The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रेट ली आणि भारताचं नातं फक्त क्रिकेट पुरतं कधीच मर्यादित नव्हतं..!

by द पोस्टमन टीम
7 November 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


२००३-०४ ची गोष्ट आहे. तेव्हा आमच्याकडं ब्लॅक ॲण्ड व्हाईट टीव्ही होता. बाबाला क्रिकेटचं वेड होतं आणि तेचं वारशानं माझ्याकडं देखील आलं. त्यामुळं क्रिकेटचा प्रत्येक सामना आम्ही न चुकता बघायचो. बाबाच्या कृपेनं तेव्हा मला क्रिकेट चांगल्या प्रकारे समजत होतं. कुठल्या देशाच्या जर्सीचा रंग कुठला आहे, वाईड बॉल, नो बॉल कसे पडतात, कुठला बॉलर सिमर आहे आणि कुठला स्पीनर या अशा गोष्टी मला समजत होत्या.

काही परदेशी खेळाडूसुद्धा माझ्या ओळखीचे झाले होते. कितीही नाही म्हटलं तरी मी तेव्हा लहानचं होते. जेव्हा कुणी विदेशी बॉलर आपल्या भारतीय खेळाडूची विकेट घेत असे तेव्हा मला प्रचंड चीड यायची. एका खेळाडूवर मात्र, माझा विशेष राग होता! तो खेळाडू होता त्या काळचा वेगाचा बादशाहा, ब्रेट ली. 

विकेट घेतल्यानंतर तो समोर येऊन जी सायकलच्या टायरमध्ये हवा भरल्यासारखी ॲक्शन करून आनंद साजरा करायचा, ते पाहून मला चीड येत असे. मात्र, जशी मी मोठी होत गेले, मला ब्रेटच्या खेळाचा दर्जा समजला. तेव्हा त्याच्या बद्दलचा सर्व राग आपोआप कमी झाला. त्यानं अशी अनेक कामं केली आहेत जी समजून घेतल्यानंतर तो नक्कीच आपल्या मनात घर करून जातो. भारताविषयी ब्रेटच्या मनात कायम आदराची भावना राहिली असल्याचं दिसतं.

क्रिकेटच्या मैदानाचा विचार केला तर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळला गेलेला प्रत्येक सामना ‘हायव्होल्टेज ड्रामा’ असतो. दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये बॉल-बॅट शिवाय शाब्दिक यु*द्धं देखील चांगलीचं रंगतात. मैदानावर असलेल्या या शत्रुत्वामुळं, एखादा ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीयांचा लाडका असल्याची किंवा खेळाडूला भारत प्रिय असल्याची बाब सहजासहजी पचनी पडणारच नाही. मात्र, ऑस्ट्रेलियन खेळाडू ‘ब्रेट ली’च्याबाबतीत या दोन्ही गोष्टी लागू होतात. 



भारतीयांचं त्याच्यावर आणि त्याचं भारतीयांवर मनापासून प्रेम आहे. क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटर्सला देवता समजल्या जाणाऱ्या भारतीयांच्या मनात ‘ब्रेट ली’नं आपली एक खास जागा निर्माण केली आहे. त्यामागे अनेक कारणं आहेत. भारतासोबत त्याच्या असलेल्या नात्याला अनेक पैलू आहेत. चला तर मग आपण त्यातील एक-एक पैलू उलगडून पाहुया..

२०२०-२१ साली संपूर्ण जगभरात कोविडचं संकट होतं. प्रत्येक देश आपापल्या परीनं या संकटाशी सामना करत होता. भारताचा विचार केल्यास भारताची परिस्थिती नाजूक होती. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली. या गोष्टीपासून ब्रेट ली अनभिज्ञ नव्हता.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

आपला आवडता देश संकटात असताना मदत न करता शांत बसेल तो ब्रेट कसला. त्यानं एप्रिल २०२१ मध्ये कोविड विरुद्ध लढ्यासाठी भारताला एक बिटकॉइन (अंदाजे 40 लाख रुपये) देण्याचा निर्णय घेतला. याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यानं एक भावनिक ट्विट केलं होतं.

‘भारत नेहमीच माझ्यासाठी अगदी दुसऱ्या घराप्रमाणं आहे. माझ्या व्यावसायिक कारकिर्दीत आणि निवृत्तीनंतरही भारतीयांनी प्रेम आणि आपुलकीनं वागवलं आहे. त्यामुळं या देशासाठी माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. सध्या देश कोविडसारख्या संकटाचा सामना करत आहे. त्यामुळं ऑक्सिजन खरेदीसाठी मी काही मदत करू इच्छित आहे’, असं हे ट्विट होतं.

अशा प्रकारे भारताला मदत करण्याची ही काही त्याची पहिलीच वेळ नव्हती. गेल्या कित्येक वर्षांपासून तो भारतातील गरजू आणि गरिब मुलांना संगीत शिकवण्यासाठी काम करत आहे. संगीतामध्ये एक प्रकारची ‘हिलींग पॉवर’ असते, या मताचा ब्रेट ली आहे. 

त्यानं २००७ साली भारतात ‘मेउसिक'(Mewsic) नावाची एक संस्था सुरू केली आहे. ही संस्था भारतातील उपेक्षित मुलांच्या उपचार आणि सक्षमीकरणासाठी काम करते. याशिवाय त्यांना संगीताचे धडे देखील देते. ‘ब्रेट ली’च्या संस्थेची भारतभर सहा संगीत केंद्रं आहेत.

लहान मुलांना संगीत शिकवण्यासाठी पुढाकार घेणारा ब्रेट ली स्वत: देखील उत्तम संगीतकार आणि गायक आहे. ‘Six & Out’ नावाचा त्याचा स्वत:चा एक रॉक बँड आहे. त्याच्या बँडमध्ये त्याचा भाऊ शेन ली आणि न्यू साउथ वेल्सचे क्रिकेटपटू ब्रॅड मॅकनमारा, गेविन रॉबर्टसन आणि रिचर्ड ची क्वी यांचा समावेश आहे. ब्रेट बँडमध्ये बास गिटार किंवा अकाउस्टीक गिटार वाजवतो.

२००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान भारतात ब्रेट लीनं अष्टपैलू भारतीय गायिका आशा भोसले यांच्यासोबत एक गाणं देखील गायलं आहे. ‘यू आर द वन फॉर मी’ नावाचं हे गाणं त्यानेचं लिहिलं होतं. हे गाणं रिलीज झाल्यानंतर भारतातील आणि दक्षिण आफ्रिकेतील हिट गाण्यांच्या चार्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलं होतं.

भारतीय सिनेमा जगभरात प्रसिद्ध आहे. क्रिकेट आणि बॉलीवूडचे संबंध तर फार जुने आहेत. मग त्यापासून ब्रेट ली तरी कसा दूर राहिल. २००४ पासून ब्रेट ली बॉलीवूडशी जोडला गेला आहे. त्यावर्षी सिंगापूर येथे झालेल्या आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्यासाठी ब्रेट ली उपस्थित राहिला होता. बॉलीवूडकरांनी त्याचं मोठ्या आपुलकीनं स्वागत केलं होत. इतकंच नाही तर त्याच्या हातून डिंपलगर्ल प्रीटी झिंटाला पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी कोणी कल्पनाही केली नसेल भविष्यात प्रीटीच्याचं संघाकडून ब्रेट आयपीएल खेळेल.

त्यानंतर त्याने सीमी गरेवालच्या टॉक शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. २००९ मध्ये ‘ब्रेट ली’ नं अभिनेता हरमन बावेजाच्या ‘व्हिक्टरी’ या क्रिकेटवरील चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती.

प्रत्यक्ष आयुष्यात भारताशी असलेलं नातं त्यानं चित्रपटांच्या माध्यमातून देखील जपलं आहे. २०१५ मध्ये त्यानं ‘अनइंडियन’या ऑस्ट्रेलियन चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यासोबत तनिष्ठा चॅटर्जी आणि सुप्रिया पाठक यांनी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाला भारतीयांनी उत्स्फुर्तपणे दाद दिली. 

अभिनयाशिवाय ‘ब्रेट ली’नं भारतात मॉडेलिंग देखील केलं आहे. ऑक्टोबर २००९ मध्ये मुंबई फॅशन वीकमध्ये रॅम्पवर त्यानं आपला जलवा दाखवला होता. ‘सेव गर्ल चाईल्ड’ या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी त्याने डिझायनर संजना जोनसाठी रॅम्पवॉक केला होता. याच शोनंतर त्यानं ‘पर्ल ब्रॉडकास्टिंग कोर्पोरेशन’च्या न्यूज चॅनेलसाठी त्याने ब्रॅड ॲम्बेसिडर म्हणून करार केला होता. याशिवाय रॉक एनर्जी ड्रिंक आणि फार्माकेयर या भारतीय कंपन्यांसोबतही करार केला होता.

अनेक भारतीय गोष्टींचा दिवाना असेलेला ब्रेट ली भारतीय खाद्यसंस्कृतीचा मोठा चाहता आहे, विशेषत: बटर चिकनचा. एकदा एका कार्यक्रमात त्यानं जाहिरपणे भारतीय पदार्थांबद्दलचं त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं. एखाद्याने सामन्यात: चांगली कामगिरी केली असेल तर ती साजरी करण्यासाठी बटर चिकन आणि बिअरसारखा दुसरा पर्याय नाही, असं ब्रेट म्हणाला होता. भारतीय खाण्याच्या प्रेमापायीच त्यानं आपल्या ‘फ्युजन कॉफी ॲण्ड बुक शॉप’मध्ये अनेक भारतीय पदार्थ ठेवले आहेत. 

याशिवाय फक्त भारतीय पदार्थ मिळणारं एक रेस्टॉरंट देखील तो चालवतो. एकदा त्याचा मॅनेजर म्हणाला होता, ‘भारताबद्दलची कुठलीही लहान-मोठी गोष्ट असू द्या, ब्रेट भारतात येण्यासाठी तयारच असतो. त्याला भारतात येण्यासाठी फक्त कारण पाहिजे असतं’. यावरून आपण कल्पना करू शकतो. ‘ब्रेट ली’सारख्या सर्वोत्तम खेळाडूच्या मनात आपल्या भारताविषयी किती प्रेम आणि आदर आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

स्टीव्ह जॉब्स आणि झुकरबर्ग दोघांनी करियरच्या सुरुवातीला निम करोली बाबांचा आशीर्वाद घेतला होता

Next Post

पौराणिक कथांना मूर्त रुप देणारा दक्षिण भारतीय उत्सव ‘गोलू’

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

पौराणिक कथांना मूर्त रुप देणारा दक्षिण भारतीय उत्सव ‘गोलू’

अणुबॉ*म्बचा जनक असलेल्या ओपेनहायमरने आपल्या गुरुला विष द्यायचा प्रयत्न केला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.