The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोव्हियेत रशियाच्या एकाच रणगाड्याने ना*झींच्या २१ रणगाड्यांचा भुगा केला होता

by द पोस्टमन टीम
5 July 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सोव्हिएतमधील एका दुर्गम ठिकाणी केव्ही – १ नावाचा रणागाडा आपल्या लक्ष्याची वाट पाहत होता. दारूगोळ्यानं सुसज्ज असलेली जर्मन वाहनं त्याचं लक्ष्य होतं. कुठल्याही क्षणी ती वाहनं केव्ही-१ च्या टप्प्यात येणार होती. केव्ही -१ एकटा नव्हता. त्याच्या साथीला आणखी चार रणगाडे होते. मात्र, आणीबाणीच्या परिस्थितीसाठी त्यांना राखून ठेवण्यात आलं होतं.

दुसऱ्या महायु*द्धातील सर्वांत प्रसिद्ध ह*ल्ल्यांपैकी एक असलेल्या रणधुमाळीची ही तयारी होती. केव्ही-१नं अविश्वसनीय पराक्रम केला आणि त्यामुळं या रणधुमाळीला आणि परिसराला ‘टँक ॲली’ असं नाव मिळालं. नेमकं याठिकाणी काय झालं होतं? केव्ही-१ जगाच्या इतिहासामध्ये का प्रसिद्ध झाला? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण इतिहासाची पानं उलगडून पाहुया.

ज्यू लोक, कम्युनिस्ट आणि इतर गटांविरोधात लढण्याचं आश्वासन देऊन ॲडॉल्फ हि*टल*र १९३३ साली जर्मनीच्या सत्तेवर आला. मात्र, सत्तेवर आल्यानंतर त्याच्या एका निर्णयानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. हि*टल*रनं सोव्हिएत हुकूमशहा जोसेफ स्टालिनसोबत एक करार केला. या करारानुसार दोन्ही देशांनी एकमेकांवर ह*ल्ला न करण्याचा निर्णय घेतला. एवढ्यावरचं न थांबता सोव्हिएत युनियन आणि ना*झी जर्मनीनं पोलंडवर दोन्ही बाजूंनी हल्ला करून त्याचे दोन भाग केले. त्यानंतर मात्र हि*टल*रनं आपला खरा रंग दाखवला आणि रशियाच्या विलीनीकरणाची योजना आखली. त्याला ऑपरेशन बार्बरोसा असे नाव देण्यात आले.

रशियाला जर्मनी असं काही करेल याची मुळीच कल्पना नव्हती. त्यामुळं सोव्हिएत रेड आर्मीला अशा आक्र*मणाची अपेक्षाच नव्हती. ऑपरेशन बार्बरोसाच्या सुरुवातीच्या काही दिवसांतच जर्मन हवाई दलानं (लुफ्टवाफे) संपूर्ण सोव्हिएत हवाई दलाची दैना केली आणि जर्मन सैन्य रशियात कित्येक-शे मैलापर्यंत आत आलं.



जर जर्मनांनी आणखी आत येऊन सोव्हिएतमधील मुख्य शहरांना वेढा दिला तर आपला शेवट नक्की आहे, याची सोव्हितला कल्पना होती. त्यामुळं जर्मन आक्र*मणानंतर, रशिया मित्र राष्ट्रांमध्ये सामील झाला. युनायटेड स्टेट्स आणि ब्रिटीशांनी सोव्हिएत रशियाला मोठ्या प्रमाणात यु*द्धसाहित्य पुरवलं. मात्र, रशियाकडे असलेले रणगाडे अतिशय निकृष्ट दर्जाचे होते. म्हणून त्यांनी केव्ही – १ या रणगाड्याची निर्मिती केली.

सोव्हिएत डिफेन्स कमिशनर आणि राजकारणी क्लेमेंट वोरोशिलोव्हचं (केव्ही) नाव या रणगाड्यांना देण्यात आलं होतं. केव्ही रणगाडे हे जर्मन सैन्याच्या पॅन्झर III आणि पॅन्झर IV या रणगाड्यांवरील केडब्ल्यूके-३६ बंदुका आणि हॉवित्झरसारख्या तोफांचा सामना करण्यास सक्षम होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

जर्मन सैन्याने लेनिनग्राडवर आक्र*मण करण्याची योजना सुरू केली होती. जर्मनांना लेनिनग्राडपासून जवळ असणाऱ्या क्रास्नोगवार्डेयस्क शहरात येण्यापासून रोखण्याची जबाबदारी झिनोविय कोल्बोनोव्ह या टँक कमांडरला देण्यात आली. त्याच्याकडे असामान्य यु*द्ध कौशल्य होतं.

मात्र, विविध ठिकाणी जर्मन आक्र*मणांचा सामना करून कोल्बोनोव्हचा तोफाखाना रिकामा होत आला होता. त्याच्याकडे फक्त पाच केव्ही-१ शिल्लक होते. अशी परिस्थिती असूनही, त्यानं त्याचे रणगाडे क्रॉसरोडच्या सभोवतालच्या दलदलीत ठेवले आणि जर्मन सैन्याची वाट पाहिली.

लेफ्टनंट कोल्बोनोव्हने आपला फक्त एक रणगाडा समोर ठेवला होता. बाकीचे चार केव्ही-१ दलदलीमध्ये ठेवले होते. कारण अगोदरच त्याच्याकडे असलेल्या रणगाड्यांची संख्या कमी होती. जर एकाचवेळी त्याचे पाचही रणगाडे जर्मनांच्या भक्ष्यस्थानी पडले तर सोव्हितला याची मोठी किंमत मोजावी लागणार होती. त्यामुळे जोपर्यंत तीव्र आणीबाणीची स्थिती येत नाही तोपर्यंत शिल्लक असलेल्या चार रणगाड्यांनी ह*ल्ला करू नये, असे स्पष्ट आदेश त्यानं दिले होते. त्यानं १४ तास जर्मन आ*क्रमकांची वाट पाहिली.

शेवटी जर्मन मोटारसायकलचा एक ताफा सोव्हिएत सैनिकांच्या नजरेस पडला. हा ताफा म्हणजे जर्मन सैन्याचा लवाजमा चाल करून येत असल्याची खूण होती. या ताफ्यामध्ये अगदी हलक्या मशीनगन्स होत्या, ही गोष्ट लेफ्टनंट कोल्बोनोव्हला खटकत होती. त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण जर्मन सैन्याचा ताफा नजरेस पडत नाही तोपर्यंत ह*ल्ला न करण्याचं त्यानं ठरवलं.

एक वेळ अशी आली की, दारूगोळ्यानं सुसज्ज असलेल्या जर्मन सैन्याचा संपूर्ण ताफा केव्ही -१ च्या टप्प्यात आला. केव्ही -१ च्या एका शॉटने जर्मनीच्या लीड टँकचा वरचा भाग उडून गेला. जर्मन सैन्यानं तत्काळ तोफेचा स्रोत शोधला. तोपर्यंत या सोव्हिएत लेफ्टनंटनं त्याच्या गनमनला मागच्या टँकवर गोळीबार करण्यास सांगितलं. सुरुवातीच्या दोन टँकवर झालेल्या ह*ल्ल्यामुळं रस्ता पूर्णपणे अडवला गेला.

केव्ही -१नं एकापाठोपाठ एक अनेक जर्मन टँक निकामी करण्यास सुरुवात केली. जर्मन सैन्यानंसुद्धा जोरदार प्रतिह*ल्ला केला. एक क्षण असा आला की केव्ही – १चा वरचा फिरणारा भाग अडकून पडला. लेफ्टनंट कोल्बोनोव्हनं त्याच्या ड्रायव्हरला दलदलीच्या बाहेर पडून चाकांचा वापर करण्यास सांगितलं. त्या दिवशी एकट्या केव्ही-१ नं जर्मनीचे तब्बल २१ रणगाडे उ*ध्वस्त केले. पहिल्या केव्हीचा दारूगोळा संपला म्हणून, लेफ्टनंट कोल्बोनोव्हनं इतर चार केव्हींना समोर आणलं. एकूण ५ सोव्हिएत रणागाड्यांनी ४६ जर्मन रणागाडे मातीत घातले होते.

कोल्बोनोव्हच्या पाच केव्हीच्या ताफ्यानं जर्मनांना रात्रभर त्रास दिला. मात्र, सकाळी जर्मन पायदळानं पूर्ण शक्तीनीशी ह*ल्ला केला. तेव्हा केव्हींना काढता पाय घेता आला असता. मात्र, ते शेवटपर्यंत लढले. सोव्हिएतच्या या रणागाड्यांनी तब्बल २२ तास जर्मन आक्र*मण थोपवून ठेवलं होतं.

दुसऱ्या महायु*द्धातील पूर्वेकडील आघाडी क्रू*रतेसाठी इतिहासात लक्षात ठेवली जाते. जर्मन आणि रशियन सैन्यानं एकमेकांच्या यु*द्धकैद्यांचा अमानुष छळ केल्याची अनेक उदाहरणं आहेत. मात्र, टँक ॲलीच्या या घटनेत एकदम याविरुद्ध घडलं.

सोव्हिएत केव्ही १ चा पराक्रम पाहून जर्मन्स देखील थक्क झाले होते. त्यांनी मृत रशियन टँकच्या क्रूला बाहेर काढलं आणि जवळच्या जंगलात संपूर्ण सन्मानानिशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले, अशी स्मृती जर्मन कर्नल राऊस यांनी लिहून ठेवलेली आहे.

दुसऱ्या महायु*द्धाची व्याप्ती प्रचंड होती. त्यात शौर्याच्या अनेक असामान्य घटना दडून बसलेल्या आहेत. अनेक सैनिकांनी आणि अधिकाऱ्या्ंनी आपल्या देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूचा सामना केला होता. मात्र, सोव्हितच्या केव्ही-१ची गोष्ट नक्कीच उच्च स्थानावर गणली जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

दुसरं महायु*द्ध होऊ नये यासाठी महात्मा गांधीजींनी हि*टल*रला पत्र लिहिलं होतं..!

Next Post

हा अमेरिकन सैनिक ना*झींविरोधात अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांकडून लढला होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

हा अमेरिकन सैनिक ना*झींविरोधात अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांकडून लढला होता

एका तळघरातून सुरू झालेली कंपनी जगातील सर्वात मोठी कुरिअर कंपनी बनली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.