यु*द्ध म्हणजे पहिले महायु*द्ध. हे सन १९१४ ते १९१८ दरम्यान युरोपमध्ये झालेले अत्यंत संहारक असे यु*द्ध होते. या यु*द्धात मूलतः एका बाजूला इंग्लंड आणि फ्रान्स ही राष्ट्रे होती तर दुसरीकडे जर्मनी आणि ऑस्ट्रिया. यु*द्धात जर्मनीचा पराभव झाला, शिवाय या महायु*द्धाचे अनेक दीर्घकालीन परिणाम झाले.

या महायु*द्धापूर्वी जवळपास संपूर्ण जगभर इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, पोर्तुगाल या देशांनी आपापल्या वसाहती निर्माण केल्या होत्या. अमेरिकेचा उदय होऊ लागला होता. रशियामध्ये दुसऱ्या झार निकोलसची जुलमी राजवट होती. पूर्व युरोप आणि मध्य पूर्व आशिया ऑस्ट्रिया आणि तुर्कस्तानच्या ताब्यात होते.

मात्र तुर्की आणि ऑस्ट्रियन साम्राज्याची ताकद कमी होत चालली होती, उलटपक्षी जर्मनी ही युरोपमधली नव्याने निर्माण झालेली ताकद होती. १८७१ मध्ये फ्रान्सला खडे चारून बिस्मार्कने जर्मनीचे एकीकरण घडवून आणले होते. सम्राट कैसर विल्यम-२ हा जर्मनीचा राजा होता. तो आक्र*मक राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता होता. त्याला नव्या वसाहती स्थापन करायच्या होत्या.



१९१२-१३च्या बाल्कन यु*द्धानंतर युरोपातील वातावरण तापले होते. त्यात ठिणगी पडली ती २८ जून १९१४ रोजी ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्च ड्यूक फ्रान्सिस फर्डिनंड आणि त्याची बायको यांच्या बोस्नियामधील सारायेओ येथे झालेल्या ह*त्येने. यामुळे २३ जुलै १९१४ रोजी ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध यु*द्ध पुकारले आणि जर्मनीने ऑस्ट्रियाला पाठींबा दिला.

इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि जपान एका बाजूला तर जर्मनी, ऑस्ट्रिया आणि तुर्कस्तान दुसऱ्या बाजूला एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. हे या यु*द्धाचे तात्कालिक कारण असले तरी मुळात जर्मनीची वाढती महत्त्वाकांक्षा आणि आक्रमक राष्ट्रवाद यांमुळे यु*द्धाची बीजे आधीच रोवली गेली होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

या यु*द्धाला पैसा पुरविण्याचे काम प्रथम फ्रान्सने व नंतर इंग्लंडने केले. सुरुवातीला अमेरिका यात सहभागी नव्हती. मात्र दोस्तराष्ट्रांना यु*द्ध खर्चासाठी नंतर अमेरिकेची मदत घ्यावी लागली. अमेरिका हळूहळू यु*द्धात गुंतत गेली. तिने शस्त्रास्त्रे, अन्नधान्ये आणि इतर गोष्टींचा पुरवठा करायला सुरुवात केली. पुढे जर्मनीच्या यू बोटींनी अमेरिकेची काही जहाजे बुडविली आणि अमेरिकेनेही यु*द्धामध्ये उडी घेतली.

पण याशिवाय अमेरिका आणि जर्मनी यांच्यातील संघर्षाचे आणखी एक कारण म्हणजे ब्लॅक टॉम एक्स*प्लोजन. काय होती ही घटना?

तो दिवस होता रविवारचा. वेळ उत्तररात्रीची किंवा पहाटेपूर्वीची. तारीख होती ३० जुलै १९१६. अजून उजाडायला पुरेसा अवकाश होता. त्यावेळी अमेरिकेच्या ईशान्य बाजूला असलेले ब्लॅक टॉम नावाचे बेट स्फो*टांनी हादरले. हा ह*ल्ला जर्मनीने केला होता आणि अमेरिकेने दोस्त राष्ट्रांना पुरवठा करण्यासाठी ठेवलेली शस्त्रास्त्रे उ*द्ध्वस्त करणे हा त्याचा उद्देश होता. ह*ल्ल्याचे ठिकाण न्यूयॉर्क बंदराच्या जवळ होते. यात पाच लोकांना आपला जीव गमवावा लागला, शिवाय दोन कोटी डॉलर्स किंमतीची शस्त्रा*स्त्रे नष्ट झाली. आजही इतिहासात हा सर्वांत मोठ्या मानवी ह*ल्ल्यापैकी एक मानला जातो.

ब्लॅक टॉम हे न्यूयॉर्क बंदराच्या बाजूला असलेले एक मानवनिर्मित बेट आहे. याच नावाच्या एका विशाल खडकाच्या बाजूला असलेल्या जमिनीपासून ते तयार झाले आहे. आज हे बेट लिबर्टी स्टेट पार्कच्या मालकीचे आहे. ब्लॅक टॉम येथे अमेरिकेने आपला शस्त्रसाठा ठेवलेला होता.

१९१५ च्या सुरुवातीपर्यंत अमेरिकन शस्त्रास्त्र कंपन्या कोणालाही शस्त्रास्त्रे विकू शकत असत, परंतु त्यानंतर अमेरिकेने केवळ दोस्त राष्ट्रांना म्हणजेच इंग्लंड आणि फ्रान्सला ही श*स्त्रास्त्रे विकायला सुरुवात केली. त्यामुळे हा शस्त्रसाठा उ*द्ध्वस्त करून शत्रूला शह देण्याची रणनीती जर्मनीने आखली.

पहिला स्फो*ट पहाटे दोन वाजून आठ मिनिटांनी झाला. हा स्फो*ट सगळ्यात जास्त तीव्रतेचा होता. त्यानंतर अर्ध्या तासाने दुसरा स्फो*ट झाला. या स्फो*टात कमीत कमी पाच माणसे ठा*र झाली, ज्यामध्ये जर्सी सिटीमधील एका लहान बाळाचाही समावेश होता. हे बाळ त्याच्या पाळण्यातून बाहेर फेकले गेले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

वित्तहानीचा विचार करता आजच्या भावाने सुमारे ५०० मिलीयन डॉलर्सचे नुकसान झाले. स्फो*टाच्या भीतीने या बेटावरील बहुतेक सुरक्षारक्षक पळून गेले. काही जणांनी प्रसंगावधान राखत न्यू जर्सी येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. पण तरीही जे नुकसान व्हायचे ते टळले नाहीच.

या स्फो*टाच्या हादर्‍यांनी १३ मोठ्या वखारी जमीनदोस्त झाल्या. स्फो*टाची तीव्रता इतकी होती की, तो झालेल्या ठिकाणापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या लॉवर मॅनहॅटन येथील अनेक घरांच्या खिडक्यांची तावदाने फुटली. पाच ते साडेपाच रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्यावर जेवढे हादरे बसतील तेवढे हादरे या स्फो*टामुळे बसले.

हे स्फो*ट झाले तेव्हा ब्लॅक टॉम बेटानजीक वखारी, पडाव चालवणारे व्यवसाय होते. सुरुवातीला या स्फो*टांसाठी या व्यवसायिकांनाच जबाबदार ठरवण्यात आले. परंतु या लोकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचा कोणताही पुरावा तपास अधिकाऱ्यांना मिळू शकला नाही.

सुरुवातीला या स्फो*टांची मालिका म्हणजे केवळ अपघात वाटला होता. त्यामध्ये कुठेही परकीय शक्तींचा हात असल्याच्या संशयाला बळकटी देणारे धागेदोरे गवसले नव्हते. अखेरीस काही अमेरिकन वकिलांना अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर या स्फो*टांमागे जर्मनीचा हात होता, हे सिद्ध करण्यात यश आले. त्यामुळे अमेरिकेने जर्मनीकडे नुकसानभरपाईची मागणी केली.

हे प्रकरण हेग येथील आयोगापुढे चालले. १९३९ साली अमेरिकेने केस जिंकली. त्यावेळी जर्मनीवर हिट*लर*चा अंमल होता. हिट*लर*च्या आधिपत्याखालील जर्मनी नुकसानभरपाईची रक्कम चुकती केली नाही. त्यामुळे १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला नुकसानभरपाईची रक्कम सुधारित करण्यात आली. ही रक्कम पूर्णपणे चुकती व्हायला १९७९ साल उजाडावे लागले.

थेट स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला नुकसान पोहोचवणाऱ्या या स्फो*टाने उद्ध्वस्त झालेले ब्लॅक टॉम हे बेट आजही तिथेच आहे. आता त्याच्यावरील मालकी इतर कुणाची असली तरी गतकाळातील सं*हाराच्या खुणा आजही त्याच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या दंगलीत अर्ध्या कॉन्स्टॅन्टिनोपलची राख झाली आणि १० हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला होता

Next Post

कम्प्युटरचा शोध नेमका कोणी लावला यावरून पण बरेच मतभेद आहेत..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

कम्प्युटरचा शोध नेमका कोणी लावला यावरून पण बरेच मतभेद आहेत..!

एकाच सामन्यात भारताच्या ८ विकेट, आणि इंग्लंडच्या कर्णधाराचा हात मोडणारा पाकिस्तानचा सिकंदर

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.