The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१८१ सदस्य असलेलं जगातलं सगळ्यात मोठं कुटुंब तरीही गिनीज बुकमध्ये नोंदच नाही

by Heramb
4 September 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


वसुधैव कुटुम्बकम परंपरा जपणाऱ्या आपल्या देशात सध्यातरी एकत्र कुटुंब पद्धतीचा मात्र आभाव दिसत आहे. विशेषतः शहरी भागात एकत्र कुटुंब पद्धत फारशी दिसत नाही, पण भारताच्या ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धती आजही अविरतपणे सुरु आहे. भारताच्या अनेक गावांत आपल्याला मोठी कुटुंबं वाडा-सदृश वास्तूत राहताना दिसतात. जगातील सर्वांत मोठं कुटुंब असल्याचा विक्रमही भारतीयांच्या नावावर आहे. हे कुटुंब भारताच्या मिझोराम राज्यात आहे.

भारतातील झिओना याचं कुटुंब हे जगातील सर्वांत मोठं कुटुंब आहे. झिओना ‘लालपा कोहरान थार’ या ख्रिश्चन धर्मीय संप्रदायाचा नेता होता, लालपा कोहरान म्हणजे लॉर्ड्स न्यू जनरेशन चर्च. हा चर्च भारतातील मिझोराममधील बहुपत्नीत्वाचं पालन करणाऱ्या पंथाचा आहे. “जगातील सर्वात मोठे कुटुंब”  किंवा “जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख” म्हणून त्यांनी अनेकदा जागतिक विक्रम केला आहे. २००५ मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी पडताळणीसाठी आले असता प्रसिद्धी आवडत नसल्याने त्याने हा विक्रम नोंदवायला नकार दिला.

तरीही २०११ मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड अकादमीने त्यांना “जगातील सर्वात मोठे कुटुंब” म्हणून आपल्या यादीत समाविष्ट केले होते, त्यानंतर वॉल स्ट्रीट जर्नलनेही त्यांना “जगातील सर्वात मोठे कुटुंब” म्हणून त्यांची दखल घेतली. २०१९ मध्ये लंडन वर्ल्ड रेकॉर्डनेही त्यांची दखल घेतली. रिप्लिज’ बिलिव्ह इट वर नॉट’ या नियतकालिकवजा पुस्तकात २०११ च्या ११ सर्वांत विचित्र कथांमध्ये त्याची नोंद आहे. तसेच २०१३ च्या रिप्लिज’ बिलिव्ह इट वर नॉट ९ या पुस्तकातही झिओनाची नोंद आहे. 

झिओना ज्या चना पॉल सांप्रदायाचे नेतृत्व करीत होता तो ख्रिस्ती संप्रदाय त्याच्या आजोबांनी १९४२ साली खुआंगतुआहा येथे स्थापन केला. हा ख्रिस्ती संप्रदाय मिझोराम मधील सरचिप जिल्ह्यात आहे. १९६६ साली खुआंगतुआह चना यांच्या अधिपत्याखाली आले. तर १९९७ मध्ये झिओनाने त्याच्या वडीलांची म्हणजेच चलीनचाना यांची जागा घेतली, झिओनाला ३९ बायका, ८९ मुले, १४ सूना, ३३ नातवंडे आणि एक पतवंडं आहे; त्याच्या कुटुंबात एकूण १८१ सदस्य आहेत.



झिओनाचा जन्म २१ जुलै १९४५ रोजी मिझोरमची राजधानी आयझॉलच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या सेरचिप जिल्ह्यातील ह्मावंगकॉन गावात झाला. तो मिझो लोकांमध्ये ‘पु झिओना’ म्हणून लोकप्रिय होता आणि सामान्यतः स्थानिक माध्यमांव्यतिरिक्त इतर माध्यमांमध्ये ‘झिओना चाना’ म्हणून चुकीचे नाव दिले जाते. चलीनचाना, त्याचे वडील, चाना पाॅल या ख्रिस्ती संप्रदायाचे नेते होते. वयाच्या १७व्या वर्षी त्याने आपली पहिली पत्नी झ्याहंगीशी लग्न केले. झ्याहंगी त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी होती. झ्याहंगी झिओनाची मुख्य पत्नी असून कुटुंबातील घरगुती कामकाज सांभाळते.

झिओनाने जवळपास दीडशे सदस्यांच्या कुटुंबाला राहण्यासाठी चार माजली हवेली उभारली आहे. ही हवेली एखाद्या बोर्डिंग हाऊससारखी दिसते, यालाच ‘चुआन थार रन’ म्हणतात. म्हणजेच नव्या पिढीचे घर होय. गावात येणाऱ्या पाहुण्यांना राहण्यासाठी “खुआलबूक” (अतिथीगृह) देखील आहे.

त्याच्या लहान वयाच्या बायका याच मजल्यावरील त्याच्या खोलीच्या जवळच राहतात आणि दिवसभरात सात ते आठ बायका त्याच्या गरजा भागवत असत. त्याच्या सर्व जुन्या बायका हवेलीच्या पहिल्या मजल्यावर राहतात, त्यांच्यामध्ये कोणतेही वैर नाही असा त्याच्या सर्व बायकांचा दावा आहे. २००४ साली त्याने आपल्या शेवटच्या पत्नीसोबत लग्न केले, त्याच्या हयातीत त्याला एकूण किती बायका होत्या याची गणती नाही. २००५ पर्यंत त्याच्या ३ पत्नींचा मृत्यू झाला होता आणि काही बायकांनी त्याला सोडूनही दिले होते. 

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

झिओनाला २६ जावई आहेत आणि त्याच्या विवाहित मुली आपापल्या कुटुंबांसह स्वतंत्रपणे राहतात. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने आपल्या सर्व मुलांची आणि नातवंडांची नावे लक्षात ठेवली असून त्याला त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची नावं लक्षात असतात.

झिओनाचे कुटुंब स्वावलंबी आहे, त्यांच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी ते पिके घेतात. झिओनाने आपल्या मुलांसाठी एक शाळा देखील स्थापन केली आहे आणि त्याचा धाकटा भाऊ त्या शाळेचे सर्व कामकाज पाहतो. शाळेतील अभ्यासक्रम शासनाने ठरवल्याप्रमाणे जरी असला तरी त्याने त्याच्या चाना पंथाशी संबंधित काही विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत. स्थानिक, राज्य किंवा केंद्र सरकारकडून त्याने कोणतीही मदत घेतली नाही.

झिओनाच्या बायका स्वयंपाक करतात , त्याच्या मुली घराची स्वच्छता आणि कपडे धुण्याचं काम करतात. तर कुटुंबातील पुरुष पशुपालन, शेती, सुतारकाम तसेच ॲल्युमिनियमची भांडी तयार करणं इत्यादी कामं करतात.

वयाच्या ७५व्या वर्षी, झिओनाला उच्च रक्तदाब आणि मधुमेह असल्याचे समोर आले. ७ जून २०२१ रोजी तो गंभीररित्या आजारी पडला आणि ११ जून रोजी बेशुद्ध झाला. गंभीर अवस्थेत त्याला १३ जूनच्या दुपारी आयझॉल येथील ट्रिनिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर १० मिनिटांनी डॉक्टरांनी दुपारी ३ वाजता मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूबद्दल जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले.

जरी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचे नाव ‘सर्वांत मोठ्या कुटुंबाचा प्रमुख’ आहे असं म्हटलं जातं आणि याचाच प्रचारही होतो. याशिवाय सरकारी दस्तऐवजांमध्येही याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात मात्र तसे नाही. गिनीजमध्ये सर्वांत मोठ्या मानवी कुटुंबाचा कोणताही रेकॉर्ड नाही.

२००५ मध्ये १५ बायका आणि १०० पेक्षा जास्त मुलांसह, तो गिनीज रेकॉर्डसाठी पात्र होऊ शकला असता. २००७ मध्ये त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रविष्ट करण्यासाठी त्याच्याकडे प्रस्ताव देण्यात आला होता, परंतु अधिकार्‍यांनी त्याला भेट दिल्यावर त्याने त्याचे छायाचित्र घेण्यास नकार दिला.

२०११ मध्ये एका सी.एन.एन. पत्रकाराने त्याला याबद्दल विचारले असता प्रसिद्धी नको असल्याचे त्याने सांगितले. झिओनाच्या कुटुंबाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड अकादमीने “सर्वात मोठ्या कुटुंबासाठी” विश्वविक्रम म्हणून केली आहे.


संदर्भ: Who was Ziona Chana who married 39 women and had world’s largest family


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या ब्रिटिश अधिकाऱ्याने पहिल्या आधुनिक संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली होती

Next Post

राधाकृष्णन यांचं १६ वेळा साहित्य आणि ११ वेळा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालं होतं

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

राधाकृष्णन यांचं १६ वेळा साहित्य आणि ११ वेळा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालं होतं

एका चिम्पान्झीने निवडलेल्या शेअर्सनी ३६५.४ टक्के इतका परतावा दिला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.