The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माशा मारण्याच्या पंख्यामुळे दोन देशांमध्ये संघर्ष पेटला होता आणि तो तब्बल ७३ वर्षे चालला!

by द पोस्टमन टीम
19 October 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आजवर जगाच्या इतिहासात अगणित ल*ढाया झाल्या आहेत. काहींची कारणं गंभीर होती तर काहींची निव्वळ शुल्लक. एखाद्या राज्यानं दुसऱ्या राज्याचा काही भाग काबिज केला म्हणून यु*द्धं झाली. एखाद्या राजानं दुसऱ्या राजाची मुलगी पळवली म्हणून यु*द्धं झाली, तर एखाद्या राजानं दुसऱ्या राजाच्या राजकुमाराचा खू*न केला म्हणूनही यु*द्धं झाली आहेत.

मात्र, जगाच्या इतिहासात एक असं यु*द्ध देखील झालं आहे, ज्याला एक निर्जीव ‘फ्लाय स्वॅटर’ (माशा मारण्याचा पंखा) कारणीभूत आहे! ही अजिबात अतिशयोक्ती नाही. एका फ्लाय स्वॅटरमुळं फ्रान्स आणि अल्जेरिया या दोन देशांमध्ये संघर्ष पेटला होता आणि कहर म्हणजे तो तब्बल ७३ वर्षे चालला! कित्येक निष्पाप लोकांसाठी जीवघेणा ठरलेला हा संघर्ष नेमका होता तरी काय, हे आपण जाणून घेऊया…

एक ‘फ्लाय स्वॅटर’ या प्रदीर्घ संघर्षासाठी कसा कारणीभूत ठरला यामागची गोष्ट मोठी रंजक आहे. १७९५-९६ साली फ्रेंच रिपब्लिकनं अल्जीयर्समधील दोन ज्यू व्यापाऱ्यांसोबत फ्रेंच सैन्यासाठी गहू खरेदी करण्याचा करार केला होता. अल्जीयर्स डेलीकचा शासक हुसेन डे याच्याकडून या व्यापाऱ्यांनी अगोदर कर्ज घेतलेलं होतं.

जोपर्यंत फ्रान्स धान्याचे पैसे देत नाही तोपर्यंत व्यापारी हुसेन डेचं कर्ज भरण्यास असमर्थ होते. ही देवाण-घेवाण लवकर मार्गी लागावी यासाठी हुसेन डेनं फ्रेंच कॉन्सुल पियर डेवाल याच्याशी वाटाघाटी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर डेवालचा भाचा अलेक्झांड्रेनं ‘बॉन’ आणि ‘ला चाला’मधील फ्रेंच स्टोअरहाऊसेस मजबूत करून हुसेन डेला आणखी डिवचलं.

२९ एप्रिल १८२७ रोजी पियर डेवाल आणि हुसेन डे यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत डेवालनं डेला अपमानास्पद वागणूक दिली आणि त्याच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देखील दिली नाहीत. या प्रकारानं संतपालेल्या डेनं आपल्या फ्लाय स्वॅटरनं फटका मारला.



या प्रकरणानंतर फ्रान्समध्ये वातावरण तापलं. डेनं डेवालची माफी मागावी, अशी मागणी फ्रान्सनं केली आणि सरळ-सरळ अल्जीयर्स बंदराची नाकाबंदी सुरू केली. ही नाकाबंदी तीन वर्षे चालली. मात्र, या नाकाबंदीमुळं अल्जीयर्सबरोबर व्यवसाय करण्याऱ्या फ्रेंच व्यापाऱ्यांचं नुकसान झालं. त्यामुळं १८२९ साली फ्रान्सनं नमतं घेऊन वाटाघाटीचा प्रस्ताव घेऊन आपला एक राजदूत डेकडं पाठवला. डे माघार घेण्यास तयार नव्हता. उलट त्यानं नाकाबंदी करणाऱ्या एका फ्रेंच जहाजावर तोफेचा मारा केला. यानंतर मात्र, फ्रेंचांनी माघार न घेण्याचं ठरवलं.

राजदूत भेटीच्या अपयशानंतर, चार्ल्सनं ज्युल्सचा अध्यक्ष म्हणून प्रिन्स डी पॉलिग्नॅक या एका कट्टर परंपरावादीची नियुक्ती केली. पॉलिग्नॅकनं उत्तर आफ्रिकन देशांमध्ये फुट पाडण्याच्या हेतून इजिप्तच्या मुहम्मद अलीशी बोलणी सुरू केली. अली, ऑटोमन्सचा एक अधिकारी होता त्यानं पॉलिग्नॅकचे प्रस्ताव नाकारले. दरम्यान फ्रान्समध्ये पॉलिग्नॅक आणि किंग चार्ल्सच्या विरोधात असंतोष वाढू लागला होता. जर अल्जीयर्सवर फ्रान्सचं वर्चस्व निर्माण केलं तर लोकांचे मत पुन्हा आपल्या बाजूनं वळेल, असा विचार किंगनं केला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

राजाकडून आदेश मिळाल्यानंतर ॲडमिरल डुपेरीनं ६०० जहाजांच्या ताफ्याची कमांड घेतली आणि अल्जीयर्सकडे कूच केलं. नेपोलियननं १८०८ साली अल्जेरियावर ह*ल्ल्याची एक योजना केली होती. त्या योजनेचा आधार घेऊन जनरल डी बोरमोंटसुद्धा १४ जून १८३० रोजी ३४ हजार सैनिकांना घेऊन अल्जीयर्सच्या पश्चिमेला २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या सिदी फेरूच या ठिकाणी उतरला.

फ्रेंचांना सामोरे जाण्यासाठी, हुसेन डेनं ७ हजार जेनिसरीज् (ऑटोमन सैन्याचा प्रकार), कॉन्स्टँटाईन व ओरानच्या बेमधून १९ हजार सैन्य आणि सोबतीला १७ हजार कबाल (उत्तर अल्जेरियातील एक जमात) पाठवले होते. फ्रेंचांनी आपल्या उत्कृष्ट तोफखाना आणि चांगल्या संघटन कौशाल्याच्या बळावर किनारी भागात एक मजबूत फळी तयार केली आणि अल्जीयर्सच्या दिशेनं वाटचाल सुरू ठेवली.

१९ जून रोजी फ्रेंचांनी स्टॉउलीच्या यु*द्धात हुसेन डेच्या सैन्याचा पराभव केला आणि तीन आठवड्यांच्या मोहिमेनंतर ५ जुलै रोजी अल्जीयर्समध्ये प्रवेश केला. हुसेन डेनं स्वातंत्र्याच्या बदल्यात त्याच्या वैयक्तिक संपत्तीचा ताबा फ्रान्सला देण्याची तयारी दर्शवली. फ्रान्सनं ही गोष्ट मान्य केली. त्यानंतर हुसेन डे आपल्या कुटुंबासह नेपल्समध्ये निघून गेला. तुर्कीच्या जेनिसरींनी देखील प्रदेश सोडला आणि तुर्कीला रवाना झाले. डेच्या जाण्यानं अल्जियर्समधील ३१३ वर्षांच्या ऑटोमन राजवटीचा अंत झाला.

फ्रेंच कमांडनं अल्जियर्समधील रहिवाशांचं स्वातंत्र्य, मालमत्ता आणि धार्मिक स्वातंत्र्य जपण्याची सहमती दर्शविली होती मात्र, ती नाममात्र असल्याचं लवकरच सिद्ध झालं. फ्रेंच सैन्याने ताबडतोब शहर लुटणं, क्षुल्लक कारणास्तव लोकांना अटक करणं, त्यांची मालमत्ता जप्त करणं आणि धार्मिक स्थळांची अवहेलना करणं सुरू केलं. ऑगस्टच्या मध्यापर्यंत तर पूर्ण शहर लुटण्यात आलं होतं. या लुटीच्या दरम्यान साधारण पाच कोटी फ्रेंच सैनिकांनी केवळ स्वार्थासाठी यु*द्धाचा कालावधी लांबवल्याचा अंदाज इतिहासकारांनी व्यक्त केलेला आहे.

यासंदर्भात १८३३ साली एका फ्रेंच कमिशननं लिहिलेलं पत्र समोर आलेलं आहे. “आम्ही साध्या संशयावरून अनेकांचा जीव घेतला आहे. निरपराध आणि चांगले आचरण असलेल्या लोकांची क*त्तल केली आहे… आम्ही रानटीपणालाही मागं टाकलं आहे”, असा मजकूर या पत्रात आहे. यावरून अल्जियर्समधील परिस्थितीचा आपल्याला अंदाज लावता येऊ शकतो.

अल्जियर्समध्ये फ्रेंच वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वापरल्या गेलेल्या पद्धतीमुळं मोठ्या प्रमाणात नर*संहार झाला. यु*द्ध, दुष्काळ आणि रोग यामुळे अंदाजे ३० लाख अल्जेरियन लोकांपैकी ५ ते १० लाख लोकांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणाचा फ्रेंच व्यापारी आणि स्थानिक लोकांमधील भविष्यातील संबंधांवर देखील मोठा परिणाम झाला.

या दरम्यान फ्रान्समध्ये चार्ल्सला (दहावा) पदच्युत केलं गेलं होतं आणि त्याचा चुलत भाऊ लुईस फिलिप याला ‘सिटीझन किंग’ म्हणून घटनात्मक राजेशाहीचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं. नवीन सरकार जुन्या राजवटीने सुरू केलेल्या धोरणाचा पुरस्कार करणार नव्हतं. त्यांनी त्याठिकाणी वसाहतवादाला सुरुवात केली. तरी देखील १९०३ पर्यंत अनेक लहान-मोठे संघर्ष अल्जियर्समध्ये निर्माण झाले. १९०३ साली फ्रान्सनं अल्जेरियातील ‘केल अहागर’चं राज्य जिंकून या संघर्षावर पूर्व विराम लावला.

अशा प्रकारे एका क्षुल्लक वाटणाऱ्या फ्लाय स्वॅटरच्या फटक्यानं अल्जेरियाच्या इतिहासामध्ये मोठा गोंधळ माजवला होता. हुसेन डेनं वेळीच आपल्या रागाला आवर घातला असता तर कदाचित आज अल्जेरियाची परिस्थिती वेगळी असती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या ब्रिटिश अधिकाऱ्याने पेरियार नदीवर धरण बांधलं आणि मद्रास प्रांताचा दुष्काळ कायमचा संपला

Next Post

इंग्रजी कौन बनेगा करोडपतीमध्ये ‘चीटिंग’ करून जिंकला आणि आर्मीतून बेदखल झाला

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

इंग्रजी कौन बनेगा करोडपतीमध्ये 'चीटिंग' करून जिंकला आणि आर्मीतून बेदखल झाला

या ब्रिटिश संशोधकामुळे भारतीय इतिहासातील कित्येक घटना प्रकाशात आल्या

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.