The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या शास्त्रज्ञाच्या उलट्या बुद्धीमुळे सोविएत रशिया कित्येक दशकं मागे गेला..!

by द पोस्टमन टीम
23 September 2025
in विश्लेषण, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आतापर्यंत लाखो लहान-मोठ्या समस्यांवर शास्त्रज्ञांनी संशोधन करून उपाय शोधलेले आहेत. अखंड मानववंशासमोरील अडचणी सोडवणारे ‘मसीहा’ म्हणून शास्त्रज्ञांकडे पाहिलं जातं. मात्र, सोव्हिएतमध्ये असा एक शास्त्रज्ञ होता, ज्यानं आपल्या हट्टामुळं आणि लहरी स्वभावामुळं अनेक लोकांचा जीव घेतला. सोव्हिएतमधील या जीवशास्त्रज्ञाच्या बोगस कृषी संशोधनामुळं लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. ट्रोफिम लिसेन्को, असं या शास्त्रज्ञाचं नाव होतं. लेसिन्को कसा व्यक्ती होता आणि त्याच्या अशा वर्तणुकीमागे काय कारणं होती याबाबत हा विशेष लेख..

जीवशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ ट्रोफिम लिसेन्कोचा जन्म रशियन साम्राज्यात येणाऱ्या युक्रेनमध्ये, २९ सप्टेंबर १८९८ रोजी झाला. त्याचं कुटुंब शेतकरी होतं असं म्हटलं जातं. वयाच्या १३व्या वर्षापर्यंत तो निरक्षरच होता. नंतर मात्र, हाच लिसेन्को असामान्य वेगानं वैज्ञानिक जगताच्या शिखरावर पोहोचला. कारण त्यानं जगाला मान्य असणारं मेंडेलियन जेनेटिक्स नाकारलं होतं. तो लॅमार्किझमचा प्रबळ समर्थक होता.

कुठलाही व्यक्ती जन्मताचं चांगली किंवा वाईट नसते. त्यामागे अनेक परिस्थितीजन्य कारणं असतात. लिसेन्कोच्या बाबतीत देखील तेच झालं होतं. अत्यंत गरिबीत वाढलेल्या लिसेन्कोनं कम्युनिस्ट क्रांतीच्या आश्वासनांवर मनापासून विश्वास ठेवला होता. जेव्हा विज्ञानाचे आणि साम्यवादाचे सिद्धांत आपसांत  भिडले, तेव्हा त्यानं नेहमीच साम्यवाद निवडला.

लिसेन्कोला विश्वास होता की, जीवशास्त्र त्याच्या विचारसरणीला अनुरूप ठरेल. परंतु, राजकीय विचारधारा आणि विज्ञान एकत्र आल्यानंतर त्याचे परिणाम चांगले होत नाहीत, ही गोष्ट तो विसरला होता.

लिसेन्कोनं रशियन क्रांतीचा फायदा घेत अनेक कृषी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवला. जिथं त्यानं इतर अनेक प्रकल्पांसह, सोव्हिएतच्या कडक हिवाळ्यात मटार वाढवण्याच्या नवीन पद्धती विकसित करण्यास सुरुवात केली. मटारच्या प्रयोगात त्यानं अतिशय खराब डिझाइन वापरले होते आणि कदाचित त्यातील काही निष्कर्ष देखील खोटे होते.



तरीदेखील या संशोधनानं त्याला १९२७ साली मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि प्रशंसा मिळाली. कम्युनिझमचा खंदा समर्थक असल्यामुळं तो कम्युनिस्ट पार्टीमध्ये विशेष प्रसिद्ध झाला. सोव्हिएत सरकारी अधिकाऱ्यांनी तर १९३० च्या दशकात लिसेन्कोला सोव्हिएत शेती विभागाचा कारभारच देऊ केला. एकच अडचण होती, त्याच्याकडं विचित्र वैज्ञानिक कल्पना होत्या. विशेषतः त्याला जेनेटिक्सचा तिटकारा होता.

१९१० आणि २० च्या दशकात जेनेटिक्सच्या क्षेत्रामध्ये वेगानं प्रगती झाली होती. १९३३ साली तर अनुवंशशास्त्रातील कार्यासाठी पहिलं नोबेल पारितोषिक देखील दिलं गेलं होतं. वनस्पती आणि प्राण्यांमध्ये स्थिर वैशिष्ट्ये असतात. जीन म्हणून ती एन्कोड केली जातात आणि तीच त्यांच्या पुढच्या पिढीकडे संक्रमित केली जाते, या तत्त्वावर जेनेटिक्सचा डोलारा उभा झालेला होता.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

मात्र, या सर्व गोष्टींना स्वत:ला जीवशास्त्रज्ञ म्हणून घेणाऱ्या लिसेन्कोनं वाईट मानलं. वास्तविक पाहता त्याचा जेनेटिक्सलाच विरोध होता. जीन्स(जनुके) नावाची एखादी गोष्ट अस्तित्वात असते हेच तो नाकारत होता. फक्त पर्यावरण वनस्पती आणि प्राण्यांना आकार देतं या मार्क्सवादी कल्पनेला लिसेन्कोनं प्रोत्साहन दिलं. त्यांना जर योग्य ठिकाणी ठेवलं गेलं आणि त्यांना योग्य उत्तेजा दिल्या गेल्या तर आपण पाहिजे तितक्या प्रमाणात या वनस्पती व प्राण्यांची निर्मिती करू शकतो, असं त्याचं म्हणणं होतं.

याचाच परिणाम म्हणून लिसेन्कोने सोव्हिएतमधील पिकांवर अनेक प्रयोग करण्यास सुरुवात केली होती. अतिशय थंड पाण्यात बियाणं भिजवून त्यांना कोंब आणण्याचा (म्हणजेच नवीन उत्पन्न) त्यानं प्रयत्न केला. भविष्यातील पिकांच्या पिढ्या हे पर्यावरणीय संकेत लक्षात ठेवतील आणि स्वत:च फायदेशीर गुणधर्मांचा वारसा घेतील, असा त्याचा दावा होता.

हे म्हणजे एखाद्या शेपूट कापलेल्या मांजरीनं शेपटीविरहितच पिल्लू जन्माला घालावं, अशी अपेक्षा करणं होतं. जेनेटिक्सनुसार लिसेन्कोच्या गोष्टी अशक्य होत्या. तरी देखील सोव्हिएतमधील लोकांच्या मनात त्यानं ही गोष्ट बिंबवण्यास सुरुवात केली होती. सायबेरियाच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये संत्र्याची झाडं वाढवण्याची बढाई तो मारत होता. शिवाय देशातील पीक उत्पादन वाढवण्यासाठी ओसाड माळरानांचं विशाल शेतात रूपांतर करण्याचं आश्वासन देखील त्यानं दिलं होतं.

ज्या गोष्टी सोव्हिएत नेत्यांना ऐकायच्या होत्या तेचं दावे लिसेन्कोनं केले होते. १९२० च्या उत्तरार्धात आणि १९३० च्या पूर्वार्धात जोसेफ स्टालिननं लिसेन्कोच्या साथीनं सोव्हिएत शेतीचं आधुनिकीकरण करण्यासाठी एक योजना सुरू केली. या योजनेत लाखो लोकांना सामूहिक आणि राज्य-संचालित शेतीत सामील होण्यास भाग पाडलं गेलं. याचा परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पादन कमी झालं आणि अन्न धान्य तुटवडा निर्माण झाला.

स्टॅलिननं मात्र आपली योजना मागे घेण्यास नकार दिला आणि लिसेन्कोला त्याच्या नवीन कल्पनांवर आधारित पद्धतींनी या आपत्तीवर उपाय करण्याचे आदेश दिले. लिसेन्कोनं शेतकऱ्यांना दाटीवाटीनं बियाणं लावण्यास भाग पाडले. शिवाय खते आणि कीटकनाशके वापरण्यासही मनाई केली. याचा देखील फायदा झाला नाही.

लिसेन्कोच्या पद्धतींनुसार पिकवलेली प्रत्येक गोष्ट कुजलेली निघत होती. विशेषत: गहू, राई, बटाटे आणि बीट या पिकांचं उत्पन्न तर एकदम कमी झालं. यामुळं निर्माण झालेल्या मानवनिर्मित दुष्काळानं कमीतकमी ७० लाख लोकांचा बळी घेतला. याशिवाय लिसेन्कोच्या अजब-गजब धोरणामुळं सोव्हिएतला दिर्घकालीन अन्नाचा तुटवडा सहन करावा लागला.

कहर म्हणजे, सोव्हिएतमधील परिस्थिती डोळ्यांना दिसत असूनही कम्युनिस्ट चीननं देखील १९५० च्या उत्तरार्धात लिसेन्कोची पद्धतं स्विकारली. आणि परिणामादाखल आणखी मोठा दुष्काळ ओढून घेतला. चीनमध्ये किमान ३० दशलक्ष लोक उपासमारीनं मरण पावल्याची माहिती उपलब्ध आहे.

लिसेन्कोच्या या विचित्र सिद्धांतांवर पाश्चिमात्त्य शास्त्रज्ञांनी प्रचंड टीका केली. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही. अगदी सोव्हिएतमध्ये देखील काही लोकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. ज्या शास्त्रज्ञांनी त्याला साथ देण्यास नकार दिला त्यांची गुप्तपणे धरपकड करण्यात आली.

काही नशीबवान ठरले त्यांना फक्त पदावरून काढून टाकण्यात आलं. हजारो विरोधकांना त्यानं तुरुंग किंवा वेड्यांच्या इस्पितळात पाठवलं. अनेकांना देशद्रोही म्हणून फाशीची शिक्षा दिली तर काहींना कोठडीत उपासमारीसाठी सोडून दिलं. (यात वनस्पतिशास्त्रज्ञ निकोलाई वाविलोव्ह यांचा देखील समावेश होता). १९३० च्या अगोदर, सोव्हिएत युनियनकडे जगातील सर्वोत्तम जेनेटिक्स संशोधकांचा गट होता. मात्र, लिसेन्कोच्या उदयामुळं रशियन जीवशास्त्र जवळपास अर्धशतक मागं गेलं.  

१९५३ साली स्टॅलिनचा मृत्यू झाला आणि त्यानंतर लिसेन्कोची पकड कमकुवत होऊ लागली. १९६४ पर्यंत, या सोव्हिएत जीवशास्त्राच्या हुकूमशहाला पदच्युत केलं गेलं. १९७६ साली त्याचा मृत्यू झाला. लिसेन्कोच्या मृत्यूनंतर जीवशास्त्र आणि कृषीशास्त्रावर त्याची मक्तेदारी संपली. मात्र, त्यानं केलेलं नुकसान भरून काढण्यासाठी रशियाला कित्येक दशकं प्रयत्न करावे लागले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जुने आयफोन जाणीवपूर्वक स्लो केले म्हणून ॲपलला १३ कोटी डॉलर्सचा दंड भरावा लागला होता

Next Post

या पोराने केलेले फ्रॉड्स वाचले तर आपले नेतेसुद्धा याच्यापुढे कच्चे वाटतील

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या पोराने केलेले फ्रॉड्स वाचले तर आपले नेतेसुद्धा याच्यापुढे कच्चे वाटतील

ऑलिम्पिकमध्ये २८ पदकं जिंकूनही मायकल फेल्प्सला आत्म*हत्या करायची होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.