The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपल्या वेगाने फलंदाजांना घाम फोडणारा शॉन टेट दुखापतींमुळे अक्षरशः संपून गेला..!

by द पोस्टमन टीम
22 February 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


३१ जानेवारी २०१६ रोजी सिडनीमध्ये झालेला भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा टी -२० सामना क्रिकेटवेड्यांच्या नक्कीच लक्षात असेल. या सामन्यात अक्षरश: धावांचा पाऊस पडला होता. विराट कोहलीच्या, रोहित शर्माच्या अर्धशतकांनी आणि शेन वॉटसनच्या १२४ धावांच्या आतिषबाजीनं सिडनी उजळून निघाली होती.

संपूर्ण सामन्यावर फलंदाजांचं वर्चस्व राहिलं होतं. आशिष नेहरा, जसप्रित बुमराह, स्कॉट बोलँड, वॉटसन, शॉन टेट या दोन्ही बाजूच्या गोलंदाजांची पिसं निघाली होती. खेळ म्हटलं की असे प्रकार होतच राहतात, असा विचार करून खेळीमेळीत सामन्याचा निर्णय सर्वांनी स्विकारला.

मात्र, या गोलंदाजांपैकी एकजण नक्कीच खुश नव्हता. कसा असणार? तो त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना होता आणि त्यात त्याची आकडेवारी झिम्बाब्वेच्या अर्थव्यवस्थेइतकीच वाईट होती. ४ ओव्हर्समध्ये त्याने ४६ धावा दिल्या होत्या आणि ४ वाइड बॉल टाकले होते. ज्या गोलंदाजाला समोर पाहून भल्या भल्यांना भीती वाटत होती त्याच्या ‘वेगवान’ कारकिर्दीचा असा शेवट झाला होता. काहींना अंदाज आला असेल मी कुणाबद्दल बोलत आहे! हो तो शॉन टेटच होता! तोच शॉन टेट, जो कधीकाळी वेगवान गोलंदाजीचा अनभिषीक्त सम्राट होता.

शेवट जरी निराशजनक झाला असला तरी, शॉन टेटनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात मात्र, दणक्यात केली होती. १९ वर्षीय शॉन टेटला २००२-०३मध्ये गाबाच्या खेळपट्टीवर फॉलो थ्रू आणि स्लीन्गी ॲक्शनसह ज्यांनी खेळताना पाहिलं होतं त्यांच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकला होता. जास्तीत जास्त वेगात गोलंदाजी करण्याचा त्याचा आत्मविश्वास आणि भूक कमालीची होती. त्याचा प्रत्येक बॉल अगोदरच्या बॉलच्या वेगाशी सरळ स्पर्धा करत होता.

गाबाच्या मैदानावर क्विन्सलँडच्या तीन विकेट घेऊन त्यानं सिद्ध केलं होतं की, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भात्यामध्ये एक नवीन अस्त्र जमा होण्याची वाट पाहत आहे. आणि झालंही तसचं, जेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संधी मिळाली तेव्हा त्यानं आपल्या बॉलच्या वेगानं भल्याभल्यांना गार केलं. मात्र, यात त्याला सातत्य ठेवता आलं नाही. जसं ‘पछाडलेला’ चित्रपटात इनामदार, किरकिरे आणि बाब्याच्या भूतांनी भरतला पछाडलं होतं तसं सततच्या दुखापतींनी शॉन टेटला पछाडलं होतं. अन् त्याची तीव्रता इतकी होती की, फक्त टी २० सारख्या छोट्या फॉरमॅटमध्ये खेळण्यापर्यंत त्यानं स्वत:वर मर्यादा घातली तरी देखील फायदा झाला नाही.



शॉन टेटच्या आयुष्यात, मेडन ओव्हर्स किंवा त्याच्या गोलंदाजीवर मारलेल्या बाऊंड्रीज्-पेक्षा जास्त तर दुखापती असतील. पाठदुखी, पोटऱ्यांचे-मांडीचे स्नायू दुखावणं हे तर त्याच्यासाठी ‘रोजचं मढं त्याला कोण रडं’ या म्हणीप्रमाणं झालं होतं. त्यामुळंच त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द त्याच्या कामगिरीपेक्षा दुखापतींसाठी लक्षात ठेवली जाते. त्यानं मोठ्या कष्टानं वेगवान गोलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. त्याच्याकडे कमालीची क्षमता होती. तो अगदी सहजपणे आपल्या बॉलमध्ये स्पीड आणि बाऊन्स आणू शकत असे. त्यानं खेळलेल्या ५९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या वाट्याला ९५ विकेट आल्या.

व्यक्तीमध्ये असलेली प्रतिभा पूर्णपणे खुलून येण्यासाठी नियमित कष्ट आणि त्याची अंमलबजावणी आवश्यक असते. २७ मार्च २०१७ रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या शॉन टेटकडं या गुणांची कमतरता नव्हती. त्याच्याकडे वेग होता प्रचंड वेग होता. पण काही वेळा, त्याचे बॉल ऑफ-स्टंपच्या इतक्या बाहेर जात की, मधल्या जागेत एक इशांत शर्मा नक्की झोपेल!

टेट हा मायकेल क्लार्कच्या संघाचा महत्त्वाचा भाग मानला जाई. जेव्हा टेटनं पाकिस्तानच्या इम्रान फरहतला १६० किमी प्रती तासाच्या वेगाने बॉल टाकला तेव्हा क्लार्कनं त्याची उत्स्फुर्तपणे स्तुती केली होती. मात्र, जेव्हा पाठीच्या आणि पायाच्या स्नायूंच्या त्रासामुळे टेटला महत्त्वाच्या सामन्यांपासून दूर रहावं लागलं तेव्हा क्लार्कनं नाराजी देखील व्यक्ती केली होती. कारण जेव्हा टेट अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर होता तेव्हा त्याची कमतरता क्लार्कला नक्कीच जाणवायची.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

त्याच्या पदार्पणाच्या काही आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विचार केला तर, २००५च्या नॉटिंगहॅम येथील चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांच्या दिशेनं बॉल घेऊन गर्जना करत जाणारा टेट नजरेसमोर येते. भेदक गोलंदाजी करून त्यानं झटपट तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, कसोटीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यानं ‘बोनस’मध्ये दुखापत देखील मिळवली होती. त्याच्या पहिल्या किंवा शेवटच्या एकदिवसीय सामन्यांचा विचार केला तर, तिथेही फारशी वेगळी परिस्थिती नव्हती. टेटनं २००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं. एड जॉयस आणि इयान बेलवर त्यांनी अगदी तोफेच्या गोळ्यांप्रमाणं बॉल्सचा मारा केला होता. मात्र, सोबतचं त्यानं इंग्लंडला ६८ धावांची भेट देखील दिली होती.

कॅरेबियन बेटांवर २००७ साली झालेल्या विश्वचषक हा टेटचा सर्वोत्तम काळ होता. त्याने विश्वषचकातील ११ सामन्यांमध्ये २३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं सर्वोत्तम कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला सलग तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी मदत केली. व्हेरिएबल बाउन्स देणाऱ्या खेळपट्ट्यांवर त्यानं बहारदार गोलंदाजी केली होती. तो स्पर्धेचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला होता. 

ग्रोस आयलेटमधील उपांत्य फेरीच्या सर्वात महत्त्वाच्या सामन्यादरम्यान, टेट नावाच्या वादळानं दक्षिण आफ्रिकन संघाला थेट स्पर्धेबाहेरची वाट दाखवली. एबी डिव्हिलियर्सला बाद केल्यावर, त्याने सामन्याच्या निर्णायक टप्प्यात आक्रमक हर्षल गिब्सला पॅव्हेलियनमध्ये धाडलं. जरी हा सामना ऑस्ट्रेलियानं डकवर्थ-लुईस नियामाप्रमाणं जिंकला असला तरी टेटच्या कामगिरीमुळं आकड्यांची गणितं ऑस्ट्रेलियन बाजूनं फिरण्यास मदत झाली होती.

शॉन टेटकडं उंची, शक्ती आणि वेग या तिन्ही गोष्टी होत्या मात्र, त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात यश आलं नाही. एका वळवणार आल्यानंतर टेटनं स्वत:च क्रिकेटपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला अन् क्रिकेटनं त्याला सोडण्यापूर्वी टेटनं क्रिकेट सोडलं.  त्याची अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या कारकिर्दीत दुखापतींशी संघर्ष करणारा शॉन टेट आता अगोदरच तालिबानच्या दह*शतीत असलेल्या अफगाण गोलंदाजांना कसं मार्गदर्शन करतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सीमा सुरक्षा दलाने गायींची तस्करी रोखण्यासाठी त्यांना विशेष ओळखपत्र द्यायला सुरु केलंय

Next Post

मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश पोलिसांना मिशा ठेवण्यासाठी विशेष ‘भत्ता’ मिळतो..!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश पोलिसांना मिशा ठेवण्यासाठी विशेष 'भत्ता' मिळतो..!

जर्मनीनं ब्रिटनच्या या गँगस्टरलाच आपला हेर बनवलं होतं, त्यानेच त्यांचा घात केला..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.